कट्टा – BolBhidu.com https://bolbhidu.com विषय हार्ड Mon, 06 Apr 2020 09:51:27 +0000 en-GB hourly 1 https://wordpress.org/?v=5.3.2 https://i0.wp.com/bolbhidu.com/wp-content/uploads/2018/03/cropped-bol_bhidu-1.png?fit=32%2C32&ssl=1 कट्टा – BolBhidu.com https://bolbhidu.com 32 32 173639643 उन्हाळ्यात घरात अडकल्यावर आठवण येतेय लहानपणीच्या रसनाची ! https://bolbhidu.com/rasana-brand-story/ https://bolbhidu.com/rasana-brand-story/#respond Mon, 06 Apr 2020 09:51:27 +0000 https://bolbhidu.com/?p=21455

एप्रिल महिना सुरू झालाय. उन्हाळा प्रचंड तापलाय. कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे. डोक्यावरचा फॅन गरम हवा सोडतोय आणि घरातून बाहेर पडायची चोरी झालीय. उकाड्याने, तहानेने जीव व्याकुळ झालाय. दारुड्यांचं विशेष हाल होत आहेतच पण सोबत इतरांना साध्या कोल्ड्रिंक्सचे दर्शनदेखील दुर्मिळ झालंय. ऊसाचा रस, नारळ पाणी प्रत्येकाला मिळतंय अस नाही. लिंबू सरबतावर जोर दिला जातोय. त्यातच […]

The post उन्हाळ्यात घरात अडकल्यावर आठवण येतेय लहानपणीच्या रसनाची ! appeared first on BolBhidu.com.

]]>

एप्रिल महिना सुरू झालाय. उन्हाळा प्रचंड तापलाय. कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे. डोक्यावरचा फॅन गरम हवा सोडतोय आणि घरातून बाहेर पडायची चोरी झालीय.

उकाड्याने, तहानेने जीव व्याकुळ झालाय. दारुड्यांचं विशेष हाल होत आहेतच पण सोबत इतरांना साध्या कोल्ड्रिंक्सचे दर्शनदेखील दुर्मिळ झालंय.

ऊसाचा रस, नारळ पाणी प्रत्येकाला मिळतंय अस नाही. लिंबू सरबतावर जोर दिला जातोय.

त्यातच कोणी तरी डालगोना कॉफीचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला. अर्धा तास फेटून फेटून कष्टाने बनवलेल्या कॉफीने जिभेची चव बिघडून गेली.

अशावेळी आठवण आली रसणाची.

टीव्हीवरच्या आय लव्ह यु रसनाने सगळ्या बच्चे कंपनीला वेड लावलं होत. लहानपणी उन्हाळेसुट्टीत कुरडया पापड सोबतच घरात रसना बनवायचा कार्यक्रम व्हायचा.

रसनाच्या बॉक्सवर लिहिलेल्या रेसिपी प्रमाणे आई मस्त केशरी रसना बनवून बाटलीमध्ये भरून ठेवायची. कोणी पाहुणे आले तर त्यांना हा थंडगार रसना सर्व्ह व्हायचा.

आपली उन्हाळी सुट्टी रसनामुळे सुसह्य झाली होती हे खरे.

तर हा आपल्या सर्वांचा लाडका रसना बनला गुजरातमध्ये. तिथे खंबाटा नावाची पारशी फॅमिली आपला पिढ्यानपिढ्या चालत आलेला सोडा वॉटर चा बिझनेस सांभाळत होती.

त्यांच्या पैकीच एकाला हा फ्लेव्हरड सोडा बनवण्याची आयडिया सुचली.

1950 च्या दशकात जाफे या नावाने हा सोडा गुजरात मध्ये फेमस झाला. पुढे याच कुटुंबातील फिरोजशा खंबाटा यांनी हा ब्रँड नव्याने लाँच करायचं ठरवलं. साल होत 1976.

त्यांनीच याला नवीन नाव दिल, रसना

याच्या मार्केटिंगमध्ये देखील नावीन्य आणले होते. त्याकाळी मुद्रा नावाच्या जाहिराती कंपनीकडे याच्या जाहिरातीचं काँट्रॅक्ट देण्यात आलं. मोठ्या माणसांसाठी मार्केटमध्ये बरेच कोल्ड्रिंक्स उपलब्ध होते. रसना साठी लहान मुलांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं.

हीच ती फेमस आय लव्ह यु रसना कॅम्पेन.

अंकिता झव्हेरी नावाची गोड छोटी मुलगी या जाहीरातीच्या केंद्रस्थानी होती. तिची स्माईल, डोकं तिरक करून आय लव्ह यु रसना म्हणणं खूप लोकांना भावलं.

अमूल गर्ल, निरमा गर्ल नंतर रसना गर्ल भारतभरात फेमस झाली.

रसनेन काहीच दिवसात अख्ख्या भारतातील मार्केट काबीज केलं. रुआफझा, किसान वगैरे स्पर्धक कधीच मागे पडले पण याच बरोबर गोल्ड स्पॉट, थम्स अप, लिम्का यासारख्या सॉफ्ट ड्रिंक वाल्याना देखील धडकी बसली.

अगदी दोन लिमकाच्या दरात 32 ग्लास रसना मिळत असल्यावर कोण नाही म्हणणार?

रामायण महाभारत सिरीयल गाजू लागल्या. त्यातल्या भीमाला रसना वल्यानी जाहिरातीत वापरलं. एकावेळी 32 ग्लास पिणाऱ्या भिमाची तहानसुद्धा रसना शांत करते अशी ही ऍड फेमस झाली.

कपिल देव, करिष्मा कपूर अशा अनेकांनी रसनाची जाहिरात केली.

रसना गर्ल देखील बदलत गेल्या. पण रसनाची चव तीच राहिली.

नव्वदच्या दशकात जागतिकीकरणानंतर कोक, पेप्सी, फ्रुटी वगैरे अनेक ब्रँड आले. रसना त्यांनाही पुरून उरली.

ऑरेंज सोबतच मँगो वगैरे आणखी फ्लेवर रसनाने आणले होते. ते देखील गाजले. रसनाने हजारो कोटींच साम्राज्य उभा केलं.

विशेष म्हणजे आजही हा बिझनेस खंबाटा कुटुंबा तर्फे चालवला जातो.

पण दोन हजारच्या नंतर हळूहळू रसनाची क्रेझ कमी होत गेली. फक्त उन्हाळ्यातल ड्रिंक किंवा लहान मुलांच फेव्हरेट ड्रिंक म्हणून केलेली जाहिरात उलटा इफेक्ट करून गेली.

गेल्या काही वर्षापूर्वी रसनाने कात टाकली आणि नव्याने मार्केटमध्ये उतरली आहे. खिलाडी अक्षय कुमार त्यांचा ब्रँड अबेसिडर आहे.

बाकी काही का असेना आज कोरोनाच्या काळात घरात अडकून पडलेले जीव रसनाची खूप आठवण काढत आहेत हे नक्की.

हे ही वाच भिडू.

The post उन्हाळ्यात घरात अडकल्यावर आठवण येतेय लहानपणीच्या रसनाची ! appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/rasana-brand-story/feed/ 0 21455
आज आम्ही म्हणतो, काळजी घ्या डॉक्टर ! https://bolbhidu.com/open-letter-to-doctors-by-arvind-jagtap/ https://bolbhidu.com/open-letter-to-doctors-by-arvind-jagtap/#respond Sun, 05 Apr 2020 13:09:27 +0000 https://bolbhidu.com/?p=21426

लहानपणापासून पोलीस, वकील आणि डॉक्टर यांच्यापासून लांब राहण्याचं मार्गदर्शन प्रत्येक मुलाला होत असतं. भीतीपोटी. आपलं मुल गुन्हेगारीपासून, आजारापासून दूर रहावं हा विचार असतो. पण यात खूप गोष्टी राहून जातात. वकील आणी पोलिसांपासून सरसकट चार हात लांब राहण्याची मानसिकता खूप गोष्टी कळू देत नाही. कायदा, पोलिसांची मानसिकता, कुठल्या तणावात त्यांना काम करावं लागतं किंवा किती तोडक्या […]

The post आज आम्ही म्हणतो, काळजी घ्या डॉक्टर ! appeared first on BolBhidu.com.

]]>

लहानपणापासून पोलीस, वकील आणि डॉक्टर यांच्यापासून लांब राहण्याचं मार्गदर्शन प्रत्येक मुलाला होत असतं. भीतीपोटी. आपलं मुल गुन्हेगारीपासून, आजारापासून दूर रहावं हा विचार असतो. पण यात खूप गोष्टी राहून जातात. वकील आणी पोलिसांपासून सरसकट चार हात लांब राहण्याची मानसिकता खूप गोष्टी कळू देत नाही.

कायदा, पोलिसांची मानसिकता, कुठल्या तणावात त्यांना काम करावं लागतं किंवा किती तोडक्या मोडक्या सुविधा असताना ते वेळ आल्यावर थेट अतिरेक्यांशी लढतात हे सहज लक्षात येत नाही.

डॉक्टरच्या बाबतीतही तेच आहे. वारंवार एकच एक प्रश्न विचारला जाऊनही डॉक्टर कसे संयमाने वागतात, त्यांच स्वतःचं आयुष्य कितीवेळा धोक्यात असतं या गोष्टी कळतही नाहीत.

या कोरोनाच्या काळात सतत डॉक्टर्सचे फोटो बघतोय. बातम्या ऐकतोय. जीवावर उदार होऊन, पुरेशा सुरक्षेच्या वस्तू नसतानाही तुम्ही किती जवाबदारीने संकटाशी लढताय हे बघून तुमच्याबद्दलचा सामान्य माणसाचा आदर खूप वाढलाय.

अर्थात दवाखाने बंद करून बसलेलेही काही डॉक्टर आहेत. पण तो त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. अर्थात इमर्जन्सी नसताना प्रत्येकाने विनाकारण दवाखाना उघडा ठेवायची काही गरज नाही. खरं सांगू डॉक्टर तुम्ही ज्या निष्ठेने काम करताय त्याबद्दल कौतुक केलच पाहिजे तुमचं. खरतर पांढरा रंग शरणागतीचा म्हणूनही ओळखला जातो. पण पांढरा ॲप्रन घातलेल्या डॉक्टरपुढे येताना भले भले शरण आलेले असतात.

जग विकत घेऊ शकतो अशी गुर्मी असणारे लोक चहात चमचाभर साखरसुद्धा तुम्हाला विचारून घेतात. एखाद्या लहान मुलाने आईकडे बघावं तसं तुमच्याकडे बघतात माणसं.

तुमच्या डोळ्यातला किंचितसा विश्वास पण जगण्याचं बळ देणारा असतो. तुमच्या शब्दातला आश्वासक स्वर औषधाएवढाच प्रभावी असतो. पोटातच मुल अडून बसलय अशा वेदना होत असलेल्या बाईने केवळ तुम्ही सुटका केली म्हणून बाळाला तुमचच नाव ठेवलेलं पाहिलय.

यशस्वी ऑपरेशननंतर आपलं पुढचं आयुष्य डॉक्टरने उधार दिलेलं आहे असं म्हणत कोरा चेक समोर करणारे पण पाहिलेत. पण डॉक्टरवर हल्ला करणारी माणसं कधी डोळ्यांनी पाहिली नाही. ही माणसं या जगात आहेत ती कुणामुळे आहेत? ते कधी दवाखान्यात गेले नव्हते का? त्यांचा जन्म गर्भात झालाय का गटारात ?

भाषा वाईट वाटेल. पण अशा माणसांसाठी चांगले शब्द शोधूनही सापडत नाहीत. थुंकणारी माणसं, नर्सला त्रास देणारी माणसं, आरोग्यसेवकांना एरियात आले म्हणून मारहाण करणारे लोक माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाहीत. मुळात आम्ही असे लोक आहेत यावर चर्चा करत बसलोय. या लोकांना किती आणि कशी शिक्षा झालीय हे सरकारने सगळ्या देशाला दाखवून दिलं पाहिजे.

सगळा देश न सांगता टाळ्या वाजवेल. डॉक्टर खरतर कौतुक आणी द्वेष या गोष्टीच्या तुम्ही खूप पुढे निघून गेला आहात. लोक कोरोनाविरोधात उपाय म्हणून स्वतःच्याच मनाने गोमुत्र पार्टी करू लागले आणि आजारी पडले तेंव्हा तुम्ही वैतागला असाल. मागे तुमचं कौतुक करण्यासाठी थाळ्या वाजवता वाजवता लोक गरबा खेळायला लागले, रस्त्यावर मिरवणुका काढायला लागले तेंव्हा तुम्ही डोक्यावर हात मारून घेतला असेल.

पुन्हा कधी तुम्हाला अशा कौतुकाची इच्छा होईल असं वाटत नाही. तसेही या संचारबंदीत राजरोसपणे फिरता यावं म्हणून तुमच्याकडे आजारी असल्याचं खोटं प्रमाणपत्र मागणारे पण असतील. उगाच औषध द्या, बरं वाटत नाही म्हणून येणारे पण असतील. सहा महिन्याआधी डोळ्याचं ऑपरेशन करा म्हणून सांगितल असेल तर आता वेळ आहे म्हणून ऑपरेशन करा म्हणून मागे लागणारे असतील. एका पेशंट सोबत चार चार लोक असतील. असे उदाहरण कमी नाहीत.

पण तरीही आम्ही या संकटात एक शिकलोय. जात पात देव धर्म सगळं एकीकडे राहतं. आरोग्याच्या संकटात मदतीला असतात फक्त डॉक्टर. लाईफलाईनचे त्रिकोण महत्वाचे असतात. ती रेषा सरळ होऊ नये हे महत्वाचं असतं.

कुठल्याच धर्माची प्रार्थना उपयोगी नसते. फक्त छातीत धडधड आवाज येत राहणं महत्वाचं वाटतं. जगातल्या कुठल्याही प्रार्थनेपेक्षा तो ह्रदयाच्या ठोक्यांचा आवाज जास्त प्रेरणा देणारा वाटू लागतो. श्रद्धा महत्वाची असते. पण ती मनात. बायपास किंवा मेंदूची शस्त्रक्रिया कुठल्याच धर्मग्रंथांत नसते. धर्म फक्त एकच शिकवतो. जे चांगलं आहे त्याचा मान राखायचा. कौतुक करायचं. त्याच्या पाठीशी उभं रहायचं.

प्रत्येक संकटात तुम्ही तुमचा आरोग्यसेवेचा धर्म पाळता हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. सामान्य माणसाच्या असतात तशा तुमच्याही स्वतःच्या श्रद्धा असतात. अगदी हिप्पोक्रॅटीसचा पण ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता म्हणे. माणसाची कशावर ना कशावर श्रद्धा असते.

पण एकेकाळी ती एवढी टोकाची होती की आपल्याच देशात देवीचा आजार झालेल्या पेशंटच्या अंगात देवी आली म्हणून त्याच्या पाया पडायचे लोक. मुल जन्माला आलं की देवाला बोकड द्यायचे.

ज्युलियस सीझरच्या जन्माच्या वेळी त्याला थेट पोटातून काढायची वेळ आली आईच्या. म्हणून पुढे तशा ऑपरेशनला सीझर म्हणू लागले म्हणे.

पण बाकी बायकांना परदेशात सीझर करायला खूप काळ बंदी होती. ऑपरेशनच्या वेळी बायकांना भूल द्यायला पाश्चात्य देशात विरोध होता. तिकडे ग्रीसमध्ये थेट देवाच्या पायाशी ठेऊन द्यायचे पेशंटला एकेकाळी. आपोआप बरा होईल म्हणून. अगदी इंग्लंडमध्ये अंगात सैतान आला म्हणून कित्येक मानसिक रुग्णांना मारलं जायचं.

अशा भयंकर परिस्थितीत लोकांचा औषधावर आणी वैद्यकशास्त्रावर विश्वास निर्माण करत डॉक्टरांनी जग इथपर्यंत आणलय. स्वतः शिकत. इतरांना शिकवत. आज आश्चर्य वाटेल पण सुरुवातीला डॉक्टरांनाच हात धुवायला सांगावं लागलं. हात अस्वच्छ असल्यावर पेशंटला आजार होऊ शकतो हे माहीतच नव्हतं. नंतर स्वच्छता लोकांना सांगायला लागले.

पण आजही एवढ्या वर्षानंतर आपल्याला लोकांना रस्त्यात थुंकू नका हे सुद्धा सांगावं लागतय. हे अगदी कौटिल्याने पण सांगून ठेवलय. आणि घाण करणाऱ्या लोकांना दंड करा म्हणून पण सांगितलय. उत्खननात आपल्या देशात पूर्वी संडासची भांडी वापरायचे हे सिध्द होतं. मग मधल्या काळात लोक विसरून गेले का? रेल्वे फक्त रुळाच्या कडेला टमरेल घेऊन बसायला असते असं वाटतं काही लोकांना. मग नित्यनेमाने साथीचे आजार सुरु होतात.

डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून पेशंट तपासत राहतात. साधे डॉक्टरचे आभार मानायचे पण कित्येकांच्या ध्यानात येत नाही. उलट लोक पावसाळ्यात डॉक्टरांची मजा असते म्हणतात. टेस्ट करायला लावल्या तर लुटतात असं म्हणतात. डॉक्टर टेस्ट न करता तुम्हाला काही झालं नाही म्हणाले तर डॉक्टर चांगला नाही म्हणतात. लक्ष देत नाही.

खूप लोकांना तर छान गप्पा मारणारे डॉक्टर चांगले वाटतात. कमी पैसे घेतले तर डॉक्टर मोठा वाटत नाही. जास्त पैसे घेतले तरी बोंब. डॉक्टर आणि पेशंटचं नातं शेजाऱ्यासारखं होत जातं. तुझ्यावाचून करमेनाच्या पुढची स्टेज असते या नात्यात खुपदा. पण डॉक्टर घरचा माणूस होऊन जातो नेहमीच. आपल्या देशात एकूणच आपण कौतुक करण्याच्या बाबतीत थोडे हात आखडताच घेतो.

पण अशा संकटकाळात तुमच्यासारख्या लाखो डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय. मेडिकल दुकानदार आणि सगळे आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले पाहिजेत.

कोरोना आज आहे. उद्या नसेल. नसेल हे फक्त तुमच्या भरवशावर सांगू शकतो. उद्या माणसं सुरक्षित असतील ती फक्त आम्ही स्वतः घेतलेल्या काळजीनेच नाही तर तुम्ही घेतलेल्या कष्टाचा पण त्यात खूप मोठा वाटा आहे.

तबलीगी सारख्या काही धर्मांध लोकांनी कोरोनाचं संकट मोठं करायला हातभार लावला. धर्माचा प्रचार करायला मशिदीत जमलेल्या हजारभर लोकांनी जगभर आपला धर्म बदनाम करून ठेवला. माणुसकीचा विचार प्रबळ असला की धर्माचा प्रचार करायची गरज पडत नाही. देश संकटात असताना नियम पाळायचे सोडून मशिदीत जमल्यावर काय मिळेल? फक्त रोगच मिळणार.

प्रत्येक माणसाने अशा संकटात तरी हा धडा घेतला पाहिजे. सध्या धार्मिक स्थळी गर्दी कराल तर फक्त कोरोनाची साथ आहे. तिथून त्यांच्या देवाने त्यांना थेट उचलून घेतलं असतं तर कुणी आक्षेप घेतला नसता. एका शब्दाने विचारलं नसतं. पण नंतर हे धर्मांध मूर्ख समाजात मिसळतात, दवाखान्यात येतात. म्हणून त्रास होतो. समाजाला. देशाला. धर्माला.

करोडो लोक मूठभर लोकांना वठणीवर आणायचं काम करू शकत नसले की  मूठभर लोक करोडोंना आणि करोडोंच्या धर्माला बदनाम करतात. धर्मातल्या चुकीच्या गोष्टीला निर्भीडपणे नाव ठेवणारी माणसं ज्या धर्मात असतात तो धर्म कधी खतरेमे नसतो.

बाकी ज्या त्या धर्माच्या लोकांनी ठरवायचं. सगळीकडे नमुने आहेत. कुठे चिमुटभर. कुठे मूठभर. देव देव करायला आयुष्य पाहिजे असेल तर डॉक्टर नावाचा देवदूत सुरक्षित आणि समाधानी असला पाहिजे. हे डोकं जागेवर असलेल्या प्रत्येकाला कळतय. तरी काही आहेतच. ज्यांना अजूनही कळत नाही. या अशा मोजक्याच फालतू लोकांसह तुम्ही सगळ्यांना समजून घेताय, काळजी घेताय त्याबद्दल आम्ही सगळेच मनापासून आभारी आहोत डॉक्टर!

कधी कारण नसताना तुम्हाला फोन केला किंवा भेटायला आलो तर दचकून जाऊ नका. तुमचे आभार मानायचेत. आजारी नसताना डॉक्टरला भेटणारी माणसं असतात तो समाज जास्त निरोगी असतो.

नेहमी नेहमी डॉक्टरच म्हणतात. आज आम्ही म्हणतो, काळजी घ्या डॉक्टर! स्वतःचीसुद्धा. धन्यवाद.

  •  लेखक : अरविंद जगताप 

हे ही वाचा.

The post आज आम्ही म्हणतो, काळजी घ्या डॉक्टर ! appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/open-letter-to-doctors-by-arvind-jagtap/feed/ 0 21426
ज्याला बघून लहान मुले टरकायची तो WWF चा केन सध्या कुठाय? https://bolbhidu.com/kane-knox-county-mayor-corona/ https://bolbhidu.com/kane-knox-county-mayor-corona/#respond Sat, 04 Apr 2020 13:25:57 +0000 https://bolbhidu.com/?p=21403

कोरोनाच्या महामारीमुळे सगळ्या जगावर लॉकडाऊन होण्याची पातळी आली आहे. नेटफ्लिक्स आणि प्राईमचा पण कंटाळा आलाय. दूरदर्शनवर रामायण महाभारत सुरू झालंय आणि शक्तिमान सुरू होईल अशी शक्यता आहे. परवा असच टीव्हीवर जगभरातल्या कोरोनाच्या बातम्या बघत बसलो होतो तेव्हा अमेरिकेच्या एक महापौर कोरोना संदर्भात आपण काय काळजी घेतोय या बद्दल अभ्यासपूर्ण माहिती देताना दिसत होते. राहून राहून […]

The post ज्याला बघून लहान मुले टरकायची तो WWF चा केन सध्या कुठाय? appeared first on BolBhidu.com.

]]>

कोरोनाच्या महामारीमुळे सगळ्या जगावर लॉकडाऊन होण्याची पातळी आली आहे. नेटफ्लिक्स आणि प्राईमचा पण कंटाळा आलाय. दूरदर्शनवर रामायण महाभारत सुरू झालंय आणि शक्तिमान सुरू होईल अशी शक्यता आहे.

परवा असच टीव्हीवर जगभरातल्या कोरोनाच्या बातम्या बघत बसलो होतो तेव्हा अमेरिकेच्या एक महापौर कोरोना संदर्भात आपण काय काळजी घेतोय या बद्दल अभ्यासपूर्ण माहिती देताना दिसत होते. राहून राहून वाटत होतं की हा चेहरा आणि हा आवाज ओळखीचा वाटतोय.

खूप डोकं खाजवल आणि एकदम लाईट पडली. ते मेयर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून WWF चा केन आहे.

होय WWF. कारण आमच्या वेळी तरी ते फायटींगच होतं. त्याच रूपांतर अजून एंटरटेनमेंट मध्ये झालं नव्हतं. नाईन्टीज मध्ये जन्मलेल्या प्रत्येकाला हे आठवत असेल. घरच्यांच्या शिव्या खात आपण ही हाणामारी बघितली होती.

द रॉक, ट्रिपल एच, शॉन मायकल, स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन सारखे स्टायलिश रेसलरची क्रेझ होती.

पण रिंगणावर राज्य करायचा अंडरटेकर.

अंधारात घंटा वाजवून त्याची एन्ट्री झाली की विरुद्ध साईडला असलेला पहिलवान तर सोडाच पण टीव्ही बघणारी जनता सुद्धा थरथर कापायची.

हा अंडरटेकर सातवेळा मरून परत जिवंत झालेला असं म्हणतात. त्याला कोणीच हरवू शकत नाही अशी चर्चा होती.

या अंडरटेकरचा एक पॉल बेअरर नावाचा मॅनेजर होता. एकदा याच दोघांची भांडणे झाली. वाद खूप वाढले त्यातच पॉलने अंडर टेकर ला धमकी दिली की तुझं एक सिक्रेट बाहेर काढणार.

जगभरात उत्सुकता लागली होती.अखेर ते सिक्रेट बाहेर पडल.

अंडरटेकर ला एक छोटा सावत्र भाऊ होता. अंडर टेकरची आई आणि पॉल बेअरर च अफेअर होत त्यातून हा मुलगा जन्माला आला होता. त्याच नाव केन.

केन सुद्धा पहिलवान होता. अनेक वर्षे अंडर टेकर ला हा आपला सख्खा भाऊ आहे असंच वाटत होतं.

पण जेव्हा त्याला हे सिक्रेट कळाल तेव्हा म्हणे त्याने रागाच्या भरात आपलं घर जाळून टाकलं होतं आणि त्यात त्याचे आईवडील मेले. पण केन वाचला.

या केनचा चेहरा त्या अपघातात जाळला गेला होता.(आठवतंय गेम ऑफ थ्रोन्स मधले क्लिगेन बंधू हाउंड आणि माऊंटन ?)

तेव्हा पासून केन कायम मास्क वापरत होता. तब्बल सात फूट उंच दीडशे किलो वजनाचा, लांब केस आणि डेंजर डोळे असणारा केन हा अंडरटेकर पेक्षाही डेंजर आहे म्हणून पब्लिसिटी झाली.

त्याच मास्क ज्यांनी काढलंय त्या सर्वांची कवटी त्याने फोडलीय अशी वदंता त्याकाळी फेमस होती.

त्याची एन्ट्री सुद्धा अशीच भयानक असायची की अनेक लहान मुले त्याला बघून चड्डी ओली करत होते. जर अंडरटेकर ला कोणी हरवू शकेल तर तो म्हणजे केन अस म्हटलं जायचं

पण अंडर टेकर मी माझ्या भावा सोबत लढणार नाही असं सांगत ही मॅच टाळायचा.

केनने त्याकाळच्या दिग्गज रेसलरना सहज हरवलं. यात शॉन मायकल, स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन आशा अनेक सुपरस्टार चा समावेश होता.

खुद्द अंडर टेकर ला सुद्धा त्याने हरवलं आणि एका पेटीत घालून जाळून टाकलं होतं. पण तो तिथून सटकला. 

पुढे अंडर टेकर आणि तो एकत्र आले आणि ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन नावाने टीम बनवली. हे दोघे रिंगणात आले की वाघ आल्यावर माकडे जशी पळून जातात तसे इतर खेळाडू जीव मुठीत धरून पळून जायचे.

केन ने अनेक वर्षे WWFच रिंग गाजवलं. रसेल मॅनिया, raw सगळी कडे त्याचीच हवा होती. अनेक वेळा त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली.

त्याच्या बद्दल अनेक अफवा फेमस होत्या, त्यातील अनेक किळसवाण्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या होत्या.

पुढे हळूहळू आपण मोठे झालो. हे WWF चे जग खोटे असते ते उशिरा कळलं.

ही सगळी फायटींग त्या मागची स्टोरी हे सगळं स्क्रिप्टड असते, यात काम करणारे हे अभिनेते असतात हे कळल्यावर जगातील चांगुलपणा वरचा विश्वास उडून गेला.

केनच खर नाव ग्लेन जेकब थॉमस.

घरची परिस्थिती बरी होती. शाळेत फुटबॉल आणि बास्केटबॉल भारी खेळायचा. अभ्यासातही हुशार होता. पुढे कॉलेज मध्ये त्याची उंची आणि पर्सनॅलिटी बघून कोणी तरी कुस्तीत जाण्याचा सल्ला दिला

काही काळ प्रोफेशनल रेसीलिंग केली आणि एक दिवस त्यातूनच त्याची ओळख वर्ल्ड रेसीलिंग फेडरेशन उर्फ WWF शी झाली

आणि पुढचा इतिहास तर सगळ्यांना ठाऊकच आहे.

एकीकडे केनच्या रुपात जेकबच रेसीलिंग चालू होतं, लग्न होऊन दोन गोड मुली देखील झाल्या होत्या. त्याची बायको आणि तो एका इन्श्युरन्स कंपनीची एजन्सी सांभाळत होते.

2008 साली कुठल्या तरी उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने त्याने भाषण केले आणि तेव्हा त्याला कळले की लोकांवर भुरळ घालेल अस वक्तृत्व देखील आपल्या जवळ आहे. तो ग्रॅज्युएट होता, हुशार होता, पॉप्युलर होता राजकारणाची त्याला समज होती.

त्याने राजकारणात प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला.

2018 साली रिपब्लिकन पक्षातर्फे त्याने टेनेसी राज्यातील नॉक्स कौंटी शहराच्या महापौर पदासाठीची उमेदवारी मिळवली. अर्थात त्यासाठी त्याने निवडणूक जिंकली होती.

पुढे डेमॉक्रॅटिक पक्षाच्या लिंडा हायने हीचा सहज पराभव करून तो नॉक्स कौंटीचा मेयर सुद्धा बनला.

पडद्यावर त्याची इमेज एक खुंखार व्हिलन अशी असूनही लोकांनी त्याला भरघोस मतदान केलंय. खऱ्या आयुष्यात तो प्रचंड प्रेमळ आहे.

गेली दोन वर्षे तो त्या शहरासाठी जेकब खूप काम करतोय.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत कोरोनाने थैमान घातलंय. टेनेसी राज्यातही हा रोग येऊन पोहचलाय. सध्या नॉक्स कौंटी मध्ये 50 जणांचा मृत्यू झालाय. तिथे स्थिती नियंत्रित यावी यासाठी महापौर या नात्याने केन जबरदस्त काम करतोय.

जसा WWF च्या रिंगणात त्याने प्रतिस्पर्ध्याला लोळवले होते तसे कोरोनाचा सुद्धा पराभव करेल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

The post ज्याला बघून लहान मुले टरकायची तो WWF चा केन सध्या कुठाय? appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/kane-knox-county-mayor-corona/feed/ 0 21403
राज्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी कोल्हापूर कोरोनाविरुद्ध कस लढतय हे पहायला हवं https://bolbhidu.com/go-corona-patern-in-kolhapur/ https://bolbhidu.com/go-corona-patern-in-kolhapur/#respond Fri, 03 Apr 2020 11:54:53 +0000 https://bolbhidu.com/?p=21359

सध्या चर्चा सुरु आहे की, कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला. म्हणजे काय तर बऱ्याच परदेशातून आलेले नागरिकांनी, त्यांच्या संपर्कात आलेले नागरिकांनी होम कोरोन्टाईन म्हणजे घरातच बसून राहण्याचे आदेश पाळले आले नाहीत व ते लोकांमध्ये फिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना स्प्रेड होण्याची शक्यता बळावली. इस्लामपूरच उदाहरण द्यायचं झालं तर इथेही चौघांना होम कोरान्टाईनचे आदेश दिले होते. […]

The post राज्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी कोल्हापूर कोरोनाविरुद्ध कस लढतय हे पहायला हवं appeared first on BolBhidu.com.

]]>

सध्या चर्चा सुरु आहे की, कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला. म्हणजे काय तर बऱ्याच परदेशातून आलेले नागरिकांनी, त्यांच्या संपर्कात आलेले नागरिकांनी होम कोरोन्टाईन म्हणजे घरातच बसून राहण्याचे आदेश पाळले आले नाहीत व ते लोकांमध्ये फिरले.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना स्प्रेड होण्याची शक्यता बळावली.

इस्लामपूरच उदाहरण द्यायचं झालं तर इथेही चौघांना होम कोरान्टाईनचे आदेश दिले होते. त्यांच्याकडून ते पाळण्यात आले नाहीत. परिमाणी आज सांगलीच्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २५ इतकी झाली.

कट टू आपण कोल्हापूरात येवू.

दिनांक २० मार्चच्या दरम्यानची गोष्ट. रात्रीच्या आठ-साडेआठ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अमन मित्तल, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख व कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह प्रशासनाची बैठक सुरु झाली.

या बैठकीत काही कागद आले. या कागदांवर नाव आणि समोर फोन नंबर लिहण्यात आले होते. पालकमंत्र्यांनी आपल्याकडे दोन कागद घेतले आणि समोर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याकडे दोन दोन कागद देण्यात आले.

प्रत्येकाने कागदावर नाव असणाऱ्या व्यक्तिला व्यक्तिश: फोन लावण्यास सुरवात केली.

कुठे आहात? काय करताय? हे प्रश्न विचारून तुम्हाला होम कोरोन्टाईनचा आदेश देण्यात आला आहे. कशाप्रकारे घरी रहायचं आहे. कुटूंबापासून कशाप्रकारे अंतर ठेवायचं आहे या सगळ्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी पालकमंत्री व प्रशासकीय अधिकारी व्यक्तिश: प्रत्येकाला समजावून सांगू लागले.

एक-एक करत प्रत्येकाला फोन करुन कोरोनाबाबतचं गांभिर्य समजावून सांगण्यात आलं. घरी राहण्याचे आदेश पाळावेत म्हणून समजून सांगण्यात आलं,

व हे सगळं काम खुद्द पालकमंत्री करत होते. 

आज कोल्हापूरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या तीन आहे. यामध्ये एक रुग्ण इस्लामपूरच्या कुटुंबाशी संपर्क आलेली आहे. तर उर्वरीत दोन हे भाऊ बहिण आहेत. पुण्यात राहणारा भाऊ कोल्हापूरात आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या बहिणीला कोरोना झाला. त्यांची योग्य ती दक्षता घेतली जात आहे.

जिल्हात सुरक्षिततेच वातावरण निर्माण करण्यात प्रशासनाला यश येत आहे व याच क्रेडिट पालकमंत्री म्हणून बंटी पाटलांना दिलं जात आहे, त्याच कारण देखील तितकच महत्वाच आहे.

हे सगळं कस वर्कआऊट होऊ शकतं यासाठी कोरोनाचा कोल्हापूरी पॅटर्न अभ्यासायला हवा. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र आल्यानंतर काय होतं. 

आज लोकप्रतिनिधींना काय करायला हवं हे समजून देण्याचा हा प्रयत्न 

साधारण १९-२० मार्च दरम्यान कोरोनाचा विषय राज्यात गंभीरपणे चर्चेला आला होता. त्यापूर्वीपासूनच योग्य ती खबरदारी घेण्यात येत होतीच.

बंटी पाटलांनी १९-२० तारखेपासून कोरोनाचं गांभिर्य ओळखून आपला मुक्काम कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये हलवला. त्या तारखेपासून ते आजतागायत दिवसाचे १२ ते १४ तास ते कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी ऑफिसमध्येच ठाम मांडून आहेत.

दिनांक १९ मार्च रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली.

पालकमंत्री म्हणून येणाऱ्या काळात आपलं एकमेकांसोबत असणारं नियोजन व येणाऱ्या परिस्थितीत आपल्याकडे असणाऱ्या नियोजनांची चर्चा या बैठकीत करण्यात आली.

इथे सर्वात मोठ्ठी गोष्ट होती ती राजकारण्यांनी प्रशासनाला विश्वासात घेणं आणि प्रशासनाने राजकारण्यांना विश्वासात घेणं.

एका बैठकीतून विश्वासाचं नात निर्माण करुन आपणाला मोठी लढाई लढायची आहे हा विश्वास देण्यात आला.

याचा अपेक्षित परिणाम काय झाला तर अधिकाऱ्यांना बळ मिळालं, त्यांच्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बळ मिळालं व कर्मचारी चांगलं काम करतात म्हणून कोल्हापूरच्या नागरिकांमध्ये विश्वासाच वातावरण तयार होवू शकलं.

या बैठकांनंतर कोल्हापूरच्या एकूण आरोग्य व्यवस्थेची पाहणी करुन कृतीकार्यक्रम आखण्यात आला. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांना लागणारी गरज इथपासून ते कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी १०० खाटांची स्वतंत्र सोय, N95 मास्क, सॅनिटायजर, डॉक्टरांसाठी आवश्यक उपकरणे इत्यादी गोष्टी उपलब्ध करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश होता.

पालकमंत्र्यांनी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयाचा आढावा घेतला. इचलकरंजीतल्या रुग्णालयास भेट देवून माहिती घेण्यात आली त्याच बरोबरीने हातकणंगले इथे आयसोलेशन वार्ड करण्यासाठी कार्यक्रम सुरु करण्यात आले. गव्हर्मेंट प्रॉपर्टी असणाऱ्या जागा ताब्यात घेवून शेंडा पार्क व सर्किटहाऊस जवळ आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आले.

याच दरम्यान जनता कर्फ्यू डिक्लेर करण्यात आला.

या काळात पालकमंत्र्यांनी नियोजनाचा कोल्हापूर पॅटर्न सेट होवू लागला होता. कोणत्याही एका अधिकाऱ्याकडे जबाबदारी न देता प्रत्येकाकडे जबाबदारी वाटून देण्यात आली होती.

येणाऱ्या जनता कर्फ्यूमुळे भयभीत होवून पुण्या-मुंबईसह बाहेरील ठिकाणचे लोक आपल्या मुळगावी परतू लागले. त्यांच्यासोबतच गेल्या महिन्याभरात बाहेरील देशातून आलेले लोक यांचा माग काढणं हे प्रशासनासमोरच सर्वात मोठं आव्हान होतं.

कारण बाहेरून आलेल्या लोकांची संख्या तब्बल ७५ हजार इतकी होती. 

इतक्या मोठ्या प्रमाणात असणारे त्यातही संपुर्ण जिल्ह्यात विखरूलेल्या लोकांसाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. WHO सारख्या संघटनेत काम करणारे पण कोल्हापूरच्या मातीत जन्म झालेले व्यक्तींची मदत पालकमंत्र्यांनी घेतली.

यासाठी चॅटबॉट तयार करण्यात आले.

WHO व आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार एक फॉर्म तयार करण्यात आला व हा फार्म आपण भरावा असे आवाहन बाहेरून आलेल्या नागरिकांना करण्यात आले.

या http://www.kolhapurcollector.com/covid19/

वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपण आपली माहिती भरू शकता. चॅटबॉक्समध्ये तुम्हाला सहा प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्याचे वर्गीकरण हाय, मिडीयम व लो कॅटेगरित करण्यात येतं.  

संशयास्पद वाटल्यानंतर जिल्हा प्रशासन तातडीने स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना सुचना करेल व आरोग्य अधिकारी सदर व्यक्तिने फॉर्म भरल्यानंतर दोन तासांमध्ये संबधित व्यक्तिची तपासणी करुन योग्य त्या सुचना करेल. आवश्यक वाटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करेल अशी रचना करण्यात आली.

यामुळे आजतागायत ७५ हजारांपैकी २० हजार व्यक्तींचा अचूक मार्ग काढून त्यांच्या आरोग्याच्या लक्षणाची माहिती मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे.

सोबतच ७ हजार कर्मचारी प्रत्यक्ष ग्राऊंडवर जावून बाहेरून आलेल्या लोकांची माहिती घेत आहेत. त्यांच्या आरोग्याबाबत योग्य त्या सूचना करत आहेत.

शहरातल्या प्रभाग समित्या आणि ग्रामिण भागात ग्रामसमित्यांमार्फत जबाबदार नागरिकांचे गट तयार करण्यात आले. कोरोनासंबधित कोणत्याही अफवा पसरवू न देणं व योग्य शासकिय माहिती लोकांपर्यन्त घेवून जाण्याची जबाबदारी अशा समित्यांकडे देण्यात आली.

लॉकडाऊनमुळे लोक पॅनिक होण्याची शक्यता नाकारता येणारी नव्हती. जीवनावश्यक गोष्टींची चढ्या भावाने विक्री आणि जीवनावश्यक गोष्टी विकत घेण्यासाठी लोकांची होणारी गर्दी ओळखून कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या सहकार्याने कोल्हापूरता ३१ नव्या भाजी मंडई सुरू करण्यात आल्या.

दोन भाजी विक्रेत्यांमध्ये किमान वीस फुटांचे अंतर व खरेदी करणाऱ्यांमध्ये किमान ३ फुटांचे अंतर ठेवण्याचा नियम आखण्यात आला.

लोकांच्या समस्या अडचणी वाढू नयेत म्हणून पाच wtsapp नंबर जाहीर करण्यात आले. या नंबरवर जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती आपल्या सुचना, अडचणी पाठवू शकतो अशी जाहिरात करण्यात आली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे नंबर व्हायरल करण्यात आले.

आज या नंबरवर कोल्हापूर जिल्ह्यातून लोकांच्या अडचणी व सूचना येत असतात. अडचणीच्या काळात प्रशासन कुठे आहे हा प्रश्न लोकांना न पडता, प्रशासन चौवीस तास सोबत असल्याची गॅरेंटी या गोष्टीमुळे मिळाली.

चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे लोक, अफवा पसरवणाऱ्या व्यक्ती याचसोबत बेघर लोक ज्यांना जेवण मिळत नाही अशा व्यक्तींची माहिती या नंबरमुळे प्रशासनाला तात्काळ मिळू लागली.

त्यानंतरची महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे,

तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत संपर्क ठेवून एक कामांची सिस्टिम उभा करणं. यासाठी पालकमंत्र्यांनी संबधित तालुक्यातले प्रांताधिकारी, तहसिलदार व आरोग्य अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलण्यास सुरवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू करण्यात आल्याने तालुकापातळीवर नियोजन घडण्यास मदत मिळाली.

प्रभाग समित्या व कोल्हापूर शहरातल्या नगरसेवकांसोबत आयुक्तांची सांगड घालून देण्यात आली व त्यामुळे पक्षीय भेद न करता सर्वांना खुलेपणाने आपल्या अडचणी, मागण्या आयुक्तासमोर मांडता येतील याची तरतूद करण्यात आली. १० टॅक्टर व ६ फायर फायटर यांना घेवून संपुर्ण कोल्हापूरात औषध फवारणी करुन निर्जंतूकीकरण करण्याची मोहिम हाती घेण्यात आली.

खूप वर्षांपूर्वी छ. शाहू महाराजांनी कोल्हापूराच्या सीमेवर प्लेग रोखला होता. आजही कोल्हापूरात अभिमानाने प्लेगमध्ये शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा दाखला दिला जातो. कोल्हापूरचे पालकमंत्री ही जबाबदारी म्हणून बंटी पाटलांनी देखील हाच विचार कृतीतून सिद्ध केला. 

गेल्या कित्येक दिवसांपासून तहानभूक हरवून हा माणूस जिल्हाधिकाऱ्यालयात ठाम मांडून आहे. “साथीच्या रोगात लढण्याचा कोल्हापूरी पॅटर्न” इतिहासात अजरामर आहे. तोच पॅटर्न घेवून कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच एक सुरक्षिततेच वातावरण प्रत्येक घरात निर्माण होण्यास मदत मिळत आहे.

हे ही वाच भिडू. 

The post राज्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी कोल्हापूर कोरोनाविरुद्ध कस लढतय हे पहायला हवं appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/go-corona-patern-in-kolhapur/feed/ 0 21359
अहमदनगरच्या पोलीसांनी दिल्लीचे ‘मरकज प्रकरण’ उघडकीस आणले https://bolbhidu.com/majkaj-delhi-ahmednagar-poli/ https://bolbhidu.com/majkaj-delhi-ahmednagar-poli/#respond Fri, 03 Apr 2020 06:55:17 +0000 https://bolbhidu.com/?p=21370

दिल्लीच्या निझामुद्दीन येथील मरकजमध्ये हजारोंच्या संख्येत तबलिगी असून त्यातील काहीजण कोरोना बाधित असल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. तबलिकी लोकांनी या काळात रस्त्यांवर थुंकणे, हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांसोबत अश्लिल वर्तन करण्याचा कारनामा केल्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले. मुळात लॉकडाऊनच्या स्थितीत हजारोंच्या संख्येत तबलिकी लोक लपून राहिले आहेत ही माहिती दिल्ली प्रशासनाकडे नव्हती. ही […]

The post अहमदनगरच्या पोलीसांनी दिल्लीचे ‘मरकज प्रकरण’ उघडकीस आणले appeared first on BolBhidu.com.

]]>

दिल्लीच्या निझामुद्दीन येथील मरकजमध्ये हजारोंच्या संख्येत तबलिगी असून त्यातील काहीजण कोरोना बाधित असल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. तबलिकी लोकांनी या काळात रस्त्यांवर थुंकणे, हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांसोबत अश्लिल वर्तन करण्याचा कारनामा केल्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले.

मुळात लॉकडाऊनच्या स्थितीत हजारोंच्या संख्येत तबलिकी लोक लपून राहिले आहेत ही माहिती दिल्ली प्रशासनाकडे नव्हती. ही माहिती सर्वात प्रथम मिळाली ती अहमदनगर पोलीसांना. इथून सुरू झालेला तपास दिल्लीच्या मरकजपर्यन्त जावून थांबला व त्यातूनच हे कांड उघडकीस आलं.

याबाबतची माहिती,

दैनिक देशदूतच्या नगर टाईम्सच्या २ एप्रिलच्या अंकात देण्यात आलेली आहे. या बातमीनुसार अहमदनगरच्या पोलीसांमुळे दिल्लीतले मरकज प्रकरण उघडकीस आले असे सांगण्यात आले आहे.

या बातमीनुसार,

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजमध्ये हजारो तबलीगी असून ही माहिती नगर पोलिसांच्या चौकशीत उघड झाली. त्यानंतर ही माहिती महाराष्ट्र पोलीसांनी दिल्ली पोलीसांना दिल्ली व त्यानंतर कारवाई करण्यात आली. 

दिनांक २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली. देशात येणाऱ्या काळात कोरोनाची साथ पसरू शकते याचा विचार करुन तत्पुर्वीच रस्ते रिकामे झाले होते. मात्र या परिस्थितीत देखील नगरच्या मुकूंदनगर भागातील मशिदीमध्ये संशयास्पदरित्या ये-जा सुरू असल्याची माहिती नगर पोलीसांना मिळाली.

त्या आधारावर पोलीसांनी आपल्या खबऱ्यांना मशिदीच्या बाहेर कामाला लावले.

पोलीसांना खबऱ्यांनी अचूक माहिती दिल्यानंतरच पोलीसांनी मशिदीवर कारवाई करण्याच नियोजन केलं. नगर पोलीस मशिदीमध्ये घुसले तेव्हा ११ विदेशी नागरिक तिथे असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र माध्यमांना कळू न देता त्यांची चौकशी करण्यात सुरवात करण्यात आली.

तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर या चौकशीत दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये हजारो तबलिगी असल्याची माहिती या विदेशी नागरिकांकडून देण्यात आली. 

ही माहिती मिळाल्यानंतर नगर पोलीस सावध झाले.  नगरचे कलेक्टर राहूल द्विवेदी, प्रभारी एसपी सागर पाटील, DYSP संदिप मिटके यांनी हा अहवाल विभागीय आयुक्त व डीआयजी यांच्यामार्फत वरिष्ठांकडे सादर केला. हा अहवाल वाचल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक देखील दचकले.

त्यांनी पोलीस अधिक्षक सागर पाटील यांच्याकडून फोनवरून अधिक माहिती घेतली व तो अहवाल थेट केंद्रीय गुप्तचर विभागाच्या महासंचालकांना २६ मार्च रोजी देण्यात आला.

सुरवातीला नगर पोलीसांच्या अहवालावर दिल्ली पोलीसांचा देखील विश्वास बसला नाही. लॉकडाऊनच्या अवस्थेत सुमारे दोन हजाराहून अधिक तबलिगी एका ठिकाणी लपून राहण्याची गोष्ट अशक्य वाटण्यासारखीच होती.

दिल्ली पोलीसांनी मरकज येथे भेट दिली तेव्हा आतून प्रतिकार करण्यात आला. पोलीसांना माघारी परतावे लागले, त्यामुळेच संशय वाढू लागला. त्यानंतर केंद्रिय राखीव दलाच्या जवानांना घेवून मरकजमध्ये प्रवेश करण्यात आला आणि तिथे दोन हजारांच्या दरम्यान तबलिगी लोक असल्याचं पाहण्यात आलं.

नगर पोलीसांनी अतिशय गुप्तपणे मुंकूदनगरमधील मशिदीमधील ११ जणांना ताब्यात घेवून ही माहिती मिळवली. व गुप्तपणे ही माहिती दिल्ली पोलीसांपर्यन्त पोहचवण्यात आली, त्यामुळेच हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

हे ही वाच भिडू. 

The post अहमदनगरच्या पोलीसांनी दिल्लीचे ‘मरकज प्रकरण’ उघडकीस आणले appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/majkaj-delhi-ahmednagar-poli/feed/ 0 21370
होम क्वारंटाईन असताना द्रौपदीने पाणीपुरीचा शोध लावला होता. https://bolbhidu.com/draupadi-invented-golgappa-panipuri/ https://bolbhidu.com/draupadi-invented-golgappa-panipuri/#respond Thu, 02 Apr 2020 09:08:11 +0000 https://bolbhidu.com/?p=21342

क्वारंटाइनचा मौसम सुरू आहे. घराचं खाऊन खाऊन कंटाळा आलाय. बाहेर पडलं तर पोलीस मोक्कार हणालेत. गप्प रामायण महाभारत बघत आईने केलेल्या डाळीची भाजी भाकरी खाऊन दिवस मोजणे सुरू आहे. या कोरोनाच्या दिवसात अखंड भारतभरातल्या पोरी एक डिश मिस करत आहेत, “पाणी पुरी” तसं बघायला गेलं तर याचे हजारो प्रकार आहेत, बिहार मध्ये स्टाईल वेगळी, गुजरात […]

The post होम क्वारंटाईन असताना द्रौपदीने पाणीपुरीचा शोध लावला होता. appeared first on BolBhidu.com.

]]>

क्वारंटाइनचा मौसम सुरू आहे. घराचं खाऊन खाऊन कंटाळा आलाय. बाहेर पडलं तर पोलीस मोक्कार हणालेत. गप्प रामायण महाभारत बघत आईने केलेल्या डाळीची भाजी भाकरी खाऊन दिवस मोजणे सुरू आहे.

या कोरोनाच्या दिवसात अखंड भारतभरातल्या पोरी एक डिश मिस करत आहेत,

“पाणी पुरी”

तसं बघायला गेलं तर याचे हजारो प्रकार आहेत, बिहार मध्ये स्टाईल वेगळी, गुजरात मध्ये वेगळी, बंगाल मध्ये वेगळी, कुठे गोलगप्पा तर कुठे पुचका, अमेरिकेत पोटॅटो इन होल. पुण्यात तर याच्यात वरण घालतात

पण जगात कुठेही जा पाणीपुरीवाला कितीही कळकट मळकट असू दे त्याच्या समोर कटोरी घेऊन उभ्या असलेल्या भुकेलेल्या माता भगिनींची गर्दी कधी कमी होत नाही.

अशावेळी भिडूला प्रश्न पडतो सगळ्यांना प्रेमात पाडणारी ही पाणीपुरी आली कुठून असेल?

पाणीपुरीच्या इतिहासाबद्दल मतेमतांतरे आहेत. अभ्यासकांची यावरून भांडणे आहेत. पण सर्वात फेमस थेरी आहे की पहिली पाणीपुरी महाभारत काळात बनली होती आणि तिला बनवलेलं द्रौपदीने.

गोष्ट आहे पांडव पहिल्यांदा वनवासात गेले होते त्याची. हे म्हणजे त्याकाळचे क्वारंटाईन.

लाक्षगृह जाळून कौरवांनी पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला होता, तिथून पाचही पांडव आणि कुंती माता यांनी कशिबशी सुटका करून घेतली.

याच वनवासातील काळात अर्जुनाने द्रुपदराजाची मुलगी द्रौपदीचा स्वयंवर जिंकला आणि तिला घेऊन घरी आला. स्वयंपाकात बिझी असलेल्या कुंतीमातेने त्याने काय आणलंय पाहिलंच नाही आणि जे आणलंय ते पाचही जण वाटून घ्या असा आदेश दिला.

बिचाऱ्या द्रौपदीची युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव अशी पाच भावात वाटणी झाली, ती पांचाली बनली.

हा काळ पांडवांवर आलेल्या संकटाचा होता. कुरु राज्याचे हे राजकुमार रानोमाळ भटकत होते. त्यांचेच चुलत भावंड असलेले 100 कौरव त्यांच्या जीवावर उठले होते.

अशा या कष्टमय परिस्थितीत जंगलातल्या झोपडीत ही लाडाकोडात वाढलेली राजकन्या कशी काय तग धरेल, आपल्या मुलांच्या पोटाला काय घालेल याची कुंतीमातेला चिंता लागली होती.

सासूबाई कुंतीने द्रौपदीची परीक्षा घ्यायचं ठरवलं.

तिला स्वयंपाकाच्या वेळी भाज्या भरपूर दिल्या पण पोळ्या बनवण्याचं पीठ अगदी कमी दिलं. भीमासारखे पट्टीचे खवय्ये जेवायला बसल्यावर त्यांना हे जेवण पुर्न अशक्य होतं.

पण पांचाली द्रौपदी राजकुमारी असली तरी संसारी होती. तिने एक आयडियाची शक्कल लढवली. एकदम छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्या. त्या पुरीला एक छोटंसं भोक पाडून त्यात भाजी भरली.

पाचही पांडवांनी मिटक्या मारत हा नवा पदार्थ आवडीने पोट भरून खाल्ला.

भीमाने तृप्तीची ढेकर दिली. तेव्हा कुंतीची खात्री पटली की आपली सून ही अन्नपूर्णा आहे.

हाच द्रौपदीने बनवलेला पदार्थ आता पाणीपुरी म्हणून ओळखला जातो.

ही स्टोरी फेमस आहे पण काही जण यावर आक्षेप घेतात. त्यांचं म्हणणं पाणीपुरीची शोध मगध सत्तेच्या काळात लागला असावा.

तर काहीजण म्हणतात ही इंटरनेटवर कोणीतरी सोडलेली पुडी आहे.असो.

मधल्या काळात या पाणीपुरी मध्ये प्रचंड बदल झाले. आज आपण पाहतो ती पाणीपुरी मात्र खूप अलीकडची. ती बनवण्यासाठी लागणारा बटाटा, तिखटपणा येण्यासाठी लागणारं मिरची हे सगळं पोर्तुगीजांच्या नंतर भारतात आले.

शे दीडशे वर्षांपूर्वी बिहार आणि उत्तरप्रदेश च्या दरम्यानच्या भागात हा चटकमटक गोलगप्पा फेमस झाला आणि आज जगाच्या कानाकोपऱ्यात मिळतो.

हे ही वाच भिडू.

The post होम क्वारंटाईन असताना द्रौपदीने पाणीपुरीचा शोध लावला होता. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/draupadi-invented-golgappa-panipuri/feed/ 0 21342
धुळ्याच्या पोरानं घरबसल्या ६ विश्वविक्रम केलेत, घरबसल्या हे विक्रम मोडता येतात का बघा https://bolbhidu.com/world-recorder-rahil-shaikh/ https://bolbhidu.com/world-recorder-rahil-shaikh/#respond Wed, 01 Apr 2020 07:41:01 +0000 https://bolbhidu.com/?p=21287

घरबसल्या कमवा ३५,००० रुपये. घरबसल्या पापड तयार करा. भिडूंनो आम्ही तुम्हाला अस काहीही सांगणार नाही. सध्याचा दिनक्रम म्हणजे सकाळी १० वाजता उठणे. फेसबुक उघडणे. १२ वाजता जेवण करुन वामकुशी घेणे. पाच वाजता परत अल्पोहार त्यानंतर टिव्हीवर कोरोनाचे किती आकडे वाढले हे पाहणे आणि रात्री पिक्चर पाहणे असा झालाय. यात विशेष अस काही करण्यासारखं नाहीय. म्हणून […]

The post धुळ्याच्या पोरानं घरबसल्या ६ विश्वविक्रम केलेत, घरबसल्या हे विक्रम मोडता येतात का बघा appeared first on BolBhidu.com.

]]>

घरबसल्या कमवा ३५,००० रुपये. घरबसल्या पापड तयार करा. भिडूंनो आम्ही तुम्हाला अस काहीही सांगणार नाही.

सध्याचा दिनक्रम म्हणजे सकाळी १० वाजता उठणे. फेसबुक उघडणे. १२ वाजता जेवण करुन वामकुशी घेणे. पाच वाजता परत अल्पोहार त्यानंतर टिव्हीवर कोरोनाचे किती आकडे वाढले हे पाहणे आणि रात्री पिक्चर पाहणे असा झालाय. यात विशेष अस काही करण्यासारखं नाहीय.

म्हणून विचार केला घरबसल्या अचाट अस काही करता येवू शकतं का? तेव्हा धुळ्याच्या या मुलाची माहिती मिळाली. त्याने आपल्या ब्लॉगवर त्याच्या विक्रमाबद्दल लिहलं आहेच.

तर या भिडूने काय केलय याच्यापुर्वी त्यांची बेसिक माहिती सांगण गरजेचं आहे.

राहिल शेख अस या पोराचं नाव. मिडलक्लास कुटूंबातला जन्म.  S.S.V.P.S कृष्णा नगर हायस्कूलमधून तर J.R. सिटी हायस्कूलमधून त्याच शिक्षण झालं. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून त्यानं शिक्षण घेतलं. त्याचा जन्म १९९३ चा. म्हणजे हा आत्ता २७ वर्षाचा पोरगा आहे. या वयात या पठ्यानं ६ विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे.

आत्ता हे विक्रम काय आहेत ते बघुया.

१) सर्वात लांब लचक इ मेल आयडी तयार करणे.

माझ्या इमेल आयडीतले शब्द मी मोजले. १८ शब्द निघाले. पहिला तुम्हीपण तुमच्या इमेल आयडीतले शब्द मोजा. २०-२५ शब्दांच्या वरती गाडी सरकणार नाही. पण या भिडू्च्या इमेल आयडीत १०० शब्द आहेत.  जगातला सर्वाधिक लांबीचा इ-मेल आयडी तयार करण्याचा विक्रम या फंटरच्या नावावर आहे.

२) सर्वात लहान इ-मेल आयडी तयार करणे.

या मेल आयडीत आठ शब्द आहेत. आपण साध जी मेलच उदाहरण घ्यायचं म्हणलं तरी G MAIL . COM असे नऊ आकडे होतात. याचा मेल आयडी फक्त आठ शब्दाचा आहे.

३) लय जोरात फोल्डर तयार करणं.

न्यू फोल्डर तयार करण्यात आपल्या भिडू लोकांची खासियत असते. कुठलं मटेरियर कुठं लपवून ठेवलय हे कोणाच्या बापाला सापडू शकत नाहीत. आत्ता विचार करा एका तासात तुम्ही किती फोल्डर तयार करु शकताय? या भिडूने २४५३ फोल्डर एका तासात केलेले आहेत.

४) कॉम्प्युटर रिफ्रेश मारण्याचा प्रकार.

यात तर आपण उस्ताद आहे. गंडल की कॉम्प्युटर रिफ्रेश मारत बसायचा हा धंदा सॉफ्टेवअर इंडस्ट्रितला सर्वात भारीतला धंदा आहे. पण या पठ्याने ३० सेकंदात ५८ वेळा कॉम्प्युटर रिफ्रेश मारलाय. म्हणजे सेकंदाला दोनची सरासरी आहे. पण मला वाटतय १५ दिवसाच्या प्रॅक्टिसनंतर हा विक्रम मोडता येवू शकतोय.

५) विन्डोज बंद करणे.

२० सेकंदात ३९ मायक्रोसॉफ्ट विन्डोज क्लोज करण्याचा विक्रम या पठ्याने केलाय.

६) विन्डोज सुरू करण्याचा विक्रम.

एकाच वेळी ६० मायक्रोसॉफ्ट विन्डोज उघडण्याचा विक्रम या पठ्याने केलाय.

आत्ता या राहिल शेखचं कौतुक जगभरात असणारचं. अमेरिका, इंग्लडच्या वेगवेगळ्या रेकॉर्ड होल्डर बुकमध्ये त्याची नोंद आहे. धुळे भूषण पुरस्कारासह त्याला जगभरातले वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत.

खाली त्यांच्या ब्लॉगची लिंक देत आहोत ती वाचा आणि ट्राय मारा. आम्हाला विश्वास आहे, एखादा भिडू तरी हा विक्रम मोडून नवे विक्रम रचेल.

हे ही वाच भिडू. 

The post धुळ्याच्या पोरानं घरबसल्या ६ विश्वविक्रम केलेत, घरबसल्या हे विक्रम मोडता येतात का बघा appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/world-recorder-rahil-shaikh/feed/ 0 21287
पण भिडू, बदामाच्या राजाला मिशी का नसते? https://bolbhidu.com/why-playing-cards-king-moustache-theory/ https://bolbhidu.com/why-playing-cards-king-moustache-theory/#respond Sat, 28 Mar 2020 06:23:16 +0000 https://bolbhidu.com/?p=21241

कोरोनाच्या कृपेने भिडू घरी लॉक डाऊन झालाय. टाइमपास साठी जुने सुट्टीतले खेळ बाहेर काढण्यात आलेत. पण आता टाईमपास करून पण दम लागलाय. कंटाळलेल्या भिडूचं रूपांतर आता सायंटिस्ट लोकांत होऊ लागलंय. पाच तीन दोन, गाढव, रम्मी, चॅलेंज उचलेंज खेळून बोर झाल्यामुळे या सायंटिस्ट लोकांनी कॅटच्या 52 पत्त्यांचे निरीक्षण करण्याचा उद्योग हाती घेतला. या प्रोजेक्टमधून एक महत्त्वाच […]

The post पण भिडू, बदामाच्या राजाला मिशी का नसते? appeared first on BolBhidu.com.

]]>

कोरोनाच्या कृपेने भिडू घरी लॉक डाऊन झालाय. टाइमपास साठी जुने सुट्टीतले खेळ बाहेर काढण्यात आलेत. पण आता टाईमपास करून पण दम लागलाय. कंटाळलेल्या भिडूचं रूपांतर आता सायंटिस्ट लोकांत होऊ लागलंय.

पाच तीन दोन, गाढव, रम्मी, चॅलेंज उचलेंज खेळून बोर झाल्यामुळे या सायंटिस्ट लोकांनी कॅटच्या 52 पत्त्यांचे निरीक्षण करण्याचा उद्योग हाती घेतला. या प्रोजेक्टमधून एक महत्त्वाच संशोधन पुढे आले,

पत्त्यांच्या कॅटमध्ये सगळ्या राजांना मिशी असते फक्त बदामाच्या राजाला सोडून.

किलवर इस्पिक चौकट च्या राजांना आकडेबाज मिशी असते पण बिचाऱ्या बदाम राजाला फक्त दाढी असते पण मिशी नसते. त्यातही त्याने आपल्या डोक्यात तलवार खुपसलेली दिसते. अस का? काय आहे या मागची हिस्ट्री?

लगेच या सायंटिस्ट लोकांनी बोल भिडूला कामाला लावलं. आम्ही पण शोध घेतला आणि एक मज्जेशिर माहिती समोर आली.

या पत्त्यांच्या कार्ड्स चा शोध शेकडो वर्षा पूर्वी लागलाय. आपल्या कोरोना रोगाप्रमाणे पत्ते देखील चीन मध्ये निर्माण झाले अस म्हणतात. मग व्यापाऱ्यांनी हा खेळ जगभरात नेला. भारतात सुद्धा गंजिफाच्या स्वरूपात पत्ते खेळले जात होते.

तेराव्या शतकात अरबांनी हा खेळ युरोपमध्ये नेला. तिथे इटली, स्पेन, जर्मनी, फ्रेंच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तो खेळला जाऊ लागला. प्रत्येक ठिकाणच्या पद्धतीप्रमाणे कार्ड वरच्या चित्रात ढाल तलवार गुलाब वगैरे दिसत होते. कोणी याचा वापर खेळण्यासाठी तर कोणी जुगारासाठी तर कोणी भविष्य सांगण्यासाठी करू लागलं.

रिकामटेकड्या भिडूनी संशोधन करून या खेळात सुधारणा करत आणली. जोकर आला, इटलीतल्या पत्त्यांमध्ये राणी दिसू लागली.

याच काळात युरोपमधील सर्वात महत्वाची घटना घडली ते म्हणजे फ्रान्सचा राजकुमार आणि इंग्लंडची राजकुमारी यांच लग्न. या लग्नामुळे या दोन्ही राजसत्ता एकत्र आल्या. अनेक वर्षांचे युद्ध थांबले. एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टीची देवाण घेवाण झाली. यातच होते फ्रेंच पत्ते.

फ्रेंच पत्त्यांच्या कॅट मध्ये 52 कार्ड्स होते. एक्क्या पासून ते राजा पर्यंत चौकट, इस्पिक, किलवर आणि बदाम अशी चार प्रकारची पाने होती. त्यातही किलवर आणि इस्पिक काळ्या रंगाची तर चौकट आणि बदाम लाल.

आता मेन विषय राहिला बदाम राजाच्या मिशीचा.

त्याकाळी राजाला मिशाअसणे हे पुरुषार्थाचे लक्षण मानले जाई. बदामच्या राजाची सर्वात फेमस दंतकथा अशी की फ्रांसच्या राजाला चार मुले होती. त्यातल्या तीन राजकुमारांना मिशी होती आणि एकाला नव्हती, तोच हा बदामाचा राजा.

तो गुलछबु होता पण आपल्या इतर भावांप्रमाणे पराक्रमी होता. कोणतंही काम करताना डोक्यापेक्षा हृदयाने विचार करायचा म्हणून त्याला बदाम हे चिन्ह मिळालं.

आता ही आहे दंतकथा ! खरं कारण हे नसण्याची जास्त शक्यता आहे.

या पत्त्यांच्या चारही राजांना युरोपच्या इतिहासातील महान राजांची नावे देण्यात आली आहेत. इस्पिकचा राजा डेव्हिड, चौकटचा राजा सीझर, किलवरच राजा म्हणजे अलेक्झांडर उर्फ सिकंदर आणि बदामाचा राजा म्हणजे चार्ल्स.

आठव्या शतकात फ्रान्सचा राजा झालेला चार्ल्स पराक्रमी होता. अख्ख्या युरोपचा पहिला सम्राट म्हणून त्याला ओळखलं जातं. तो प्रेमळ आणि दयाळू होता. त्याच्या स्मरणार्थ बदामाच्या राजाला त्याचे नाव देण्यात आले.

पण गंमत म्हणजे या किंग चार्ल्स ला मिशी होती. एवढंच काय सुरवतीच्या काळातील पत्त्यांमध्ये बदाम राजाला सुद्धा मिशी होती.

इंग्लंडमधल्या लाकडी छापखाण्यात तयार होत होते. या पत्त्यांच्या छापामध्ये कालौघात काही दोष आले आणि

त्यातूनच बदामाच्या राजाची मिशी गायब झाली आणि त्याच्या हातातील कुऱ्हाडीचा निम्मा भाग दिसेनासा होऊन तो डोक्यात खुपसल्याप्रमाणे वाटू लागला.

इंग्लंडने जगावर राज्य केलं. त्यातूनच हे पत्ते जगभरात पसरले. आज जर्मनी असो की परभणी सगळी कडे हेच पत्ते खेळले जातात. एवढी वर्ष कधी आपण पत्त्यांकडे लक्ष देऊन बघितलं नाही. पण कोरोनाच्या निमित्ताने बदाम राजा आणि त्याचा इतिहास शोधता आला.

हे ही वाच भिडू.

The post पण भिडू, बदामाच्या राजाला मिशी का नसते? appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/why-playing-cards-king-moustache-theory/feed/ 0 21241
क्वारंटाईन आणि आयसोलेशन या दोन शब्दांची ओळख छ. शाहू महाराजांनी करुन दिली https://bolbhidu.com/quarantine-and-isolation-words-ch-shahu-maharaj/ https://bolbhidu.com/quarantine-and-isolation-words-ch-shahu-maharaj/#respond Fri, 27 Mar 2020 13:50:54 +0000 https://bolbhidu.com/?p=21231

कोरोना असणाऱ्या देशातून आलेल्या व्यक्तिंना क्वारंटाईन करण्यात येत आहे. पुण्या मुंबईतून आलेल्या व्यक्तिंना देखील क्वारंटाईन करण्यात आलं आहे तर कोरोनाबाधित व्यक्तिंना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात येत. आज हे शब्द काही जणांना नवीन वाटत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का या दोन शब्दांची ओळख सर्वात पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी करून दिली. मुंबई पुण्यात जेव्हा प्लेगची साथ आली […]

The post क्वारंटाईन आणि आयसोलेशन या दोन शब्दांची ओळख छ. शाहू महाराजांनी करुन दिली appeared first on BolBhidu.com.

]]>

कोरोना असणाऱ्या देशातून आलेल्या व्यक्तिंना क्वारंटाईन करण्यात येत आहे. पुण्या मुंबईतून आलेल्या व्यक्तिंना देखील क्वारंटाईन करण्यात आलं आहे तर कोरोनाबाधित व्यक्तिंना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात येत.

आज हे शब्द काही जणांना नवीन वाटत आहेत.

पण तुम्हाला माहित आहे का या दोन शब्दांची ओळख सर्वात पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी करून दिली.

मुंबई पुण्यात जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा शाहू महाराजांनी जी उपाययोजना राबवली त्यामध्ये लोकांना क्वारंटाईन करणं आणि आयसोलेशन करणं महत्वाचं होतं. त्याचाच परिमाण म्हणजे आजही कोल्हापूरात आयसोलेशन नावाने ओळखला जाणारा भाग आहे.

मुंबईत प्लेगची साथ आल्यानंतरच शाहू महाराज सावध झाले होते.

हा प्लेग आपल्याकडे देखील येवू शकतो हे त्यांनी जाणलं. याच काळात भयानक दूष्काळ पडला होता. शाहू महाराज दुष्काळी जनतेची दुख दूर करण्यासाठी बाहेर पडत तेव्हा येणाऱ्या प्लेगच्या साथीचा अंदाज लोकांना देत असत. शाहू महाराजांना या दौऱ्यांमध्ये लक्षात आलं की, लोकं उंदरांना गणपतीचे वाहन मानतात. सहजासहजी उंदराला मारण्यास धजावत नाहीत. शिवाय प्लेगसारख्या रोगाकडे देवाचा प्रकोप म्हणूनच बघतात.

म्हणून महाराजांनी आज्ञापत्र काढली.

प्लेगसाठी घराघरातील उंदरांची बिळे मुजवावीत म्हणून सांगण्यात आलं. घरात सुर्यप्रकाश खेळता ठेवण्यास सांगण्यात आलं. मुळात हा कोणत्याही देवाचा प्रकोप नसून तो उंदरामुळे होणारा रोग आहे व त्यावर स्वच्छता हाच उपाय असल्याचं महाराजांनी लोकांना सांगितलं. त्याचा योग्य तो परिणाम होवून गावेच्या गावे स्वच्छ झाली.

याच सोबत महाराजांनी लोकांनी मळ्यात रहावयास जावे म्हणून उद्युक्त केलं. लोकांनी महाराजांच ऐकून मळ्यामध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली. जेव्हा करवीर नगरीत प्लेग आला तेव्हा या गोष्टींचा लोकांना फायदा झाला. अनेकजण मळ्यात रहायला गेले.

प्लेग येण्यापुर्वीच खबरदारी घेण्याची शक्य ती तयारी महाराजांनी केली, तरिही करवीर नगरीत प्लेगचे आगमन झालेच. १८९८ आणि १८९९ या दोन वर्षात करवीर नगरीस प्लेगने सतावले. गडहिंग्लज व शिरोळ तालुक्यातील १८ गावे प्लेगने पछाडली. त्यामुळे ३१,१३१ प्लेगने पछाडले.

महाराजांनी या सर्व गोष्टींची पुर्वतयारी करून ठेवली होती.

प्लेगची गाठ उठली की तीन दिवसात रोगी खलास व्हायचा. अशा वेळी प्लेगबाधित व्यक्तिला घरात ठेवणे धोक्याचे असायचे. पहिला प्लेगबाधित व्यक्तिला घरातून हलवून मग घरातील इतर निरोगी व्यक्तिंना बाहेर काढलं जात असे. व त्यानंतर घर निर्जंतूक करण्यात येत असे.

लोकांच्या व वतनदारांच्या मदतीशिवाय प्लेगविरोधात लढणं अशक्य होतं. म्हणून शाहू महाराजांनी राजाज्ञा देण्यास सुरवात केली.

मात्र आजच्यासारखीच तेव्हा देखील परिस्थिती होती. “तटत नाय खचाक्क” करणाऱ्या लोकांना अद्दल घडवायची जबाबदारी वतनदारांवर देण्यात आली. त्यासाठी महाराजांनी जो वतनदार सहकार्य करणार नाही त्याचे वतन जप्त करण्याची आज्ञा दिली. वतनदारांनी ही गोष्ट फारशी मनावर घेतली नाही म्हणून महाराजांनी दोन तीन वतनदारांचे वतन जप्त केले. त्यानंतर वतनदारांना अद्दल मिळाली.

करवीर नगरिच्या प्रवेशद्वारानजीक म्हणजेच नगरीत यायच्या व नगरीत जायच्या निरनिराळ्या दिशांच्या मोक्याच्या जागी क्वारंटाईन करण्याची पद्धत अवलंबण्यात आली.

क्वारंटाईन हाच शब्द तेव्हा वापरण्यात आला होता. त्यामुळे बाहेरची माणसे आत किंवा आतली माणसे बाहेर येताना त्यांची वैद्यकिय तपासणी करुन, निर्जंतूक करुनच त्यांना प्रवेश दिला जात असे अथवा बाहेर सोडले जात असे.

रेल्वेने येणाऱ्या लोकांसाठी देखील रेल्वे स्टेशननजिक तपासणी केंद्र उघडण्यात आले. काही लोक ही वैद्यकिय तपासणी चुकवून जात असल्याचं लक्षात आल्यानंतर फसव्या लोकांची माहिती देणाऱ्यास ५ ते १५ रुपायांचे बक्षीस शाहू महाराजांनी देण्यास सुरवात केली.

याच वेळी करवीर नगरीच्या कोटी तिर्थाजवळ प्लेगचे हॉस्पीटल सुरू करण्यात आले.  डॉ. बोमनजी दोराबजी यांची खास प्लेग डॉक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

प्लेग ग्रस्त लोकांना खास आयसोलेशन करुन ठेवण्याची जागा निश्चित करण्यात आली. ४ सप्टेंबर १८९९ पासून भास्करराव जाधव यांची प्लेग आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

क्वारंटाईन आणि आयसोलेशन या दोन शब्दांवर शाहू महाराजांनी प्लेगशी यशस्वी लढा उभारला. या काळात हे दोन्ही शब्द करवीर नगरीत फेमस झाले होते. त्याचा परिणाम म्हणजे करवीर नगरीत नाममात्र प्लेगचे बळी गेले.

एप्रिल १९०० साली जॅक्सनने शाहू महाराजांना पत्र लिहले, या पत्रात जॅक्सन म्हणतात,

प्लेगाच्या काळात त्रस्त झालेल्या जनतेला आपण जातीने केलेल्या शासकिय मदतीबद्दल आपले अभिनंदन करणे यशोचित होईल.

हे ही वाच भिडू. 

The post क्वारंटाईन आणि आयसोलेशन या दोन शब्दांची ओळख छ. शाहू महाराजांनी करुन दिली appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/quarantine-and-isolation-words-ch-shahu-maharaj/feed/ 0 21231
संपुर्ण जग म्हणत होतं भारत पोलिओ-मुक्त होणार नाही तरिही आपण करुन दाखवलं https://bolbhidu.com/poliofree-india-121/ https://bolbhidu.com/poliofree-india-121/#respond Thu, 26 Mar 2020 07:16:02 +0000 http://bolbhidu.com/?p=1049

२४ मार्च २०१४ ही तारिख आहे भारत पोलिओमुक्त झाल्याची. भारतातील लोकसंख्येचा विचार करता विकसित राष्ट्राचं अस मत होतं की भारतासारखा देश पोलिओमुक्त होणं अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तरिही भारतासारख्या भल्यामोठ्या लोकसंख्येच्या देशात ही गोष्ट शक्य झाली. कारण….  १६ मार्च १९९५ या दिवशी भारतात पहिल्यांदा तोंडावाटे पोलिओचा डोस देण्यात आला. यापूर्वी इंजेक्शनद्वारे डोस देण्यात येत असे. […]

The post संपुर्ण जग म्हणत होतं भारत पोलिओ-मुक्त होणार नाही तरिही आपण करुन दाखवलं appeared first on BolBhidu.com.

]]>

२४ मार्च २०१४ ही तारिख आहे भारत पोलिओमुक्त झाल्याची. भारतातील लोकसंख्येचा विचार करता विकसित राष्ट्राचं अस मत होतं की भारतासारखा देश पोलिओमुक्त होणं अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तरिही भारतासारख्या भल्यामोठ्या लोकसंख्येच्या देशात ही गोष्ट शक्य झाली.

कारण…. 

१६ मार्च १९९५

या दिवशी भारतात पहिल्यांदा तोंडावाटे पोलिओचा डोस देण्यात आला. यापूर्वी इंजेक्शनद्वारे डोस देण्यात येत असे. पण अधिकाधिक लोकांपर्यन्त सहजरित्या लस घेवून जायची असेल तर त्यासाठी तोंडावाटे लस दिली पाहीजे याचा विचार करुन भारत पोलिओमुक्त करण्याच्या दिशेने पाऊले टाकण्यात आली.

तत्पुर्वी

WHO च्या १९८८ च्या जागतिक पोलिओ निर्मुलन मोहिमेला प्रतिसाद देत भारताने देशात पोलिओ निर्मुलन सुरू केले होते. भारताची लोकसंख्या क्षेत्रफळ आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची परस्थिती बघता भारत कधी पोलिओ मुक्त देश बनेल याबाबात जगभरात संशयाच वातावरण होतं.

परंतु WHO, World Bank यांसारख्या संस्थांच्या मदतीने भारताने स्वत: लस निर्मीती करण्यास सुरवात केली.

पोलिओ लसीची ठराविक तापमानात साठवणूक करावी लागली त्यासाठी देशभर वितरणाची साखळी निर्माण करण्यात आली. वितरणाची प्रमुख अडचण सोडवल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलिओ लस अभियानाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२००० ते २०१३ पर्यन्त भारतातील पोलिओ निर्मुलनासाठी World Bank ने ६४० मिलियन डॉलरचा पुरवठा केला. यातून भारताने दरवेळी मोठ्ठे मनुष्यबळ निर्माण करुन पोलिओमुक्त भारत घडवण्याचं काम केलं.

या मोहिमेसाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता होती त्यासाठी जवळपास २४ लाख स्वयंसेवक दिड लाख वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आलं. 

भारतासारख्या प्रंचड मोठ्या देशात वर्षातून दोन वेळा आणि ईशान्य भारतातसारख्या दूर्मिळ भागात वर्षातून चार ते पाच वेळा ही मोहिम राबवण्याचा स्विकार करण्यात आला. 

मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक होते म्हणून WHO च्या मदतीने सामान्य लोकांसाठी मार्गदर्शन राबवण्यात आले.

सुरवातीच्या काळात राजस्थान व ईशान्य भारतासारख्या भागात वेळेत लस पोहचवण्यासाठी भारतीय लष्कराने मदत केली.

पण यातही माती खाणारे लोक होते, पोलीओ म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करण्याचा सरकारचा डाव आहे अशा अफवा पसरवण्यात आल्या. काही ठिकाणी यात अंमली पदार्थ असतात म्हणून सांगण्यात आलं. मात्र सरकारने या विरोधात लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली. पोलीओचा डोस गरजेचा असल्याचं लोकांपर्यन्त माध्यमांद्वारे पोहचवण्यात यश आलं.

आणि दिनांक २४ मार्च २०१४ रोजी भारत देश पोलिओमुक्त झाल्याचं घोषीत करण्यात आलं.

पोलीओ मुक्त करणं हा दिर्घकालीन टप्पा होता. मात्र आपण मिळून ही अशक्य गोष्ट पुर्ण करुन दाखवली. त्यामानाने कोरोनो रोखण्यासाठीची वेळ खूप कमी आहे. मात्र लोकांनी साथ दिली तर आपण ही गोष्ट देखील करुन दाखवू शकतो. कारण आज ैWHO पासून अनेक संस्थांच मत आहे की भारतात कोरोनाची साथ पसरली तर अटकाव करणं अशक्य होईल. पण इतिहास पाहता आपण काहीतरी अनपेक्षित करुन जगाला पुन्हा आश्चर्यचकित करु अस वाटतं. 

हे ही वाच भिडू. 

 

The post संपुर्ण जग म्हणत होतं भारत पोलिओ-मुक्त होणार नाही तरिही आपण करुन दाखवलं appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/poliofree-india-121/feed/ 0 1049