फोर्थ अंपायर – BolBhidu.com https://bolbhidu.com विषय हार्ड Sun, 05 Apr 2020 13:03:01 +0000 en-GB hourly 1 https://wordpress.org/?v=5.3.2 https://i0.wp.com/bolbhidu.com/wp-content/uploads/2018/03/cropped-bol_bhidu-1.png?fit=32%2C32&ssl=1 फोर्थ अंपायर – BolBhidu.com https://bolbhidu.com 32 32 173639643 चंद्रपॉलच्या डोळ्याखालच्या पट्ट्यामागे कोणती काळी जादू होती? https://bolbhidu.com/chandrapaul-eyestickers-1213-cp/ https://bolbhidu.com/chandrapaul-eyestickers-1213-cp/#respond Sun, 05 Apr 2020 07:15:20 +0000 http://bolbhidu.com/?p=15597

लहानपणी क्रिकेट बद्दल अनेक मजेदार गैरसमज होते, ज्याबद्दल आज माहिती जाऊन घेताना मोक्कार हसायला येतं. यात पॉंटिंगच्या बॅट मध्ये स्प्रिंग होते हे कायम बोललं जाणार वाक्य होतं, जे आजही जोक म्हणून बोललं जातं अन त्यावर हसायला ही तितकंच येतं. याशिवाय सचिन तेंडुलकरची बॅट वजनाने जगात सगळ्यात भारी होती, पाकिस्तानी प्लेयर्स इंनिंग ब्रेकमध्ये दश्या खाऊन येतात […]

The post चंद्रपॉलच्या डोळ्याखालच्या पट्ट्यामागे कोणती काळी जादू होती? appeared first on BolBhidu.com.

]]>

लहानपणी क्रिकेट बद्दल अनेक मजेदार गैरसमज होते, ज्याबद्दल आज माहिती जाऊन घेताना मोक्कार हसायला येतं. यात पॉंटिंगच्या बॅट मध्ये स्प्रिंग होते हे कायम बोललं जाणार वाक्य होतं, जे आजही जोक म्हणून बोललं जातं अन त्यावर हसायला ही तितकंच येतं.

याशिवाय सचिन तेंडुलकरची बॅट वजनाने जगात सगळ्यात भारी होती, पाकिस्तानी प्लेयर्स इंनिंग ब्रेकमध्ये दश्या खाऊन येतात आणि जुम्मे की दिन मॅच असली तर तेच जिंकतात अशा एकसे बढकर एक अफवा होत्या.

ज्या आज घडीला बोलल्या की, पोट धरून हसायला येतं, अगदी आता हा लेख लिहिताना सुद्धा येतंय.

सगळ्यात जास्त  गैरसमज वेस्ट इंडिजच्या खेळाडुबद्दल होते. त्यांचे बॉलर म्हणे रात्री भूत होतात. खर तर दिवसापण एखाद्या भूतापेक्षा कमी नव्हते. आणखी चर्चा असायची की त्यांचे लेफ्टी बॅट्समन लै भारी खेळत्यात.

धुवांधार खेळत नुसते छक्के मारत्यात अन लवकर आऊट बी होत नाही. लारामुळे हा समज दृढ झाला असेल पण आणखी एक बॅट्समन होता जो आपल्याला आउटचं व्हायचा नाही.

शिवनारायण चंद्रपॉल.

ह्याची खासियत होती ती, याची बॅटिंग करण्याची स्टाईल. बॅट्समन क्रिज आल्यावर समोरून स्टंप दिसतोय का विचारून बुटाच्या खिळ्याने रेघ ओढतो. पण चंद्रपॉलच वेगळंच होतं. ह्यो गडी आला की, बुटाच्या खिळ्याने रेघ पडायच्याया जागी स्टंप वरची बेल उचलुन ती बॅटने क्रिजवर ठोकून भोक पडायचा.

परत त्याची उभं राहण्याची पद्धत बी अजबच. हा सरळ उभा न राहता स्टंपला समांतर उभा राहायचा. आणि चौफेर फटकेबाजी करायचा. मग आम्ही बी गल्ली क्रिकेट खेळताना त्याची स्टाईल कॉपी मारायचो तेव्हा पोरं मोक्कार हसायची.

पण फुकटची स्टाईल मारायला काय जातंय म्हणून मारायची. भले मग दोन बॉल्स मध्ये आऊट का होईना.

पण ते सगळ जाऊ दे.

चंद्रपॉल म्हटल की आठवते की त्याच्या डोळ्याखाली दिसणाऱ्या काळ्या पट्ट्या.

तेव्हा वाटायचं की, ते देशाच्या संबंधित काही असेल. तर त्यावर काहीतरी लिहिलेलं दिसत असल्याने कुणी म्हणायच ते त्याच्या मुला-मुलीचे नाव आहेत. आमच्या गल्लीतल्या एका अतिहुशार पोरान सांगीतलेल की तो खरा भारतीय आहे आणि शिवशंभोचा भक्त आहे. त्याच्या गुरुने काही तरी काळा मंत्र दिलाय. त्याच्या काळ्या पट्टीवर तेच लिहिली. तेव्हा इंटरनेट वैगेरे कळत नसल्याने गूगल करून सर्च करण्याच्या प्रश्नच येत नव्हता. लोक म्हणतात मग असेल तसेच.

पण नंतर नंतर कळलं की, ते तस काहीच नसून अँटी-ग्लेयरचे स्टिकर होते. जे उन्हात खेळतांना डोळ्यावर पडणाऱ्या सुर्यकिरणांचा प्रभाव कमी करतात.

सूर्याची किरणे सरळ डोळ्यावर पडायला नको म्हणून चंद्रपॉल ते स्टिकर लावायचा.

ह्याच्या बाबतीत एकच तथ्य बरोबर होतं. ते म्हणजे त्याच्या नावावरून तो भारतीय आहे असे वाटायचं. आणि हो तो खरोखरच भारतीय वंशाचा आहे. खर तर बिहारी होता. त्याचे पूर्वज अठराव्या शतकात बिहार सोडून गुयाना मध्ये जाऊन स्थायिक झालेले.

२०११ मध्ये जेव्हा वेस्टइंडिज भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा, एका मॅचमध्ये दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर चंद्रपॉल खेळत होता. त्याच दरम्यान बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारी टेस्ट क्रिकेटरला अवॉर्ड देण्याचे जाहीर केले. पूर्ण भारतात चर्चा झाली की एका परदेशी खेळाडूला का हा सन्मान दिला?

झालं असं होत की त्या वर्षी बिहार मध्ये एकही एवढी मोठी कामगिरी केलेला खेळाडू सापडत नव्हता.  धोनीला देऊ शकत नव्हते, कारण तो झारखंडचा होता. मग जेव्हा नितीश कुमार यांना चंद्रपॉल बद्दल कळलं की, तो बिहारी आहे, अनायसे तो भारत दौऱ्यावर आला होता.

मग बिहार सरकारने त्याला ‘बिहारी क्रिकेटर ऑफ द डेकेड’ चा अवॉर्ड दिला.

चंद्रपॉल जवळपास वीस वर्षे क्रिकेट खेळला. एवढी वर्षे कसोटी क्रिकेट खेळत राहणे ही चेष्टा नाही.जगभरातल्या फक्त लिजेंड क्रिकेटर्सनाच हे जमलंय.

तसं बघितल तर चंद्रपॉलला वेस्ट इंडीज क्रिकेटर्सच्या सुपरस्टार खेळाडू मध्ये धरत नाहीत. तो एवढे वर्षे खेळेल हे ही कोणाला वाटलं नव्हत.

पण पठ्ठ्याने आपल्या बिहारी रक्तातल्या मेहनतीच्या जोरावर चिकाटीने लढा दिला आणि कित्येक सो कॉल्ड  सुपरस्टार खेळाडूंपेक्षा जास्त विक्रम मोडले.

हे ही वाच भिडू.

The post चंद्रपॉलच्या डोळ्याखालच्या पट्ट्यामागे कोणती काळी जादू होती? appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/chandrapaul-eyestickers-1213-cp/feed/ 0 15597
गांगुली म्हणाला होता, द्रविडमध्ये दम नाही.. https://bolbhidu.com/rahul-dravid-and-sourav-ganguli-about-greg-chappell/ https://bolbhidu.com/rahul-dravid-and-sourav-ganguli-about-greg-chappell/#respond Wed, 01 Apr 2020 09:46:29 +0000 https://bolbhidu.com/?p=21295

दादा सौरव गांगुली आणि कोच ग्रेग चॅपेल यांच्यातील भांडण हे भारतीय क्रिकेट इतिहासातील एक काळे प्रकरण. 2005 साली जॉन राईट यांच्यानंतर भारताचा कोच कोण हा मुख्य प्रश्न होता. कॅप्टन गांगुलीच्या आग्रहाखातर ऑस्ट्रेलियाचा माजी सुपरस्टार ऑल राऊंडर ग्रेग चॅपेलला कोच करण्यात आलं. वाजत गाजत चॅपल साहेब कोच झाले, हवा केली मात्र अपेक्षित रिझल्ट काही देता आला […]

The post गांगुली म्हणाला होता, द्रविडमध्ये दम नाही.. appeared first on BolBhidu.com.

]]>

दादा सौरव गांगुली आणि कोच ग्रेग चॅपेल यांच्यातील भांडण हे भारतीय क्रिकेट इतिहासातील एक काळे प्रकरण.

2005 साली जॉन राईट यांच्यानंतर भारताचा कोच कोण हा मुख्य प्रश्न होता.

कॅप्टन गांगुलीच्या आग्रहाखातर ऑस्ट्रेलियाचा माजी सुपरस्टार ऑल राऊंडर ग्रेग चॅपेलला कोच करण्यात आलं.

वाजत गाजत चॅपल साहेब कोच झाले, हवा केली मात्र अपेक्षित रिझल्ट काही देता आला नाही. मग अपयशाच खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडायच म्हणून चॅपेल साहेबांनी आपल्याला ज्यानं आणलं त्याच गांगुलीला गोत्यात आणलं.

भारताचा झिम्बाब्वे दौरा सुरू होता. गांगुलीला फॉर्म म्हणावा तितका चांगला नव्हता.

गांगुली शारीरिक दृष्ट्या व मानसिकदृष्ट्या फिट नाही. त्याला कॅप्टनशिप झेपत नाही, यामुळे त्याचा फॉर्म खराब झाला आहे. त्याने भारतीय टीमचे कर्णधारपद सोडावे

असा मेल गुरू ग्रेग चॅपेलने बीसीसीआयला लिहिला. प्रचंड वाद झाले. मीडिया मध्ये चर्चा झाली. टूरमध्येच गांगुली चॅपेल भांडणे झाली. गांगुलीने दौरा सोडून परत जाण्याची धमकी दिली, चॅपेलने राजीनामा देण्याच वक्तव्य केलं.

एकंदरीत भांडणे टोकाला पोहचली होती.

सिलेक्शन कमिटी मध्ये सुद्धा यावरून वाद झाले. याची परिणीती गांगुलीची कॅप्टनसी तर गेलीच पण पाठोपाठ त्याची टीम मधून सुद्धा गच्छंती झाली.

गांगुलीच्या जागी द वॉल राहुल द्रविड कॅप्टन बनला.

द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम परदेशात चांगली कामगिरी करू लागली. एकेकाळी भारतीय क्रिकेटचा महाराजा गांगुली आता निवृत्ती घेतोय की काय अस वाटू लागलं.

पण गांगुलीने एका इमोशनल जाहिरातमधून लोकांच्या हृदयाला हात घातला आणि मी पुन्हा येईनच आश्वासन दिलं.

आणि 2007च्या वर्ल्डकप वेळी तो परत आला देखील. तो वर्ल्ड कप म्हणजे भारतासाठी एक दुःखद स्वप्न ठरलं. पहिल्याच फेरीत आपण बाहेर पडलो. आपला अपमानास्पद पराभव झाला होता.

ग्रेग चॅपेलने भारतीय खेळाडूंच्या वागण्यावर वर्तवणुकीवर टीकास्त्र सोडले.

गांगुली,सेहवाग, हरभजन यांच्या बरोबरच कुंबळे, सचिन तेंडुलकरवर सुद्धा त्याने बोट उगारले.

देशभर खळबळ उडलीच होती.अखेर वर्ल्ड कप पराभवाच्या पार्श्वभूमीवर ग्रेग चॅपेल साहेबांना कोच पदावरून काढून ऑस्ट्रेलियाला परत पाठवण्यात आले.

भारतीय क्रिकेट इतिहासातील काळ्या प्रकरणावर पडदा पडला.

नंतर एकदा या विषयावर बोलताना गांगुलीने ड्रेसिंग रूममध्ये जे काय काय घडलं याची मीडियासमोर सविस्तर माहिती दिली. तेव्हा त्याने ग्रेग चॅपेल सोबतच द्रविड बद्दल ची आपली तक्रार सुद्धा उघड केली.

तो म्हणाला,

ग्रेग चॅपेल के कारण ड्रेसिंग रूम बिखरा हुआ था. राहुल द्रविड एक ऐसे इंसान है जिन्हे लगता है की सब कुछ अच्छा हो, मगर ऊस टीम मे सब गलत हो रहा था. मगर उनमें ये दम नहीं था की रिवोलट कर के बोले ये गलत हो रहा है.”

गांगुलीच्या म्हणणं होतं की झिम्बाब्वे दौऱ्यात आपल्या सोबत जे झालं ते बघून द्रविड घाबरला होता व ग्रेग चॅपेल चुकीचं करतोय हे दिसत असूनही काही बोलला नाही.

राहुल द्रविडने आपल्या सहकाऱ्यांची बाजू न घेतल्यामुळे भारतीय टीमचे खूप मोठे नुकसान झाले.

या मुलाखती वरून सरळ कळत होतं की गांगुली आणि द्रविडमधील संबंध सुद्धा बिघडले होते. त्याकाळात एका मॅचच्या आधी गांगुली, द्रविड आणि चॅपल यांचे वाद सुरू असलेला व्हिडीओ आजही इंटरनेटवर पाहायला मिळेल

गांगुलीच्या फॅन्सच तर म्हणणं होतं की दादाला टीममधून काढून टाकलं यामागे द्रविड होता.

पण गांगुलीने नंतर खुलासा केला,

मला नाही वाटत की, यात द्रविडची कोणतीही भूमिका राहिली असेल. असं होत असतं की, जेव्हा कोच काही सांगतो ते कर्णधाराला ऐकावं लागतं.

याचाच अर्थ ग्रेग चॅपेल हा यासगळ्यामागचा कळीचा नारद होता. सचिन ने देखील आपल्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केलेला आहे.

द्रविड आणि गांगुली यांच्यातील वाद ग्रेग चॅपेलच्या गच्छंती नंतर मिटले. देशासाठी हे दोन्ही खेळाडू एकत्र आले आणि अनेक सामने जिंकून देखील दिले. आजही त्यांची मैत्री कायम आहे.

हे ही वाच भिडू.

The post गांगुली म्हणाला होता, द्रविडमध्ये दम नाही.. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/rahul-dravid-and-sourav-ganguli-about-greg-chappell/feed/ 0 21295
शेवटच्या ओव्हरमध्ये वर्ल्डकप जिंकून दिला, आता रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढा देतोय https://bolbhidu.com/jogi-superstar-police/ https://bolbhidu.com/jogi-superstar-police/#comments Sun, 29 Mar 2020 10:14:41 +0000 https://bolbhidu.com/?p=21262

पहिल्या 20-20 वर्ल्ड कपचा फायनल. आपले भाऊबंद आणि जन्माचे वैरी असलेले पाकिस्तान समोर होते. मॅच नेहमी प्रमाणे अटीतटीची सुरू होती. शेवटची एकच ओव्हर उरली होती, पाकिस्तानला जिंकायला 13 धावा हव्या होत्या आणि 1 विकेट हातात होती. मिसबाह उल हक स्ट्राईकवर होता. निम्मं जग टीव्हीसमोर आलं होतं. प्रत्येकाचे हार्ट बिट वाढले होते. धोनीने बॉल सोपवला जोगिंदर […]

The post शेवटच्या ओव्हरमध्ये वर्ल्डकप जिंकून दिला, आता रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढा देतोय appeared first on BolBhidu.com.

]]>

पहिल्या 20-20 वर्ल्ड कपचा फायनल. आपले भाऊबंद आणि जन्माचे वैरी असलेले पाकिस्तान समोर होते. मॅच नेहमी प्रमाणे अटीतटीची सुरू होती. शेवटची एकच ओव्हर उरली होती, पाकिस्तानला जिंकायला 13 धावा हव्या होत्या आणि 1 विकेट हातात होती. मिसबाह उल हक स्ट्राईकवर होता.

निम्मं जग टीव्हीसमोर आलं होतं. प्रत्येकाचे हार्ट बिट वाढले होते.

धोनीने बॉल सोपवला जोगिंदर शर्मा कडे.

एवढ्या महत्वाच्या क्षणी अनुभवी हरभजन ची ओव्हर शिल्लक असताना नवोदित जोगिंदर शर्मा कडे ओव्हर का दिली असेल हा प्रश्न अनेकांना पडला. भारतात अनेकांनी धोनीच्या नावाने बोटे मोडली पण तो कुल होता.

जोगिंदर शर्मा मूळचा हरियाणाचा मीडियम पेसर. कामचलाऊ बॅटिंग सुद्धा करायचा. हा 20-20 वर्ल्ड कप म्हणजे त्याची पहिलीच इंटरनॅशनल सिरीज होती. फायनलच नाही तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल वेळी देखील धोनीने शेवटची ओव्हर जोगिंदर शर्माला दिली होती.

जोगिंदर शर्माने पहिलाच बॉल वाईड टाकला.

सगळ्या जगाला झहीर खानने 2003च्या वर्ल्ड कप वेळी टाकलेली ओव्हर आठवली. छातीत धस्स झालं. त्यातच जोगिंदर शर्माने दुसरा बॉल फुल टॉस टाकला आणि मिसबाहने त्याला सिक्स हाणला. धोनी आणि जोगिंदर शर्माच्या कुळाचा उद्धार अख्ख्या भारताने केला.

आता पाकिस्तानला जिंकायला 4 बॉल मध्ये 6 धावा लागणार होत्या. अगदी सोपे टार्गेट समोर होते. जोगिंदर शर्माने थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला, मिसबाहने आपला स्पेशल स्कुप शॉट मारला.

आपल्याला वाटलं मॅच गेली पण किपरच्या मागे उभा असलेल्या श्रीशांतने कोणतीही चूक केली नाही आणि स्टाईल मारत कॅच धरला.

कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीने पाकिस्तानला हरवून पहिला 20-20 वर्ल्ड कप उचलला. त्या दिवशी मॅन ऑफ द मॅच इरफान पठाण होता, सिरीज चा हिरो युवराज सिंग होता.

पण जोगिंदर शर्माची शेवटची ओव्हर कधीच कोण विसरू शकणार नाही.

वर्ल्ड कप मध्ये केलेल्या या कामगिरी मुळे हरयाणा सरकारने जोगिंदर शर्माला 21 लाखाचे कॅश प्राईज दिले व सोबतच पोलीस खात्यात नोकरी देखील दिली.

पुढे जोगिंदर शर्मा नव्या फास्टर बॉलरच्या स्पर्धेत मागे पडत गेला. चेन्नई सुपरकिंग मध्ये पण अपेक्षित यश मिळाले नाही.

त्यातच 2011 साली झालेल्या अपघातानंतर त्याची क्रिकेट कारकीर्द जवळ जवळ संपुष्टात आली. त्याने हरियाणा पोलीस खात्यातल्या नोकरीत मन रमवले.

आज कोरोना व्हायरसने जगभरात उच्छाद मांडला आहे. डॉक्टर नर्स पासून ते पोलिसांपर्यंत प्रत्येक जण युद्धपातळीवर आपली जबाबदारी पार पाडत आहेत. हरयाणा पोलीस मध्ये डेप्युटी सुप्रीटेंडन्ट असलेला जोगिंदर शर्मा सुद्धा यात मागे नाही.

काल आयसीसी ने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोत दिसले की जोगिंदर शर्मा रस्त्यावर उतरून लोकांना कर्फ्यु पाळण्याचे आवाहन करत आहे.

जस शेवटच्या ओव्हर मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला तसच कोरोना ला देखील हरवु अशी प्रेरणा तो प्रत्येक नागरिकाला देताना दिसत आहे.

हे ही वाच भिडू.

The post शेवटच्या ओव्हरमध्ये वर्ल्डकप जिंकून दिला, आता रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढा देतोय appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/jogi-superstar-police/feed/ 1 21262
बेळगावच्या चौगुलेंनी भारताला पहिलं ऑलिंपिक मेडल मिळवून दिलं असतं पण.. https://bolbhidu.com/p-d-chaugule-belgav-first-olympic-player-in-india/ https://bolbhidu.com/p-d-chaugule-belgav-first-olympic-player-in-india/#respond Thu, 26 Mar 2020 14:19:06 +0000 https://bolbhidu.com/?p=21223

पुण्यातील डेक्कन जिमखाना ही भारतातील आद्य क्रीडा संस्था. 1910 या सालापासूनच या जिमखान्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या कुस्त्या होत असत. काही वर्षातच खोखो आट्यापाट्या, रस्सीखेच, सायकलिंग,क्रॉस कंट्री वगैरे स्पर्धा होऊ लागल्या. टाटा कंपनीचे अध्यक्ष सर दोराबाजी टाटा यांच्याकडे डेक्कन जिमखान्याची जबाबदारी आली आणि ही संस्था वेगात प्रगती करू लागली. दोराबाजी टाटांनी पाश्चात्य देशातली क्रीडा संस्कृती पाहिली होती. […]

The post बेळगावच्या चौगुलेंनी भारताला पहिलं ऑलिंपिक मेडल मिळवून दिलं असतं पण.. appeared first on BolBhidu.com.

]]>

पुण्यातील डेक्कन जिमखाना ही भारतातील आद्य क्रीडा संस्था. 1910 या सालापासूनच या जिमखान्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या कुस्त्या होत असत. काही वर्षातच खोखो आट्यापाट्या, रस्सीखेच, सायकलिंग,क्रॉस कंट्री वगैरे स्पर्धा होऊ लागल्या.

टाटा कंपनीचे अध्यक्ष सर दोराबाजी टाटा यांच्याकडे डेक्कन जिमखान्याची जबाबदारी आली आणि ही संस्था वेगात प्रगती करू लागली.

दोराबाजी टाटांनी पाश्चात्य देशातली क्रीडा संस्कृती पाहिली होती. ज्याप्रकारे औद्योगिक क्रांती भारतात करायचं त्यांचं ध्येय होत त्याच प्रमाणे भारताला क्रीडा क्षेत्रातही सर्वोच्च स्थानावर न्यायचं स्वप्न त्यांनी पाहिलं.

दोराबाजी टाटा,मोरेश्वर देशमुख, न चि केळकर, एल बी फाटक, हरी तुळपुळे अशा या डेक्कन जिमखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की

1920 साली बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये भरणाऱ्या जागतिक ऑलिंपिक स्पर्धेत भारताची टीम पाठवायची.

टाटांचा दबदबा आणि डेक्कन जिमखान्याबद्दल असणारी इंग्रज अधिकाऱ्यांची सहानुभूती यामुळे भारताचे स्टेट सेक्रेटरी लॉर्ड मोंटेंग्यू यांनी भारतीय टीम पाठवण्यास परवानगी दिली.

24 एप्रिल 1920 मध्ये डेक्कन जिमखान्यातर्फे सिलेक्शन सामने भरवण्यात आले आणि त्यातून सहा जणांची निवड करण्यात आली.

कोल्हापूरचे शिंदे आणि मुंबईचे कुमार नवले कुस्ती साठी, कलक्त्याचा पूर्णचंद्र बॅनर्जी छोट्या शर्यतीसाठी तर साताऱ्याचे सदाशिव दातार, हुबळी चे एच डी कैकाडी आणि बेळगाव चे पीडी चौगुले मॅरेथॉन शर्यतीसाठी निवडले गेले.

पीडी चौगुले म्हणजे फडेप्पा दरेप्पा चौगुले. हे वयाने सर्वात लहान होते. मूळचे कुस्तीगीर पण कसल्या तरी अपघातामुळे हाताला दुखापत झाली आणि त्यानंतर ते शर्यतीकडे वळले. अनेक स्पर्धा गाजवल्या.

1919 साली 27 मैलांची मॅरेथॉन जिंकून त्यांनी अनधिकृत विश्व विक्रम देखील केला होता.

5 जून 1920 रोजी ही भारतीय टीम जहाजाने इंग्लंडला निघाली. तिथे त्यांचे काही दिवस इंग्रज प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सराव होणार होता.

टाटांनी मुख्य स्पॉन्सरशिप दिली होती मात्र टिळकांनी व अनेक भारतीयांनी या संघासाठी देणगी दिली होती. भारताच्या ब्रिटिश गव्हर्नरनी देखील त्यांची येण्याजाण्याची व अँटवर्पच्या ब्रिटिश सैनिकी तळावर राहण्याची व्यवस्था केली होती.

पण प्रवासाच्या पहिल्या दिवसापासून या खेळाडूंच्या अडचणींना प्रारंभ झाला. जहाजातला पहिल्यांदाच करत असलेला मोठा प्रवास त्यांना झेपत नव्हता. उलटयानी त्यांना बेजार केले. त्यात पीडी चौगुले हे शाकाहारी असल्यामुळे त्यांच्या खाण्याचे प्रचंड हाल होत होते.

हिच परिस्थिती इंग्लंड आणि बेल्जियममध्ये कायम राहिली. याच सोबत वर्णद्वेषाचाही मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. भारतीय संघाने इंग्लंडमध्ये सर्व करताना अनेक स्पर्धा जिंकल्या.

आपल्या गुलाम देशातील खेळाडू आपल्या पेक्षा वरचढ ठरत आहेत हे गोऱ्याना सहन होत नव्हते.

विशेषतः पीडी चौगुलेनी तिथे बरेच नाव कमावले. अमेरिकेतील वर्तमानपत्रामध्ये हिंदू डार्क हॉर्स ऑलिंपिकमध्ये चमकणार अशा बातम्या झळकू लागल्या.

10 ऑगस्ट 1920 रोजी भारतीय टीम अँटवर्पमध्ये दाखल झाली. बेल्जियमच्या राजाच्या हस्ते उदघाटन झाले. ब्रिटिश भारताचा झेंडा घेऊन भारताचे खेळाडू या समारंभात सहभागी झाले होते.

स्पर्धांना सुरवात झाली. प्रवास, खाण्याचे हाल, हवामानातील बदल यामुळे भारतीय खेळाडू लवकर स्पर्धेतून बाहेर पडले.

याला आणखी एक कारण होते ते म्हणजे धावण्याचे शूज.

आपल्या खेळाडूंना धावताना शूज वापरण्याची सवय नव्हती. या शूज मुळे पायांना जखमा होत होत्या. बॅनर्जी तर पहिल्याच फेरीत बाहेर पडला.

आता सगळ्या आशा स्टार खेळाडू असणाऱ्या पीडी चौगुले यांच्यावर होत्या.

दहा हजार मिटर स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्यांनी धावायला सुरवात केली पण तीन किलोमीटरवर एका माथेफिरूने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्याचा नेम हुकला पण घाबरलेल्या चौगुलेंनी स्पर्धा निम्म्यात सोडली.

22 ऑगस्ट रोजी चौगुलेची मुख्य 42 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा होती. बाकीच्या खेळाडूंनी त्यांना समजावून धावण्यास तयार केले. दातार आणि चौगुले स्पर्धेला उतरले. कैकाडी आलेच नाहीत.

भर पावसात स्पर्धा सुरू झाली. 15 किलोमीटरपर्यंत चौगुलेंनी आघाडी घेतली होती. पण शूजमध्ये पाणी गेल्यामुळे घोट्यापाशी जखमा झाल्या होत्या. या जखमा झोंबु लागल्या, त्यामुळे त्यांचा वेग मंदावला.

सदाशिव दातारनी स्पर्धा सोडली पण चौगुले प्रचंड वेदना घेऊन जिद्दीने धावतच होते. कशीबशी स्पर्धा त्यांनी पूर्ण केली.

त्यांचा 19वा क्रमांक आला. तत्कालीन ब्रिटिश पत्रकाराने लिहून ठेवले आहे,

“अँटवर्प ऑलिंपिकमध्ये भावना हेलवणारे एकच दृश्य होते ते म्हणजे मरेथॉनच्या अंतिम टप्प्यात स्टेडियममध्ये प्रवेश करणाऱ्या चौगुलेंच्या चेहऱ्यावरच्या वेदना व निराश यांच्यावर त्यांच्या संयमित कणखरपणाने केलेली मात. भारताच्या हजारो वर्षांच्या संयमशील इतिहासाचे ते प्रतीक होतेच पण एक मूक राजकीय विधान देखील होते.”

पीडी चौगुले यांना या स्पर्धेत प्रमाणपत्र मिळाले. ऑलिम्पिकमध्ये स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले.

त्या दिवशी जर परिस्थितीने त्यांना साथ दिली असती तर त्यांनी भारताला पहिलं मेडल निश्चित जिंकून दिलं असतं.

आज अनेक भारतीय खेळाडू वेगवेगळ्या खेळात जगात नाव कमवत आहेत, ऑलिंपिक गाजवत आहेत, मेडल मिळवत आहेत याच श्रेय जातं पी.डी. चौगुलेंच्या सारख्या निडर खेळाडूंनी सुरू केलेल्या परंपरेला.

मात्र आज परिस्थिती अशी आहे की आपल्या पैकी अनेकांना पी.डी. चौगुलेंच नाव देखील ठाऊक नसते. आज बेळगाव संयुक्त महाराष्ट्र मध्ये त्यांची आठवण जपलेली आहे. तिथे त्यांना पवनंजय नावाने ओळखल जात होतं. त्यांच्या नावाने स्पर्धा भरवली जाते.

संदर्भ- दैनिक सकाळ: शताब्दी भारताच्या ऑलिम्पिक प्रवेशाची

हे ही वाच भिडू.

 

The post बेळगावच्या चौगुलेंनी भारताला पहिलं ऑलिंपिक मेडल मिळवून दिलं असतं पण.. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/p-d-chaugule-belgav-first-olympic-player-in-india/feed/ 0 21223
पंजाबी चिकनने न्यूझीलंडची निम्मी टीम गारद केली होती https://bolbhidu.com/newzealand-in-1988-tour-of-india/ https://bolbhidu.com/newzealand-in-1988-tour-of-india/#comments Wed, 25 Mar 2020 15:50:30 +0000 https://bolbhidu.com/?p=21209

त्याकाळी आजच्या प्रमाणे क्रिकेटचा भडिमार झाला नव्हता. वर्षातून अगदी मोजके कसोटी सामने खेळले जायचे. गोष्ट आहे 1988ची, जवळपास 10 वर्षांनी न्यूझीलंड ची टीम भारत दौऱ्यावर आली होती. नंतर भारताचे कोच बनलेले गुरू जॉन राईट न्यूझीलंडचे कॅप्टन होते तर मुंबईकर दिलीप वेंगसरकर भारताचे कर्णधार होते. भारताची टीम तगडी होती. के श्रीकांत, सिद्धू, अझरुद्दीन, वेंगसरकर, रवी शास्त्री […]

The post पंजाबी चिकनने न्यूझीलंडची निम्मी टीम गारद केली होती appeared first on BolBhidu.com.

]]>

त्याकाळी आजच्या प्रमाणे क्रिकेटचा भडिमार झाला नव्हता. वर्षातून अगदी मोजके कसोटी सामने खेळले जायचे. गोष्ट आहे 1988ची, जवळपास 10 वर्षांनी न्यूझीलंड ची टीम भारत दौऱ्यावर आली होती.

नंतर भारताचे कोच बनलेले गुरू जॉन राईट न्यूझीलंडचे कॅप्टन होते तर मुंबईकर दिलीप वेंगसरकर भारताचे कर्णधार होते.

भारताची टीम तगडी होती. के श्रीकांत, सिद्धू, अझरुद्दीन, वेंगसरकर, रवी शास्त्री असे तुफान हाणामारी करणारे बॅट्समन भारताची मेन ताकद होती. शिवाय फॉर्ममध्ये असलेला कपिल, नरेंद्र हिरवानी हे बॉलिंगची बाजू समर्थपणे हाताळत होते.

न्यूझीलंड ची टीम सुद्धा नावाजलेली होती. त्यांची बॉलिंग खतरनाक होती. सर रिचर्ड हेडली तेव्हा आपल्या करियरच्या पीक पॉईंट वर होते. कसोटीमध्ये 400 विकेट घेण्याच्या ते उंबरठ्यावर होते. शिवाय जॉन राईट, ग्रेटबॅच , रुदरफोर्ड सारखे जागतिक कीर्तीचे बॅट्समन कोणत्याही पिचवर मोठा स्कोर उभा करण्यासाठी प्रसिद्ध होते.

पहिलीच कसोटी बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होती.

वेंगसरकरने टॉस जिंकुन पहिली बॅटिंग निवडली. सिद्धूने जोरदार सुरवात केली. त्याने ठोकलेल्या शतकाच्या आणि वेंगसरकरच्या 75 धवांच्या जोरावर भारताने 384 धावा उभा केल्या.

उत्तरादाखल न्युझीलंडने फक्त 189 धावा बनवल्या आणि ऑल आउट झाली. कपिल देव सोबतच नवख्या अर्षद आयुबने 4 विकेट घेतल्या. न्यूझीलंड टीमची बेक्कार वाट लागली होती.

त्याकाळी कसोटी च्या दरम्यान एक रेस्ट दिवस असायचा. त्या दिवशी दुःखात असलेल्या न्यूझीलंडच्या टीमने डिनरला भारतीय स्टाईलच्या चिकन, कबाबवर ताव मारला.

पण दुर्दैवाने हा खाना त्यांना झेपला नाही.

कसोटीचा चौथा दिवस सुरू झाला आणि न्यूझीलंडच्या नाजूक प्लेअर्सची पाकिस्तानची वारी सुरू झाली. अगदी खेळ सुरू झाला तरी काही जण टॉयलेटमधून बाहेर येण्यास तयार नव्हते.

भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये के श्रीकांत आणि सिद्धू ची जोडी सेट झाली होती. ते काही केल्या किवी बॉलर्सना आउट होत नव्हते. सर रिचर्ड हेडलीचं पोट बिघडलं होत त्यामुळे ते खेळायला उतरलेच नव्हते.

त्यातच चॅटफिल्ड नावाचा दुसरा फास्टर बॉलर बॉलिंग ला उतरला. त्याने मोठी रनअप घेतली. पण बॉल टाकलाच नाही, अंपायर, बॅट्समन,विकेट किपर सगळ्यांना मागे टाकून थेट पव्हेलीयन दिशेने धूम ठोकली. बाकीचे प्लेअर्स बघतच राहिले. चॅटफिल्डने थेट ड्रेसिंग रूमचा टॉयलेट गाठला .

सगळं स्टेडियम हसत होत. न्यूझीलंड टीमची अवस्था अतिशय वाईट झाली होती. त्यांचे हाल कुत्रे देखील खात नव्हते. त्यांचे राखीव खेळाडू देखील हगवणीमुळे संपले.

अखेर कॉमेंटेरी करणाऱ्या दोघांना न्यूझीलंडने फिल्डिंग करण्याची विनंती केली.

भारताने 141 धावावर आपली इनिंग डिक्लेर केली आणि न्यूझीलंडने सुखाचा श्वास सोडला. त्यांची दुसरी इनिंग लगेच गुंडाळली गेली. अनेक बॅट्समन फक्त हजेरी लावून गेले. भारताने तबाबल 172 धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला.

या मॅचचं मॅन ऑफ दी मॅच पंजाबी चिकन ठरले.

तिथून पुढे न्यूझीलंडच्या कोचने टीमला आदेश दिले की खेळाडूंनी स्वतः स्वतः स्वयंपाक बनवून खायचा, बाहेर जेवायला जायचे नाही. आजही परदेशी टीम भारतात दौऱ्या साठी आली तर विराट कोहली, बुमराह वगैरे राहिले बाजूला इथल्या जेवणाची आणि उष्ण हवामानाची तयारी पहिली करतात.

हे ही वाच भिडू.

 

The post पंजाबी चिकनने न्यूझीलंडची निम्मी टीम गारद केली होती appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/newzealand-in-1988-tour-of-india/feed/ 1 21209
जयसूर्याने एका ओव्हरमध्ये मनोज प्रभाकरचं क्रिकेटमधलं करीयर संपवल https://bolbhidu.com/jaysurya-manoj-prabhakar/ https://bolbhidu.com/jaysurya-manoj-prabhakar/#respond Thu, 12 Mar 2020 07:28:36 +0000 https://bolbhidu.com/?p=20912

गोष्ट आहे १९९६ च्या वर्ल्डकपची. भारत श्रीलंका मॅच. नाही नाही तो कुप्रसिद्ध सेमीफायनल नाही. त्याच्या आधी दिल्लीमध्ये झालेल्या साखळी सामन्यात आपण समोरासमोर आलो होतो. नुकताच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवामुळे हा सामना जिंकणे आपल्याला गरजेचे होते. अर्जुन रणतुंगाने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग स्वीकारली. फॉर्ममध्ये असलेल्या सचिन तेंडुलकर सोबत ओपनिंगला उतरला लोकल बॉय मनोज प्रभाकर.   मनोज प्रभाकर एक मिडीयम पेसर होता.स्विंग गोलंदाजी […]

The post जयसूर्याने एका ओव्हरमध्ये मनोज प्रभाकरचं क्रिकेटमधलं करीयर संपवल appeared first on BolBhidu.com.

]]>

गोष्ट आहे १९९६ च्या वर्ल्डकपची. भारत श्रीलंका मॅच. नाही नाही तो कुप्रसिद्ध सेमीफायनल नाही. त्याच्या आधी दिल्लीमध्ये झालेल्या साखळी सामन्यात आपण समोरासमोर आलो होतो. नुकताच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवामुळे हा सामना जिंकणे आपल्याला गरजेचे होते.

अर्जुन रणतुंगाने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग स्वीकारली. फॉर्ममध्ये असलेल्या सचिन तेंडुलकर सोबत ओपनिंगला उतरला लोकल बॉय मनोज प्रभाकर.  

मनोज प्रभाकर एक मिडीयम पेसर होता.स्विंग गोलंदाजी मध्ये तो एक्सपर्टहोता. पण त्याची बॅटींग देखील चांगली होती. कामचलाऊ खेळता खेळता त्याने २-३ शतक ठोकले होते. म्हणूनच अझरूद्दीनने त्याला वनडेमध्ये थेट ओपनिंगला पाठवायला केली होती. भारतातर्फे पहिली ओव्हर टाकणारा आणि बॅटिंग करताना पहिला बॉल खेळणारा एक मेव खेळाडू अशी त्याची प्रसिद्धी झाली .

त्यामुळे झाल अस होत की तो स्वतःला कपिल पेक्षा ही आपण भारी ऑलराउंडर आहे या गैरसमजात राहू लागला होता.

पण त्यादिवशी मनोज प्रभाकरला आपल्या समोर कांय वाढून ठेवलंय हे ठाऊक नव्हत.

चामिंडा वासची तुफानी बॉलिंग त्याला झेपतच नव्हती. सगळे बॉल त्याच्या कानाजवळून जात होते. त्यामानाने सचिन नेहमीच्या फ्लोमध्ये चांगला खेळत होता. प्रभाकरचं घरच ग्राउंड असूनही दिल्लीकरांनी त्याची हुर्यो उडवायला सुरवात केली. तो अजून जास्त प्रेशर मध्ये आला.

९ ओव्हर मध्ये भारताच्या फक्त २७ धावा झाल्या होत्या. प्रभाकरने ३६ बॉल मध्ये फक्त ७ धावा काढल्या होत्या. प्रेशर खाली येऊन त्याने अखेर पुढ येऊन मारायचा प्रयत्न केला आणि त्यात तो आउट झाला. भारतीय पब्लिकने तो आउट झाल्याबद्दल टाळ्या वाजवल्या.

पुढे सचिनची सेंच्युरी आणि अझरच अर्धशतक याच्या जोरावर भारताने २७१ धावा काढल्या. त्या काळच्या मानाने हा धावांचा डोंगर होता. श्रीलंकेला तो झेपणार नाही असच सगळ्यांना वाटत होतं. पण झाल उलटच.

रणतुंगाच्या कप्तानीखाली लंकन बॅट्समननी वेगळीच स्ट्रॅटेजी आखली होती. पहिल्या १५ ओव्हर मध्ये फटकेबाजी करून १०० धावा काढणे.

पहिली ओव्हर टाकायला आलेल्या प्रभाकरला कालूवितरनाने सलग दोन बाऊंड्री हाणली. पहिल्या ओव्हरलाच प्रभाकरने ११ धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरला श्रीनाथने ८ धावा दिल्या. तिसरी ओव्हर टाकायला प्रभाकर परत आला. यावेळी मात्र त्याच्या समोर घातक जयसूर्या होता.

त्याने पहिलाच बॉल मिडओनला उचलून मारला. वन बाउन्स फोर गेला. दुसऱ्या बॉलला मात्र जयसूर्याने मिडऑफला सिक्स हाणला. तिसरा बॉल डॉट गेला. चौथ्या पाचव्या आणि सहाव्या बॉलला सलग तीन फोर टोलवले. प्रभाकरच तोंड बघण्यासारखं झाल होतं. यावेळी एका ओव्हर मध्ये त्याने २२ धावा दिल्या होत्या.

आजकाल अशोक डिंडा वगैरे ची बॉलिंग बघून आपल्याला सवय झाली आहे. पण त्याकाळात एखाद्या बॉलरची इतकी पिटाई सहसा होत नव्हती.

फिरोजशहा कोटलाच्या पॅव्हेलीयनमधून प्रभाकरला दिलेल्या अस्सल दिल्लीवाल्या शिव्या ऐकू येऊ लागल्या.

अझरने त्याच्या हातातून बॉल काढून घेतला आणि वेंकटेश प्रसादकडे दिला.

वेंकटेश प्रसाद, कुंबळे या दोघांनी जयसूर्याला बरयापैकी जखडून ठेवल होतं. पार्टटाईम बॉलिंग करणाऱ्या सचिनने देखील चांगली बॉलिंग टाकली. जयसूर्याला कुंबळेने आउट काढले.

अझरने मिडल ओव्हरमध्ये प्रभाकरला परत बोलावले. तो भारताचा मुख्य बॉलर होता आणि त्याच्या अजून ८ ओव्हर उरल्या होत्या. त्या भरून काढणारा दुसरा बॉलर नव्हता आणि आता प्रभाकरचा कर्दनकाळ जयसूर्या देखील समोर नव्हता.

प्रभाकर परत आला मात्र त्याने लांब रणअप घेऊन वेगवान बॉलिंग करायच्या ऐवजी स्पिन टाकायला सुरवात केली.

कुंबळे आणि सचिनला खेळायला लंकन बॉलरना अडचण येत आहे ते बघून प्रभाकरने ही आयडिया केली होती. कॉमेंट्री करणारे सुद्धा हसत होते. फास्टर बॉलर स्पिन बॉलिंग टाकतोय हे चित्र जागतिक क्रिकेटमध्ये फार कमी वेळा पाहायला मिळत होतं.

प्रभाकरच दुर्दैव त्याला पुढच्या 2 ओव्हर मध्ये सुद्धा रणतुंगा आणि कंपनीने फोडून काढल. टोटल ४ ओव्हर मध्ये प्रभाकरने ४७ धावा दिल्या होत्या.

भारताने ती मॅच गमावली. याच सगळ श्रेय मिळालं मनोज प्रभाकरला.ग्राउंडवर आणि टीव्हीवर ज्यांनी मॅच बघितली त्यांनी तर त्याला शिव्या दिल्याच होत्या, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातदेखील समीक्षकांनी त्याच्यावर टिकेचा पाउस पाडला.

“मनोज प्रभाकर सिरीयस नाही. त्याची फिटनेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी कमी पडतेय. त्यामुळेच तो दमून स्पिन बॉलिंग करू लागला आहे.”

या टीकेचा परिणाम झाला. ती प्रभाकरच्या आयुष्यातली शेवटची मॅच ठरली. पुढच्या वर्ल्डकपच्या एकही सामन्यात त्याला घेतल गेल नाही.

वयाच्या ३२ व्या वर्षी त्याने निवृत्ती घेतली. पुढे त्याने देखील मान्य केल की त्या एका ओव्हरमध्ये जयसूर्याने त्याचे जे हाल केले त्यामुळे त्याला निवृत्ती घ्यावी लागली. 

पुढे त्याने राजकारणात हातपाय मारून घेतले. त्यातही अयशस्वी झाला. मचफिक्सिंग प्रकरणातही त्याने स्टिंग ऑपरेशन करून स्वतःच हस करून घेतल. आता कधी कोचिंग तर कधी टीव्ही वर विश्लेषक म्हणून तो दिसतो.

हे ही वाच भिडू.

The post जयसूर्याने एका ओव्हरमध्ये मनोज प्रभाकरचं क्रिकेटमधलं करीयर संपवल appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/jaysurya-manoj-prabhakar/feed/ 0 20912
रागाने लालबुंद झालेला इंझमाम स्टेडियममध्ये घुसला आणि ‘आलू आलू चिडवणाऱ्याला धुतले. https://bolbhidu.com/inazmam-ul-haq-aloo-incident/ https://bolbhidu.com/inazmam-ul-haq-aloo-incident/#respond Tue, 03 Mar 2020 11:20:05 +0000 https://bolbhidu.com/?p=20608

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. भारत पाकिस्तान वैर पूर्वापार चालत आलेल पण क्रिकेटच्या मैदानात ते त्वेषाने लढल जायचं. प्रेक्षक तर त्याहूनही खुंखार व्हायचे. मॅच हरल्यावर टीव्ही फोडला जायचा. पॅव्हेलीयनमध्ये आपआपसात मारामारी ठरलेली असायची. काही काही वेळा खुर्च्या जाळलेली उदाहरणे देखील आहेत. मात्र खेळाडू सोबत प्रेक्षकांची मारामारी होण्याचा एकमेव प्रसंग घडला होता. १९९७ सालची ही घटना घडली […]

The post रागाने लालबुंद झालेला इंझमाम स्टेडियममध्ये घुसला आणि ‘आलू आलू चिडवणाऱ्याला धुतले. appeared first on BolBhidu.com.

]]>

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. भारत पाकिस्तान वैर पूर्वापार चालत आलेल पण क्रिकेटच्या मैदानात ते त्वेषाने लढल जायचं. प्रेक्षक तर त्याहूनही खुंखार व्हायचे. मॅच हरल्यावर टीव्ही फोडला जायचा. पॅव्हेलीयनमध्ये आपआपसात मारामारी ठरलेली असायची. काही काही वेळा खुर्च्या जाळलेली उदाहरणे देखील आहेत. मात्र खेळाडू सोबत प्रेक्षकांची मारामारी होण्याचा एकमेव प्रसंग घडला होता.

१९९७ सालची ही घटना घडली होती टोरांटो कॅनडामध्ये. गंमत म्हणजे या सिरीजचं नाव होत भारत पाकिस्तान फ्रेन्डशिप सहारा कप.

भारताच कप्तान होता सचिन आणि पाकिस्तानचा कप्तान होता रमीझ राजा. सचिनची टीम तुलनेने नवीन होती. अझरूद्दीन आणि जडेजा हे दोनच तसे अनुभवी खेळाडू सचिनच्या सोबतीला होते. नाही तर देबाशिष मोहोंती, अॅबे कुरविल्ला, निलेश कुलकर्णी, साबा करिम असे अनेक नवे चेहरे खेळत होते. रॉबिनसिंग, गांगुली,द्रविड यांना येऊन सुद्धा जास्त काळ झाला नव्हता.

पाकिस्तानी टीम वासिम वकार या नेहमीच्या तगड्या बॉलर्स शिवाय आली होती मात्र तरीही त्यांची टीम स्ट्रॉंग वाटत होती. रमीझ राजाला वाटले देखील की आपण भारताला सहज हरवून टाकू.

मात्र घडल उलटच.

अगदी पहिल्या मॅच पासून सचिनच्या टीमने पाकिस्तानवर राज्य केलं. गांगुली तेव्हा विशेष फॉर्म होता. पहिली मॅच आपण त्याच्या बॉलिंग मुळे जिंकली. दुसऱ्या मॅच वेळी कुरविल्ला, मोहंती, गांगुली या भारतीय बॉलर्सनी पाकिस्तानच्या चिंधड्या उडवल्या, अवघ्या ११६ धावात पाकवाले ऑल डाऊन झाले.

जेव्हा भारताची बॅटिंग सुरु झाली तेव्हा आपला विजय  फक्त सोपोस्कर उरला होता.

भारतीय प्रेक्षक बेभान झाले होते. यापूर्वी पाकिस्तानला आपण एवढ रडवलं नव्हतं. पाक फॅन्स तर अगदी चिडीचूप झाले होते. पाकिस्तानी खेळाडूदेखील खांदे पाडून फिल्डिंग करत होते. सगळ काही ठीक चालल होतं. भारताची एक विकेट पडली होती तरी आपण मजबूत स्थितीत होतो.

अचानक सोळाव्या ओव्हरच्या दरम्यान बाउन्ड्रीलाईन जवळ काही तरी गोंधळ झाला.

पाकिस्तानचा इंझमाम उल हक मैदानातून थेट स्टेडियमच्या गर्दीत घुसला आणि एका प्रेक्षकाला त्याने बडवायला सुरवात केली.

कोणाला काहीच कळेना की काय चाललय. इतक्यात मागून एका राखीव पाकिस्तानी खेळाडूने इंझमामच्या हातात बॅट दिली.

धिप्पाड जनावरांसारखा दिसणारा इंझमाम कोणाच्या तरी डोक्यात बॅट घालतोय की काय असच वाटत होतं.

पोलीस धावत आले. बाकीच्या प्रेक्षकांनी देखील इंझमामला पकडल मात्र तो कोणाला आवरणारा नव्हता. त्याने जमिनीवर बॅट आपटली. काही तरी महाभयंकर घडलय असच वाटत होतं.

इंझमाम उल हक हा तसा शांत खेळाडू. कधी कोणाच्या अध्यात नाही न मध्यात नाही. कोणाशी त्याची भांडणे आहेत अस ऐकिवातही नाही. बोलताना चालताना सुद्धा निवांत हलत डुलत हत्तीसारखा वागणारा म्हणून तो फेमस होता.

मग त्या दिवशी अस काय झाल की इंझीचा कंट्रोल सुटला?

वेगवेगळे अंदाज केले जात होते की त्याला प्रेक्षकामधून कोणी तरी आईवरून शिवी दिली असेल. कोणाला वाटल धर्मावरून किंवा देशावरून चिडवल असेल. पण तस काही नव्हत.

इंझमामला आलू आलू म्हणून चिडवल म्हणून राग आला होता.

ज्याने हे केल त्याच नाव शिवकुमार धिंड. तो कॅनडास्थित भारतीय माणूस. तो व त्याचा मित्र विक्की अगदी सुरवातीपासून वेगवेगळ्या प्लेयर्सच्या खोड्या काढून आसुरी आनंद मिळवत होते. त्यांनी भारतीय खेळाडूना सुद्धा सोडल नव्हत. अझरुद्दीनला संगीता बिजलानीला घटस्फोट दिला म्हणून चिडवल तर देबाशिष मोहंतीला सावळ्या रंगावरून कालिया, कालिया म्हणत होते.

एक मोठा कर्णा घेऊन त्यातून हा चिडवण्याचा प्रकार सुरु होता.

सगळेच खेळाडू वैतागले होते पण दुर्लक्ष करत होते. पण जेव्हा त्यांनी इंझमामला मोटा आलू म्हणून चिडवायला सुरवात केली तेव्हा मात्र सहनशक्तीचा अंत झाला. तो चिडलाय हे बघून शिवकुमार जास्त चेकाळला. त्याच्या सोबतचे साथीदार त्याला प्रोत्साहन देऊ लागले आणि स्टेडियमभर आलू आलूचा नारा सुरु झाला.

उखडलेल्या बटाट्याने आपल्या पेक्षा निम्म्या साईजच्या शिवकुमार धिंड ला ओढून ओढून मारले.

तिथून प्रचंड राडा सुरु झाला. कॅनडामध्ये मॅच असूनही दोन्ही देशातून आलेल्याचे प्रेक्षकांचे प्रमाण खूप आहे. हे सगळे लोक हमरीतुमरीवर आले होते. पोलीसाना देखील ते आवरत नव्हते. यात खूप वेळ गेला.

आता मॅच कॅन्सल होऊन भारताच्या हाता तोंडाशी आलेला विजय निसटून जातो की काय अस वाटत होतं.  

अखेर रमीज राजा आणि सचिन तेंडूलकर मैदानात आले त्यांनी शांततेच आवाहन केल. मग कुठे सामना सुरु झाला. गांगुली, द्रविड आउट झाल्यावर अझर आणि सचिनने संयमाने खेळून मॅच जिंकून दिला.

पण अजून गोंधळ संपला नव्हता. मॅच रेफ्रींनी झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून इंझमामला 2 सामन्यासाठी बॅन केले. पण यात समाधानी नसणाऱ्या शिवकुमार धिंडने इंझमाम विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली.

पाकिस्तानच्या मॅनेजरने त्याला तक्रार मागे घेण्याची विनंती केली आणि याबदल्यात मॅचची तिकिटे देऊ केली. पण शिवकुमार यासाठी तयार झाला नाही. पाकिस्तानने दिलेले १०००० हजार डॉलर एवढे पैसे सुद्धा त्याने नाकरले.

शिवकुमारच्या हेकेखोरपणामुळे हा प्रश्न आणखी चिघळला होता. सगळ्या जगभरातील मिडियामध्ये ही क्लिप दाखवली जात होती.  जेवढे हे प्रकरण वाढेल तेवढी दोन्ही देशांची बदनामी होणार होती.

शिवकुमारला समजावून सांगण्यासाठी त्याला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये भेटायला बोलवल.

शिवकुमार एका मुलाखती मध्ये सांगतो की तिथे सचिन अझर आणि जडेजा हजर होते. कधीकधी एखाद्या व्यक्तीचा संयम सुटतो आपण त्याला माफ केल पाहिजे अस ते त्याला समजावून सांगत होते. अझर आणि सचिनने तर त्याला आम्ही तुझ्या पाया पडतो पण ही कंप्लेंट मागे घे अस सांगितल. पण शिवकुमार सचिनला  म्हणाला म्हणे की,

“मै आपके लिये जान भी डे सकता हुं मगर कंप्लेंट पीछे नही लुंगा. इंडिया का प्राईम मिनिस्टर भी मुझे आके बोलेगा तब भी नही.”

हे ऐकून अजय जडेजा म्हणाला,

” तू इंडिया में होता तो डंडे से मना लेते “

सचिनची मध्यस्ती उपयोगाची ठरली नाही. इंझमामला पोलिसात हजर व्हाव लागल. त्याने धिंडच्या विरोधात कर्णा फेकून मारल्याची तक्रार नोंदवली. धिंडला ही पोलिसात आणण्यात आले.

अखेर दोघांनीही आपापली तक्रार मागे घेतली आणि अखेर या प्रकरणावर पडदा पडला.

पुढे  ही सिरीज आपण ४-१ ने निवांत जिंकली. भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय होता. गांगुली मॅन ऑफ द  सिरीज झाला. पण शेवटपर्यंत चर्चा इंझमामला आलू म्हटल्याचीच झाली. आजही त्याला भारतात आलू या नावानेच ओळखल जातं.

हे ही वाच भिडू.

 

The post रागाने लालबुंद झालेला इंझमाम स्टेडियममध्ये घुसला आणि ‘आलू आलू चिडवणाऱ्याला धुतले. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/inazmam-ul-haq-aloo-incident/feed/ 0 20608
दलित समाजातून आलेला हा मुलगा भारतासाठी १०० विकेट्स घेणारा पहिला वेगवान बॉलर ठरला ! https://bolbhidu.com/first-faster-bowler-to-complete-100-wickets-for-india/ https://bolbhidu.com/first-faster-bowler-to-complete-100-wickets-for-india/#respond Fri, 28 Feb 2020 13:35:43 +0000 http://bolbhidu.com/?p=20493

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. तेव्हा भारताकडे बॉलर म्हणजे स्पिनर असायचे. फास्टर बॉलर नव्हतेच. असायचे ते मिडीयम पेसर. त्यांचा वापर बॉलची चमक घालवण्यासाठी व्हायचा. अशा काळात एक बॉलर आला ज्याच्या बाउन्सरची भीती ऑस्ट्रेलियन फलंदाजांची झोप उडवायची. त्याच नाव कर्सन घावरी.  समाजाने वाळीत टाकलेलं स्वच्छतेच काम कराव लागणाऱ्या घरात जन्मलेला मुलगा. मुळचा गुजरातचा. घरची परिस्थिती गरीबीची. काकामुळे […]

The post दलित समाजातून आलेला हा मुलगा भारतासाठी १०० विकेट्स घेणारा पहिला वेगवान बॉलर ठरला ! appeared first on BolBhidu.com.

]]>

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. तेव्हा भारताकडे बॉलर म्हणजे स्पिनर असायचे. फास्टर बॉलर नव्हतेच. असायचे ते मिडीयम पेसर. त्यांचा वापर बॉलची चमक घालवण्यासाठी व्हायचा. अशा काळात एक बॉलर आला ज्याच्या बाउन्सरची भीती ऑस्ट्रेलियन फलंदाजांची झोप उडवायची.

त्याच नाव कर्सन घावरी. 

समाजाने वाळीत टाकलेलं स्वच्छतेच काम कराव लागणाऱ्या घरात जन्मलेला मुलगा. मुळचा गुजरातचा. घरची परिस्थिती गरीबीची. काकामुळे क्रिकेटची आवड निर्माण झालेली. त्याचा काका जीवा माला देखील फर्स्ट क्लास क्रिकेट खेळला होता. पण काही गोष्टी आडव्या आल्या आणि त्याला देशाकडून खेळायला मिळाले नाही. जीवाभाईने ठरवलेलं की माझ्या बाबतीत जे झाल ते माझ्या पुतण्याच्या बाबतीत होऊ देणार नाही.

कर्सन घावरीच्या पाठीशी तो डोंगराप्रमाणे उभा राहिला. शाळेत स्पिन बॉलिंग टाकणाऱ्या घावरीने कोचच्या सांगण्यावरून एकदा सहज म्हणून फास्ट बॉलिंग टाकली आणि ५ विकेट घेतले. तिथून त्याला फास्टर म्हणून ट्रेन करण्यात आलं. त्याकाळातही राजकोटमध्ये त्याची बॉलिंग कोणाला खेळता यायची नाही. कर्सन घावरी काम चलाऊ फलंदाजी देखील करायचा.

कर्सन घावरीची निवड ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या ज्युनियर टीममध्ये झाली.

त्यावेळी मोहिंदर अमरनाथ ब्रिजेश पटेल सुद्धा त्या टीममध्ये होते. तेव्हा त्यांचा सामना ऑस्ट्रेलियन बाउन्सरशी झाला. कर्सन घावरी सांगतात की आम्ही तेव्हा जेफ थोमसनला पहिल्यांदा पाहिले. त्याने बाउन्सर टाकून टाकून आम्हाला दांडिया खेळायला लावला. तेव्हा मला बाउन्सरची खरी ताकद कळाली.

भारतीय विकेट पाटा असायचे. इथे बाउन्सर टाकणे खूप अवघड असायचं. कर्सन घावरीने आपल्या बाउन्सरच्या जोरावर सौराष्ट्रच्या टीममध्ये जागा मिळवली. तो दिसायला देखणा होता. त्याची रनअप त्याची स्टाईल खूप जबरदस्त होती. त्याच्यावर अख्खा राजकोट जीव ओवाळून टाकायचा.

पण पोटापाण्याचा प्रश्न होताच. त्याकाळात क्रिकेटवर पोट भरणे अशक्य होतं.

मुंबईला येणाऱ्या पूर्वी कर्सन घावरीने रेल्वेकडे अर्ज केला होता. मात्र मुलाखतीमध्ये इंग्लिश बोलता न आल्यामुळे रेल्वेने त्याला वर्ग-४ची नोकरी देऊ केली. यात जेव्हा सामने नसायचे तेव्हा रेल्वेच्या स्टीम इंजिनमध्ये कोळसा भरण्याच काम करावं लागणार होतं.

 पण एकदा एका मुंबईच्या सामन्यामुळे त्याच आयुष्य बदलून गेल.

भारतातले सर्वोत्कृष्ट फलंदाज तेव्हा मुंबईकडून खेळायचे. कर्सन घावरीची जबरदस्त बॉलिंग बघून त्यांनी आपल्या कोचकडे मागणी केली होती की याला टीम मध्ये घ्या म्हणजे आम्हाला त्याचे बाउन्सर खेळावे लागणार नाही.

कर्सन घावरी मुंबईकडून खेळू लागला शिवाय एसीसी सिमेंटमध्ये नोकरी देखील मिळवून देण्यात आली. मुंबईकडून खेळणे म्हणजे एक्स्पोजरदेखील मोठे मिळू लागले. लवकरच त्याची भारताच्या टीममध्ये निवड झाली.

त्याकाळात भारताच्या स्पिनर चौकडीची संपूर्ण जगात दहशत होती.

भारतात पीचसुद्धा स्पिनसाठीच बनवलेले असायचे. नावापुरता एक फास्ट बॉलर खेळवला जायचा, तोही ऑल राउंडर. कप्तान आपल्या फास्टर बॉलरना सांगायचा की

तुम्हाला फक्त २ ओव्हर मिळणार. त्यानंतर स्पिनर येणार. त्याआधी जे काही करायचं आहे ते करा.

कर्सन घावरी आणि मदनलाल हे दोघे नवीनच टीममध्ये आलेले फास्टर होते. दोघांपैकी एकालाच संधी मिळायची. तरीही या दोघांनी खूप मेहनत घेतली. जेवढी संधी मिळते त्यातूनही खोऱ्याने विकेट मिळवल्या. विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये घावरीची डावखुरी मिडियम फास्ट बॉलिंग जबरदस्त चालायची.

स्पिनर चौकडीपैकी एक असलेला बिशनसिंग बेदी तेव्हा कप्तान होता.

त्याने घावरीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठे मोठे बाउन्सर टाकायला लावले. घावरीने देखील त्वेषाने बॉलिंग टाकली. त्याला एक खास कारण होतं. लहानपणी ज्याने त्याला दांडिया खेळायला लावला होता तो जेफ थोमसन आता समोर होता आणि त्याचा जुना हिशोब चुकता करायचा होता.

पण घावरीचे हे बाउन्सर बघून आपले भारतीय फलंदाज घाबरले. आणि त्याला सांगु लागले की तूझी बॉलिंग बघून चिडलेले ऑस्ट्रेलियन आम्हाला सुद्धा बाउन्सर टाकतील. पण घावरी ऐकायचा नाही.

त्याने त्याच्या आयुष्यातली सर्वोत्तम स्पेल टाकली.

घावरी वेळ प्रसंगी स्पिन बॉलिंग देखील टाकायचा. पण एकदा त्याने स्पिन करून पाच विकेट घेतल्यावर बिशनसिंग बेदीने त्याला आमच्या पोटावर पाय देऊ नको म्हणून धमकावल आणि स्पिन करण्याला बंदी घातली. पण त्याची विकेटची भूक थाबली नाही. त्याच्या याच चिवटपणामुळे गुजरातमध्ये त्याला कडूभाई म्हणून ओळखल जायचं.

कर्सन घावरी हा भारतातला कसोटीमध्ये १०० विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला.

पुढे त्याच्या जोडीला कपिल देव आला आणि या दोघांनी भारतीय फास्ट बॉलिंगची जगभरात दहशत पसरवली. भारताचे फास्टर सुद्धा मॅच जिंकुन देऊ शकतात हा आत्मविश्वास या दोघांच्या बॉलिंगमुळे आपल्याला मिळाला.

घावरी १९८२ मध्ये रिटायर झाला. एका छोट्या शहरातला मागासवर्गीय जातीतून आलेला मुलगा एवढ मोठ यश मिळवतो हे देखील स्वप्नवत होतं.

रिटायरमेंट नंतर देखील कोचिंग व मॅनेजमेंट मधून तो क्रिकेटशी जोडलेला राहिला. घावरीची लोकप्रियता बघून गुजरात भाजपने त्याला पाटण या SC आरक्षित जागेवरून निवडणूक लढवण्याची विंनती केली होती पण त्याने नम्रपणे याला नकार दिला.

हे ही वाच भिडू.

The post दलित समाजातून आलेला हा मुलगा भारतासाठी १०० विकेट्स घेणारा पहिला वेगवान बॉलर ठरला ! appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/first-faster-bowler-to-complete-100-wickets-for-india/feed/ 0 20493
२०० धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड करणारा सचिन त्या रात्री झोपु शकला नव्हता. https://bolbhidu.com/sachin-200-score/ https://bolbhidu.com/sachin-200-score/#respond Mon, 24 Feb 2020 13:41:37 +0000 http://bolbhidu.com/?p=20377

२४ फेब्रुवारी २०१०. बरोबर दहा वर्षापूर्वीची गोष्ट. ग्वाल्हेरच्या कॅप्टन रूपसिंग स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान वन डे सामना होत होता. धोनीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. सचिन आणि सेहवाग ओपनिंगला उतरले. का काय माहित पण सेहवाग नेहमीच्या फॉर्ममध्ये नव्हता. पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला स्टेनने आपल्याच बॉलिंग वर त्याचा कच सोडला. तो जास्त वेळ टिकलाही नाही. […]

The post २०० धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड करणारा सचिन त्या रात्री झोपु शकला नव्हता. appeared first on BolBhidu.com.

]]>

२४ फेब्रुवारी २०१०. बरोबर दहा वर्षापूर्वीची गोष्ट.

ग्वाल्हेरच्या कॅप्टन रूपसिंग स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान वन डे सामना होत होता. धोनीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. सचिन आणि सेहवाग ओपनिंगला उतरले. का काय माहित पण सेहवाग नेहमीच्या फॉर्ममध्ये नव्हता. पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला स्टेनने आपल्याच बॉलिंग वर त्याचा कच सोडला. तो जास्त वेळ टिकलाही नाही. चौथ्या ओव्हरला पारनेलने त्याला आउट काढले.

त्याच्या जागी दिनेश कार्तिक आला. सेहवाग लवकर आउट झाल्यामुळे कार्तिक प्रचंड प्रेशरखाली आलेला जाणवत होत.

दुसऱ्या बाजूला सचिन मात्र प्रचंड एकाग्र झाला होता. विरूच्या आउट होण्याचा त्याच्यावर काही खूप परिणाम झालेला नव्हता. काही वेळात कार्तिक देखील सेट झाला. दोघांनी मिळून सिंगल,डबल, खराब बॉल आला की फोर सिक्स अस करत स्कोरबोर्ड हलता ठेवला. ३३ व्या ओव्हरपर्यंत विकेट जाऊ दिली नाही.

दिनेश कार्तिक ८९ धावा काढून आउट झाला. टीमच्या २१९ धावा झाल्या होत्या. सचिनची सेंच्युरी झाली होती. पीच अजून बॅटिंगसाठी जबरदस्त दिसत होते.

महाप्रचंड स्कोर होणार हे स्पष्ट होतं.

अशावेळी कॅप्टन कुल धोनीने एक विचित्र निर्णय घेतला, विराट कोहली, रैना आणि स्वतःच्या जागी खालच्या नंबरवर खेळणाऱ्या युसुफ पठाणला वर पाठवले. पण हा निर्णय गेम चेंजर ठरला. युसुफ ने आल्या आल्या धुलाई सुरु केली. त्याने मोमेंटम बदलल्यामुळे सेट झालेल्या सचिनने देखील आडवा पट्टा सुरु केला. युसुफ पठाण जास्त वेळ टिकला नाही. अवघ्या ३५ धावा काढून तो पव्हेलीयनमध्ये परतला होता.

पण सचिनला खरा सूर गवसला होता. त्याने ठरवले आज थांबणे नाही. 

पहिल्या १०० काढायला ९० चेंडू घेतलेल्या सचिनने पुढच्या २८ बॉलमध्ये ५० धावा काढल्या. निम्मा भारत आधीच टीव्हीसमोर होता, उरलेल पब्लिक सुद्धा हळूहळू टीव्हीकडे आलं. आज काही तरी वेगळ होणाराय याची चाहूल लागली होती. स्कोरची चर्चा व्हायरल होत होती.

नुकताच इंटरनेट आपल्या मोबाईलमध्ये घुसला होता. अजून ऑफिस मध्ये असलेले गरीब बिचारे आयटी वाले दिनवाणे पणे स्कोरकडे बघत होते. काही जन पोटात दुखत आहे सांगून घरी पळाले देखील. धोनी आला होता. धोनीने तर युसुफ पठाणच्या पुढे एक पाऊल जात धुलाई चालू ठेवली.

पहिल्या ओव्हरपासून खेळत असलेला ३६ वर्षाचा सचिन मात्र जरा सुद्धा दमला आहे असे वाटत नव्हते.

सगळ्यांच लक्ष्य होतं पाकिस्तानच्यासईद अन्वरच्या १९४ धावा. गेली अनेक वर्ष हा वनडेमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडला नव्हता. विशेष म्हणजे अन्वरने भारताविरुद्ध हा रेकोर्ड केला होता आणि तो सचिनने मोडावा अशीच प्रत्येक भारतीयाची इच्छा होती.

४५ व्या ओव्हरला सचिनने पार्नेलच्या बॉलवर त्याने २ धावा काढल्या आणि रेकॉर्ड क्रॉस झाला. अख्ख्या भारतात फटाक्यांची आतिषबाजी झाली. पण पिक्चर अभी बाकी था.

५ ओव्हर उरले होते. आता सचिनच्या २०० धावा सहज होतील. असच सगळ्यांना वाटू लागल. पण दरम्यानच्या काळात धोनीला ताव चढला. ४९ व्या ओव्हर मध्ये त्याने दोन सिक्स आणि एक फोर मारला. धोनीच्या घरचे सुद्धा त्याला शिव्या घालत असतील. नास्तिक लोक सुद्धा देव पाण्यात घालून बसले होते. सचिन स्ट्राईकवर आल्यावर अनेकांचा बिपी लो झाला होता.

अखेर शेवटच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला सचिनने एक रन धावून २०० च बॅॅॅरीयर तोडून टाकल. काही वर्षापूर्वी कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं ते सचिनने करून दाखवलं होतं. कोणताही रनर न घेता ३६ वर्षाचा सचिन पूर्ण ५० ओव्हर खेळून नाबाद राहिला होता हे देखील एक प्रकारचे आश्चर्य ठरल होतं.

पुढची मॅच सुद्धा कोणी पहिली नाही. आपण मॅच जिंकली पण त्या आधीच सगळ्या भारतात दुसरी दिवाळी साजरी झाली होती.

खरं तर त्या दिवशी सचिनच्या राक्षसी खेळीमुळे डेल स्टेन वगैरे आफ्रिकन बॉलरची  झोप  उडायला हवी होती पण झाल उलटच !

त्या रात्री ग्वाल्हेरच्या हॉटेलने त्याला आणि धोनी ला स्पेशल स्युट दिलेली होती. या रूम्स इतरांच्यापासून दूर होत्या. सचिनची स्युट एवढी मोठी होती की त्यात एक प्रायव्हेट स्विमिंग पूल देखील होता. बाथरूमसुद्धा एखाद्या हॉल एवढा मोठा होता. गॅलरीमधून बाहेर पाहिलं तर निरव शांतता आणि फक्त झाडांचा आवाज.

त्या दिवशी जगातला सर्वात खूष असलेला तेंडूलकर या एवढ्या मोठ्या स्युटमध्ये एकटाच बसला होता. दिवसभर लाखोजन आरोळी ठोकत असलेला “सचिन सचिनचा” गजर अजूनही त्याच्या कानात घुमत होता. ही प्रचंड शांतता त्याच्या अंगावर येत होती. थोडी भीती देखील वाटत होती.

त्याने बाथरूमचे दिवे चालू ठेवून झोपण्याचा प्रयत्न केला पण दिवसभर दमछाक होऊनही त्याला झोप येईना.

अखेर मोबाईलवर भरून वाहात असलेल्या एसएमएसना रिप्लाय देत बसू अस त्यान ठरवल. एका पाठोपाठ एक हजारो मेसेजना त्याने थँक यु चे रिप्लाय पाठवले. अस करता करता सकाळ झाली पण बिचारा सचिन झोपलाच नाही.

हे ही वाच भिडू.

The post २०० धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड करणारा सचिन त्या रात्री झोपु शकला नव्हता. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/sachin-200-score/feed/ 0 20377
राहुल द्रविडने फक्त दहा मिनिटात जे सांगितल त्यामुळे या पाकिस्तानी प्लेअरचं आयुष्य बदलून गेलं. https://bolbhidu.com/rahul-dravid-changed-younis-khan-batting/ https://bolbhidu.com/rahul-dravid-changed-younis-khan-batting/#respond Thu, 13 Feb 2020 15:11:08 +0000 http://bolbhidu.com/?p=20172

नाईनटीज किड्स हा प्रकार खूप विचित्र आहे. आम्हाला आठवणी मध्ये रमायला आवडते. आमच्या मते खरं क्रिकेट त्याकाळात खेळल गेलं. आताच क्रिकेट आम्ही बघतो, विराट कोहली आम्हाला पण आवडतो पण गांगुली, सेहवाग-सचिन, रिकी पॉन्टिंग यांची बातच निराळी होती. असाच एक किस्सा आमच्या वेळच्या क्रिकेटचा. भारत पाकिस्तानच्या मॅचेस आज सुद्धा रंगतदार होतात पण त्याकाळात ते एखाद युद्ध […]

The post राहुल द्रविडने फक्त दहा मिनिटात जे सांगितल त्यामुळे या पाकिस्तानी प्लेअरचं आयुष्य बदलून गेलं. appeared first on BolBhidu.com.

]]>

नाईनटीज किड्स हा प्रकार खूप विचित्र आहे. आम्हाला आठवणी मध्ये रमायला आवडते. आमच्या मते खरं क्रिकेट त्याकाळात खेळल गेलं. आताच क्रिकेट आम्ही बघतो, विराट कोहली आम्हाला पण आवडतो पण गांगुली, सेहवाग-सचिन, रिकी पॉन्टिंग यांची बातच निराळी होती. असाच एक किस्सा आमच्या वेळच्या क्रिकेटचा.

भारत पाकिस्तानच्या मॅचेस आज सुद्धा रंगतदार होतात पण त्याकाळात ते एखाद युद्ध लढल्याप्रमाणे खेळल जात असे.

२००४ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा इंग्लंडमध्ये होत होती. तेव्हा या स्पर्धेला मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल जात होतं. नुकताच झालेल्या वर्ल्डकप फायनल पर्यंत गेलेली गांगुलीची टीम फेव्हरेट होती. पण आपला गट पाकिस्तान बरोबर होता. इंझमामच्या नेतृत्वाखाली असलेली पाक टीम तगडी होती. शोएब अख्तर विरुद्ध सेहवाग युद्ध पाहायला मिळणार म्हणून जनता खूष होती.

पण बर्मिंगहॅममध्ये झालेल्या मॅचमध्ये भलतच घडल. सचिन शिवाय खेळणारी भारतीय टीम अवघ्या २०० धावांमध्ये आटोपली. गांगुली तर पहिल्याच ओव्हर मध्ये डक वर आउट झाला होता. शोएब अख्तर आणि नावेद उल हसनने ४-४ विकेट घेऊन भारतीय फलंदाजांचे कंबरडे मोडले.

फक्त द्रविड एकटाच या फास्ट बॉलिंग अटॅक पुढे टिकू शकला. त्याने ६७ धावा बनवल्या होत्या.

भारतीय बॉलिंग एवढी मजबूत नव्हती. पाकिस्तानने तीन विकेट राखून भारतावर विजय मिळवला. आपण सिरीजमधून बाहेर फेकलो गेलो होतो.

मच संपली. स्टेडियममधल्या पाकिस्तानी फॅन्सनी मैदान डोक्यावर घेतलं होतं. प्रेझेन्टेशन सेरेमनी सुरु झाला. आपले खेळाडू खांदे पाडून उभे होते. अचानक द्रविड पाशी एक पाकिस्तानी प्लेअर आला आणि  तो त्याच्या बटिंग संदर्भात हेल्प मागू लागला. द्रविड म्हणाला आपण नंतर बोलू.

तो प्लेअर म्हणजे युनुस खान होता. त्याला पाकिस्तानी टीममध्ये येऊन दोन तीन वर्षे झाली होती पण म्हणावं तशी चमकदार कामगिरी होत नव्हती.

या सिरीजमध्ये तर तो राखीव बेंचवरच होता. खरंतर युनुस बराच मेहनती होता, शिकायची आवड होती. त्याने अनेकांकडून आपल्या फलंदाजी बद्दल सल्ला घेतला होता पण खूप मोठा फरक पडला नव्हता.

युनुस खानने या दौऱ्या आधीच ठरवल होतं की भारता बरोबर च्या मच वेळी द्रविड कडून टिप्स घ्यायच्या. पण भारत मच हरल्यामुळे द्रविडचा मूड प्रचंड खराब होता. युनुसला वाटले आता आपला चान्स गेला. कधी नव्हे ते पाकिस्तान जिंकल्याबद्दल त्याला थोडस वाईट वाटून गेलं.

मॅचनंतरच्या रात्री जेवण झाल्यावर युनुस आपल्या हॉटेलरूममध्ये बसला होता. अचानक त्याच्या रूमची टकटक झाली. दार उघडून बघतोय तर बाहेर राहुल द्रविड उभा होता.   

युनुस खानला धक्का बसला. द्रविड सारखा सिनियर भारतीय प्लेअर आपल्यासारख्या ज्युनियर पाकिस्तानी प्लेअरला मदत करण्यासाठी चार मजले उतरून त्याच्या रूममध्ये येतो ही एक मोठी गोष्ट होती. युनुस खानने त्याला आपल्या शंका विचारल्या. राहुल द्रविडने सगळ्याची उत्तरे दिली. काही महत्वाच्या टिप्स देखील दिल्या.

अवघ्या दहा पंधरा मिनिटाची ती भेट. मात्र युनुस खान म्हणतो की त्यानंतर माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं.

एखाद्या आदर्श शिष्याप्रमाणे युनुस खानने राहुलने सांगितलेल्या टिप्स प्रत्यक्षात उतरवल्या. २००४ नंतरचा युनुस खान हा वेगळाच होता. त्याच टेम्परामेंट, त्याची शैली, त्याच टेक्निक एकदम सुधारलं. त्याने पाकिस्तानला अनेक कसोटी मचेस जिंकून दिले. त्याने अनेक विक्रम मोडले. त्यांच्या सवोत्तम फलंदाजामध्ये त्याचा समावेश होतो.

कसोटीत दहा हजारपेक्षा जास्त धावा बनवणारा तो एकमेव पाकिस्तानी खेळाडू आहे आणि या सर्वाच श्रेय तो आजही त्या राहुल द्रविडच्या भेटीला देतो.

त्याकाळात भारत पाकिस्तानमध्ये सामने चुरशीने खेळले गेले मात्र तितकाच भाईचारा देखील सांभाळला गेला.

हे ही वाच भिडू.

The post राहुल द्रविडने फक्त दहा मिनिटात जे सांगितल त्यामुळे या पाकिस्तानी प्लेअरचं आयुष्य बदलून गेलं. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/rahul-dravid-changed-younis-khan-batting/feed/ 0 20172