Browsing Category

फोर्थ अंपायर

ओ भाई मुझे मारो, म्हणणारा भिडू सध्या काय करतोय?

क्रिकेट मॅच आणि त्यातही भारत विरुद्ध पाकिस्तान, म्हणजे गंभीर विषय असतोय. मॅचच्या दिवशी दोन्ही देशांत सारखीच परिस्थिती. त्यात वर्ल्डकप मॅच असली की, भारताची कॉलर जरा ताठ होणार. कारण भाऊ वर्ल्डकपमध्ये बादशहा फक्त भारत. भारत-पाकिस्तान मॅच…
Read More...

फक्त त्या दोन ओव्हर्सनं जोगिंदर शर्माला बादशहा बनवलं होतं…

गणपतीचे दिवस होते. देखावा काय का असंना, प्रत्येक मंडपाच्या बाहेर प्रोजेक्टर लावलेले. साऊंडवर गाणं पण ठरलेलं वाजायचं... सुनो गौरसे दुनिया वालो, बुरी नजर ना हम पे डालो. ते साल होतं २००७ आणि विषय होता टी२० वर्ल्डकपचा. आपल्यातल्या लय भिडूंनी…
Read More...

कोण होता शांताराम ज्याला भेटायला गिलख्रिस्ट आणि मिस्टर क्रिकेटनं कॅफे लिओपोल्ड गाठलेलं..

एबी डिव्हिलिअर्स इलेक्शनला उभा राहिला, तर बँगलोरचा महापौर सहज बनू शकतो, जॉन्टी ऱ्होड्सनं आपल्या पोरीचं नाव इंडिया ठेवलंय, ग्लेन मॅक्सवेलनं तर डायरेक्ट भारतीय पोरीशीच लग्न केलं (भावा, इथं आमच्याकडची पोरं ताटकळलीत!) जाऊद्या, लग्न काय होत…
Read More...

चहा विकून मोठ्ठ होणाऱ्यांच्या यादीत एक नाव समाविष्ट केले पाहिजे, फुटबॉलचा देव पेले

फुटबॉल म्हणल्यावर दोन तीन नाव आपल्याला हमखास आठवतात ते म्हणजे रोनाल्डो, मेस्सी, नेमार वैगरे अजून थोडं पाठीमागे गेलं तर पेले आणि मॅरेडॉना. पण फुटबॉलचा देव असा दर्जा ज्याला मिळाला तो होता पेले. पेले काय साधासुधा गडी नव्हता तर त्याच्या…
Read More...

फास्टर बॉलर व्हायला निघालेल्या तेंडुलकरला त्याने सांगितलं, “तुमसे ना हो पायेगा”

जेव्हा जेव्हा क्रिकेट या खेळाचे नाव निघेल तेव्हा तेव्हा पहिलं नाव जे घेतल जाईल ते म्हणजे सचिन तेंडुलकर. क्रिकेट जगताचा देव. आपल्या मनमोहक फलंदाजीने कित्यके विक्रम आपल्या नावावर अबाधित ठेवणारा मास्टर ब्लास्टर. पण तुम्हाला एक माहितीये…
Read More...

सेहवाग आणि नेहरा या दोन वाघांचा क्रिकेट प्रवास एकाच स्कुटरवरून सुरु झाला

तुम्ही बॉलर नसाल, तर वीरेंद्र सेहवाग हे नाव ऐकल्यावर चेहऱ्यावर फिक्स हसू येणार. त्याचं नाव ऐकून आपण लगेच, 'काय साला दिवस होते' मोडमध्ये जातो. सेहवाग गांगुली-कोहलीसारखा आक्रमक नव्हता, धोनीसारखा शांत नव्हता, सेहवाग फक्त सेहवाग होता. खिशातला…
Read More...

डिलिव्हरी बॉयचं काम करणाऱ्या पोरानं वर्ल्डकपमध्ये बांगलादेशला धूळ चारलीये

क्रिकेटर म्हटल्यावर याच्याकडं मोकार पैसा असेल, असं आपण सहज गृहीत धरतो. आता आपल्या भारतात क्रिकेटइतकं येड दुसऱ्या कशाचंच नाय (तसं राजकारणाचं आहे, पण तो नाद वेगळाय.) क्रिकेटर लोकांना चांगला पगार, जाहिराती, लिलाव, स्पॉन्सर असे पाच-सहा इन्कम…
Read More...

धोनीअण्णाची चेन्नई सारखीच कशी बरं जिंकत्या?

सकाळ सकाळ व्हॉट्सअप पाहिलं, तर जेजुरीत आल्यागत वाटत होतं. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल जिंकली आणि कार्यकर्त्यांनी स्टेस्टसचा नुसता धुरळा उठवला. ज्याच्यामागं आपण उभं राहणार तो किंग आणि आपण किंगमेकर असणार असलं खतरनाक वाक्य आणि…
Read More...