आपलं घरदार – BolBhidu.com https://bolbhidu.com विषय हार्ड Mon, 06 Apr 2020 10:31:25 +0000 en-GB hourly 1 https://wordpress.org/?v=5.3.2 https://i0.wp.com/bolbhidu.com/wp-content/uploads/2018/03/cropped-bol_bhidu-1.png?fit=32%2C32&ssl=1 आपलं घरदार – BolBhidu.com https://bolbhidu.com 32 32 173639643 धोंडोजीराजांच्या रक्ताळलेल्या मिशा इंग्रजांनी विजयचिन्ह म्हणून इंग्लडला नेल्या. https://bolbhidu.com/dhodya-wagh-lord-velesly/ https://bolbhidu.com/dhodya-wagh-lord-velesly/#respond Sun, 05 Apr 2020 22:32:40 +0000 https://bolbhidu.com/?p=21436

अठराव्या शतकाच्या अखेरीचा काळ. मराठेशाहीची पकड कमी होत चालली होती. इंग्रजांनी भारतात पाय रोवण्यास सुरवात केली होती. गोष्ट आहे कर्नाटकातली. म्हैसूर राज्यातील चन्नेगिरी गावात काही महाराष्ट्रातुन स्थलांतरित झालेली कुटूंबे होती. यातल्याच पवार कुळात एक पराक्रमी योद्धा होता, त्याच नाव होतं धोंडोजी. अख्ख्या पंचक्रोशीत त्याला धोंड्या वाघ म्हणून ओळखल जायचं. धोंडोजी वाघ हैदरच्या कारकीर्दीत विष्णुपंडित नांवाच्या सरदाराच्या […]

The post धोंडोजीराजांच्या रक्ताळलेल्या मिशा इंग्रजांनी विजयचिन्ह म्हणून इंग्लडला नेल्या. appeared first on BolBhidu.com.

]]>

अठराव्या शतकाच्या अखेरीचा काळ. मराठेशाहीची पकड कमी होत चालली होती. इंग्रजांनी भारतात पाय रोवण्यास सुरवात केली होती.

गोष्ट आहे कर्नाटकातली. म्हैसूर राज्यातील चन्नेगिरी गावात काही महाराष्ट्रातुन स्थलांतरित झालेली कुटूंबे होती. यातल्याच पवार कुळात एक पराक्रमी योद्धा होता, त्याच नाव होतं धोंडोजी.

अख्ख्या पंचक्रोशीत त्याला धोंड्या वाघ म्हणून ओळखल जायचं.

धोंडोजी वाघ हैदरच्या कारकीर्दीत विष्णुपंडित नांवाच्या सरदाराच्या हाताखाली शिलेदार होता. परंतु बुद्धिमान व धाडशी असल्यामुळें लवकरच म्हैसूरच्या सैन्यांत वारगीर झाला. हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू या दोघांनी कर्नाटकात आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं.

धोंडोजींंच्या तलवारीच्या बळावर टिपूने अनेक लढाया मारल्या होत्या. पण काही काळाने त्या दोघांच्यात मतभेद सुरू झाले.

टिपूचे कट्टर होत चालले धार्मिक धोरण स्वाभिमानी धोंडोजींंना पटणारे नव्हते.

धोंडोजीनी टिपूची नोकरी सोडली. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेजवळ मराठा तरुण गोळा केले. धारवाडजवळील लक्ष्मेश्वरच्या देसाई यांच्या मदतीने स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि स्वतःला राजा घोषित केले.

आसपासच्या गावातून करवसुली सुरू होती. जिथून कर देण्यास नकार मिळत होता तिथे गावे लुटण्यास सुरवात केली. यात टिपू सुलतानसोबतच सांगली इचलकरंजी येथील पेशव्यांच्या सरदारांवर जरब बसवला.

हावेरी, सावनूर व वगैरे गावे काबीज केली, इतर काही ठिकाणें उद्ध्वस्त केली.

एकाच वेळी पेशवे आणि टिपू सुलतान असे दोन मोठे शत्रू धोंडोजीनी अंगावर घेतले होते. धोंडोजीचे स्वतंत्र अस्तित्व पेशव्याना पसंत नव्हते.

१७९३ साली सरदार परशुरामभाऊंनीं धोंड्या वाघाचे पारिपत्य करण्यासाठी मोठें सैन्य पाठविलें.

दुर्दैवाने धोंडोजींचा पराभव झाला. त्यांना जीव वाचवून पळून जावे लागले. त्यांचे राज्य संपुष्टात आले.

रानोमाळ भटकत असणाऱ्या धोंडोजीना टिपू सुलतानने ताब्यात घेतले.

पण टिपू धूर्त होता. धोंडोजीना मारण्या पेक्षा त्यांच्या पराक्रमाचा उपयोग करून घेण्यात जास्त फायदा आहे हे त्याला ठाऊक होते. त्याने धोंडोजींना जीवनदान दिले पण बळजबरीने त्यांचे धर्मांतर केले.

पण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत या नियमानुसार त्यांचे आणि टिपू सुलतानाचे मतभेद परत वाढले.

टिप्पूची गैरमर्जी होऊन धोंडोजी वाघ यांना बंदिवासात टाकले.

बरीच वर्षे त्यांनी टिपू सुलतानच्या कारागृहात काढली. पण १७९९ साली श्रीरंगपट्टण इंग्रजांनी जिंकले. टिपू सुलतान युद्धात ठार झाला. इंग्रजांनी त्याच्या ताब्यात असणाऱ्या कैद्यांबरोबर धोंडोजी वाघ यांचीदेखील सुटका केली.

बंदिवासांतून मुक्तता झाल्याबरोबर धोंडोजीनी टिप्पूच्या सैन्यांतून वाचलेले कांहीं शिपाई गोळा केले व आसपासच्या मुलखांत हल्ले करून परत आपले राज्य स्थापन केले.

बिदनूरचे नायकपद धोंडोजी वाघ यांच्याकडे आले.प्रजेमध्ये त्यांना उभय लोकाधिश्वर म्हणून ओळखत मिळाली.

आसपासच्या राज्यातील इतर नायकांनी त्यांना पाठिंबा दिला. पण पेशव्याचा त्यांच्यावरील राग कमी झाला नव्हता.

कर्नाटकचा पेशव्यांचे सरसुभेदार धोंडोपंत गोखले यांनी एक वेळ त्याच्यावर अचानक छापा घालून त्याची छावणी लुटली.

परंतु धोंडोजी वाघ त्यांच्या हातांतून निसटले. त्यांनी कोल्हापूरच्या छत्रपतींचा आश्रय घेतला. अस म्हणतात त्यांनी धोंडोपंताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली होती.

धोंडोपंत गोखल्यानां मारून त्यांच्या रक्तानें माझ्या मिशा तांबड्या करेन

धोंडोजी वाघाचा बंडखोरपणा दिवसेंदिवस वाढत चालला म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांनीं धोंडोपंत गोखले व सांगलीचे चिंतामणराव पटवर्धन यांना कित्तूरकडे पाठवले.

१३ जुलै १८०० रोजी दावणगीरी येथे धोंडोजी वाघाशी त्यांची लढाई झालीं.

पेशव्यांच्या सैन्याचा दारुण पराभव झाला. धोंडोपंत व त्यांचा एक पुतण्या हे दोघे मारले गेले धोंडोजींची प्रतिज्ञा पूर्ण झाली.

अख्ख्या कर्नाटकात त्याकाळी धोंडोजींएवढी प्रबळ सैन्यक्षमता कोणाकडे नव्हती.

अखेरीस त्यांचा निःपात करण्यासाठी दुसरा बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांची मदत घ्यायचे ठरवले. इंग्रजांना देखील धोंडोजी वाघ यांचा त्रास वाढला होता.

कर्नाटकावर संपूर्ण वर्चस्व मिळवण्यासाठी इंग्रजांनी पेशव्यांच्या मोहिमेत सहभाग घेतला.

ब्रिटिश सेनापती लॉर्ड आर्थर वेलस्लीने आपल्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,

“धोंड्या वाघाला मिळणारा लोकांचा पाठिंबा वाढत चालला आहे. त्याचे बंड मोडून काढले नाही तर कंपनी सरकारला खूप मोठा धोका आहे. या माणसाचा विनाश ही आपल्यासाठी सर्वात मोठी गरज आहे.”

इंग्रज व पटवर्धनांची फौज कित्येक दिवस धोंडोजींचा पाठलाग करत होती, परंतु त्यांनी दाद दिली नाही.

त्यांचे सैन्य गनिमी काव्याने लढत होते. त्यांच्या वेगाला पकडणे इंग्रजांना जमत नव्हते. कित्तुर, कुंदगोळ, खानापूर, बदामी अशा अनेक गावांत त्यानी शत्रूला हुलकावणी दिलीच.

अखेर स्वकीयांच्या फितुरीचा परिणाम झालाच.

१० सप्टेंबर १८०० रोजी जनरल वेल्स्ली यानें धोंडोजी वाघ यांना कोंगल येथे गाठले व त्यांचा पराभव केला. या चकमकींतच धोंडोजी वाघ मारला गेला.असे सांगितलं जातं की,

” रक्तानें माखलेल्या धोंडोजीच्या मिशा वेल्स्लीनें विजयचिन्ह म्हणून इंग्लडास नेल्या “

नेपोलियन, टिपू सुलतान यांच्यावर विजय मिळवणारा लॉर्ड वेलस्ली धोंडोजी वाघ यांच्या पराक्रमावर प्रचंड प्रभावित झाला होता. धोंडोजीच्या मृत्यूनंतर त्यांच्या ४ वर्षांच्या मुलाला वेल्स्लीनें उदरनिर्वाहासाठी व शिक्षणासाठी स्वत: जवळचे ४०० पौंड दिले.

पण धोंडोजी वाघ यांचे महत्व भारतीय इतिहासकारांना कळलेच नाही. उलट मराठीतील विद्वान अभ्यासकांनी त्यांचे चित्र पेशवाईशी बंड करणारा लुटारू धोंड्या वाघ असे रंगवले. दुर्दैवाने धोंडोजी वाघ यांचे नाव इतिहासाच्या पानात हरवून गेले.

[पारसनीस सांगली संस्थान; बील; डफ; खरे, भा. १२]

हे ही वाच भिडू.

The post धोंडोजीराजांच्या रक्ताळलेल्या मिशा इंग्रजांनी विजयचिन्ह म्हणून इंग्लडला नेल्या. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/dhodya-wagh-lord-velesly/feed/ 0 21436
पंतप्रधानांनी आवाहन केलं म्हणून अख्ख्या देशाने एकवेळचा उपवास केला होता. https://bolbhidu.com/primeminister-asked-india-to-fast-for-army/ https://bolbhidu.com/primeminister-asked-india-to-fast-for-army/#respond Fri, 03 Apr 2020 08:20:19 +0000 https://bolbhidu.com/?p=21375

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यू नंतर त्यांच्या खुर्चीवर कोण बसणार हा प्रश्न निर्माण झाला होता. स्वातंत्र्यलढ्यापासून अनेक दिग्गज नेते काँग्रेस मध्ये होते. पण स्वच्छ चारित्र्य,लोकसंग्रह, कामाचा धडाका, सर्वांना पुढे घेऊन जाण्याची वृत्ती हा वारसा सांभाळेल असा एकमेव नेता होता तो म्हणजे, लालबहादूर शास्त्री शास्त्रीजी पंतप्रधान बनले पण तो काळ संघर्षाचा होता. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच […]

The post पंतप्रधानांनी आवाहन केलं म्हणून अख्ख्या देशाने एकवेळचा उपवास केला होता. appeared first on BolBhidu.com.

]]>

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यू नंतर त्यांच्या खुर्चीवर कोण बसणार हा प्रश्न निर्माण झाला होता. स्वातंत्र्यलढ्यापासून अनेक दिग्गज नेते काँग्रेस मध्ये होते. पण स्वच्छ चारित्र्य,लोकसंग्रह, कामाचा धडाका, सर्वांना पुढे घेऊन जाण्याची वृत्ती

हा वारसा सांभाळेल असा एकमेव नेता होता तो म्हणजे,

लालबहादूर शास्त्री

शास्त्रीजी पंतप्रधान बनले पण तो काळ संघर्षाचा होता. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या. कधीही युद्धाला तोंड फुटेल अशी परिस्थिती होती. पण नुकताच झालेल्या चीनच्या युद्धात देशाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं होतं. अनेक वर्षांनी देश मागे पडला होता.

उद्योगधंदे हेलकावत होते. बेरोजगारीच प्रमाण वाढलं होतं. सर्वात महत्वाच म्हणजे अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा पडू लागला होता. याचे सलग पडत असलेला दुष्काळ हे एक कारण होते पण सोबतच पंचवार्षिक योजनांमध्ये शेतीकडे झालेले दुर्लक्ष याचाही आपल्याला तोटा झाला होता.

प्रचंड वेगाने वाढत असलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध करून देणे हे शास्त्रीजींसमोरचा मुख्य आव्हान होता.

यासाठी अमेरिकेकडून गहू व इतर धान्याची मदत घेणे हा एक उपाय त्यांच्या समोर होता. पण त्यासाठी अमेरिकेच्या जाचक अटी स्वीकारण्याची त्यांची तयारी नव्हती.

तो काळ अमेरिका आणि रशिया यांच्यातील शितयुद्धाचा होता. यातील कोणाचीही बाजू घ्यायची नाही हे नेहरूंचे अलिप्ततावादाचे धोरण शास्त्रीजींनी देखील कठोरपणे पाळले होते.

अशातच भारताचा संयम हा दुबळेपणा अशी गैरसमजूत करून घेतलेल्या पाकिस्तानने कडेलोट केला. शास्त्रीजींनी त्यांना कठोर उत्तर द्यायचं ठरवलं.

1965 सालच्या भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटले.

सुरवातीपासून अमेरिका हा पाकिस्तानचा पक्षपाती होता. त्यांनी पाकिस्तानला शस्त्रास्त्रांपासून सगळी मदत केली होती. या आणीबाणीच्या वेळेचा वापर त्यांनी भारतावर दबाव वाढवण्यासाठी केला.

भारताचा अन्नधान्याचा साठा वेगाने कमी होत होता. सीमेवर लढणाऱ्या जवानांना रसद कमी पडू नये याची काळजी घेतली जात होती. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी घोषणा केली,

“जय जवान जय किसान

शास्त्रीजी ग्रामीण तळागाळातुन आलेले लोकनेते होते. ज्या प्रमाणे हातात बंदूक घेऊन आपले जवान शत्रूशी लढत आहेत त्याप्रमाणे शेतात राबणारा शेतकरी सुद्धा या आणीबाणीच्या काळात तितकाच महत्वाचा आहे हा संदेश पंतप्रधानांनी दिला होता.

सोबतच शास्त्रीजींनी आणखी एक महत्वाच व्रत सगळ्या जनतेला दिलं,

एक वेळ उपवास पाळण्याच व्रत

जवानांना अन्नधान्य पुरावे म्हणून त्यांच्यासाठी जनतेने आठवड्यातील एक दिवस उपवास ठेवावा असे त्यांनी आवाहन केलं होतं. लालबहादूर शास्त्री हे गांधीवादाचे कठोर पालन करणारे होते. त्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली होती.

आपल्या भाषणात ते म्हणतात ,

‘हमें भारत का स्वाभिमान बनाए रखने के लिए देश के पास उपलब्ध अनाज से ही काम चलाना होगा. हम किसी भी देश के आगे हाथ नहीं फैला सकते. यदि हमने किसी देश द्वारा अनाज देने की पेशकश स्वीकार की तो यह देश के स्वाभिमान पर गहरी चोट होगी. इसलिए देशवासियों को सप्ताह में एक वक्त का उपवास करना चाहिए. इससे देश इतना अनाज बचा लेगा कि अगली फसल आने तक देश में अनाज की उपलब्धता बनी रहेगी.”

नुसत सांगितलं नाही तर याचे स्वतः पासून पालन केलं. पंतप्रधान निवासमध्ये एकवेळ च जेवण बनू लागले.

याचा परिणाम देशभरात झाला. शहर असो की छोटे खेडे प्रत्येक घरात सोमवारी किंवा मंगळवारी एक वेळच जेवण शिजल नाही.

आपलं रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी गोरगरीब असो की श्रीमंत प्रत्येकाने उपवास केला.

शास्त्रीजींच्या या अभिनव कल्पनेला हिंदीत अनाज यज्ञ म्हणून ओळखल जातं. आजही उत्तरेत अनेकजण हा उपवास करतात.

पण याचा अर्थ असा नव्हे की पंतप्रधानांनी फक्त अन्नधान्याच्या तुटवड्यावर हे व्रत हा एकमेव उपाय केला होता. त्यांनाही हे ठाऊक होतं की हा तत्कालीन उपाय व प्रतिकात्मक योजना आहे.

ही वेळ परत येऊ नये म्हणून हरितक्रांती व दुग्ध क्रांतीची दुरोगामी योजना शास्त्रीजींनी वेगाने अंमलात आणली ज्याची फळे आजही आपण चाखतो आहोत.

हे ही वाच भिडू.

The post पंतप्रधानांनी आवाहन केलं म्हणून अख्ख्या देशाने एकवेळचा उपवास केला होता. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/primeminister-asked-india-to-fast-for-army/feed/ 0 21375
छ. शाहू महाराजांच्या घसरगुंडी मागची सत्यकथा. https://bolbhidu.com/shahu-maharaj-ghasargundi/ https://bolbhidu.com/shahu-maharaj-ghasargundi/#comments Thu, 02 Apr 2020 15:27:40 +0000 https://bolbhidu.com/?p=21220

छत्रपती शाहू महाराजांच्या बदनामीचे अनेक प्रकार रचले गेले. राजर्षी शाहू महारांजांच्या हयातीतच त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या बदनामीचे हे प्रकार रचले. अनेक कपोकल्पित कथा रचण्यात आल्या. एक वेळ तर अशी आली की, याच विरोधकांनी शाहू महाराजांच्या कोल्हापूरात एकही स्त्री सुरक्षित नाही अशा आशयाचे पत्र इंग्लडला पाठवले. मात्र या खोट्या पत्राला इंग्रजांनी कचऱ्याची पेटी दाखवली.  शाहू महाराजांवर असे […]

The post छ. शाहू महाराजांच्या घसरगुंडी मागची सत्यकथा. appeared first on BolBhidu.com.

]]>

छत्रपती शाहू महाराजांच्या बदनामीचे अनेक प्रकार रचले गेले. राजर्षी शाहू महारांजांच्या हयातीतच त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या बदनामीचे हे प्रकार रचले. अनेक कपोकल्पित कथा रचण्यात आल्या.

एक वेळ तर अशी आली की,

याच विरोधकांनी शाहू महाराजांच्या कोल्हापूरात एकही स्त्री सुरक्षित नाही अशा आशयाचे पत्र इंग्लडला पाठवले. मात्र या खोट्या पत्राला इंग्रजांनी कचऱ्याची पेटी दाखवली. 

शाहू महाराजांवर असे खोटे आरोप का करण्यात आले याच उत्तर देखील स्पष्ट आहे. त्यांनी सनातनी ब्राह्मण्यवादावर जोरदार प्रहार केला. दलितांना मोठ्या संधी निर्माण केल्या. समतेचा पाया रचला. याचा त्यांना झालेला तोटा म्हणजे त्यांच्या अब्रुबद्दलच रचल्या गेलेल्या कल्पित कथा.

याच सांगीव गोष्टीतली एक गोष्ट म्हणजे शाहू महाराजांच्या घसरगुंडीचा. अफवा अशी शाहू महाराज या घसरगुंडीच्या मार्फत महिलांसोबत दूराचार करत असत. 

शाहू महाराजांची ही घसरगुंडी कुठे आहे ? 

शाहू महाराजांनी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर सोनतळी स्काऊट बंगला कॅंप पासून तीन फर्लांगच्या अंतरावर सोनतळी गाव वसवले. त्यालाच सोनतळी कॅम्प असे म्हणले जाते. या गावात महाराजांनी भटक्या अस्पृश्य लोकांना जागा देवून वसाहत निर्माण केली. गवताची कुरणे उभा करुन रेसच्या घोड्यांची पैदास केली. इथेच बरेच रानटी पशु असायचे. महाराज आठवड्यातून तीनचार दिवस या सोनतळी कॅम्पवर मुक्कामाला असायचे.

याच बंगल्याच्या आवारात प्रवेशद्वारावरच ही घसरगुंडी आहे. लहान मुलांना बागेत खेळण्यासाठी असते त्या धर्तीची, बरोबर काटकोनाकृती भरीव दगडी बांधकामाची सुमारे वीस फूट उंचीची, चार फुट रुंदीची अशी दगडी घसरगुंडी आहे.

याचा वापर महाराज कशासाठी करत असत ? 

याबाबतची अधिक माहिती शाहू महाराज स्मृतीदर्शन या हिंदूराव साळुंखे यांच्या पुस्तकात दिलेली आहे. लेखकांनी स्वत: या ठिकाणास भेट देवून माहिती घेतली. त्यात ते काय म्हणतात ते त्यांच्याच भाषेत ऐकू. 

मी या ठिकाणी भेट दिली. महाराजांच्या नोकरीत असलेला एक वृद्ध तिथे मला भेटला. त्याच्यासोबत बंगला पाहीला. त्याने सर्व माहिती सांगितली. महाराजांची घसरगुंडी पाहिली.  महाराजांची उंची सहा फूट चार इंच तर होते. त्यांचे वजन सतत वाढतच रहायचे. डॉक्टरांनी त्यांना वजन कमी केले नाही तर प्रकृतीस धोका आहे असे सांगितले होते. त्यासाठी ते अनेक तऱ्हेचे व्यायाम करायचे.

घसरगुंडीचा व्यायाम प्रकार देखील यातलाच.

एका बाजूने महाराज दगडी पायऱ्या दोन्ही लोखंडी नळ्यांना धरून वर चढत. वरच्या मध्यावर थोडे थांबत व दूसऱ्या गुळगुळीत घसरणीवरून लोखंडी नळ्यांना धरून खाली येत. प्रत्येक वेळी थोडा थोडा वेग वाढवीत. अंगात सदरा व खाली लुंगी असे.

घामाने सदर चिंब भिजल्यानंतर दूसऱ्या बाजूने उतरताना बसून घसरत खाली येत, हा व्यायाम अंगातील घामाच्या धारा सदरा चिंब भिजून खाली गळेपर्यन्त चाले. खाली एक हुजऱ्या एक टॉवेल आणि दूसरे कपडे घेवून सज्ज असे.

म्हणजे घसरगुंडी ही शाहू महाराजांनी व्यायामासाठी करुन घेतली होती, हे स्पष्ट आहे.

परंतु विरोधकांच्या कल्पक डोक्यातून घसरगुंडीसंबधी कोण अद्भूत कहाण्या पसरवण्यात आल्या. अव्वल दर्जाच्या कांदबरीलाही या लाजवतील अशा आहेत. पण त्या खोट्या आहेत हे पुराव्यानिशी वारंवार सिद्ध झालेले आहे.

हे ही वाच भिडू. 

The post छ. शाहू महाराजांच्या घसरगुंडी मागची सत्यकथा. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/shahu-maharaj-ghasargundi/feed/ 1 21220
पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांची तुलना जगजेत्या सिकंदराशी केली होती. https://bolbhidu.com/portuguse-viceroy-compared-shivaji-maharaj-with-alexander/ https://bolbhidu.com/portuguse-viceroy-compared-shivaji-maharaj-with-alexander/#comments Thu, 02 Apr 2020 03:04:30 +0000 https://bolbhidu.com/?p=21331

भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले आणि इथं राज्य करायला सुरुवात केली यामध्ये पोर्तुगीज पहिले. पंधराव्या शतकात त्यांनी भारतात जम बसवला. गोवा तर त्यांची राजधानी बनली होती सोबतच दिव दमन मुंबई वसई कल्याण येथील बंदरावर व तिथल्या किल्ल्यांवर त्यांचंच राज्य होतं. शिवपूर्वकाळात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज राज्य करत होते. भारतातली सर्वात सामर्थ्यशाली सत्ता होती मुघलांची. मुघल बादशहा […]

The post पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांची तुलना जगजेत्या सिकंदराशी केली होती. appeared first on BolBhidu.com.

]]>

भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले आणि इथं राज्य करायला सुरुवात केली यामध्ये पोर्तुगीज पहिले. पंधराव्या शतकात त्यांनी भारतात जम बसवला.

गोवा तर त्यांची राजधानी बनली होती सोबतच दिव दमन मुंबई वसई कल्याण येथील बंदरावर व तिथल्या किल्ल्यांवर त्यांचंच राज्य होतं.

शिवपूर्वकाळात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज राज्य करत होते.

भारतातली सर्वात सामर्थ्यशाली सत्ता होती मुघलांची. मुघल बादशहा दिल्लीतून देशाचा कारभार चालवायचा पण पश्चिम किनारपट्टीवर त्याचे काही एक चालत नसे.

इतकेच काय त्याकाळी खुद्द मुघल बादशहाला हज यात्रेला जायचं असेल तर पोर्तुगीजांच्या जहाजांचा वापर करावा लागायचा.

भारतातल्या प्रत्येक मुसलमानाला हज यात्रेसाठी पोर्तुगीज अधिकाऱ्यांचा परवाना घ्यावा लागायचा.

मुघलांकडे स्वतःच आरमार नसल्याचा हा परिणाम होता. पोर्तुगीजांचे वर्चस्व मोडावे म्हणून मुघलांनी जंजिऱ्याच्या सिद्दीला पैसा पुरवून बळ देण्यास सुरवात केली. त्यांच्याशी तह केले. त्याला आरमारप्रमुख म्हणून मान्यता दिली.

याच काळात शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांनी थोड्याच काळात बारा मावळातील मराठी तरुणांना एकत्र करून महाराष्ट्रातील किल्ले जिंकले. निजामशाही, आदिलशाही, मुघल या मोठ्या सत्ताधार्यांना हादरवून सोडलं.

छत्रपतींच्या राज्याची सीमा पश्चिमेला समुद्र किनाऱ्याला जाऊन भिडली. यामुळे पोर्तुगीज आणि सिद्दी या दोन्ही आरमारासाठी ही धोक्याची घंटा निर्माण झाली.

विशेषतः मुघलांच्या आश्रयाखाली असलेल्या सिद्दीला शिवरायांच्या राज्यविस्ताराची भीती वाटत होती. त्यामानाने पोर्तुगीजांनी मराठ्यांशी सामोपचाराचे वागत होते.

पोर्तुगीज हे धूर्त राज्यकर्ते होते. आपले राज्य सुरक्षित राहावे म्हणून एतद्देशीय राजांशी सलोख्याच धोरण स्वीकारलं होतं. मुघल आदिलशहा मराठे एवढंच काय सिद्दीशी देखील त्यांचे चांगले संबंध होते.

शिवाजी महाराजांना पोर्तुगीजांचा स्वभाव ठाऊक होता.

एक हातात तागडी व एका हातात बंदूक घेऊन आलेले हे परकीय व्यापारी विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. संधी मिळताच ते आपल्या देशात पाय रोवून बसतील याचा त्यांना अंदाज होता.

पण पोर्तुगीजांशी त्यांच्याच पद्धतीने गोड बोलून चुचकारून आपले कार्य साधण्याचा सल्ला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला होता.

म्हणूनच जेव्हा सुरत लूट केली किंवा स्वराज्याचे पहिले आरमार उभारले तेव्हा पोर्तुगीजांनी मराठ्यांना मदत केली होती.

जेव्हा मुघल सरदार दिलेरखान आणि राजा जयसिंग यांनी मराठ्यांना तह करायला भाग पाडले, शिवराय औरंगजेबाच्या मगरमिठीत आग्र्याला अडकले तेव्हा सगळ्या भारताला वाटले की मराठ्यांचं राज्य संपलं.

शिवाजी महाराज आग्र्याहून जिवंत परत येतील याची कोणालाही खात्री नव्हती.

पण महाराजांनी चातुर्याने बलशाली मुघल बादशहाच्या कडक बंदोबस्तातूनही सहज सुटका करवून घेतली. आग्र्याहून शिवाजी महाराज सहीसलामत सुटले आणि रायगडावर येऊन देखील पोहचले.

सगळ्या महाराष्ट्रात दुसरी दिवाळी साजरी झाली.

शिवरायांना पकडण्यासाठी मागे पाठवलेले सरदार मोकळ्या हाताने परत आल्यावर औरंगजेब बादशाह हताश झाला. दक्षिणेत आता फक्त मराठेशाहीच वर्चस्व राहणार हे त्याच्या लक्षात आलं होतं.

परत येताच शिवरायांनी आपले गमावलेले किल्ले परत घेण्याचा धडाका लावला. त्यांचा पराक्रम, बुद्धीचातुर्य, रणनीती कौशल्य यामुळे पोर्तुगिजांचा व्हाइसरॉय प्रचंड प्रभावित झाला. 1666 साली आपल्या पोर्तुगाल मधल्या राजाला पाठवलेल्या पत्रात तो म्हणतो,

“जर मुत्सद्देगिरी व युद्धकौशल्य याबाबतीत तुलनाच करावयाची असेल तर फक्त अलेक्झांडर द ग्रेट किंवा ज्युलियस सीझर यांचीच तुलना शिवाजीसोबत होऊ शकते.”

पोर्तुगीज इतिहासकार कॉस्मे दे गार्डा याने या प्रसंगा बद्दल लिहून ठेवले आहे. खरं तर सिकंदर आणि सीझर हे जन्मतःच मोठ्या राज्याचे सत्ताधीश होते.

शिवरायांच्या एवढी संकटे आणि मोठ्या शत्रूशी सामना करून स्वतःच राज्य शून्यातून उभा करायची वेळ त्यांच्यावर आली असती तर त्यांना देखील हे शक्य झालं असत का हे सांगता येत नाही. म्हणूनच शिवाजी महाराज इतर राज्यकर्त्यांपेक्षा अद्वितीय ठरतात.

हे ही वाच भिडू.

The post पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांची तुलना जगजेत्या सिकंदराशी केली होती. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/portuguse-viceroy-compared-shivaji-maharaj-with-alexander/feed/ 2 21331
राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला १४ दिवस कोंडून घेतलं होत https://bolbhidu.com/dr-babasaheb-ambedkar-1928/ https://bolbhidu.com/dr-babasaheb-ambedkar-1928/#respond Wed, 01 Apr 2020 11:14:24 +0000 https://bolbhidu.com/?p=21318

फेसबुक आणि व्हॉटस्अप वरुन सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टचा आशय असा आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी स्वत:ला चौदा दिवसांसाठी कोंडून घेतले होते. नेमकी पोस्ट कोठून व्हायरल झाली याचा शोध घेतला असता आमच्या हाती पोस्टच्या खाली वेगवेगळ्या लेखकांची नावे आली. अनेकांची स्वत:चा लेख म्हणून हा लेख खपवून इतकी उत्तम माहिती […]

The post राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला १४ दिवस कोंडून घेतलं होत appeared first on BolBhidu.com.

]]>

फेसबुक आणि व्हॉटस्अप वरुन सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टचा आशय असा आहे की,

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी स्वत:ला चौदा दिवसांसाठी कोंडून घेतले होते.

नेमकी पोस्ट कोठून व्हायरल झाली याचा शोध घेतला असता आमच्या हाती पोस्टच्या खाली वेगवेगळ्या लेखकांची नावे आली. अनेकांची स्वत:चा लेख म्हणून हा लेख खपवून इतकी उत्तम माहिती समोर आणणाऱ्या व्यक्तींवर अन्यायच केला म्हणावे लागले.

असो, तर मुळ मुद्दा आहे ही गोष्ट खरी आहे का? 

तर हो, हि गोष्ट खरी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकारांनी स्वत:ला चौदा दिवसांसाठी घरात कोंडून घेतलं होतं. हा प्रसंग डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड दूसरा या पुस्तकात चांगदेव खैरमोडे यांनी सांगितला आहे.

यामध्ये सांगण्यात आल आहे की, 

हिंदूस्तानाला जादा राजकीय हक्क देण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी १९२७ साली सायमन कमिशन नियुक्त करण्यात आला. या कमिशनमध्ये एकाही भारतीय व्यक्तीची नेमणूक न झाल्याने या कमिशनला देशभरातून विरोध करण्यात आला. त्यामुळे प्रांतिक समिती नेमण्यात आली. १९२८ साली उमेदवारांची निवडणुक झाली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भास्करराव जाधव यांचा समावेश करण्यात आला होता.

देशाच्या राजकीय हक्कांसाठी आपण भरीव कार्य केले पाहीजे, याची जाणीव त्यांना होती. जगभरातील संविधानिक व्यवस्थेचा सखोल अभ्यास करायला हवा या विचारातून जगभरातील राज्यघटनांचा सखोल अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:ला १४ दिवस कोंडून घेतले होते. 

राज्यघटनेचा प्रश्न हिंदी राजकारणात प्रामुख्याने चर्चेला येणार आहे त्यावेळी आपण शांत बसणे ही गोष्ट योग्य ठरणार नाही याची जाणीव बाबासाहेबांना होती व त्यानुसार ५ ऑगस्ट १९२८ रोजी त्यांची प्रांतिक समितीवर निवड होताच त्यांनी दूसऱ्याच दिवशी आपल्या मित्रांकडून ४०० रुपये उधार घेतले. दोन दिवसात त्यांनी प्रा. पी.ए. वाडिया यांच्यासोबत तारपोरवाला बुकसेलर्स गाठले. व तिथे जगभरातील राज्यघटनांचे अभ्यासग्रॅंथ विकत घेण्यात आले.

९ ऑगस्ट पासून डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले व राज्यघटनांचा अभ्यास करण्यास सुरवात केली. अशा वेळी काही लोक यायचे व दरवाजा ठोठवायचे. अशा वेळी बाबासाहेबांची एकाग्रता तुटत असे.

यावर उपाय म्हणून बाबासाहेबांनी मडके बुवांना सांगितलं की, दरवाजाला बाहेरून कुलूप लावा. व इराण्याच्या हॉटेलातून मला सकाळ, दूपार, संध्याकाळ चहा देण्याची व्यवस्था करा. जेवणाची सोय देखील खिडकीतूनच करण्यात आली. अशा प्रकारे १४ दिवस डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला कोंडून घेवून राज्यघटनेचा अभ्यास करण्यास सुरवात केली. 

या एकनिष्ठतेचं फळ म्हणजेच गेली ७० वर्ष अबाधित असणारी आपली राज्यघटना. 

हे ही वाच भिडू. 

The post राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला १४ दिवस कोंडून घेतलं होत appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/dr-babasaheb-ambedkar-1928/feed/ 0 21318
फुटकळ नेत्यांच्या त्याच त्या गोष्टी सांगणारे आपण सीडी देशमुखांना विसरत चाललोय. https://bolbhidu.com/about-c-d-deshmukh/ https://bolbhidu.com/about-c-d-deshmukh/#respond Wed, 01 Apr 2020 10:30:20 +0000 https://bolbhidu.com/?p=21313

चिंतामणराव देशमुख भारताचे माजी अर्थमंत्री. आपल्याला ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात राजीनामा दिल्याने जास्त माहित असतात. पहिले स्वाभिमानी नेते. पण गंमत अशी आहे की, चिंतामणराव देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी राजीनामा दिलाच नव्हता. त्यांनी तसं खुपदा सांगितलय. त्यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या सरकारच्या हालचालीचा विरोध म्हणून राजीनामा दिला होता. पण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्या नशिबी हे आलं. […]

The post फुटकळ नेत्यांच्या त्याच त्या गोष्टी सांगणारे आपण सीडी देशमुखांना विसरत चाललोय. appeared first on BolBhidu.com.

]]>

चिंतामणराव देशमुख भारताचे माजी अर्थमंत्री. आपल्याला ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात राजीनामा दिल्याने जास्त माहित असतात. पहिले स्वाभिमानी नेते. पण गंमत अशी आहे की,

चिंतामणराव देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी राजीनामा दिलाच नव्हता. त्यांनी तसं खुपदा सांगितलय. त्यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या सरकारच्या हालचालीचा विरोध म्हणून राजीनामा दिला होता. पण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्या नशिबी हे आलं.

मराठी माणसाला स्वाभिमानाचं उदाहरण देण्यासाठी चिंतामणराव उर्फ सीडी देशमुख हे महत्वाचं नाव झालं.

अर्थात पंडीत नेहरूंशी वाद घालणे, त्यांच्या मंत्रीमंडळाचा राजीनामा देणे ही साधी गोष्ट नव्हतीच. बरं चिंतामणराव म्हणजे साधी सुधी आसामी नव्हती. त्यांच्या प्रचारासाठी पंडीत नेहरू स्वतः आले होते. पण अर्थमंत्री झालेले चिंतामणराव काही राजकारणी नव्हते. 

चिंतामणराव उर्फ सीडी देशमुख कोकणातल्या रोह्याचे. रोहा गावातच त्यांचं बालपण गेलं. पुढे ते काही काळ लंडनला स्थायिक झाले. त्या काळात त्यांनी लंडनला घर घेतलं होतं. आणी घराचं नाव ठेवलं होतं रोहा.

लंडनला पण आपल्या गावाचं मराठमोळ रोहा नाव ठेवणारे सीडी देशमुख शंभर टक्के मराठी माणूस होते.

पांडुरंगशास्त्री आठवले आणी ते एकाच गावचे. योगायोग म्हणजे दोघांना मॅगसेसे हा मानाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचे एकाच गावातले दोघे मानकरी जगात कुठे नसतील.

तर हे सीडी देशमुख मुंबई विद्यापीठात मॅट्रिकच्या परीक्षेत पहिले आले होते. आणि विद्यापीठ आजच्याएवढ नव्हतं. अगदी कर्नाटकपर्यंतचा भाग मुंबई विद्यापीठात यायचा. त्यावेळची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ते पहिले आल्यावर चक्क राम गणेश गडकरी यांनी त्यांच्यावर कौतुक करणारी कविता लिहिली होती. इंटर परीक्षेतही ते पहिले आले.

पुढे सीडी रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले. नोटेवर सही करणारा पहिला भारतीय गव्हर्नर मराठी होता. त्यांची आणखी एक गंमत म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर काही काळ कराराप्रमाणे ते भारत आणी पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सामाईक असलेल्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.

आणी पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर वर्षभर तरी सीडी देशमुखांच्या सह्या असलेल्या नोटा पाकिस्तानात वापरात होत्या. 

पंडीत नेहरू आणि सरदार पटेलांची इच्छा होती की सीडी देशमुखांनी अर्थमंत्रीपद स्वीकारावं. इंग्रजांनी आधीच विनंती केली होती. पण त्यावेळी राजकारणात पडायचे नाही म्हणून सीडी देशमुखांनी नकार दिला होता.

पुढे नेहरूंच्या आग्रहाने ते अर्थमंत्री झाले. पण खासदार नसल्यामुळे त्यांना निवडून यावे लागणार होते. सहा महिन्यात. मग त्यांना राज्यसभेवर घ्यायची तयारी सुरु झाली. चाचपणी सुरु झाली. महाराष्ट्रातून त्यांना राज्यसभेसाठी जागा देता येणार नाही असे कळविण्यात आले.

शेवटी सीडी देशमुख यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले. आणि आश्चर्य म्हणजे पंजाबने अजिबात विरोध केला नाही. नंतर सीडी देशमुख यांना कॉंग्रेसने निवडणूक लढवण्याची विंनती केली. पण त्यांना राजकारणाचा तिटकारा होता.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना निवडणूक लढवायला कॉंग्रेस पक्षात प्रवेश घ्यावा लागणार होता. असा प्रवेश घेण्यात त्यांना अडचण नव्हती.

त्यांना कॉंग्रेस आवडत नव्हती असा प्रकार नव्हता. त्यांची अडचण वेगळीच होती.

कॉंग्रेस पक्षाचे काही नियम होते. सभासदाने दारू प्यायची नाही आणि खादी वापरायची हे नियम सीडी देशमुखांना मान्य नव्हते. त्यांनी सभासद व्हायला नकार दिला. शेवटी विशेष बाब म्हणजे सहयोगी सदस्य असा काहीसा प्रकार करून त्यांना पक्षात घेण्यात आले.

सीडी देशमुख यांनी कुलाब्यातून निवडणूक लढवली.

त्यांची प्रतिमा चांगली होती. कोकण त्यांच्या घरचा मतदारसंघ. सीडी देशमुख निवडून आले. अर्थमंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं. आजच्या काळात कौतुक वाटणारी गोष्ट म्हणजे त्यांचा खाजगी कंपन्यांनी राजकीय पक्षांना देणग्या देण्यास विरोध होता.

आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला धक्कातंत्र म्हणजे सरकारने केलेली नोटबंदीच आठवत असते. पण सीडी देशमुखांच्या काळात एक जोरदार धक्का व्यापारवर्गाला देण्यात आला होता. रातोरात त्यांनी विमाक्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करून टाकले. तोपर्यंत खाजगी उद्योगाच्या ताब्यात हे क्षेत्र होतं.

पण एका दिवसात अतिशय योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी विमाक्षेत्र सरकारच्या ताब्यात आणले. एकाच वेळी सगळे खाजगी उद्योग ताब्यात घेतले गेले. हा सामान्य जनतेच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा निर्णय होता. गरिबांना आपल्या जीवाची पर्वा झाल्यासारख वाटलं. एलआयसीने आजपर्यंत ती प्रतिमा जपलेली आहे. 

अर्थमंत्री असताना त्यांची भाषणं गाजली. ते इंग्रजीत बोलायचे. एकदा एका खासदाराने विरोध केला. हिंदीत बोलण्याचा आग्रह धरला. सीडी देशमुख संस्कृत प्रचुर हिंदीत बोलू लागले. थोड्यावेळाने तो खासदार उभा राहिला आणि इंग्रजीतच बोला असा आग्रह करू लागला. कारण त्याला सीडी देशमुखांचं शुध्द हिंदी कळत नव्हतं.

त्यापेक्षा इंग्रजी बरी असं वाटलं त्या खासदाराला. सीडी देशमुख राजकारणी नसल्याने त्यांची आठवण देशानेच काय महाराष्ट्रानेसुद्धा त्यांच्या कार्याच्या प्रमाणात ठेवली नाही.

अगदी सीडी अनुदान आयोगाचे चेअरमन असताना त्यांनी मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठ स्थापन केलय हे सुद्धा फार लोकांना लक्षात नाही. सीडी देशमुख आयोगावर असताना एक रुपया पगार घ्यायचे. याबाबतीत ते गमतीने म्हणायचे की, एक रुपया घेत असलो तरी काम सोळा आणे होतय की नाही ते महत्वाचं! 

सीडी देशमुखांचा शेवटचा काळ मात्र फार बरा नव्हता.

ते हैद्राबादला रहायला गेले. मृत्युपत्रात संपत्ती सामाजिक संस्थेला दिली असल्याचे कळल्यावर विचारपूस करणारे गायब झाले. घरच जेवण पाठवणारे यायचं बंद झाले. आधीच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. ते दुखः होतच.

जाता जाता आज महत्वाची वाटणारी गोष्ट.

सीडी देशमुख टिळकांच्या विचारांचा प्रभाव असणारे नेते. दिल्लीतलं जेएनयु मोठं होण्यात मोठा वाटा असलेले नेते. सीडी देशमुखांना याच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली. त्यांना पुरस्कार खूप मिळाले.

पण गावोगावच्या फुटकळ नेत्यांच्या पन्नास पन्नास वर्ष त्याच त्या गोष्टी सांगणारे आपण सीडी देशमुखांना मात्र विसरत चाललोय. महाराष्ट्राने आपला हा स्वाभिमानी नेता विसरता कामा नये. 

हे ही वाच भिडू

The post फुटकळ नेत्यांच्या त्याच त्या गोष्टी सांगणारे आपण सीडी देशमुखांना विसरत चाललोय. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/about-c-d-deshmukh/feed/ 0 21313
साखर कारखानेसुद्धा हँड सॅनिटायझर बनवू शकतात ही आयडिया पहिल्यांदा यांना सुचली https://bolbhidu.com/sanjaykumar-bhosle-hand-santitizer-in-sugar-factory/ https://bolbhidu.com/sanjaykumar-bhosle-hand-santitizer-in-sugar-factory/#respond Mon, 30 Mar 2020 04:44:03 +0000 https://bolbhidu.com/?p=21264

कोरोनाच्या कोव्हीड 19 या व्हायरसने जगभरात थैमान घातलंय. लाखोंना या रोगाने गाठलंय. अगदी इंग्लंड सारख्या देशाचे युवराज, पंतप्रधान देखील या रोगापासून सुटले नाहीत. कधी नव्हे ते जगाला हँड सॅनिटायझरने हात धुण्याचे महत्व पटतय. भारतात देखील अनेकांना हँड सॅनिटायझर म्हणजे काय हेच माहीत नव्हतं पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने निर्देशित केल्यानंतर प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाचा परिणाम म्हणून […]

The post साखर कारखानेसुद्धा हँड सॅनिटायझर बनवू शकतात ही आयडिया पहिल्यांदा यांना सुचली appeared first on BolBhidu.com.

]]>

कोरोनाच्या कोव्हीड 19 या व्हायरसने जगभरात थैमान घातलंय. लाखोंना या रोगाने गाठलंय. अगदी इंग्लंड सारख्या देशाचे युवराज, पंतप्रधान देखील या रोगापासून सुटले नाहीत. कधी नव्हे ते जगाला हँड सॅनिटायझरने हात धुण्याचे महत्व पटतय.

भारतात देखील अनेकांना हँड सॅनिटायझर म्हणजे काय हेच माहीत नव्हतं पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने निर्देशित केल्यानंतर प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाचा परिणाम म्हणून अनेकांनी हँड सॅनिटायझर खरेदी केले.

पण गेल्या काही दिवसात त्याच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या. कोरोनासारख्या व्हायरसच्या हल्ल्यातील मुख्य शस्त्र असणारे हँड सॅनिटायझर खरेदी करणे सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले.

अशातच बातमी आली की साखर कारखान्यांनी हँड सॅनिटायझरची निर्मिती सुरू केली आहे आणि त्याच्या किंमती खाली आल्या आहेत.

आणि हा क्रांतिकारी बदल घडला आहे तो एका सरकारी अधिकाऱ्यामुळे,

त्यांचं नाव डॉ. संजयकुमार भोसले.  उप आयुक्त साखर आयुक्तालय, महाराष्ट्र शासन

बोल भिडू टीमने त्यांच्या शी संपर्क साधला तेव्हा त्यांनी ही अभिनव कल्पना त्यांना कशी सुचली हे सांगितलं.

झालं असं होतं की कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर इतरांप्रमाणे डॉ. भोसले देखील मेडिकलमध्ये सॅनिटायझर खरेदी करायला गेले होते. तेव्हा त्यांना १५० ml ची सॅनिटायझर बाटली ५५० रुपयाला घ्यायला लागली. एवढी किंमत कशी काय वाढली हा प्रश्न त्यांना पडला.

अभ्यास केल्यावर एक महत्वाची महिती त्यांच्या लक्षात आली की सॅनिटायझर बनवण्यासाठी लागणारे आयसोप्रोफाईल अल्कोहोल हे भारतात चीन मधून तैवान मार्गे येते. भारतात आयसोप्रोफाईल अल्कोहोल साठी चीनची मक्तेदारी असल्या प्रमाणे आहे.

चीन मध्ये कोरोना आल्यापासून त्यांच्याशी असणारी आयात निर्यात थांबली आणि याचा फटका सॅनिटायझर निर्मितीला बसला. त्याचा पुरवठा थांबला आणि किंमती गगनाला भिडल्या.

तसं पाहायला गेलं तर डॉ. भोसले हे साखर आयुक्तालयात को जनरेशन आणि डिस्टीलरी हा विभाग सांभाळतात. हँड सॅनिटायझरशी त्यांचा थेट संबंध हात धुण्यापुरताच. पण आपल्या खात्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला कसा करता येईल हे डॉ. भोसलेंच्या डोक्यात नेहमी चालू असायच.

मधल्या काळात भारत शासनाच्या इथेनॉल ब्लेंडिंग पॉलिसीवर काम करायची त्यांना संधी मिळाली होती आणि त्या निमित्ताने पेट्रोल मध्ये इथेनॉल वापरण्यापासून इतर कोणते उपयोग करता येतील याचा अभ्यास झाला होता.

यातूनच त्यांच्या लक्षात आलं, साखर कारखान्यात तयार होणाऱ्या इथेनॉलमधून हँड सॅनिटायझर बनवता येऊ शकतात.

आणि ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे हेे सॅनिटायझर बाजारातल्या
सॅनिटायझर इतकेच परिणामकारक देखील आहेत याची खात्री करून घेतली होती.

तिथून सगळं चित्रच पालटलं.

महाराष्ट्राचे साखर आयुक्त सौरभ राव यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारकडे साखर कारखान्याना सॅनिटायझर निर्मितीची परवानगी मिळावी यासाठी दिल्लीत जाऊन प्रयत्न केले. त्यांची रास्त मागणी केंद्र सरकारला पटली आणि तातडीने आदेश देण्यात आले.

एफडीएने अख्या भारतभरातील साखर कारखान्याना सॅनिटायझर निर्मितीचा परवाना दिला.

गेल्या शनिवार पासून महाराष्ट्रात 45 साखर कारखाने सॅनिटायझर बनवू लागले आहेत. काही दिवसातच त्यांनी 5 लाख लिटर सॅनिटायझर बनवले आहे

शिवाय याचा निर्मिती खर्च सरकारने निर्धारित केलेल्या दरापेक्षाही प्रचंड कमी आहे.

याचा परिणाम म्हणून येत्या काळात मोठमोठ्या हॉस्पिटल पासून ते कॉर्पोरेट कंपन्या, रेल्वे स्टेशन, बस स्थानक अशा प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी अगदी वाजवी दरात हँड सॅनिटायझर उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाणारे सहकारी साखर कारखाने सध्या आचके देत आहेत. हँड सॅनिटायझर निर्मिती सारखे बाय प्रॉडक्ट्स त्यांना नवं संजीवनी देतील हे नक्की.

फक्त भारतातच नाही तर अमेरिकेतही दोन दिवसांपूर्वी इथेनॉल पासून सॅनिटायझर बनवण्याच्या कल्पनेला पाठिंबा देण्यात आला आहे आणि येत्या काळात तिथेही स्वस्त दरातल्या या सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको.

हे ही वाच भिडू

The post साखर कारखानेसुद्धा हँड सॅनिटायझर बनवू शकतात ही आयडिया पहिल्यांदा यांना सुचली appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/sanjaykumar-bhosle-hand-santitizer-in-sugar-factory/feed/ 0 21264
चाफेकर बंधूनी ज्याला मारलं त्याच रँडने पुण्यात नायडू हॉस्पिटल स्थापन केले होते https://bolbhidu.com/chafekar-brothers-rand-naidu-hospital-pune/ https://bolbhidu.com/chafekar-brothers-rand-naidu-hospital-pune/#comments Sat, 21 Mar 2020 09:22:18 +0000 https://bolbhidu.com/?p=21154

सध्या कोरोनाने सगळ्या जगाला छळले आहे. चीन आणि इटली सारख्या देशात हजारोंच्या संख्येने लोक मरत आहेत. जवळपास सव्वाशे वर्षापूर्वी अशाच एका संसर्गजन्य रोगाने भारताला वेठीला धरले होते. तो रोग म्हणजे प्लेग. 1896 साली आलेल्या पुरामुळे मुंबईतल्या गोदामातले उंदीर मेले हा रोग सगळीकडे पसरला. शेकडो जनांचा मृत्यू झाला. लाखो जण शहर सोडून निघू लागले. रेल्वे जहाजावर […]

The post चाफेकर बंधूनी ज्याला मारलं त्याच रँडने पुण्यात नायडू हॉस्पिटल स्थापन केले होते appeared first on BolBhidu.com.

]]>

सध्या कोरोनाने सगळ्या जगाला छळले आहे. चीन आणि इटली सारख्या देशात हजारोंच्या संख्येने लोक मरत आहेत.

जवळपास सव्वाशे वर्षापूर्वी अशाच एका संसर्गजन्य रोगाने भारताला वेठीला धरले होते.

तो रोग म्हणजे प्लेग.

1896 साली आलेल्या पुरामुळे मुंबईतल्या गोदामातले उंदीर मेले हा रोग सगळीकडे पसरला. शेकडो जनांचा मृत्यू झाला. लाखो जण शहर सोडून निघू लागले. रेल्वे जहाजावर तपासणी केल्याशिवाय प्रवेश मिळेना झाला होता. पण तरीही अस्वच्छतेमुळे फैलावणाऱ्या या रोगाने पुण्यात एंट्री केली.

19 डिसेंबर रोजी पुण्याच्या रास्तापेठेत प्लेगचा पहिला रुग्ण सापडला. काहीच दिवसात पुण्यात या रोगाने आक्राळविक्राळ रूप धारण केले. सगळीकडे हाहाकार उडाला.

तेव्हाच्या इंग्रज सरकारने प्लेगवर मात करण्यासाठी एक प्लेग प्रतिबंधक समिती स्थापन केली. याचा कमिशनर होता वॉल्टर चार्ल्स रँड.

तेव्हाची आयसीएस परीक्षा पास होऊन भारतात ब्रिटिश सेवेसाठी दाखल झालेला रँड यापूर्वी साताऱ्यात उपजिल्हाधिकारी होता. धडाक्यात निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करणारा अधिकारी अशी त्याची ओळख होती.

डब्ल्यू सी रँडने पुण्यात प्लेगशी लढा देण्याची जबाबदारी उचलली. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे या रोग्यांना एकत्र ठेवण्यासाठी मुळा-मुठेच्या संगमावर प्लेग हॉस्पिटल सुरू करण्यात आले.

संसर्ग पसरू नये म्हणून मुद्दामहून शहराबाहेरची जागा निवडण्यात आली होती. तिथेच रुग्णासाठी विलगीकरण छावणी सुरू केली. या प्लेग हॉस्पिटलचे पहिले मेडिकल ऑफिसर होते डॉ. अॅडम्स वायली.

मार्च महिना उजाडला तसा पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घालायला सुरवात केली. तरी खूप जण आपले घर सोडून मदतीच्या छावणीत येण्यास तयार नव्हते. ते एकोणीसावे शतक होते, अंधश्रद्धानी भारतीय समाज व्यवस्थेला पोखरल होत.

प्लेग हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे धर्म बाटेल अशी भीती पुण्यातील अनेकांना होती.

प्लेग थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. अखेर रँडने मिल्ट्रीला बळजबरीने लोकांना घरातून बाहेर काढण्याचे आदेश दिले. यासाठी 893 जणांची तुकडी तैनात केली होती.

पुणेकरांनी जोरदार विरोध केला. सैनिक बूट घालून घरात शिरतात, देवघरात जातात, बाया मुलींनासुद्धा उचलून बाहेर आणतात असे आरोप होऊ लागले.

लोकमान्य टिळकांनी देखील रँडच्या या बळजबरीवर आपल्या अग्रलेखातुन जोरदार हल्ला चढवला.

सैनिकांच्या संख्ये पेक्षा डॉक्टरांची संख्या जास्त असती तर बरं झालं असत अस त्यांचं म्हणणं होतं. भारतीयांच्या धार्मिक भावना परंपरा दुखावू नये अन्यथा याचे परिणाम वाईट होतील असे अनेकांचे मत होतं.

तर मेडिकल इमर्जन्सीच्या वेळी जातपात सोवळे ओवळे पाळणे योग्य नाही असे रँडच मत होतं.

भीती खरी ठरलीच. प्लेगच्या साथीत झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधूनी 22 जून 1897 रोजी गणेशखिंड रोडवर गोळ्या घालून रँडची हत्या केली. लोकमान्य टिळकांचा त्यांना आशीर्वाद होता अस म्हटलं जातं.

रँड च्या मृत्यूनंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दडपशाही कमी केली.

पुढे अनेक वर्षे हे पुण्याच्या जनरल प्लेग हॉस्पिटलमध्ये फक्त प्लेगच नाही तर अनेक संसर्गजन्य रोगांचे रोगी भरती केले जात होते.

महानगरपालिका आणि मुंबई सरकार, लष्करी खाते, जिल्हा लोकल बोर्ड या सगळ्यांच्याकडे या रुग्णालयाच्या खर्चाची वाटणी करण्यात आली होती. बरीच वर्षे पुण्याला प्लेगने छळले.

1933 साली प्लेग प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष असणाऱ्या डॉ. नायडू यांचं नाव या हॉस्पिटलला देण्यात आले.

आज स्थापना होऊन 125 वर्षे झाली आजही स्वाइन फ्लू असो वा कोरोना प्रत्येक संसर्गजन्य रोगाचा उपाय पुण्यात नायडू हॉस्पिटल या एकमेव रुग्णालयातच होतो आणि याचे श्रेय जाते पुणेकरांवर अत्याचार करणाऱ्या रँडला.

संदर्भ – health care in bombay Presidency, 1896-1930

हे ही वाच भिडू.

The post चाफेकर बंधूनी ज्याला मारलं त्याच रँडने पुण्यात नायडू हॉस्पिटल स्थापन केले होते appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/chafekar-brothers-rand-naidu-hospital-pune/feed/ 1 21154
शाहू महाराजांनी कोल्हापुरात पाटलांचं ट्रेनिंग स्कुल सुरू केलं होतं https://bolbhidu.com/patil-training-school-shahu-mharaj-kolhapur/ https://bolbhidu.com/patil-training-school-shahu-mharaj-kolhapur/#respond Fri, 20 Mar 2020 11:27:44 +0000 https://bolbhidu.com/?p=21107

पाटील म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो रांगडा, घरंदाज, करारी, गावचं नेतृत्व करणार पुढारी, आकडेबाज मिशा, टोपी-धोतर, पायात कर्रकर्र वाजणाऱ्या चामड्याच्या चपला. जुन्या सिनेमामुळे पाटलांचे हेच चित्र आपल्या मनात फिट्ट बसलंय. पाटील म्हणजे गावचा राजा!  प्रत्येक गोष्टीत पाटलाचा मान पहिला असायचा. आज ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या गावात ही पद्धत दिसते. अनेक जण अभिमानाने आपल्या आडनावापुढे पाटील लावतात. […]

The post शाहू महाराजांनी कोल्हापुरात पाटलांचं ट्रेनिंग स्कुल सुरू केलं होतं appeared first on BolBhidu.com.

]]>

पाटील म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो रांगडा, घरंदाज, करारी, गावचं नेतृत्व करणार पुढारी, आकडेबाज मिशा, टोपी-धोतर, पायात कर्रकर्र वाजणाऱ्या चामड्याच्या चपला. जुन्या सिनेमामुळे पाटलांचे हेच चित्र आपल्या मनात फिट्ट बसलंय.

पाटील म्हणजे गावचा राजा!  प्रत्येक गोष्टीत पाटलाचा मान पहिला असायचा.

आज ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या गावात ही पद्धत दिसते. अनेक जण अभिमानाने आपल्या आडनावापुढे पाटील लावतात. अनेकांचे आडनावच पाटील आहेत.

पण तुम्हाला माहीत आहे का की मराठेशाहीच्या प्रशासन व्यवस्थेत पाटील ही एक पदवी होती.

गावचा शेतसारा वसूल करणारा अधिकारी म्हणजे पाटील. गावातला न्यायनिवडा करणे, शांतता राखणे ही महत्वाची कामे त्याच्याकडे असायची.

अगदी मुघलांपासून ब्रिटिशांच्या पर्यंत प्रत्येक राजसत्तेला गावच्या कारभारासाठी पाटलांवर अवलंबून रहावं लागत होतं.

कालांतराने प्रशासन व्यवस्था बदलली गेली.आज याच पाटलांची मुले पुण्याला येऊन mpsc/upsc चा अभ्यास करत आहेत. मसुरीच्या लालबहादूर शास्त्री ट्रेनिंग सेंटरला जाण्याची स्वप्ने बघत आहेत.

पण भिडू, याच महाराष्ट्रात पाटलांच्या ट्रेनिंग साठी एक ट्रेनिंग सेंटर होतं? तेही कोल्हापुरात? खुद्द राजर्षी शाहू महाराजांनी याची सुरवात केली होती.

शाहू महाराज आधुनिक विचारांचे होते. इंग्लंड सारख्या युरोपियन देशामध्ये प्रशासन कसे चालते हे त्यांनी पाहिलं होतं. पाटील म्हणजे राजाचा गावातील शेवटचा प्रतिनिधी. त्याच्यावर राज्यकारभाराचा मुख्य भार अवलंबून असतो. रयतेशी त्याचा थेट संपर्क असतो.

या पाटलांचे प्रबोधन व्हावे, तो आपल्या कामात तरबेज व कर्तव्यदक्ष राहावा म्हणून महाराजांनी त्यांच्या ट्रेनिंग साठी एक संस्था स्थापन केली. नाव होतं,

“दिल्ली दरबार मेमोरियल पाटील स्कुल”

1911 मध्ये ब्रिटिश सत्तेचा राजा पंचम जॉर्ज याच्या पदारोहणाचा कार्यक्रम दिल्ली येथे झाला होता. याला दिल्ली दरबार असे म्हणत. त्याचदिवशी दिल्लीला भारताची राजधानी जाहीर करण्यात आलं होतं. याची आठवण म्हणून शाहू महाराजांनी आपल्या या ट्रेनिंग स्कुल ला दिल्ली दरबाराचे नाव दिले.

या संदर्भातील करवीर रियासतीचा जाहीरनामा तेव्हाचे एज्युकेशन इन्स्पेक्टर अण्णासाहेब लठ्ठे यांनी 2 फेब्रुवारी 1912 रोजी जाहीर केला आहे. यात शाळेचे स्वरूप कसे असेल याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे.

या शाळेत शिकवले जाणारे विषय

१. गाव पोलीस, डिस्ट्रिक्ट पोलीस यासंबंधी कायदे व फौजदारी कायद्याची मुख्य तत्वे.
२. गावचा जमाखर्च, त्या संबंधी नमुने वगैरे मुलकी कामे.
३. खेडेगावातील आरोग्यासंबंधी वगैरे माहिती. त्या संबंधाने गावकामगारांची कर्तव्ये.
४.रिपोर्ट वगैरे लिहिणे यास, जरूर इतका भाषाविषयी व्याकरणासह.
५. कोल्हापूर राज्याचा इतिहास, भूगोल व राज्यव्यवस्थेची माहिती.

ही पाटलांची व तलाठ्यांची शाळा चालवण्याची जबाबदारी पंडित आत्माराम शास्त्री यांच्याकडे देण्यात आली होती.

सदर क्लासचे टीचर बाळासाहेब गायकवाड यांनी पुरवावे असे आदेश होते. दरवर्षी या विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले की त्यांची परीक्षा घेण्यात यावी असं महाराजांनी सांगितलं होतं.

ही परीक्षा एज्युकेशनल इन्स्पेक्टर, राजाराम कॉलेजचे विज्ञानाचे प्राध्यापक आणि सरसुभे नेमतील तो मुलकी कामगार यांच्या कमिटीकडून घेण्यात येईल व त्या परीक्षेत पास होणाऱ्यास पाटीलकीच्या कामावर रुजू करून घेण्यात येईल असा स्पष्ट आदेश त्या जाहीरनाम्यात लिहिला होता.

एवढेच नाही तर 23 नोव्हेंबर 1912च्या जाहीरनाम्यात त्या वर्षीच्या पाटील स्कुलच्या वार्षिक परीक्षेचा निकाल देखील जाहीर केला आहे.

गंमत म्हणजे या परीक्षेत पास होऊन करवीर संस्थानात पाटील होण्याचा मान मिळवणाऱ्यामध्ये एक ब्राम्हण आणि एक मुसलमान व्यक्ती देखील आहे.

महंमद मोहद्दीन पाटील हे मिणचे,पेटा आळते येथून तर महादेव आप्पाजी कुलकर्णी हे कडलगे पेटा गडहिंग्लज येथून पाटीलकीची परीक्षा पास झाले होते असं या जाहीरनाम्यात दिसतं.

याचाच अर्थ शाहू महाराजांनी पाटीलकी ची परीक्षा सर्व समाजासाठी खुली केली होती. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे कोल्हापूर हे एक पुरोगामी विचारांचा वारसा चालवणारे शहर बनले. आधुनिकता देशाच्या इतर भागांच्या तुलनेत कोल्हापुरात लवकर आली. आजही कोल्हापूर भागात सर्व जातपंथातील पाटील दिसून येतात.

संदर्भ- राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे व हुकूमनामे, संपादक जयसिंगराव पवार

हे ही वाच भिडू.

The post शाहू महाराजांनी कोल्हापुरात पाटलांचं ट्रेनिंग स्कुल सुरू केलं होतं appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/patil-training-school-shahu-mharaj-kolhapur/feed/ 0 21107
दुष्काळामुळे महाराष्ट्रातील लोकांनी इंडोनेशियाला स्थलांतर केलं होतं https://bolbhidu.com/indonesia-has-maharashtrian-people-12/ https://bolbhidu.com/indonesia-has-maharashtrian-people-12/#respond Thu, 19 Mar 2020 09:35:04 +0000 https://bolbhidu.com/?p=21120

गोष्ट आहे सहाव्या की सातव्या शतकातली. यापूर्वी महाराष्ट्रात वाकटकांचे राज्य होते. मात्र शेवटचा राजा हरिषेणच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राज्य दक्षिणेतील पल्लवांकडे गेलं. ते महाराष्ट्रापासून दूर राहत असल्यामुळे त्यांचे या प्रदेशाकडे दुर्लक्ष होणे सहाजिक होते. कर्नाटकातील बदामी चालुक्यांनी हा प्रदेश जिंकला. त्यांच्याच शिलालेखांत महाराष्ट्र असा पहिला उल्लेख येतो. परकीय राज्यकर्त्यांमुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावली, शिवाय याच काळात […]

The post दुष्काळामुळे महाराष्ट्रातील लोकांनी इंडोनेशियाला स्थलांतर केलं होतं appeared first on BolBhidu.com.

]]>

गोष्ट आहे सहाव्या की सातव्या शतकातली. यापूर्वी महाराष्ट्रात वाकटकांचे राज्य होते. मात्र शेवटचा राजा हरिषेणच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राज्य दक्षिणेतील पल्लवांकडे गेलं. ते महाराष्ट्रापासून दूर राहत असल्यामुळे त्यांचे या प्रदेशाकडे दुर्लक्ष होणे सहाजिक होते.

कर्नाटकातील बदामी चालुक्यांनी हा प्रदेश जिंकला. त्यांच्याच शिलालेखांत महाराष्ट्र असा पहिला उल्लेख येतो.

परकीय राज्यकर्त्यांमुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावली, शिवाय याच काळात पर्यावरणात प्रचंड बदल घडून येत असल्यामुळे दुष्काळ वारंवार पडू लागला. शेतीची दुरवस्था झाली. व्यापार मंदावला.

दर तीन-चार वर्षांनी दुष्काळ येत होता. त्यातच रोगराईचा तडाखा नित्याचा होता. कधीकधी दुष्काळ 12 वर्षे टिकल्याचा उल्लेख आहे.

या दुष्काळाला दुर्गादेवी दुष्काळ असे म्हटले गेले आहे.

मार्कंडेय पुराण हे सहाव्या शतकातले. थोर संस्कृत गद्यलेखक दंडीन हा याच काळातला त्याच्या दशकुमारचरिता मध्ये असेच एक बारा वर्षे सतत पडणाऱ्या दुष्काळाचे वर्णन आहे. धान्य उगवत नाही, अन्नान दशा झाली आहे.लोक बायका पोरांना विकत आहेत पण विकत घ्यायला कोणी नाही. रस्त्यात माणसे, जनावरे मरून पडली आहेत.

दांडीन हा पल्लवांच्या दरबारात होता. याकाळातील समकालीन ग्रंथामध्ये या दुष्काळाचे वर्णन आढळते.

वाराणसी सकट अनेक तीर्थक्षेत्रे निर्मनुष्य झाली आहेत,

कलियुग अवतरले आहे असे उल्लेख आढळतात.

सातव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवाशी ह्युएन त्संग लिहितो की, श्रावस्ती, कपिलवास्तू सारखे भरभराटीला आलेले व्यापारी शहरे देखील ओस पडली आहेत. कांची, वैशाली, कुशीनगर सगळी कडे हीच स्थिती आहे. रेशीम उद्योग कारागिर देशोधडीला लागले आहेत.

जाव्हानीज क्रोनिकल या ऐतिहासिक ग्रंथात सहाव्या शतकात पश्चिम भारतात प्रचंड दुष्काळ पडल्यामुळे तेथील राजाने आपल्या राजपुत्रासह हजारो सैनिक कारागीर शेतकरी यांना जाव्हा (इंडोनेशिया) बेटांवर पाठवले असा थेट उल्लेख आहे.

हा भारतीयांचे इंडोनेशियाला झालेले पहिले स्थलांतर मानले जाते.

तिथल्या भाषेवरही महाराष्ट्रातील प्राकृत आणि तामिळनाडूच्या तामिळ भाषेतील शब्दांचा प्रभाव स्पष्ट दिसतो.

पुढे भारतातून या बेटांवर स्थलांतर सुरूच राहिले. इंग्रज सत्ता आल्यावर त्यांनी तिथल्या मळ्यात कामे करण्याच्या निमित्ताने हजारो मुसलमान, हिंदू सर्व समाजातील लोकांना नेले.

म्हणूनच आज तिथे लाखो भारतीय वंशाचे लोक राहतात. त्यांनीच इंडोनेशिया देशाला भारताची छोटी बहीण अशी ओळख मिळवून दिली आहे.

संदर्भ- महाराष्ट्राची कुळकथा

हे ही वाच भिडू.

The post दुष्काळामुळे महाराष्ट्रातील लोकांनी इंडोनेशियाला स्थलांतर केलं होतं appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/indonesia-has-maharashtrian-people-12/feed/ 0 21120