Browsing Category

दिल्ली दरबार

भाजपचे बडे नेते धमकी देत असूनही संघाच्या एका आदेशावर उमा भारतींची घरवापसी झाली.

२००३ सालच्या मध्यप्रदेश निवडणूका. भाजपने विधानसभेच्या २३० पैकी १७३ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसची गाडी ३८ वर थांबली. भाजपकडून पक्षाचा चेहरा होत्या आक्रमक नेत्या उमा भारती. ८ डिसेंबर २००३ रोजी त्यांनी मध्यप्रदेशच्या १५ व्या मुख्यमंत्री…
Read More...

खरंच…फक्त कांद्याच्या मुद्द्यावर सरकार पडू शकतयं.

काल केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी मागं घेतल्यानं शेतकऱ्याच्या जीवात जीव आला आहे. सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात कांद्यानं शंभरी गाठल्यानं सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून दर कमी यावेत यासाठी ही निर्यात बंदी केली होती. एकूणच काय…
Read More...

राजीव गांधींना मारण्यापूर्वी धनु व्ही. पी. सिंग यांच्या पाया का पडली होती?

२१ मे १९९१ च्या रात्री १० वाजून २१ मिनिटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये जे घडलं ते भीषण होतं. ३० वर्षांची एक बुटकी, सावळी आणि जाडी धनु नावाची मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन राजीव गांधी यांच्या दिशेनं चालू लागली. ती राजीव गांधी…
Read More...

मध्यरात्री रेडिओवरून खासदारांना बोलवून घेण्यात आलं आणि रात्रभर संसद चालू राहिली..

साठ सत्तरच्या दशकामध्ये कागदांचा लखोटा बगलेत मारुन एक मराठमोळा खासदार संसदेत शिरायचा तेव्हा ट्रेझरी बेंचवर बसणाऱ्यांना अक्षरशः घाम फुटायचा की हे महाशय आज कुणाला धारेवर धरणार? ते भलभल्यांना आपल्या शब्दांनी पुराव्यानिशी गारद करत असत. अखंड…
Read More...

त्यादिवशी स्टेजवर जावून दिलेल उत्तर मायावतींच्या राजकीय प्रवेशाच कारण बनलं.

राज नारायण.  देशातील एकेकाळचा समाजवादी नेत्यांच्या यादीमधील मोठं नाव. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना २ वेळा हरवण्याचा पराक्रम गाजवलेले अशी त्यांची दुसरी ओळख. दोन वेळा कधी हरवलं, तर पहिल्यांदा न्यायालयात, ज्यामुळे आणीबाणी लागू झाली. आणि…
Read More...

पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन करून त्यांची धुलाई करणारा एकमेव पंतप्रधान

तीनवेळा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसलेले नवाझ शरीफ म्हणजे राजकारणातील एक न उलगडलेलं कोडं. फक्त नावालाच शरीफ असलेले नवाज पाकिस्तानमध्ये लष्करशाही विरुद्ध लढून लोकशाही आणणारा नेता अशी फुशारकी जगभर मारत असतात मात्र त्यांच्याच काळात पाक मधला…
Read More...

१३ दिवसांचे पंतप्रधान वाजपेयी म्हणाले, ‘अशा सत्तेला मी चिमट्याने सुद्धा शिवणार नाही’

वर्ष १९९६. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप ‘सिंगल लार्गेस्ट पार्टी’ म्हणून समोर आली होती. भाजपला लोकसभेच्या १६१ जागांवर विजय मिळाला होता, तर १४० जागांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. जनता दल आणि डाव्या पक्षांकडे मिळून साधारणतः १२३…
Read More...

एक अपमान झाला आणि इंदिरा गांधींनी थेट चरणसिंग यांची पंतप्रधान पदाची खुर्ची खेचली

१९७७ साली आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला होता. मतदार राजाने जनता पक्षाच्या पारड्यात आपलं मत टाकलं होतं. पण निवडणुकीपूर्वी गैरकाँग्रेस वादाच्या नावाखाली एकत्र आलेल्या पक्षांमध्ये सत्ता स्थापनेनंतर मात्र…
Read More...

डॉ.मनमोहनसिंग यांची समजूत काढण्यासाठी नरसिंहरावांनी खास अटलजींना बोलावल होत.

२४ जुलै १९९१ रोजी भारताचे तेव्हाचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारणारं ऐतिहासिक अर्थसंकल्प लोकसभेत मांडले होते. या जागतिकीकरणामुळे भारताच्या फक्त अर्थकारणातच नाही तर समाजकारणात, राजकारणात अमुलाग्र बदल घडून…
Read More...

विरोधी पक्ष नेता असूनही जेटलींनी केलेली मदत पृथ्वीराज चव्हाण कधीही विसरले नाहीत.

गोष्ट आहे २००८ सालची. भारत सरकार आणि अमेरिकेचे जॉर्ज बुश सरकार यांच्यात एक ऐतिहासिक कराराची बोलणी सुरु होती. त्याच नाव अणुकरार. दहा वर्षांपूर्वी वाजपेयींनी केलेल्या अणुचाचणी वेळी भारतावर विविध प्रकारची बंधने आणणाऱ्या अमेरिकेच्या…
Read More...