माहितीच्या अधिकारात – BolBhidu.com https://bolbhidu.com विषय हार्ड Mon, 06 Apr 2020 06:00:18 +0000 en-GB hourly 1 https://wordpress.org/?v=5.3.2 https://i0.wp.com/bolbhidu.com/wp-content/uploads/2018/03/cropped-bol_bhidu-1.png?fit=32%2C32&ssl=1 माहितीच्या अधिकारात – BolBhidu.com https://bolbhidu.com 32 32 173639643 लाखोंच्या गर्दीत हिटलरला सॅल्युट न करणाऱ्याचं पुढे काय झालं…. https://bolbhidu.com/man-didnt-salute-hitler-1212/ https://bolbhidu.com/man-didnt-salute-hitler-1212/#respond Mon, 06 Apr 2020 05:30:20 +0000 http://bolbhidu.com/?p=14055

विद्रोह, बंडखोरी नेहमी मोठ्या गोष्टीतून साध्य होते अस नाही. कधीकधी खूप छोट्या वाटणाऱ्या गोष्टी इतिहासाच्या पानावर वेगळ अस्तित्व निर्माण करतात. येणाऱ्या पिढ्यांना संदेश देत राहतात. जगाच्या इतिहासात २० व्या शतकातील सर्वात दुर्देवी घटना कोणती विचारली तर हिटलरचा उदय हेच उत्तर मिळतं. लाखों ज्यू लोकांची कत्तल, वंशश्रेष्ठत्वाचा दावा ठोकून एक वंशच निर्मुलन करण्याचा उचलेला विडा आणि […]

The post लाखोंच्या गर्दीत हिटलरला सॅल्युट न करणाऱ्याचं पुढे काय झालं…. appeared first on BolBhidu.com.

]]>

विद्रोह, बंडखोरी नेहमी मोठ्या गोष्टीतून साध्य होते अस नाही. कधीकधी खूप छोट्या वाटणाऱ्या गोष्टी इतिहासाच्या पानावर वेगळ अस्तित्व निर्माण करतात. येणाऱ्या पिढ्यांना संदेश देत राहतात. जगाच्या इतिहासात २० व्या शतकातील सर्वात दुर्देवी घटना कोणती विचारली तर हिटलरचा उदय हेच उत्तर मिळतं. लाखों ज्यू लोकांची कत्तल, वंशश्रेष्ठत्वाचा दावा ठोकून एक वंशच निर्मुलन करण्याचा उचलेला विडा आणि लाखों लोकांच्या भविष्याची केलेली राखरांगोळी म्हणूनच आज हिटलरची ओळख इतिहासात आहे.

पण इतिहास काळावर अवलंबुन असतो. आज हिटलरची ओळख अशी असली तरी एक काळ होता तेव्हा हिटलर हा लोकांसाठी दैवी अवतार होता. तो आपल्याला सर्व गोष्टीतून बाहेर काढेल एका नव्या जगात घेवून जाईल अशी आशा हिटलरने दाखवली होती.

त्या वेळी हिटलरला एका व्यक्तीने सॅल्यूट करणं नाकारलं होतं. हिटलरला मानवंदना देणं नाकारण म्हणजे स्वत:हून मृत्यूच्या खाईत जाणं. पण त्याने हे धाडस दाखवलं म्हणूनच त्यांची नोंद इतिहासत घेतली गेली. 

पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी पुर्णपणे बुडाला होता. आर्थिकस्थिती डबघाईला आली होती. अशा काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज पुकारणाऱ्या नेत्याचा जन्म झालं त्याच नाव ॲडाल्फ हिटलर. हिटलरचा सुरवातीचा काळ प्रचंड आशादायी होता. आपल्या भाषणातून तो तरुणाईला नव्या जर्मनीची स्वप्न दाखवत होता. बेरोजगारी ग्रस्त असणारे हजारो तरुण त्याच्या सोबत येत होती. याच तरुणांमधलं दूसर नाव होतं ते म्हणजे ऑगस्ट लॅण्डमेसर.

हिटलर सारख कणखर नेतृत्व त्याला नोकरी मिळवून देईल म्हणून हा तरूण नाझी पक्षात सामिल झाला होता. 

इकडे जर्मनीत हिटलर राज्य सुरू झालं होतं.

हजारो लाखो तरुण हिटलर सोबत होते त्याच वेळी ऑगस्ट लॅण्डमेसर देखील या गर्दीचा एक भाग होता. ऑगस्ट लॅण्डमेसरच्या खाजगी आयुष्यात त्यावेळी काय चालू होतं तर तो एका ज्यू मुलीच्या प्रेमात पडला होता. ते साल होतं १९३४ चं. इर्मा एक्लरची आणि ऑगस्ट लॅण्डमेसरची ओळख झाली. मैत्री झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

इकडे हिटलरचा ज्यू विरोध वाढू लागला. ज्यू लोकांच्या कत्तली घडवून आणण्यासाठी गॅस चेंबर उभारण्यात आले. इर्मा आणि ऑगस्टच्या लग्नाची माहिती नाझी पक्षाच्या लोकांना समजली. तात्काळ ऑगस्टची नाझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या काळात त्या दोघांना एक मुलगी देखील झाली. आपल्या मुलीला आणि पत्नीला घेवून जर्मन सोडून पळून जाण्याची योजना ऑगस्टने आखली. पण डेन्मार्कच्या सीमेवर नाझी सैनिकांनी त्यांना पकडलं. ऑगस्टचा हा गुन्हा म्हणजे थेट वंशाचा अपमान होता.

याच गुन्ह्यासाठी त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. 

दोघांना न्यायालयात उभा करण्यात आलं. ऑगस्टने सांगितलं की, ती ज्यू आहे हे त्याला माहिती नव्हतं. इर्माच्या आईने दुसरे लग्न केल होतं. त्यानंतर इर्माने ख्रिश्चन धर्माचा बप्तिस्मा स्वीकारला होता. १९३८ साली कोणताच पुरावा नसलेल्या न्यायालयातून दोघांची सुटका करण्यात आली. पण हि सुटका करत असताना न्यायालयाने दोघांपुढे एक अट ठेवली ती म्हणजे, दोघांनी पुन्हा संबध ठेवल्यास त्यांच्यावर पुन्हा गुन्हा नोंदवला जाईल. झालं देखील तसच. पुढच्या दोन तीन महिन्यातच न्यायालयाने ऑगस्टला पत्नीसोबत संबध ठेवल्यामुळे अटक केली. ३० महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. 

ऑगस्ट लॅण्डमेसर जेलमध्ये गेला. इकडे ज्यू महिलेशी संबध ठेवले तर महिलेला देखील शिक्षा करण्याचा आदेश निघाला आणि एर्मा एक्लरला देखील अटक करून तिला कारावासची शिक्षा ठोठवण्यात आली.

त्यांच्या दोन्ही मुलींना अनाथआश्रमात टाकण्यात आलं. तिकडे ऑगस्ट लॅण्डमेसर जेलमध्येच होता. आपल्या पत्नीसोबत, आपल्या मुलींसोबत काय झालं याची त्याला कल्पनादेखील नव्हती. हिटलरने उभा केलेल्या गॅस चेंबरमध्येच तिच्या पत्नीचा शेवट करण्यात आला. 

या सर्व घडामोडींमध्ये त्याने हिटलरला सॅल्यूट देणं कधी नाकारल होतं हा प्रश्न उरतोच.

ती तारिख होती, १३ जून १९३६. हिटरलने त्या वेळी नौदल सैन्य प्रशिक्षण शिबीर आयोजित केलं होतं. ऑगस्ट लॅण्डमेसर तेव्हा हिटलरच्या नौदलात सहभागी झाला होता. नाझी सैन्यात सहभागी होणं हे प्रत्येकासाठी कम्पलसरी होतं.  एर्मा एक्लरसोबत लग्न करुन दोन वर्ष झाली होती. त्यावेळी त्याला एक मुलगी होती व वाढता ज्यू विरोध पाहून तो पळून जाण्याच्या तयारीत होता. याच वातावरणात त्याने हिटलरला सॅल्यूट करण्याच नाकारलं होतं. 

त्याचं पुढे काय झालं ?

१९४१ साली तो कारावासातून बाहेर पडला. बाहेर पडल्या पडल्या त्याला नाझी सैन्यात पुन्हा भरती व्हावं लागलं. यादरम्यान एकीकडे त्याच्या पत्नीला गॅस चेंबरमध्ये मृत्यू देण्यात आला तर दूसरीकडे क्रोएशिया येथील युद्धात तो हिटरलकडूनच लढताना मारला गेला. 

हे ही वाच भिडू. 

The post लाखोंच्या गर्दीत हिटलरला सॅल्युट न करणाऱ्याचं पुढे काय झालं…. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/man-didnt-salute-hitler-1212/feed/ 0 14055
शिवसमाधीमध्ये शिवरायांच्या पवित्र रक्षा आढळून आल्या होत्या का? https://bolbhidu.com/is-there-any-proof-of-remains-of-shivaji-maharaj-in-his-samadhi1/ https://bolbhidu.com/is-there-any-proof-of-remains-of-shivaji-maharaj-in-his-samadhi1/#respond Fri, 03 Apr 2020 02:37:53 +0000 http://bolbhidu.com/?p=13030

चैत्र शुध्द पौर्णिमा राजाभिषेक शके ६ सातवाहन शके १६०२ ख्रिस्ताब्ध ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपतींनी याच गडावर अखेरचा श्वास घेतला. शिवरायांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार युवराज राजारामराजेनी केला. यावेळी शिवरक्षा व अस्थी जगदीश्वर देवळाच्या जवळ पुरण्यात आल्या व तिथे दगडी चौथरा उभारण्यात आला. रक्षेचा काही भाग काशी, रामेश्वर अशा तीर्थक्षेत्रामध्ये विसर्जित करण्यात आला तर काही भाग […]

The post शिवसमाधीमध्ये शिवरायांच्या पवित्र रक्षा आढळून आल्या होत्या का? appeared first on BolBhidu.com.

]]>

चैत्र शुध्द पौर्णिमा राजाभिषेक शके ६ सातवाहन शके १६०२ ख्रिस्ताब्ध ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपतींनी याच गडावर अखेरचा श्वास घेतला.

शिवरायांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार युवराज राजारामराजेनी केला.

यावेळी शिवरक्षा व अस्थी जगदीश्वर देवळाच्या जवळ पुरण्यात आल्या व तिथे दगडी चौथरा उभारण्यात आला. रक्षेचा काही भाग काशी, रामेश्वर अशा तीर्थक्षेत्रामध्ये विसर्जित करण्यात आला तर काही भाग सिंधुदुर्ग येथील राजराजेश्वर मंदिरात ठेवण्यात आला.

शिवरायांच्या पावन अंश असलेल्या या समाधीवर आपला माथा टेकला की हा जन्म सार्थकी लागला अशी भावना प्रत्येक शिवभक्ताची असते. दरवर्षी लाखो वारकरी या पवित्र स्थानाचे दर्शन घेण्यासाठी रायगडावर येतात.

ज्या स्थळी परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज समाधिस्थ झाले, ते समाधीचे स्थान जगदीश्वर देवळाच्या पूर्वेस आहे. समाधी अष्टपैलू असून चिरेबंदी आहे.

मुघल राजवट, पेशवाईच्या काळात दुर्लक्ष झाल्यामुळे बरेच वर्ष समाधी उद्ध्वस्त अवस्थेत होती. कुणी लोभी दुष्टाने द्रव्यलाभाच्या आशेने तिचे धोंडे उखडलेले होते.

१८१८ सालानंतर ब्रिटीश काळात रायगडावर जाण्यास बंदी घालण्यात आली.

गडावर जाणाऱ्या वाटा बंद करण्यात आल्या. शंभरभर वर्षे गडावरच्या भोळ्या भाबड्या गुराखी सोडले तर हे पवित्र स्थान विस्मरणात गेले.

अठराशे सत्तरच्या दशकात  महात्मा जोतीबा फुलें नी पायी वाटा शोधल्या आणि ते रायगडावर पोहचण्यात यशस्वी ठरले. तिथे त्यांना शिवरायांची समाधी दिसून आली. त्यांनी हे पवित्र स्थान जगाच्या पुनः प्रकाशात आणले.

मध्यंतरी इतिहासाचा अभ्यास असल्याचा दावा करणाऱ्या काही संशोधकांनी अशी आवई उठवली की आज आपण जिला शिवसमाधी म्हणतो ती समाधी नसून एका मनोऱ्याचा पाया आहे.

असे वक्तव्य करून मुद्दामहून शिव-इतिहासावर शंका निर्माण करण्याचा हा खोडसाळ प्रयत्न होता.

शिवसमाधीमध्ये खरोखर शिवरायांच्या पवित्र रक्षा आढळून आल्या होत्या का? हा प्रश्न विचारण्यात आला.

याचं सविस्तर खंडण इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी केलय.

महात्मा फुलेंना ही समाधी सापडल्यावर रायगडावर अनेकांचा वावर सुरु झाला. यात विशेषतः ब्रिटीश अधिकाऱ्यांचा समावेश होता. १८८३ साली मुंबईत छापण्यात आलेल्या जेम्स डग्लस ह्यांच्या ‘A Book of Bombay’ ह्या पुस्तकात पान ४३३ वर समाधीच्या पडझडीचे वर्णन केले आहे आणि छत्रपती घराण्याचे वंशज, पेशवाईचा कारभार ह्या सर्वांना समाधिस्थानाला अशा दुरवस्थेस आणल्याबद्दल दोष दिला .

याच काळात महात्मा फुलेंनी शिवसमाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी जनजागृती सुरु केली. निधी गोळा केला. १८९५ साली लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची चळवळ निर्माण करून शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराच्या मोहिमेला वेग दिला.

त्याकाळात कोल्हापूर संस्थानने जीर्णोद्धाराची जबाबदारी उचलली. त्यासाठी रायगडावर पाहणीसाठी इंजिनियरदेखील पाठवला. मात्र लोकमान्य टिळकांनी आग्रह धरला की छत्रपती शिवराय हे फक्त आपल्या वारसांचे नसून त्यांच्यावर पूर्ण समाजाचा अधिकार आहे यामुळेच जीर्णोद्धार लोक वर्गणीतूनचं केला जावा. तेव्हा कोल्हापूर संस्थानने माघार घेतली.

लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या शिवाजी रायगड स्मारक समिती आणि ब्रिटीश सरकार यांच्या माध्यमातून जीर्णोध्दाराचे काम सुरु करण्यात आले. त्यावेळी रायगड हा कुलाबा जिल्ह्यामध्ये येत होता. या जिल्ह्याच्या चीफ इंजिनियरच्या देखरेखी खाली जीर्णोध्दाराचे काम बाळकृष्ण मोरेश्वर सुळे उर्फ तात्यासाहेब सुळे या कंत्राटदाराकडे देण्यात आले.

नेमके काम सुरु झाले तो पर्यंत १९२६ साल उजाडलेले होते. जीर्णोद्धारासाठी शिवरायांच्या समाधीच्या अष्टकोनी चौथऱ्याची खुदाई करण्यात आली. यावेळी तिथे काम करणाऱ्या गवंड्यांना सहा फुट खोल खोदल्यावर एका दगडी काचेच्या पेटीमध्ये श्री शिवछत्रपतींच्या अस्थी आणि रक्षा मिळून आल्या.

तिथे हजर असणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्याने कुलाब्याला आपल्या वरिष्ठांना ही बातमी सांगणारे पत्र पाठवले.

पूर्ण महाराष्ट्राला हलवून सोडणारी ही घटना होती.

याचवेळी या समाधीमध्ये एका कुत्र्याची कवटी देखील आढळून आली. याचवेळी शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याची कथा पसरवण्यात आली. पुढे ती कवटी कलकत्त्याला फोरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवल्यावर कळाले की ती कवटी कुत्र्याची नसून एका उदमांजराची आहे.

शिवकाळानंतर जेव्हा समाधी भग्नावस्थेत गेली त्यावेळी एखाद्या छिद्रातून हे उदमांजर तिथे गेले असणार व अडकून मेले असण्याची शक्यता आहे. पुढे या काल्पनिक कुत्र्याचा पुतळा शिवसमाधी जवळ उभारण्यात आला.

अखंड भारतवर्षाचे कल्याण करणारा शिवछत्रपती राजाच्या या सापडलेल्या पवित्र अशा शिवरक्षा आपल्या घरी असाव्यात व आपल्या पुढील अनेक पिढ्यांचे कल्याण या रक्षेच्या कृपेने व्हावे ही अपेक्षा अनेकांची होती आणि ते सहाजिक होते.

कंत्राटदार सुळेंनी छत्रपतींच्या रक्षेपैकी थोडीफार रक्षा काढून घेतली . शिवाजी रायगड स्मारक समितीचे सदस्य असलेल्या महाडच्या महादेव वडके यांनी देखील ही रक्षा आपल्याकडे ठेवून घेतली. दुर्गमित्र जेष्ठ लेखक गो.नी.दांडेकर  यांच्या जवळही रक्षेचा काही भाग होता.

कोल्हापूरच्या राजवाड्यात शिवरक्षेचा काही अंश पाठवून देण्यात आला. याबद्दलचं कोल्हापूरच्या छत्रपतींनी लिहिलेलं पत्र सुद्धा उपलब्ध आहे.

काही वर्षातच शिवछत्रपतींच्या जीर्णोद्धाराचे काम सिद्धीस पोहचले. मुळच्या अष्टकोनी चौथर्यावरच त्याहून लहान दुसरा एक अष्टकोनी चौथरा बांधण्यात आला चौथर्यावर जाळीदार कठडे बसवले होते. चारही बाजूला वर समाधीजवळ जाण्यासाठी वाटा ठेवल्या आहेत.

या चौथर्याच्या मध्यभागी सुबक अष्टकोनी छत्री उभारलेली आहे, आठही बाजूंना आठ प्रवेशद्वार आहेत. मधल्या लहान चौथर्यावर छत्रपतींची अष्टधातूंची उठावदार उर्ध्वाकृती प्रतिमा बसविली आहे.

अष्टकोनी मुद्रा अष्टप्रधानमंडळ अष्टराज्ञी असणाऱ्या शिवरायांची स्मारक छत्री अष्टकोनी असावी हा एक सुंदर योगायोग !!

एका शिवाचे दुसऱ्या शिवासमोर असलेले हे स्मृतिमंदिर, या स्मारकाबद्दल कोणास कोणतीही शंका नसावी.

हे ही वाच भिडू.

The post शिवसमाधीमध्ये शिवरायांच्या पवित्र रक्षा आढळून आल्या होत्या का? appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/is-there-any-proof-of-remains-of-shivaji-maharaj-in-his-samadhi1/feed/ 0 13030
पंतप्रधान मदत निधी आणि पीएम केअर्स : दिसतात तर सेम पण फरक काय? https://bolbhidu.com/difference-between-pm-cares-and-pmnrf/ https://bolbhidu.com/difference-between-pm-cares-and-pmnrf/#respond Tue, 31 Mar 2020 15:29:57 +0000 https://bolbhidu.com/?p=21280

पंतप्रधान मोदींनी ट्विटर वरून कोरोनाच्या संकट समयी पीएम केअर्स फंडाला मदत करण्याचे आवाहन केले आणि लागलीच त्याचा उहापोह सुरु झाला. अंबानींपासून अक्षयकुमार, निक जोनास प्रियांका चोप्रा, विरुष्कापर्यंत सगळ्यांनी या फंडाला भरभरून मदत केली तर रामचंद्र गुहा आणि शशी थरूर यासारख्या विद्वानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोष असताना पीएम केअर्स फंड नावाने फंड काढण्याची गरजच काय अशी […]

The post पंतप्रधान मदत निधी आणि पीएम केअर्स : दिसतात तर सेम पण फरक काय? appeared first on BolBhidu.com.

]]>

पंतप्रधान मोदींनी ट्विटर वरून कोरोनाच्या संकट समयी पीएम केअर्स फंडाला मदत करण्याचे आवाहन केले आणि लागलीच त्याचा उहापोह सुरु झाला.

अंबानींपासून अक्षयकुमार, निक जोनास प्रियांका चोप्रा, विरुष्कापर्यंत सगळ्यांनी या फंडाला भरभरून मदत केली तर रामचंद्र गुहा आणि शशी थरूर यासारख्या विद्वानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोष असताना पीएम केअर्स फंड नावाने फंड काढण्याची गरजच काय अशी टीका केली.

आमच्या पंतप्रधानांनी काहीही केलं तर लोकांना त्यात काळबेरंच दिसत त्यात कुणी काय करावं. असो….

हे सगळं ठीक आहे पण आमचं घोडं मात्र पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोष, पीएम केअर्स फंड म्हणजे नक्की काय इथंच अडलं.

मग विचार केला दिवसभर घरात लोळून कंटाळलेल्या आपल्यासारख्या भिडूंना उगा कशाला डोकं खाजवायला लावावं आणि म्हंटल आपणच सांगावं.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोष ( Prime Minister’s National Relief Fund- PMNRF) :

PMNRF हि एक ट्रस्ट आहे जी स्वातंत्र्यानंतर १९४८ साली स्थापन केली गेली. हा निधी पूर,वादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आप्पत्ती पासून ते मोठी दुर्घटना, दंगे यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ताबतोब मदत म्हणून वापरली जाते. तसेच या निधीतील पैसे मोठ्या वैद्यकीय उपचारांसाठी देखील वापरता येऊ शकतो.

हा निधी आपल्यासारख्या लोकांच्या देणग्यांतूनच उभा आहे याला सरकारच्या बजेट मध्ये कोणतीही तरतूद असत नाही. या फंडाचे मॅनेजमेंट पंतप्रधानांच्या सह सचिवाकडे असते. या फंडाला दिलेले डोनेशन इनकमटॅक्स मध्ये वजावटीस पात्र असते तसेच कंपन्यांही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR)म्हणून हा निधी देऊ शकतात. PMNRF चे दरवर्षी ऑडिट होत असते. जर कुणाला PMNRF ला ऑनलाईन मदत करायची असेल तर

pmnrf@centralbank या भीम /यूपीआय आयडी वर मदत करू शकता. अधिक माहिती हवी असल्यास आपण pmnrf.gov.in या साईट वरून घेऊ शकता.

पीएम केअर्स फंड (Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund) :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च ला ट्विटर वरून पीएम केअर्स फंड निर्माण केल्याची माहिती दिली. हि सुद्धा एक सामाजिक संस्था (ट्रस्ट ) आहे. या फंडचे चेअरमन हे पंतप्रधान आहेत व संरक्षणमंत्री, अर्थमंत्री आणि गृहमंत्री हे सदस्य आहेत.

या फंडचा मुख्य उद्देश हा COVID-१९ सारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी वापरला जाईल. तसेच कंपन्यां पीएम केअर्सला दिलेल्या निधीचा समावेश कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत करू शकतात.

या फंडमध्ये अगदी मायक्रो डोनेशन सुद्धा करता येते.

सध्यातरी हि एवढीच माहिती पीएम केअर्स फंड याबद्दल उपलब्ध आहे. जर कुणाला पीएम केअर्स फंडाला ऑनलाईन मदत करायची तर

pmcares@sbi या यूपीआय आयडी वर मदत करू शकता. अधिक माहितीसाठी आपण press information bureau च २८ मार्चच प्रेस रिलीज वाचू शकता.

आता या pmcare बद्दल काही विरोधक आक्षेप घेत आहेत, त्यांचं म्हणणं काय हे एकदा जाणून घेऊ.

सुरवात होते पीएम ‘केअर्स’ या नावापासून. विरोधकांच म्हणणं आहे की हे नावच असं बनवलंय ज्यातून वैयक्तिक पंतप्रधानांचा प्रचार होतोय. काही जण तर म्हणत आहेत पंतप्रधान रिलीफ फंड सुरु केला नेहरूंनी, त्याच महत्व कमी करण्या साठी मोदींनी पीएम ‘केअर्स’ सुरु केलं. आता ही टीका विरोधकांचा आकस म्हणता येईल.

पण त्यांचा दुसरा मुद्दा आहे की पीएम रिलीफ फ़ंड मध्ये तीन हजार आठशे कोटी रुपये शिल्लक पडले आहेत अशा वेळी पीएम केअर्स या नवीन फ़ंड ची स्थापना का केली ?

सरकारचे समर्थक म्हणतात की हा फ़ंड फक्त कोरोना व भविष्यात येणाऱ्या साथीच्या रोगासाठी खास निर्माण केला आहे आणि या फंडाच्या वापरासाठी संसदेची मान्यता घ्यायला लागणार नाही. पण हे तर मुद्दे पंतप्रधान निधीमध्येसुद्धा कव्हर होतात.

हे सोडून आणखी यात खास काय आहे ते सरकारने अजून तरी स्पष्ट केलेलं नाही.

असो तर भिडूनो ज्या कुणाला मदत करायची इच्छा आहे त्यांनी PMNRF केली काय किंवा पीएम केअर्स फंडला केली काय मदत महत्वाची आहे. मदत कोठेही करा फक्त खोट्या यूपीआय आयडी आणि मदत मागून फसवणाऱ्या संस्थांपासून सांभाळून राहा.

  • CS प्रतिभा टारे

हे ही वाच भिडू.

The post पंतप्रधान मदत निधी आणि पीएम केअर्स : दिसतात तर सेम पण फरक काय? appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/difference-between-pm-cares-and-pmnrf/feed/ 0 21280
जगातला पहिला डॉक्टर. याने घातलेली शपथ सगळ्या जगभरातले डॉक्टर पाळतात. https://bolbhidu.com/hippocrates-oath/ https://bolbhidu.com/hippocrates-oath/#respond Mon, 30 Mar 2020 14:18:58 +0000 https://bolbhidu.com/?p=21270

“कोरोना” ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत. आणीबाणीची परिस्थिती अख्ख्या जगावर ओढवलेली आहे. अशाप्रसंगी या रोगाशी लढण्याची सर्वात प्रमुख जबाबदारी आहे डॉक्टरांवर. गेल्या […]

The post जगातला पहिला डॉक्टर. याने घातलेली शपथ सगळ्या जगभरातले डॉक्टर पाळतात. appeared first on BolBhidu.com.

]]>

“कोरोना” ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत.

आणीबाणीची परिस्थिती अख्ख्या जगावर ओढवलेली आहे. अशाप्रसंगी या रोगाशी लढण्याची सर्वात प्रमुख जबाबदारी आहे डॉक्टरांवर.

गेल्या काही दिवसात समोर आलं आहे की या रोगाचा सर्वात जास्त धोका डॉक्टरांना व त्यांच्या सोबत काम करणारे कर्मचाऱ्याना आहे.

अनेक डॉक्टरांना त्याची लागण देखील झाली आहे मात्र तरीही त्यांनी आपला लढा थांबवलेला नाही. हे देवदूत आपला किल्ला लढवत आहेत त्यांची प्रेरणा काय आहे तुम्हाला ठाऊक आहे.

हिप्पोक्रॅटिसची शपथ.

पण हा हिप्पोक्रॅटिस कोण? त्याचा काय संबंध? सगळं सांगतो धीर धरा.

इसवी सणापूर्वी पाचव्या शतकात ग्रीसमध्ये जन्मलेला हा एक वैद्य. खर तर ग्रीसमध्ये सुद्धा भारताप्रमाणे एक पुरातन संस्कृती आहे. पण जशी भारतात आयुर्वेदाने प्रगती केली त्यामानाने पाश्चात्य देशात वैद्यकशास्त्र खूप मागे राहिले होते.

त्याकाळात कोणताही रोग झाला तर तो देवाचा शाप आहे असंच लोकांना वाटायचं. त्यामुळे त्याच्यावर उपचार हे मांत्रिक व  पुजारी यांच्या सारखे भोंदू लोक करायचे. हिप्पोक्रॅटिसचे वडील आणि आजोबा हे देखील वैद्यकी करायचे मात्र ते ही मंत्र तंत्राचा वापर करूनच.

पण हिप्पोक्रॅटिस वेगळा निघाला.

तो बालपणापासून हुशार होता. त्याने अनेक ग्रंथाचा अभ्यास केला होता. त्याला सर्व विषयातलं सगळं काही कळत असा समज लोकांमध्ये पसरला होता. तो विद्वान तर होताच पण प्रत्येक गोष्टीचा तो विवेकी वृत्तीने अभ्यास करायचा.

त्याच्या लक्षात आलं की कोणत्याही रोगाच्या मागे दैवी शक्ती असणे शक्य नाही. त्याने अनेक प्रयोग करून वेगवेगळी औषधे शोधून काढली.

म्हणूनच हिप्पोक्रॅटिसला पाश्चात्य जगातला पहिला डॉक्टर मानलं गेलं.

रोग्यांना तपासणे, त्यांना औषध लिहून देणे, त्या रोगाचा इतिहास लिहून ठेवणे ही कला विकसित केली. अनेक माणसे अचानक एकत्र आजारी पडतात यामागे साथीचे रोग असतात हा शोध देखील त्यानेच लावला. पाश्चात्य वैद्यकीय शास्त्राचा जनक तोच होता. त्याने या शास्त्राचा अभ्यास करणारे अनेक शिष्य बनवले.

या शिष्यांसाठी त्याने वैद्यकीय नीतीची शपथ बनवली होती त्याला हिप्पोक्रॅटिसची शपथ म्हणून ओळखली जाते.

या शपथेमध्ये रुग्णसेवा हाच डॉक्टरचा खरा धर्म हा या शपथेचा पाया आहे. कोणत्याही रुग्णाला नाकारू नये व रुग्णाचे आजार बरे करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा अस त्याने सांगितलं होतं.

त्या काळात लिहलेली  हिप्पोक्रॅटिसची शपथ आजही आपल्याला वाचायला मिळते.

अस म्हणतात की ही शपथेची प्रत हिप्पोक्रॅटिसच्या मृत्यूनंतर लगेच कोणी तरी लिहून ठेवलेली असावी.

फक्त ग्रीसच नाही तर जगभरातल्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर होणारे विद्यार्थी ही हिप्पोक्रॅटिसची शपथ घेतात.

भारतात देखील अनेक ठिकाणी ही शपथ आहे. फक्त काहीजण हिप्पोक्रॅटिसच्या ऐवजी चरक ला स्मरून शपथ घेतात.

काळानुसार त्यात अनेक बदल झालेले आहेत मात्र त्याचा मूळ गाभा अडीच हजार वर्षांपूर्वी हिप्पोक्रॅटिसने लिहिलाय तसाच ठेवण्यात आलेला आहे. जगभरातले सर्व डॉक्टर याच शपथेला बांधलेले आहेत.

याचा अर्थ असा नव्हे की ही शपथ कोणी मोडत नाही. आपण अनेकदा पाहतो की डॉक्टरकी चा पवित्र व्यवसाय करत असूनही काहीजण गैरप्रकार करतात मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.

आज 30 मार्च Doctor’s Day. आजच्या दिवसानिमित्त तहानभूक हरपून कोरोनाशी व अशाच प्राणघातक रोगांशी लढणाऱ्या डॉक्टरांना व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना, त्यांना हे अखंड रुग्णसेवेचे व्रत देणाऱ्या हिप्पोक्रॅटिसला सलाम.

हे ही वाच भिडू.

The post जगातला पहिला डॉक्टर. याने घातलेली शपथ सगळ्या जगभरातले डॉक्टर पाळतात. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/hippocrates-oath/feed/ 0 21270
साथीच्या रोगामुळे काॅंग्रेसच्या स्थापनेलाच ब्रेक लागणार होता, पण.. https://bolbhidu.com/first-session-of-indian-national-congress-pune/ https://bolbhidu.com/first-session-of-indian-national-congress-pune/#respond Tue, 24 Mar 2020 14:44:56 +0000 https://bolbhidu.com/?p=21192

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. सध्या मृत्युपंथाला लागलेला पक्ष. एक तर यांनी निवडणूक जिंकायचं कधीच बंद केलंय . चुकून जिंकल्याच तर त्यांचे आमदार कधी भाजप पळवेल सांगता येत नाही. पण एक काळ असा होता अख्ख्या भारतात फक्त काँग्रेसचाच बोलबाला होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रमुख शक्ती काँग्रेस ही  होती. वेगवेगळ्या विचारसरणीचे धर्माचे वेगवेगळ्या प्रांताचे भाषेचे सर्व लोक या […]

The post साथीच्या रोगामुळे काॅंग्रेसच्या स्थापनेलाच ब्रेक लागणार होता, पण.. appeared first on BolBhidu.com.

]]>

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. सध्या मृत्युपंथाला लागलेला पक्ष. एक तर यांनी निवडणूक जिंकायचं कधीच बंद केलंय . चुकून जिंकल्याच तर त्यांचे आमदार कधी भाजप पळवेल सांगता येत नाही.

पण एक काळ असा होता अख्ख्या भारतात फक्त काँग्रेसचाच बोलबाला होता.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रमुख शक्ती काँग्रेस ही  होती. वेगवेगळ्या विचारसरणीचे धर्माचे वेगवेगळ्या प्रांताचे भाषेचे सर्व लोक या पक्षा च्या झेंड्या खाली राहून ब्रिटिशांशी लढत होते. पण याची स्थापना पुण्यात होणार होती.

काय कस सगळं सांगतो.

पुणे सुरवाती पासून भारतात अनेक राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र बनले होते. शहाजी महाराजांची जहागीर असलेल हे एके काळच छोटंसं गाव. आदिलशाहाने ते उद्धवस्त केलं मात्र शिवबा आणि जिजाऊंनी ते परत वसवलं.

पेशव्यानी या गावाला राजधानी बनवली. पुण्याचा दरारा दिल्लीपर्यंत पोहचला. सुरवाती पासून येथे सुशिक्षित लोकांचे प्रमाण हि खूप होते. १८१८ साली इंग्रजांनी पुणे जिंकले आणि अख्खा भारत त्यांच्या ताब्यात आला.

त्यानंतर हि अनेक घडामोडी या शहरात झाल्या. महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा इथेच सुरु केली. धोंडो केशव कर्वे, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख असे अनेक समाजसुधारक  शहरातले होते.

भारतातील पहिली सनदशीर मार्गाने चळवळ करणारी राजकीय संस्था स्थापन झाली तीही पुण्यातच.

इ. स. १८६७ मध्ये पुणे येथे ‘पुना असोसिएशन’ नावाची संस्था सुरू झाली. पर्वती देवस्थानची व्यवस्था योग्य पद्धतीने व्हावी, पंचकमिटीचा गैरकारभार, आर्थिक भ्रष्टाचार व अंदाधुंदी दूर करणे हा या संस्थेचा प्रारंभिक उद्देश होता. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका हे या संस्थेचे संस्थापक होते.

या संस्थेचे पुढे २ एप्रिल १८७० रोजी ‘सार्वजनिक सभा’ अर्थात ‘पुणे सार्वजनिक सभा’ असे नामांतर झाले.

सार्वजनिक सभेचा प्रमुख उद्देश स्थानिक प्रश्न व समस्या दूर करण्यासंदर्भात इंग्रज अधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडणे  हा होता. पुढे न्या. महादेव गोविंद रानडे पुण्यामध्ये आले आणि  सार्वजनिक सभेच्या कार्याची धुरा त्यांच्या हातामध्ये आली. त्यांनी दोन दशके सभेचे नेतृत्व व मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकाळात सभेला राष्ट्रीय स्तरावरील एका राजकीय संस्थेचे स्वरूप प्राप्त झाले.

पुणे सार्वजनिक सभेने विविध स्तरांवर आपले कार्य केले. १८७३ मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीची पाहणी करण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण केले. याचवर्षी भारतीय अर्थव्यवहाराविषयी नेमलेल्या समितीसमोर साक्ष देण्यासाठी सभेने बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सहकार्याने फर्दुनजी नवरोजी यांना लंडनला पाठविले.

१८७४ मध्ये बंगालमधील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून सभेने मदतनिधी गोळा केला. याचवर्षी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदी जनतेचे प्रतिनिधी असावेत, या आशयाचा अर्ज पार्लमेंटच्या सभासदाकडे पाठविला.

महाराष्ट्रात दुष्काळ पडला, तेव्हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे व त्यांची गाऱ्हाणी सरकारपुढे मांडण्याची महत्त्वाची भूमिका सभेने पार पाडली.

सार्वजनिक काकांनी सभेच्या व्यासपीठावरून स्वदेशीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळात सुधारणा, नागरी सेवा भरती, शैक्षणिक धोरण, करयंत्रणा, व्हर्नाकुलर प्रेस अॅक्ट, जंगलविषयक कायदे या विषयाकडे ब्रिटिश सरकारचे लक्ष वेधून घेण्याचे कार्य सभेने केले.

पुणे सार्वजनिक सभेचे सभासदत्व प्राप्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला किमान ५० प्रौढ व्यक्तींचा लेखी पाठिंबा आणणे आवश्यक होते. सभेने अल्पावधीतच सभासदांची मोठी संख्या पूर्ण केली.

सभासद झालेल्या प्रत्येक सदस्याला सभेने दिलेले कोणतेही कार्य स्वशक्तीनुसार, नि:स्पृहपणे व भेदभाव न करता पार पाडेन, अशी शपथ घ्यावी लागत असे.

प्रामुख्याने सुशिक्षित, प्रतिष्ठित, श्रीमंत लोकांचे सभासदत्व अधिक होते. विशेषत: ब्राह्मण, सरदार, जमीनदार, इनामदार, व्यापारी, सेवानिवृत्त सरकारी अधिकारी, वकील व शिक्षक या पेशांतील व्यक्ती सभेचे काम पाहत.  संपूर्ण महाराष्ट्रात या  शाखा स्थापन झाल्या.

 या सभेचे पहिले अध्यक्षपद औंध संस्थानाधिपती श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांनी भूषविले.

त्यानंतर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, आण्णासाहेब पटवर्धन, ल. ब. भोपटकर, लोकमान्य टिळक आदी मान्यवरांनी सभेचे अध्यक्षपद भूषविले.

पुढे भारत भरात सार्वजनिक सभेचे यश पाहून संपूर्ण देशात अशा राजकीय संस्था स्थापन होऊ लागल्या. इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले. १८८१ साली मद्रासला महाजनसभा स्थापन झाली.  नाना शंकर शेठनी मुंबईत स्थापन केलेल्या संस्थेचे १८८५ साली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये  पुनरुज्जीवन झाले.

जेव्हा लॉर्ड लिटन भारताचा व्हाइसरॉय बनला तेव्हा त्याने भारतीयांच्यांतील असंतोषाला वाट मिळून देण्यासाठी सार्वजनिक सभे सारख्या नेमस्त विचारांच्या संस्थांना प्रोत्साहन देण्याचे काम केले.

ऍलन ह्यूम सारख्या निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याने देशभरातल्या सर्व संस्थांना एकत्र आणून एक राष्ट्रीय चळवळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या.

यातूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची कल्पना पुढे आली. पुण्याच्या सार्वजनिक सभेचे लोक यात आघाडीवर होते. 

हा पक्ष स्थापन करण्याचे ठिकाण देखील पुणे च असावे असे निश्चित झाले.

काँग्रेस चे पहिले अधिवेशन पुण्यात व्हावे म्हणून सगळी तयारी करण्यात आली. पण दुर्दैवाने या काळात प्लेगच्या साथीने पुणे शहराला घेरले. त्याकाळी प्लेग  हा दुर्धर र्पग मानला जायचा. अनेकांचा मृत्यू देखील झाला. नाईलाजाने काँग्रेस चे पहिले अधिवेशन पुण्याच्या ऐवजी मुंबईत आयोजित करण्यात आले.

२८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथील गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत दुपारी बारा वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.

फिरोज शहा मेहता, दादाभाई नौरोजी , न्यायमूर्ती रानडे,  बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, के. टी. तेलंग, गो. ग. आगरकर इ. मंडळींची या अधिवेशनात उपस्थिती होती.

श्री. व्योमेश चन्द्र  बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष तर  ऍलन  ह्यूम ची जनरल सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली .  या अधिवेशनात काँग्रेसचे धर्मभेद, वंशभेद, प्रांतभेद इ. भेदांवर मात करणारी अखिल भारतीय एकराष्ट्रीयता निर्माण करणे हे संघटनासूत्र ठरविण्यात आले.

लोकमान्य टिळक व पुण्यातील इतर मोठे नेतेदेखील काँग्रेस मध्ये सक्रिय झाले.

सार्वजनिक काकांच्या मृत्यू नंतर सार्वजनिक सभेच्या कार्यावर मर्यादा येत  होत्या. तिची जागा या तिनेच जन्म घातलेल्या काँग्रेसने घेतली आणि राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले.

हे ही वाच भिडू.

The post साथीच्या रोगामुळे काॅंग्रेसच्या स्थापनेलाच ब्रेक लागणार होता, पण.. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/first-session-of-indian-national-congress-pune/feed/ 0 21192
कोणतीही साथ आली तर त्याचे व्हायरस भारतभरातून पुण्याला पाठवले जातात, कारण.. https://bolbhidu.com/nivpune/ https://bolbhidu.com/nivpune/#comments Fri, 20 Mar 2020 08:32:45 +0000 https://bolbhidu.com/?p=21134

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदर्शी धोरणामुळे राष्ट्रीय विकास हे वैज्ञानिक संशोधनाचे एक महत्त्वाचे लक्ष्य बनले. या कार्याचा एक भाग म्हणून उद्योगधंदे व आर्थिक योजना यांकरिता सामान्यपणे उपयुक्त किंवा सुसंबद्ध असे संशोधन करण्याकरिता योग्य अशा संघटना स्थापन करण्यात आल्या आणि त्याकरिता प्रोत्साहन पण दिले गेले. या कार्यक्रमाचा भाग म्हणून विद्यापीठे, संशोधन […]

The post कोणतीही साथ आली तर त्याचे व्हायरस भारतभरातून पुण्याला पाठवले जातात, कारण.. appeared first on BolBhidu.com.

]]>

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदर्शी धोरणामुळे राष्ट्रीय विकास हे वैज्ञानिक संशोधनाचे एक महत्त्वाचे लक्ष्य बनले. या कार्याचा एक भाग म्हणून उद्योगधंदे व आर्थिक योजना यांकरिता सामान्यपणे उपयुक्त किंवा सुसंबद्ध असे संशोधन करण्याकरिता योग्य अशा संघटना स्थापन करण्यात आल्या आणि त्याकरिता प्रोत्साहन पण दिले गेले.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून विद्यापीठे, संशोधन संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा व उच्च तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था यांच्या संख्येत खूप वाढ करण्यात आली.

यातच होती पुण्याची इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या सरकारी संस्थेने व्हायरल रिसर्च साठी संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यांना रॉकफेलर फाउंडेशन या अमेरिकेतील एनजीओची मदत मिळाली.

अमेरिकेतील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉकफेलर कुटूंबाने स्थापन केलेले हे रॉकफेलर फाउंडेशन.

जगभरात अनेक समाजोपयोगी कामे त्यांच्या तर्फे केली जातात. याचाच भाग म्हणून आर्थ्रोपॉड बोर्न व्हायरस वर त्यांनी संशोधन सुरू केलं होतं.

आर्थ्रोपॉड व्हायरस म्हणजे ज्या व्हायरसना पसरायला डास, माश्या, किडे हे माध्यम लागतात लागतात असे व्हायरस.

याच्या भारतातील संशोधनासाठी रॉकफेलर आणि आयसीएमआर यांनी पुण्यातील कॅम्प भागात व्हायरस रिसर्च सेंटर स्थापन केले. ते साल होते 1952.

पुढे काही वर्षांनी रॉकफेलरनी यातील सहभाग कमी केला. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने जिद्दीने हे संशोधन चालू ठेवले. 1967 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्यांना मदत केली. संस्थेतील संशोधनाचा आवाका वाढवण्यात आला.

1978 साली सायंटिफिक अडव्हायजरी कमिटीच्या शिफारसी नंतर व्हायरल रिसर्च सेंटरने आपला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असल्याचा दर्जा मिळविला आणि त्याचे नाव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) असे ठेवले गेले.

आज या संस्थेत एड्स पासून ते हेपाटट्स ए, चिकणगुणिया, झिका, रोटा व्हायरस अशा अनेक प्रकारच्या व्हायरस वर संशोधन होतं. शिवाय मेडिकल झुलॉजी अँड एन्टमोलॉजी, टिश्यूकल्चर, सेल बायोलॉजी या विषयातही इथे संशोधन होत आहे.

गेली अनेक वर्षे पुण्यात एनआयव्ही जागतिक आरोग्य संघटनेसोबत काम करत आहे. आर्बोव्हायरस, हिमोरजिक टॅप यांच्या संदर्भातील संशोधनासाठी जागतिक दर्जाची संस्था म्हणून एनआयव्हीची ओळख बनली आहे.

या संस्थेत शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, इंजिनियर आणि इतर कर्मचारी मिळून सुमारे 350 लोक काम करतात. इथल्या प्रयोगशाळा अद्यावत सुविधांनी सुसज्ज आहेत.

आजही भारतात कोणताही साथीचा रोग आला तर त्याचे विषाणू सर्वप्रथम याच संस्थेत पाठवले जातात.

म्हणूनच मागे आलेला स्वाइन फ्लू असो की आता थैमान घालत असलेला कोरोना त्याच्याशी लढा देण्यासाठी त्यांचे व्हायरस पुण्यातच पाठवण्यात आले आहेत.

त्या रोगाचा प्रतिकार कसा करावा याची माहिती देणे, त्याचे निदान करण्यासाठी सामग्री पुरवणे, रोग पसरू नये यासाठी योजना आखून त्या देशभरात राबवणे या साऱ्या गोष्टी भारतातील शिखर संस्था म्हणून एनआयव्ही पुणे च्या अखत्यारीत येतात.

इतकंच नाही तर अत्यंत घातक रोगजंतू सुरक्षितपणे हाताळता यावेत यासाठी पाषाण जवळ एनआयव्हीच मायक्रोबियल कंटेनमेंट सेंटर उभं राहिलं आहे.

हे ही वाच भिडू.

 

The post कोणतीही साथ आली तर त्याचे व्हायरस भारतभरातून पुण्याला पाठवले जातात, कारण.. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/nivpune/feed/ 2 21134
शंभर वर्षापूर्वी आलेल्या या रोगाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याची दिशा बदलून टाकली. https://bolbhidu.com/spanish-flu-changed-indian-freedom-strugle/ https://bolbhidu.com/spanish-flu-changed-indian-freedom-strugle/#respond Tue, 17 Mar 2020 13:13:14 +0000 https://bolbhidu.com/?p=21077

आज नॉव्हेल कोरोना या रोगाने जगभरात थैमान घातलंय. हजारो जणांचा मृत्यू झालाय. वैद्यकीय तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली तरीही आपल्याला या रोगावर नियंत्रण मिळवणे अवघड जातय. असाच एक रोग शंभर वर्षांपूर्वी आला होता आणि त्याने कोट्यावधी लोकांना गिळून टाकलं होत. “स्पॅनिश फ्ल्यू” वर्ष १९१८. पहिल्या महायुद्धाचा काळ. प्रत्येक देशातील सैनिक जगभर पसरले होते. विशेषतः युरोपात युद्धज्वर टिपेला पोहचला होता. लाखो […]

The post शंभर वर्षापूर्वी आलेल्या या रोगाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याची दिशा बदलून टाकली. appeared first on BolBhidu.com.

]]>

आज नॉव्हेल कोरोना या रोगाने जगभरात थैमान घातलंय. हजारो जणांचा मृत्यू झालाय. वैद्यकीय तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली तरीही आपल्याला या रोगावर नियंत्रण मिळवणे अवघड जातय.

असाच एक रोग शंभर वर्षांपूर्वी आला होता आणि त्याने कोट्यावधी लोकांना गिळून टाकलं होत.

“स्पॅनिश फ्ल्यू”

वर्ष १९१८. पहिल्या महायुद्धाचा काळ. प्रत्येक देशातील सैनिक जगभर पसरले होते.

विशेषतः युरोपात युद्धज्वर टिपेला पोहचला होता. लाखो लोकांची कत्तल चालली होती. कोणाच कोणाला भान राहिलं नव्हतं. मानवी जीवनाची किंमत उरली नव्हती.

अशातच हा स्पॅनिश फ्ल्यू रोग आला. हा एक संसर्गजन्य रोग होता. शिंकेतून यांचे विषाणू पसरत होते. आजारामुळे शरीराची प्रतिकार शक्ती नष्ट होते आणि थोड्याच दिवसात मृत्यू होतो. फ्रान्सच्या सीमेवर असलेल्या अस्वच्छ परिस्थितीमुळे हा रोग जास्त वेगात पसरला.

अस म्हणतात कि अमेरिकेतल्या सैनिकांनी युरोपात हा रोग आणला.

महायुद्धात सामील झालेल्या सैनिकांनी आपआपल्या देशात हे विषाणू नेले. महायुद्धातील रक्तपात सर्वत्र सडलेली प्रेते, बॉम्बस्फोटातून उध्वस्त झालेली गावे यामुळे अस्वच्छता माजली होती. यातून स्पॅनिश फ्ल्यूचे प्रमाण प्रचंड वाढले.

सुरवातीला युद्धामुळे इंग्लंड अमेरिकेतील मिडियाने या रोगाची बातमी दाबली.

यामुळे खबरदारी काय घ्यायची याची कल्पनाच कोणाला नव्हती. पाहता पाहता जगभरात हा रोग पसरला. पहिली बातमी स्पेन मधून आली म्हणून या रोगाला स्पॅनिश फ्ल्यू असे नाव मिळाले.

अस म्हणतात की जगभरातून एकूण ५० कोटी जणांना या रोगाची लागण झाली होती व त्यातील  १० कोटी जणांचा मृत्यू झाला. जगाच्या इतिहासातील आत्ता पर्यन्तचाहा सर्वात घातक रोग ठरला.

हा आकडा युद्धात मृत्यू पावलेल्या सैनिकांच्यापेक्षाही दुप्पट आहे. 

तरी इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स या देशांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांनी लवकर या रोगावर नियंत्रण आणले. पण भारतासारख्या गुलामीत असणाऱ्या देशाकडे लक्ष द्यायला देखील कोणाला वेळ नव्हता.

भारतावर तेव्हा राज्य होत इंग्रजांच. खर सांगायचं झाल तर विसाव्या शतकाच्या सुरवाती पर्यंत म्हणावं तेवढा जोर लावून स्वातंत्र्याची मागणी भारतातून होत नव्हती.

याला एक कारण म्हणजे या पूर्वी राज्य केलेल्या राजांनी बादशहाने केलेला जुलूम इंग्रजांच्या पेक्षाही टोकाचा होता. त्यांनी स्वतःच्या सोयी साठी का होईना भारतात रेल्वे वगैरे आधुनिक विकास केला होता.

त्यामुळे काही सशस्त्र क्रांतिकारक आणि टिळक, गोखले, फिरोजशहा मेहता असे सुशिक्षित नेते सोडले तर तळागाळातील आंदोलने अभावाने दिसत होती.

पण स्पॅनिश फ्ल्यूने भारताला मोठा झटका दिला. 

पहिले रुग्ण मुंबई शहरात सापडले. बंदरावर तैनात असलेल्या ७ शिपायांना हा रोग आढळून आला. काही दिवसात स्पॅनिश फ्ल्यूने भारतातही आपला विळखा पसरवला. डॉक्टर

६ ऑक्टोबर १९१८ रोजी एका दिवसात जवळपास ८०० जण मृत्यूमुखी पडले. विशेषतः उत्तर भारतात या रोगाने हाहाकर माजवला. गंगानदीच्या पात्रात लाखो मृतदेह तरंगत होते. जनतेमध्ये आक्रोश पसरला होता. पण भारतात डॉक्टरच नव्हते. अनेक डॉक्टर युद्धक्षेत्रावर युरोपात गेले होते.

कोणतीही वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे २ कोटी ते ५ कोटी भारतीयांचा मृत्यू झाला. जगभरात स्पॅनिश फ्ल्यूने  मरणाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त भारतीय होते. 

एकतर या महायुद्धाचा भारताशी काहीही संबंध नव्हता. तरीही आपले शूर सैनिक हे युद्ध प्राणपणाने लढले. तिथे रक्त सांडल, वरून या रोगामुळे देखील जीव गेला.

पण इंग्रजांनी त्याकडे थेट दुर्लक्ष केले. त्यांना भारतीय सैनिक युद्धात इंग्लंडच्या बाजूने लढायला हवे होते मात्र युद्धानंतर त्यांच्या आरोग्यावर खर्च करायला पैसा नव्हता. ज्या नेत्यांचा, सैनिकांचा ब्रिटीशांच्या न्यायवृत्तीवर विश्वास होता त्यांचा भ्रमनिरास व्हायला सुरवात याच स्पॅनिश फ्ल्यूमुळे झाली.

खुद्द महात्मा गांधींना या रोगाची लागण झाली होती. गांधीजी सुदैवाने या रोगातून सहीसलामत बरे झाले मात्र तेव्हा पाहिलेला नरसंहार त्यांच्या मनावर आघात करून गेला.

१९१८ नंतर भारतात उभारलेल्या स्वातंत्र्यलढयाला देशाच्या कानाकोपऱ्यातून पाठींबा मिळायला लागला. आपल्यावर अन्याय करणाऱ्या इंग्रजांना देशातून घालवल्या बिगर राहायचे नाही हा जोश सगळ्या देशभर पसरला. गांधीजींच्या असहकार आंदोलनात अबाल वृद्ध बायापुरुष सगळे जण सामील झाले. प्रत्येक भारतीयामध्ये राष्ट्रवाद जागा झाला.

अनेक पाश्चात्य इतिहासकार मानतात भारतात स्वातंत्र्यलढा तळागाळाशी पोहचला याला अनेक कारणे होती मात्र त्याचबरोबर १९१८ च स्पॅनिश फ्ल्यूसुद्धा एक प्रमुख कारण ठरले.

संदर्भ – Pale Rider: The Spanish Flu of 1918 and how it changed the world

हे ही वाच भिडू.

 

The post शंभर वर्षापूर्वी आलेल्या या रोगाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याची दिशा बदलून टाकली. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/spanish-flu-changed-indian-freedom-strugle/feed/ 0 21077
डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता. https://bolbhidu.com/dalda-narayanrao-bhagwat/ https://bolbhidu.com/dalda-narayanrao-bhagwat/#respond Mon, 16 Mar 2020 15:46:51 +0000 https://bolbhidu.com/?p=21049

डालडा सगळ्यानाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सबस्टीट्युट असलेला हा डालडा मोकळा झाल्यावर भरपूर कामासाठी उपयोगी पडायचा. तो आपल्या जेवणाशी आणि जीवनाशी एवढा जोडला गेला होता की डालडा हा एक ब्रँड आहे आणि पदार्थाच नाव वनस्पती तूप आहे हे आपण विसरूनच गेलो होतो. हो वनस्पती तूप. एकेकाळी याच वनस्पती तूपाने अख्ख्या दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना जगवल होतं. […]

The post डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता. appeared first on BolBhidu.com.

]]>

डालडा सगळ्यानाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सबस्टीट्युट असलेला हा डालडा मोकळा झाल्यावर भरपूर कामासाठी उपयोगी पडायचा. तो आपल्या जेवणाशी आणि जीवनाशी एवढा जोडला गेला होता की डालडा हा एक ब्रँड आहे आणि पदार्थाच नाव वनस्पती तूप आहे हे आपण विसरूनच गेलो होतो.

हो वनस्पती तूप. एकेकाळी याच वनस्पती तूपाने अख्ख्या दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना जगवल होतं. पण गंमत अशी की आपल्या पैकी प्रत्येकाला वाटत की हे वनस्पती तूप परदेशात शोधलं गेलंय. तर तस नाही. वनस्पती तुपाचा शोध एका मराठी माणसाने लावला आहे.

नारायणराव बाळाजी भागवत.

भागवत घराणे हे मुळचे पंढरपूरचे. घरात अगदी गर्भश्रीमंती होती. पण नारायणरावांचे वडील त्यांच्या वडिलांशी भांडून निराधार अवस्थेत मुंबईस आले. तिथेच हमाली वगैरे करून शिक्षण घेतल. मट्रीकच्या परीक्षेवेळी कष्टाने त्यांना मानाची  ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या मेहनतीने शिक्षण पूर्ण करून ते वकील झाले. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. नंतर बाळाजी भागवत इंदोरच्या होळकर संस्थानचे दिवान बनले.

 बाळाजी भागवतांची पत्नी ही त्या काळातली म्हणजे एकोणिसाव्या शतकातली मॅट्रिक होती आणि इंग्रजी पुस्तके वाचणे हा तिचा छंद होता.

अशा सुशिक्षित माता-पित्यांच्या पोटी नारायणरावांचा जन्म १८८६ मध्ये झाला. नारायणराव व त्यांची भावंडे अभ्यासात हुशार होते. नारायणरावांनादेखील  आपल्या वडिलांच्या प्रमाणे ‘जगन्नाथ शंकरशेठ’ स्कॉलरशिप मिळवायची होती. त्यासाठी ते संस्कृत भाषेचा अभ्यास फार जोमाने करत होते. पण त्यांच्याच एका आप्ताने त्यांना सांगितले,

‘नारायणा, तुझी आíथक स्थिती उत्तम आहे, तुझे शिक्षण तुझे आई-वडील सहज करू शकतात. त्यामुळे उगीचच जगन्नाथ शंकरशेठ मिळवून तू दुस-या एका हुशार पण गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी अडवू नकोस आणि जो काही अभ्यास करशील तो आनंदासाठी कर, काही मिळवायचे असे ध्येय ठरवून करू नकोस’

हा सल्ला नारायणरावांना जन्मभर मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरला. नारायणराव भागवतांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून  रसायनशास्त्रात डिग्री घेतली. याच काळात सर जमशेदजी टाटांच्या संकल्पनेतून कर्नाटकातील बेंगलोरमध्ये इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ची स्थापना झाली होती.

भारतातील हे पहिले मुलभूत संशोधन केंद्र होते. नारायणरावांनी तिथल्या पहिल्याच बॅचमध्ये प्रवेश घेतला. रसायनशास्त्रात त्यांनी ऑईल्स आणि फॅट्स यावर संशोधन केले.

ते टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची संशोधन पदवी पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या भावाने देखील याच संस्थेत प्रवेश घेतला.

पासआउट झाल्यावर नारायणराव येमेन देशातील एडनला गेले. तिथे त्यांच्या वडिलांच्या मित्राचा इब्राहीमभाई लालजी यांचा साबणाचा कारखाना होता. तिथे त्यांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांच्याच घरात त्यांच्या मुलासारखे राहिले.

पुढे १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर ते भारतात परत आले. भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.

पहिल्या महायुद्धाचा हा काळ होता. सैनिकांना  लोण्याची आवश्यकता असायची. पण ते सर्वाना पुरवण शक्य नव्हतं. थिजवलेल्या तेलापासून लोण्याचा स्वस्त पर्याय म्हणून मार्गारीन सैन्यात वापरायला लागले. ते लोकप्रिय झाले व ते स्वस्त असल्यामुळे मागणी वाढत गेली.

पण भारतीय सैनिकाकडून मात्र या मार्गारीन पेक्षा तुपाची मागणी जास्त व्हायची.

याच काळात जगभरातील संशोधक साजूक तुपाला पर्याय शोधण्याच्या मागे लागले होते.  विशेषतः अमेरिका व जपान मध्ये गोडेतेलापासून तूप तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना यश मिळत नव्हते. पण टाटा कंपनीमध्ये नारायणराव भागवत आणि कपिलराम या दोघांनी त्यात यश मिळवले.

पहिले नैसर्गिक तूप भारतात तयार झाले.

ही गोष्ट टाटा कंपनीचे वित्तीय सल्लागार असलेल्या पीटरसन या गोऱ्या अधिका-याला कळली. त्याने या कृतीची मागणी त्यांच्याकडे केली. पण भागवत आणि कपिलराम उत्तरले,

‘‘या क्षेत्रात आम्ही शोधकर्ते ठरलो आहोत तर मग त्याचा फायदा आमच्या देशालाच झाला पाहिजे. आमच्या देशालाच त्याचे श्रेय मिळायला हवे’’.

इंग्रजांच्या सत्तेचा काळ होता. आपण ज्यांच्यावर राज्य करतो ते भारतीय लोक आपली आज्ञा मानत नाहीत याचा राग त्या पीटरसनच्या मनात आला. त्याने थेट टाटांच्या या कंपनीची आर्थिक नाकेबंदी केली. टाटांना ही कंपनी बंद करावी लागली.

कपिलराम आणि नारायणराव दोघेही बेकार झाले. जवळपास सातवर्ष नारायणराव बेकार होते. अमेरिकेतील एक अतिशय चांगल्या पगाराची नोकरी त्यांना चालून आली होती पण ‘वनस्पती तुपाच्या’ शोधाचे श्रेय त्यांना आपल्या देशालाच द्यायचे  या हट्टापायी त्यांनी नाकारली.

याकाळात त्यांच्या एका बहिणीने आपल्या शिक्षिकेच्या नोकरीतून त्यांच अख्खं कुटुंब संभाळल.

अखेर सात वर्षानी कपिलराम यांनी गुजरातमध्ये सॉल्ट कंपनी सुरु केली व नारायणरावांना तिथे नोकरी मिळाली. या दोघांच्या जोडीने तिथेही रसायनशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावले. पुढे ही कपिलराम यांची कंपनी टाटांनी विकत घेतली आणि तिचे नाव ठेवलं

 ‘टाटा केमिकल्स’. टाटा केमिकल्सची मुख्य जबाबदारी कपिलराम आणि नारायणराव यांच्याकडेच होती.

सर्व घडी नीट बसलेली असतानाच अचानक नारायणरावांना  गुजरात सोडून परत यावं लागलं. त्याच्या वडिलांना पॅरालीसीसचा झटका आला होता. मुंबईत येऊन त्यांनी आपले मित्र अनंतराव पटवर्धन यांच्याबरोबरसाबण आणि बाकीच्या कंपन्यांना लागणारी केमिकल्स बनवणारी ‘अनार अँड कंपनी’ सुरू केली.

याच काळात लिव्हर ब्रदर्सनी भारतात हिंदुस्तान वनस्पती मॅन्युफ्कचरिंग नावाची कंपनी स्थापन केली होती.

त्यांनी डाडा या डच कंपनीबरोबर करार केला आणि भारतात सेवर येथे वनस्पती तूप बनवणारी फॅक्ट्री सुरु केली. हे वर्ष होतं १९३७. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना संपूर्ण जगभरात वनस्पती तूप पाठवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि तिथून वनस्पती तूप म्हणजे डालडा हा अगदी समानार्थी शब्द पडून गेला,

वनस्पती तुपाचा शोध नारायणराव भागवत यांनी लावला होता हे जगाबरोबरच आपण ही विसरून गेलो.

नारायण राव भागवतांच्या मुलीनीही त्यांच्या घरची उच्च शिक्षणाची परंपरा पुढे नेली. त्यांच्या दोन्ही मुली म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका दुर्गा भागवत आणि भारतातल्या पहिल्या डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमलाबाई भागवत सोहनी. त्यांच्या रूपाने भागवत कुटुंबाच नाव अजरामर राहिले आहे.

संदर्भ : विज्ञान विशारद लेखिका – वसुमती धुरू – ग्रंथाली प्रकाशन

हे ही वाच भिडू.

The post डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता. appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/dalda-narayanrao-bhagwat/feed/ 0 21049
बाबाराव सावरकरांनी मोहम्मद अली जिनाची ५० हजाराची सुपारी दिली होती? https://bolbhidu.com/babarao-savarkar-jinnah-yashpal/ https://bolbhidu.com/babarao-savarkar-jinnah-yashpal/#respond Mon, 16 Mar 2020 11:43:39 +0000 https://bolbhidu.com/?p=21029

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर कोणी टीका करतं तर कोणी थेट त्यांना देवत्वाच्या जागी नेऊन ठेवत. काहीही झाल तरी सावरकरांच्या राजकारणाचा  स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासावरील व त्यांच्या साहित्याचा मराठी समाजमनावर असलेला पगडा कोणी नाकारू शकत नाही. पण याच भक्तीभाव किंवा टोकाचा द्वेषातून त्यांच्यावरील अभ्यास एकतर्फी होऊन जातो. त्यांच्या इतिहासातील अनेक पाने गाळली जातात. असंच झालंय बाबाराव सावरकरांच्या बाबतीत. सावरकरांचे हे मोठे बंधू. ते देखील एक […]

The post बाबाराव सावरकरांनी मोहम्मद अली जिनाची ५० हजाराची सुपारी दिली होती? appeared first on BolBhidu.com.

]]>

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर कोणी टीका करतं तर कोणी थेट त्यांना देवत्वाच्या जागी नेऊन ठेवत. काहीही झाल तरी सावरकरांच्या राजकारणाचा  स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासावरील व त्यांच्या साहित्याचा मराठी समाजमनावर असलेला पगडा कोणी नाकारू शकत नाही.

पण याच भक्तीभाव किंवा टोकाचा द्वेषातून त्यांच्यावरील अभ्यास एकतर्फी होऊन जातो. त्यांच्या इतिहासातील अनेक पाने गाळली जातात.

असंच झालंय बाबाराव सावरकरांच्या बाबतीत.

सावरकरांचे हे मोठे बंधू. ते देखील एक क्रांतीकारी होते. विनायकराव सावरकरांच्या आधीपासून त्यांनी अंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगली.  पण त्यांच्याबद्दल आपल्याला जास्ती माहिती नसते

मूळ नाव गणेश दामोदर सावरकर. विनायक उर्फ तात्यारावांपेक्षा चार वर्षांनी वडील.

त्यांचा जन्म नाशिक जवळील भगूर येथे झाला. तिथे त्यांची परंपरागत जहागीर होती. वडील दामोदरपंतांच्या देखरेखीखाली बाबाराव तलवार आणि बंदूकही उत्तम प्रकारे चालवायला शिकले. शिक्षणातही उत्तम होते. मात्र घरच्या जबाबदारीमुळे मॅट्रिकच्या आतच उरकले.

त्यांना ज्योतिषशास्त्राचा आणि आयुर्वेदाच्या अभ्यासाचा नाद होता. ते स्वतः अनेक प्रकारची औषधेही तयार करीत असत. आईच्या अकाली मृत्यू मुळे घरची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांचे लवकर लग्न लावून देण्यात आले.

त्यांची पत्नी यशोदा हिनेच बाबाराव आणि तात्याराव या दोघा भावांना स्वातंत्र्यलढयासाठी प्रेरित केलं अस म्हणतात.

शिक्षणासाठी बाहेर पडलेले तात्याराव सावरकर यांनी आपल्या मित्रांसह एका गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली. कालांतराने बाबाराव सावरकर देखील यात सामील झाले.

अनेक तरुणांना प्रेरणा देण्यासाठी १ जानेवारी १९०० या रोजी मित्रमेळा नावाची संस्था उघडपणे सुरू करण्यात आली.

बाबाराव मित्रमेळा संस्थेचे कार्यवाह होते. यासंस्थेतर्फे गणेश उत्सव, शिवजयंती, अकबर जयंतीसह इतर थोरांच्या जयंत्या साजर्‍या केल्या जायच्या. टिळकांच्यासारखी मोठमोठ्या वक्त्यांना मार्गदर्शनासाठी बोलावलं जायचं.

पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षणासाठी परदेशी गेले. तिथून त्यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचे काम चालू ठेवले. बॉम्ब बनवण्याच तंत्रज्ञान, पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली.

इकडे बाबाराव सावरकरांच्या नेतृत्वाखाली नाशिक हे राष्ट्रीय चळवळीचे केंद्र बनले. सावरकरबंधू तरुणाईत प्रसिद्ध झाले.

दुर्दैवाने १९०९ साली इंग्रजांनी बाबाराव सावरकरांना अटक केली व त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांना झालेल्या शिक्षेने भडकलेल्या अनंत कान्हेरेने जॅक्सनचा खून केला आणि फासावर गेले.

या घटनेवरून बाबाराव सावरकरांची मराठी तरुणांच्यातील लोकप्रियता लक्षात येईल.

बाबाराव सावरकरांना आजन्म जन्मठेपेची काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला पाठवण्यात आले. काही काळाने तात्याराव सावरकर देखील याच सेल्युलर जेलमध्ये आले. या दोघा भावांच्या सुटकेसाठी त्यांच्या सर्वात धाकट्या बंधूने नारायणराव याने अनेक प्रयत्न केले.

अर्जविनंत्या, आंदोलने यानंतर अखेर इ.स. १९२१ दोन्ही सावरकर बंधूंची अंदमान मधून सुटका झाली.

पण एकूण शिक्षेचा काळ संपला नसल्याने त्यांना भारतातील ठिकाणच्या तुरुंगात पाठविण्यात आले. बाबारावांची तब्येत साथ देत नाही असे पाहून इ.स. १९२२ साली त्यांची शिक्षा संपल्याचे घाईने कळविण्यात आले. तात्याराव सावरकर यांना रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्धतेमध्ये ठेवण्यात आले होते.

सुटकेनंतर सावरकरांना राजकीय लढ्यात सहभागी होण्याची बंदी घालण्यात आली होती. याच काळात सावरकर बंधूनी हिंदुत्वांवर लक्ष केंद्रित केले. त्यावरील पुस्तके लिहिणे, प्रकाशित करणे हे त्यांचे मुख्य काम होते. हिदू धर्मातील अनिष्ठ रूढी परंपरावर टीका करणे, समाजसुधारणा, जनजागृती अशी कार्य सुरु केली.

मात्र पडद्यामागे राहून क्रांतीकारी तरुणांना प्रेरणा देण्याच काम सुद्धा चालूच होतं. अशातच त्यांची ओळख यशपाल नावाच्या तरुणाशी झाली.

यशपाल पंजाबचे, शालेय जीवनातच त्यांनी गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. मात्र काही वर्षांनी ते सशस्त्र क्रांतीकार्याकडे वळले. यातूनच त्यांनी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांच्या डाव्या विचारसरणीच्या हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक आर्मी या क्रांतिकारी संघटनेमध्ये प्रवेश केला.

तिथे त्यांची ओळख शार्प शुटर अशी बनली होती. 

यशपाल यांची किर्ती बाबाराव सावरकरांच्या कानी पडली. त्यांनी दिल्लीला जाऊन त्याची आणि भगवतीचरण वोहरा यांची भेट घेतली. “राष्ट्रकार्यासाठी एक योजना आहे आणि त्यासाठी मुंबईला ये” अस त्यांनी यशपाल यांना सांगितलं.

डिसेंबर १९२९ रोजी बाबांराव सावरकर आणि यशपाल यांची भेट अकोल्याला झाली. 

यशपाल सांगतात त्यांना पोहचायला खूप रात्र झाली होती. बाबाराव एका छोट्याशा खोलीत एकटे राहात होते. थंडीचे दिवस होते. सावरकरांनी आपल्या जवळची एकमेव चादर यशपाल यांना दिली व स्वतः कुडकुडत झोपले.

यशपाल यांनी बाबारावांना कामाबद्दल विचारले. त्यांना वाटत होते एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याचा खून करायचा आहे. पण सावरकरांनी सांगितल,

“हां अंग्रेज़ों को तो भगाना ही है, लेकिन इनके अलावा देश के और भी दुश्मन हैं. जो देश की एकता के लिए खतरा हैं. जो अंग्रेज़ों को निकाल फेंकने के हमारे प्रयासों में बाधा हैं. मोहम्मद अली जिना. अगर तुम उसे मारने की ज़िम्मेदारी लेते हो तो स्वतंत्रता के रास्ते का सबसे बड़ा कांटा साफ हो जाएगा और इस काम के लिए हम तुम्हारी ५०,००० रुपयों की आर्थिक मदद कर सकते हैं “

हे अतिशय टोकाचे पाऊल होते. कारण अजून त्या काळात मोहम्मद अली जिना यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली नव्हती. ती त्यांनी दहा वर्षानंतर म्हणजे १९४० मध्ये केली. पण त्यांनी मुस्लीम लीगच्या माध्यमातून मुसलमानांच्या राजकारणास कट्टरतेच वळण देण्यास सुरवात नक्कीच केली होती.  जिनाचा खून म्हणजे मोठ्या हिंदू मुस्लीम दंगलीस कारण मिळण्याची शक्यता होती.

सावरकरांनी देऊ केलेले पन्नास हजार म्हणजे त्याकाळी प्रचंड मोठी रक्कम होती. पण यशपाल यांनी विचार केला आणि ही सुपारी घेण्यास नकार दिला.  ते म्हणतात,

” बाबाराव की लगन और त्याग पर कोई संदेह नहीं था, लेकिन हमारा नज़रिया सावरकर बंधुओं से अलग था”

बाबाराव सावरकरांनी देखील यशपाल यांच्या विचारांचा आदर केला आणि त्यांना परत पाठवून दिले. यशपाल यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत क्रांतीकार्य सुरु ठेवलं. पुढे ते एक लेखक म्हणून देखील प्रसिद्ध झाले. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला.

१६ मार्च १९४५ रोजी बाबाराव सावरकर यांचे निधन झाले.

गंमत म्हणजे ज्या मोहम्मद अली जिना यांच्या मृत्यूसाठी बाबाराव सावरकर प्रयत्न करत होते त्याच जिना यांच्या मुस्लीम लिगबरोबर युती करून सावरकरांच्या हिंदू महासभा या पक्षाने निवडणुका लढवल्या.

संदर्भ-

  • Savarkar: The True Story of the Father of Hindutva
  • Friend, Corinne (Fall 1977), “Yashpal: Fighter for Freedom — Writer for Justice”, Journal of South Asian Literature,

हे ही वाच भिडू.

The post बाबाराव सावरकरांनी मोहम्मद अली जिनाची ५० हजाराची सुपारी दिली होती? appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/babarao-savarkar-jinnah-yashpal/feed/ 0 21029
इंग्रजांनी लुटलेला रायगडावरचा खजिना त्यांना व्याजासह फेडावा लागला होता? https://bolbhidu.com/deccan-booty-prize-money-english/ https://bolbhidu.com/deccan-booty-prize-money-english/#respond Fri, 13 Mar 2020 15:05:08 +0000 https://bolbhidu.com/?p=20964

गोष्ट आहे अठराव्या शतकातली. दुसऱ्या बाजीरावाच्या ताब्यात पेशवाईची सूत्रे आली होती. एकेकाळी दिल्लीवर पकड असणाऱ्या मराठ्यांचा दरारा महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर कमी झाला होता. पण दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली.  त्याने अनेक चुकीचे निर्णय घेतले, चैनीसाठी आणि दानधर्मात पैशांची उधळपट्टी सुरु केली. १८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुस-या बाजीरावाच्‍या मनमानी कारभाराला लगाम […]

The post इंग्रजांनी लुटलेला रायगडावरचा खजिना त्यांना व्याजासह फेडावा लागला होता? appeared first on BolBhidu.com.

]]>

गोष्ट आहे अठराव्या शतकातली. दुसऱ्या बाजीरावाच्या ताब्यात पेशवाईची सूत्रे आली होती. एकेकाळी दिल्लीवर पकड असणाऱ्या मराठ्यांचा दरारा महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर कमी झाला होता.

पण दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली.  त्याने अनेक चुकीचे निर्णय घेतले, चैनीसाठी आणि दानधर्मात पैशांची उधळपट्टी सुरु केली.

१८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुस-या बाजीरावाच्‍या मनमानी कारभाराला लगाम घालणारा कोणी मातब्बर असा, पुणे दरबारात उरला नाही. याच काळात इंग्रज हळूहळू भारतभरात जम बसवत होते.

राज्यकारभारात अननुभवी असलेल्या दुसऱ्या बाजीरावाने होळकर, शिंदे यांच्यावर वचक ठेवण्यासाठी व आपली पेशवाई मजबूत राहावी म्हणून इंग्रजांशी संधान बांधले.

दुसऱ्या बाजीरावाला जेव्हा आपली चूक लक्षात आली तोवर खूप उशीर झाला होता.

इंग्रजांची महाराष्ट्रातील मगरमिठी घट्ट होत चालली होती. व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटीश कंपनी सरकारची पैशांची हाव सगळ्या जगजाहीर होती.

इंग्रज जिथे विजय मिळवतात तिथे ते लुटालुट करतात याची कल्पना बाजीरावाला होती. त्याने आपला खजिना, दागिने जडजवाहीर सिंहगडावरून हलवण्याच ठरवलं.

हा खजिना एकाच जागी सुरक्षित राहणार होता, शिवछत्रपतींच्या राजधानीत, “रायगडावर”

सिंहगडावरील गोविंदराव सदाशिवराव याला आदेश दिले की दागिन्यांची ओझी बांधावीत. हेलकरी आणि संरक्षक यांच्याकडून रायगडावर नारो गोविंद आवटी यांच्या हवाली करावीत.

नारो आवटी पेशव्यांच्या विश्वासातला एक सावकार होता. त्याला रायगडाची सुभेदारी देऊन तेथे कडक बंदोबस्त करण्याची सूचना करण्यात आली होती.

मधल्या काळात पेशव्यांनी रायगडाकडे प्रचंड दुर्लक्ष केल होतं. मात्र आता खजिन्याच्या निमित्ताने का होईना रायगडाची काळजी घेण्याची गरज पडली होती.

२९ जून १८०३ रोजी हा खजिना रायगडावर आला. तिथून तो बरेच वर्ष तिथे सुरक्षित राहिला. अनेक हल्ले नारो आवटी आणि पांडोजी कुंजीर यांनी परतवून लावले. हजार अरब सैनिकांची शिबंदी मदतीला होती.

१८११ साली इस्ट इंडिया कंपनीने माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनची नेमणूक पुणे दरबारात केली.

हा खूपच धूर्त व चलाख अधिकारी होता. त्याने लंडनला पाठवलेल्या पत्रात या खजिन्याचा उल्लेख केला आहे. ज्यात तो म्हणतो की बाजीराव अप्रत्यक्षपणे लढाईची तयारी करत आहे. बाजीरावाने आपल्या थोरल्या पत्नीला देखील रायगडावरच पाठवले होते.

साधारण १८१७ साली इंग्रजांनी मराठा साम्राज्यावर घाला घालण्यासाठी अंतिम युद्धाची तयारी सुरु झाली. एप्रिल मध्ये खडकी येथे तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. पुण्यावर विजय मिळवला. बाजीराव पुरंदर सारख्या किल्ल्यांचा आधार घेत पळून जाण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला होता.

बाजीराव रायगडावर जाण्याच्या आधी ब्रिटिशांनी तिथे हल्ला करायचं ठरवल.

कर्नल प्रॉथर नावाच्या अधिकाऱ्याने मोर्चेबांधणी केली. आसपासचे छोटे मोठे किल्ले ताब्यात घेतले. तिथून तोफांची आग ओकण्यास सुरवात केली. जवळपास महिनाभर वेढा घालण्यात आला होता. प्रचंड नुकसान झाले.

अखेर मराठ्यांचा पराभव झाला. मे १८१८ साली कर्नल प्रॉथरने रायगडावर प्रवेश केला.

त्याने दुसऱ्या बाजीरावाची पत्नी वाराणसीबाई हिला सुरक्षितपणे जाऊ दिले. कर्नलने आपल्या सैनिकांना रायगडाचा धुंडोळा घ्यायला लावला. तिथे नासधूस केली. महत्वाच्या इमारती पाडून टाकल्या. त्यांना फक्त पाच लाख रुपये मिळाले.

रायगडावरून जाणाऱ्या प्रत्येक मराठ्याला इंग्रजांनी आपली खाजगी संपत्ती घेऊन जाण्याची परवानगी दिली होती.

पुण्यात नारो आवटीच्या घरात कर्नल रोबर्टसन नावाच्या अधिकाऱ्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या २८ थैल्या सापडल्या. इंग्रजांनी त्या ताब्यात घेतल्या. नारो आवटीने दावा केला की ही त्याची वैयक्तिक संपत्ती आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

इंग्रजांचं म्हणन होतं की नारो आवटीच्या अंगरक्षकांनी आपल्या फेट्यात आणि अंगरख्यात लपवून हे पैसे पुण्याला आणले आहेत.

३ जून १८१८ ला बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली. त्याची सगळी संपत्ती ताब्यात घेऊन त्याबदल्यात जिवंतपणे बिठूर येथे जाण्याची परवानगी दिली गेली. नाशिकच्या मंदिरातील हिऱ्यासकट प्रचंड संपत्ती लंडनला पाठवण्यात आली.

तिथे वेगळाच घोळ सुरु होता. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये इंग्लंडच्या राजाच्या ‘क्राऊन इस्टेट’ चे शेअर्स होते.

त्यामुळे जेव्हा केव्हा इंग्रज सैन्य भारतात लूट करून खजिना मिळवायचे तेव्हा कंपनी आणि राजाकडून सरळ एका ‘प्राईझ एजंट’ची नेमणूक व्हायची. हा एजंट एकूण लुटीची मोजदाद करायचा. फुटकळ वस्तू स्थानिक बाजारात विकून त्यांचे पैसे जमा केले जायचे आणि ते सैनिकांमध्ये लगेच वाटून टाकले जायचे.

सर्वांना आपापल्या पदानुसार आणि कामगिरीनुसार हिस्सा मिळायचा. राजाच्या सैन्यातल्या आणि कंपनीतल्या मोठमोठ्या ऑफीसर्सना खास बक्षिसं दिली जायची.

पण मराठ्यांच्या लुटलेल्या खजिन्यावरून मात्र मोठे वाद सुरु झाले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. या युद्धात लढलेल्या जनरल हिस्लॉप नावाच्या अधिकाऱ्याने तेव्हाचा भारताचा गव्हर्नर असलेल्या ड्युक ऑफ वेलिंग्डन विरुद्ध मुंबईतल्या कोर्टात केस टाकली. ड्युकने सर्वात खजिन्यातला मोठा वाटा उचलला असल्याची ही केस होती.

हीच ती कुप्रसिद्ध डेक्कन प्राईज मनी केस !

या केसच्या अनेक सुनावण्या झाल्या. मुंबईच्या सुप्रीम कोर्टात त्याचा निकाल हिस्लॉपच्या बाजूने लागला. माउंटस्टुअर्ट एल्फिस्टनने कंपनीच्या तर्फे या निकालाविरुद्ध लंडनमधल्या प्रिव्ही कौन्सिलकडे अपील केले.

इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये केसबद्दल प्रश्न विचारले गेले. या केसचा निकाल जुलै १८३० मध्ये लागला. प्रिव्ही कौन्सिलने मुंबई सुप्रीम कोर्टाचा निकाल बाद ठरवून ड्यूक ऑफ वेलिंग्डनच्या बाजूने निकाल दिला.

हाच ड्युक आर्थर वेलस्ली पुढे जाऊन इंग्लंडचा पंतप्रधान बनला.

या डेक्कन प्राईज मनीच्या केस बरोबर नारोबा गोविंद आवटीची केस सुद्धा चालली. नारो आवटीने कर्नल रोबर्टसनने बळजबरीने आपल्या कडील पैसे काढून घेतल्याची तक्रार केली. इंग्लंडच्या संसदेत त्याच्याही नावाची चर्चा झाली होती.

या केसचा निकाल लागेपर्यंत कोणालाही हे दक्खन लुटीच्या बक्षिसाचे पैसे दिले गेले नव्हते.

झालेल्या या विलंबाबद्दल, अधिकाऱ्यानी केलेल्या मनमानीवरून लंडनमध्ये वर्तमानपत्रात आणि पार्लमेंटमध्ये खरडपट्टी काढण्यात आली. याचे आजही तिथल्या संसदेत रिपोर्ट्स आहेत.

शेवटी केसचा निकाल लागल्यावर सर्व सैनिकांना त्यांची बक्षिसे देण्यात आली. फक्त सैनिकांनाच वाटलेली रक्कम सत्तर लाख रुपये इतकी होती.  म्हणजे खजिन्याच्या एकूण मूळ रकमेची कल्पना करता येईल.

नारो गोविंद आवटी यांचा निकाल लागे पर्यंत मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या वारसदारांना व्याजासकट रायगडाच्या खजिन्याचे पैसे परत केले गेले अस म्हणतात.

संदर्भ-
  • Parliamentary Debates: Official Report

हे ही वाच भिडू.

 

The post इंग्रजांनी लुटलेला रायगडावरचा खजिना त्यांना व्याजासह फेडावा लागला होता? appeared first on BolBhidu.com.

]]>
https://bolbhidu.com/deccan-booty-prize-money-english/feed/ 0 20964