त्याने १ बॉलमध्ये २८६ रन्स काढल्या होत्या अन् त्याचं नाव संजय राऊत नव्हतं. 

४० आमदारांवर मुख्यमंत्री होता येत हे यापुर्वी शरद पवारांनी पुलोद घडवून दाखवून दिलं. सध्या ५७ आमदारांच्या जोरावर सेना मुख्यमंत्रीपदावर डाव टाकून आहे. विषय राजकारणाचा असला की काहीही होवू शकतं. देवगौडा पंतप्रधान झालेले या देशाने पाहिले आहेत. त्यामुळं राजकारण म्हणल्यानंतर होय म्हणून आपण पुढं जावू शकतोय.  

आत्ता असाच भारतीय लोकांचा दूसरा आवडता उद्योग म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये मात्र नियम असतात. त्यात बदल केला जात नाही. अशक्य असणाऱ्या गोष्टींची यादी तशी कमीच आहे. म्हणजे बोलभिडूचं हा जूना लेख, या लेखात एकाने सिक्स मारला आणि तो दूसऱ्या देशात कसा गेला ते विस्कटून सांगितलं आहे. 

असाच एक किस्सा १ बॉलवर २८६ रन्स काढायचा. 

Pall Mall Gazette मध्ये याबद्दलची माहिती प्रकाशित झाली होती. १५ जानेवारी १८९४ रोजी ही माहिती प्रकाशित करण्यात आली होती व सामना डिसेंबर १९८३ साली झाल्याचं सांगण्यात आलं होतं. 

लंडनमधून प्रकाशित होणाऱ्या या पत्रिकेत या सामन्याच आणि १ बॉलवर २८६ रन्स कशा काढण्यात आल्या त्याबद्दल विस्ताराने माहिती देण्यात आली होती. 

झालं अस होतं की, 

ऑस्ट्रेलियाच्या बनबेरी येथील कल्ब क्रिकेट टुर्नामेंटमध्ये हे घडलं होतं. व्हिक्टोरिया आणि स्क्रैच इलेव्हनमध्ये झालेल्या सामन्यात व्हिक्टोरियाच्या बॅट्समनने पहिल्या बॉलवर २८६ रन्स काढल्या होत्या.

आत्त हे सगळं का झालं, कशामुळे झालं…? 

तर यामागे होतं एक झाडं. हे झाडं मैदानात होतं. म्हणजे बॉन्ड्रीलाईनच्या आत. झालं अस की व्हिक्टोरिया कल्बकडू जो ओपनर आला त्याने पहिल्याच बॉलला चांगला शॉट मारला. तो शॉट थेट झाडावर जावून पडला आणि झाडांच्या त्या फांद्यात बॉल अडकून बसला. एकतर त्या झाडावर चढता येईल असा ऑप्शन नव्हता.

दूसरी गोष्ट हे झाडं मैदानात होतं. झालं तर मग इकडे बॅट्समनने पळून रन्स काढायला सुरवात केली आणि तिकडे संपुर्ण टिम झाडाखाली गोळा झाली. आत्ता बॉल कसा काढायचा. हा गडी इकडे कुणाच्या बापाचं ऐकायला तयार नव्हता. बॉल येत नाही तोपर्यन्त पळायचं. अस करत तासभर होतं आला इतक्यात पळून पळून याच्या दोनशे रन्स पुर्ण झाल्या. तरिही गडी ऐकत नव्हता आणि बॉल काय खाली पडत नव्हता.

शेवटी अंपायरने झाड कापून बॉल खाली पाडण्याची ऑर्डर दिली. पण इथे एका फंटरला आयडीया सुचली. त्याने आणली बंदुक. ज्या फांद्यामध्ये बॉल अडकला होता तिथं घपाघप गोळ्या घालायला सुरवात केली. फांद्या मोडल्या आणि बॉल खाली पडला. 

बॉल आल्या आल्या थ्रो केला पण तोपर्यन्त साहेब २८६ रन्स घेवून निवांत झाले होते. आत्ता काय झालं तर आत्ता व्हिक्टोरियानं एक बॉल आणि २८६ रन्स काढून आपला डाव घोषीत केला.  

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.