दस का दम : “RAW” भारतीय गुप्तचर संस्थेच्या दहा गोष्टी

रिसर्च अँड ॲनालिसिस विंग अर्थात संशोधन आणि विश्लेषण विभाग. मराठीत हे नाव एखाद्या पाटबंधारे विभागासारखं वाटू शकतं पण रॉ म्हणलं की सगळा कारभार डोळ्यापुढे येतो. रॉ ही भारताची गुप्तचर संस्था हे प्रत्येकाला माहिती आहे. २१ सप्टेंबर १९६८ ला रॉ ची स्थापना करण्यात आली.

१९६२ आणि १९६५ च्या युद्धामध्ये भारतीय गुप्तचर संस्थांना माहिती मिळवण्यात अपयश आलेलं होतं म्हणून स्वतंत्र अशा रॉ ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवणे, गुप्त माहिती गोळा करणे, राज्यकर्त्यांना परराष्ट्र धोरण ठरवण्यास मदत करणे अशा प्रकारची कामे रॉ मार्फत केली जातात. मात्र अनेकदा अनेकांना रॉ बद्दल खूप चुकीचे समज असतात. म्हणूनच रॉ बद्दलच्या अस्सल दहा गोष्टी तुमच्यापर्यन्त घेवून आलो आहोत. 

१) रॉ साठी नियुक्ती हि थेट पद्धतीने केली जात नाही. पोलीस सेवा, लष्कर सेवा, प्रशासकिय सेवा अशा वेगवेगळ्या विभागातून रॉ साठी अधिकारी निवडले जातात. रॉ मध्ये कोणत्याही प्रकारे थेट भरती आजपर्यन्त करण्यात आली नाही. 

२) रॉ अधिकाऱ्यांची, त्यांच्या कारवायांची माहिती गुप्त राखली जाते. घरच्यांपासून देखील रॉ अधिकारी माहिती लपवत असतात. रॉ अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती कधीच सार्वजनिक केली जात नाही. 

३) रॉ ने केलेल्या कारवाईच्या कधीच बातम्या छापून येत नाहीत. रॉ मार्फत करण्यात येणाऱ्या कारवाया या पुर्णपणे गुप्त असल्याने अशा बातम्या छापून येत नाहीत व सहसा ती माहिती सार्वजनिक केली जात नाही. 

४) रॉ अधिकारी सशस्त्र दलाशी संबधित नसतात. त्यांना शस्त्र दिली जात नाहीत. पण गरज असेल तर अधिकाऱ्यांना शस्त्र दिली जातात. 

५) रॉ ही एक विंग आहे. ती घटनात्मक संस्था नाही. त्यामुळे रॉ ही संसदेला जबाबदार नसते. संसदेत रॉ संबधित प्रश्न विचारले जावू शकत नाहीत. 

६) RTI अर्थात माहितीची अधिकार रॉ साठी लागू होवू शकत नाही. 

७) २००४ मध्ये नॅशनल टेक्निकल फॅसेलिटीज ऑर्गनायझेशनची निर्मिती करण्यात आली. रॉ ची एक विंग म्हणून ही संस्था काम करते मात्र या विंगची कामे पुर्णपणे गुप्त ठेवण्यात आली आहेत. 

८) ऑपरेशन स्मायलिंग बुद्धा गुप्त राखण्याची जबाबदारी रॉ कडे देण्यात आली होती. अमेरिकेच्या CIA पासून भारताची पहिली अण्वस्त्र चाचणी गुप्त ठेवण्याची जबाबदारी रॉ ने यशस्वीरित्या पार पाडली होती. 

९) कारगील युद्धादरम्यान काश्मिरी घुसखोरांच्या पाठीमागे पाकिस्तान सरकार आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी देखील रॉ कडून यशस्वीरित्या पार पाडण्यात आली होती. युद्धा दरम्यान सेना अध्यक्ष परवेज मुर्शरफ यांचं संभाषण रेकार्ड करण्यात रॉ ला यश आलं होतं. 

१०) १९८४ साली सियाचिनमध्ये पाकिस्तानी सैन्य घुसखोरी करणार होते. त्याची माहिती रॉ ने दिल्यामुळे सैन्यामार्फत ऑपरेशन मेघदुत राबवण्यात आलं. त्यामुळे सियाचिनवर भारताचा ताबा कायम राहिला. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Sunay parab says

    But how to join

Leave A Reply

Your email address will not be published.