करियरचा पर्याय निवडत असाल तर घसघशीत पगार मिळवून देणारे हे 10 जॉब्स पहा..
डिग्री मिळविली आणि त्यानंतर वाटत की आपण दुसरी कुठली एखादी डिग्री केली असती तर आपल्या चांगल्या प्रकारचा नोकरी मिळाला असता. अनेकांना वाटत असेल की आपल्याला आता उशीर झाला आहे. मात्र हे असे नाही. तुमच्या कुठल्याही वर्षी काही कोर्स करून चांगला पगार मिळवू शकतात.
आर्थिक मंदीच्या काळात सुद्धा हा जॉब असणाऱ्या व्यक्तींना चांगला पगार मिळाला आहे. याच बरोबर हे जॉब युनिक असणार आहे. भारतातील १० सगळ्यात जास्त पगार मिळवून देणारे हे जॉब आहेत.
१) मर्चंड नेव्ही
सध्याचा काळात मर्चंड नेव्ही मोठी मागणी आहे. यात चांगला पगार मिळतो.अनेकजण चांगले पैसे मिळतात म्हणून मर्चंड नेव्ही जॉईन करत असतात. सुरुवातीच्या काळात पगार कमी मिळतो. जसा जसा अनुभव वाढत जातो तसा पगार सुद्धा पटीत वाढत जातो.
मात्र हे क्षेत्र निवडतांना फिजिकली आणि मेंटली फिट असायला हवं. समुद्रात ६ ते ९ महिने राहण्याची गरज असते. याकाळात सोबतीला फक्त समुद्र असतो. त्यामुळे फिजिकली आणि मेंटली फिट असायला हवं. मिळणार कॉम्पेनशेषण हे टॅक्स फ्री असते. कॅडेट, रेडिओ ऑफिसर, चीफ इंजिनियर, सेफ म्हणून मर्चंड नेव्हीत सामील होता येत.
फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथेमॅटिक्स हे विषय घेऊन १२ वी व्हायला हवी. महिन्याला ८ लाखांपर्यंतचा पगार मिळू शकतो.
२) सिव्हिल सर्व्हिसेस
भारतातील सगळ्यात अभिमानास्पद नोकरी म्हणून सिव्हिल सर्व्हिसेसची नोकरी समजली जाते. याचा चांगला पगार तर असतोच. मान तर जास्त मिळतोच देशासेवा केल्याची समाधान मिळते. पगाराबरोबरच टी ए, एचआर आणि डीए सुद्धा मिळतो.
मात्र, यात एक प्रॉब्लम आहे तो म्हणजे यात बोटावर मोजण्या इतक्याच जागा निघत असतात. आणि यासाठी देशभरात विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करत असतात.
कष्ट आणि वेळ देण्याची तयारी असेल तर सिव्हिल सर्व्हिसेस हा पर्याय उत्तम असणार आहे.
३) मेडिकल सर्व्हिसेस
कधीना कधी सगळ्यांच दवाखाण्यात जावं लागत. कोरोना नंतर तर या सर्व्हिसेस मध्ये जास्तच स्कोप वाढला आहे. खासगी हॉस्पिटल, मेडिकल मध्ये मिळणार पगार जास्त असतो. एमबीबीएस झाल्या झाल्या महिन्याला १ लाख रुपये पगार मिळतो.
डॉक्टरांबरोबर फार्मासिस्ट, क्लिनिक मॅनेजर, लॅब टेक्निशन सारखे जॉबला सुद्धा चांगला पगार मिळतो. मात्र या सर्व्हिसेससाठी पेंशनची जास्त गरज आहे.
४) आयटी प्रोफेशन्सल
ज्यांची नवीन तंत्रज्ञान शिकण्याची तयारी आहे. आणि शिकलेले तंत्रज्ञान रियल लाईफ मध्ये अंमलबजावणी करण्याची तयारी असल्यास चांगले पॅकेज मिळू शकतो. बिग डेटा इंजिनियर, क्लाऊड इंजिनियर, मोबाईल ऍप डेव्हलपर, डेटा सिक्युरिटी, इन्फो सिस्टीम सिक्युरिटी असे ऑप्शन उपलब्ध आहे.
मात्र यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगल्या कॉलेज मधून इंजिनियरिंग करणं गरजेचं आहे. ७ लाखांपासून कोटींपर्यंत पॅकेज मिळू शकत.
५) इंजिनियरिंग
यात मेकॅनिकल, कम्प्यूटर, प्रोडक्शन, केमिकल इंजिनियरिंग पेक्षाही इतर चांगले ऑप्शन आहेत. जेनेटिक इंजिनीअरिंग, एरो स्पेस, बायोटेक क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. नोकरी देतांना कुठल्या कॉलेज मधून तुम्ही डिग्री घेतली हे पाहिलं जात.
त्यामुळे गव्हर्मेंट आणि आयआयटी कॉलेज मधून इंजिनियरिंग करायला हवं. चांगले प्लेसमेंट होणाऱ्या कॉलेजची निवड महत्वाची ठरते. त्यामुळे चांगले कॉलेजे मिळावे म्हणून ११ वी पासून मेहनत करायला हवी.
६) कंपनी अकॉउंटन्ट (CA)
पहिल्या प्रयत्नात जर कंपनी अकॉउंटन्ट झाला तर मार्केट मध्ये बेस्ट कंपन्या तुम्हाला पहिले संधी देतात. आणि त्यानंतर पुरेशी प्रॅक्टिस झाल्यावर स्वतःची फर्म सुद्धा सुरु करता येते.
कंपनी अकॉउंटन्टची फायनल एक्साम झाल्यावर पहिल पॅकेज ७ लाखांपासून सुरु होत.
७) कंपनी सेक्रेरेटरी
कंपनी सेक्रेरेटरी हा कंपनीचा बॅक बोन असतो. कंपनी आणि लोकांमधील दुवा कंपनी सेक्रेरेटरी असतात. कंपनीला कुठलीही समस्या असेल तर तो सोडविण्याची जबाबदारी कंपनी सेक्रेरेटरीवर असते. त्यामुळे या पदाला फार महत्व असते.
कंपनी संदर्भात मॅनेजमेंटला सल्ला देण्याचे काम कंपनी सेक्रेरेटरी करत असतात. भारतात बाहेर देशातील कंपन्या गुंतवणूक वाढवत आहेत. यामुळे या क्षेत्राचा भविष्य चांगले आहे. १२ वी झाल्यानंतर कंपनी सेक्रेरेटरी होण्यासाठी तयारी करावी लागते.
कंपनी सेक्रेरेटरी झाल्यानंतर महिन्याला ३५ हजारांपासून ते दिड लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.
८) मॅनेजमेंट कन्सल्टंट
एमबीए झाले असेल किंवा याची तयारी करत असाल तर मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
मार्केट मध्ये नेहमी चड उतार येत असतात अशावेळी बिझनेस कन्सल्टंट मोठी गरज असते. इथून पुढे या क्षेत्रातील नोकरीला मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे. तसेच कन्सल्टंटसी फी आकारून सेवा देऊ शकत.
मॅनेजमेंट कन्सल्टंट क्षेत्रात महिन्याला ३५ हजारांपासून ते २ लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.
९) वकील
क्रिमिनल केस असुद्या अथवा मालमत्ते संदर्भातील वाद असुद्या अशा सगळ्या प्रकरणात वकिलांचा सल्ला महत्वाचा असतो. पैसे कमविण्याची मोठी संधी या क्षेत्रात आहे. यातही क्रिमिलियर लॉयर, फॅमिली लॉयर, कॉरपरेटर लॉयर, बिझनेस लॉयर असे वेगवेगळे प्रकार यात आहेत.
यासाठी एलएलबी, एलएलएम सारखी डिग्री गरजेची असते.
१०) एव्हिएशन सर्व्हिसेस
सध्या एव्हिएशन क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यात कमर्शिअल पायलट म्हणून काम करू शकता. यात पगार तर चांगला आहे त्याचबरोबर जगभर भ्रमंती करायला सुद्धा मिळते. मात्र, कमर्शियल पायलटसाठी लागणारे लायसन्स मिळविण्यासाठीजे कोर्स आहेत त्याची फी ४५ लाखांपर्यंत आहे.
कोर्ससाठी १२ नंतर ऍडमिशन घ्यावे लागते. या क्षेत्रात महिन्याला ३ ते ५ लाख रुपये पगार मिळू शकतो.
हे ही वाच भिडू
- आयटीतला जॉब सोडून त्यानं काय केलं, तर गाढविणीच्या दुधात पैसा असतोय हे शोधलं
- बँकेचा कंटाळवाणा जॉब सोडला आणि सुरु झालं मेक माय ट्रिप..!
- गाजावाजा करत ऑनलाईन स्वरूपात सुरु झालेले टिचिंग प्लॅटफॉर्म आता ऑफलाईनकडे वळलेत