IAS, IFSच्या नोकऱ्या सोडून निवडणुका लढल्या आणि राजकारण्यांना ‘राजकारण’ शिकवून गेले

उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत एक ट्रेंड पाहायला मिळत आहे. ज्यात अधिकारी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणुका लढवत आहे. हा ट्रेंड काही नवीन नाही यापूर्वी अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी राजकारणात आपली किस्मत आजमावली आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात यश सुद्धा मिळाले आहे. 

अशाच १० अधिकारी जे की, राजकारणात पुढे गेलेत त्याबद्दल पाहुयात 

सध्याचा राजकीय आलेख पाहता यात टॉपला केरजरीवाल यांचं नाव घ्यावं लागेल 

                           अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री

केजरीवाल यांनी १९८९ मध्ये IIT खरगपूरमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली. १९९२ मध्ये ते भारतीय महसूल सेवेत रुजू झाले. काही वर्षांनंतर, ते भारतीयांना माहितीचा अधिकार मिळावा यासाठी प्रचारक बनले आणि २००६ मध्ये इमर्जंट लीडरशिपसाठी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा  रॅमन मॅगसेसे पुरस्कार जिंकला.

यानंतर त्यांचा आलेख वाढतच गेला

२०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली केजरीवाल हे  जनलोकपाल चळवळीचा प्रमुख चेहरा बनले होते. माध्यमांसमोर केजरीवाल हेच येत असत. त्यामुळे संपूर्ण देशाला ते माहित झाले होते.  त्यानंतर सगळे सांगत होते त्याप्रमाणे २०१२ मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना केली.

पक्ष स्थानेसाठी त्यांनी जनलोकपाल चळवळीचा फायदा घेतला आणि आपले बस्तान बसविले.  दिल्ली विधानसभेत हा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला. २०१३ मध्ये निवडणूक झाली आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने केजरीवाल मुख्यमंत्री झाले.

मात्र केवळ ४९ दिवसांनंतर, त्यांचे सरकार पडले, केवळ २०१५ मध्ये ७० पैकी ७० जागां जिंकत  सत्तेवर परतले होती तसेच २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत ६२ जागेवर आपले उमेदवार जिंकून आले आहेत.

अजित जोगी

अजित जोगी यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते जिल्हाधिकारीही होते. १९६८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रोत्साहन दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जोगी छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री बनले होते.

एकेकाळी गांधी घराण्याचे निष्ठावंत, जोगी यांना भ्रष्टाचार आणि फौजदारी खटल्यांच्या अनेक आरोपांना सामोरे जावे लागले होते. तसेच त्यांचा आमदार मुलगा अमित याला  सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर २०१६ मध्ये जोगीनी  काँग्रेस सोडली. त्यानंतर त्यांनी छत्तीसगड जनता काँग्रेसची स्थापना केली होती. मात्र त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही.  

यशवंत सिन्हा

पाटणा येथील यशवंत सिन्हा १९६० मध्ये आयएएस झाले आणि १९८४ पर्यंत ते अधिकारी होते. भाजपमध्ये जाण्यापूर्वी ते जनता दलाचे दलात होते. १९९०-९१ मध्ये ते चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री होते.

२०१८ मध्ये त्यांनी पक्ष नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे भाजप सोडले. त्यांचा मुलगा जयंत सिन्हा अजूनही भाजप मध्ये आहे.

मीरा कुमार

२००९ ते २०१४ या काळात लोकसभा अध्यक्षपद भूषविणाऱ्या भारतातील पहिल्या महिला म्ह्णून मीरा कुमार यांचे नाव घेतले जाते. त्यांचे वडील बाबू जगजीवन राम यांनी उपपंतप्रधान होते.कुमार १९७३ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या होत्या आणि त्यांनी एक दशकाहून अधिक काळ नोकरी केली होती.

१९८५ मध्ये बिजनौर पोटनिवडणुकीत रामविलास पासवान आणि मायावती यांचा पराभव करून  राजकारणात आल्या.

२००४ मध्ये, त्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री पदभार स्वीकारला. २०१७ मध्ये काँग्रेसने भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी दिली होती.

 मणिशंकर अय्यर

लाहोरमध्ये जन्मलेले मणिशंकर अय्यर १९६३ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले होते. १९८९ मध्ये त्यांनी राजकारणात येण्यासाठी निवृत्तीचा निर्णय घेतला. ते १९९१ मध्ये तामिळनाडूतील मायिलादुतुराई मतदासंघातून लोकसभेवर निवडून आले होते. 

डून स्कूलमध्ये राजीव गांधी यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले अय्यर हे काँग्रेस घराण्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या “चायवाला-पंतप्रधान-प्रधानमंत्री” टिप्पणी आणि गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदींना “नीच आदमी” असे म्हणाले होते. त्यांचे काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले होते ते मागे घेण्यात आले आहे.

                                                    नटवर सिंग

नटवर सिंग ३१ वर्षे परराष्ट्र सेवेत होते. त्यांनी चीन आणि अमेरिके सारख्या महत्त्वाच्या देशात दूतावासात म्हणून होते.

१९८४ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते आठव्या लोकसभेत राजस्थानच्या भरतपूरमधून निवडून आले होते. त्याच वर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 १९८५ मध्ये ते राजीव गांधींच्या सरकारमध्ये पोलाद, कोळसा आणि खाणी आणि कृषी मंत्रालयात राज्यमंत्री झाले. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केले. सिंग हे एकेकाळी गांधी घराण्याच्या खूप जवळचे होते आणि काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांना “सोनिया” म्हणून संबोधणारे ते कदाचित एकमेव नेते होते.

  हरदीप सिंग पुरी

हरदीप सिंग पुरी हे सध्या मोदी सरकार मध्ये नागरी उड्डाणमंत्री आहेत. 

पुरी १९७४ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले होते त्यांनी इंग्लड आणि ब्राझीलमध्ये राजदूत म्हणून काम केले. ते जिनिव्हा तसेच न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी देखील होते आणि ऑगस्ट २०११ आणि नोव्हेंबर २०१२ मध्ये ते- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे दोनदा अध्यक्ष होते. त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे दहशतवादविरोधी अध्यक्ष म्हणूनही काम केले.  

पुरी यांनी जानेवारी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

 

                                      राजकुमार सिंग

राज कुमार सिंग हे १९७५ च्या बॅचचे बिहार-केडरचे माजी आयएएस अधिकारी होते. त्यांनी केंद्रीय गृहसचिव म्हणून काम केले आहे. सिंग समस्तीपूरचे जिल्हा दंडाधिकारी होते तेव्हा भाजप नेते  अडवाणींना रथयात्रेदरम्यान अटक करण्यात आली होती.

 सिंह २०१३ मध्ये भाजपमध्ये सामील झाले होते. 

                                 सत्यपाल सिंग

सत्यपाल सिंग हे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणूनही काम केले होते १९९० मध्ये मुंबईतील संघटित गुन्हेगारी नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सिंह यांना 

२०१४ मध्ये त्यांनी मुंबई पोलीस प्रमुखपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी बागपत जागा लढवली आणि जिंकली. 

                                        अल्फोन्स कन्नन्थनम

केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील रहिवासी असलेले अल्फोन्स कन्नन्थनम हे १९७९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

१९९० च्या दशकात दिल्ली विकास प्राधिकरणाचे आयुक्त असताना अल्फोन्स प्रसिद्धीच्या झोतात आले, जेव्हा त्यांनी अनेक बेकायदेशीर इमारती पाडल्या होत्या आणि १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची जमीन परत मिळवली होती. यामुळे त्यांना ‘डिमॉलिशन मॅन’ हा किताब मिळाला होता. ते २००६ मध्ये आयएएसमधून निवृत्त झाले आणि त्याच वर्षी डाव्या लोकशाही आघाडीच्या पाठिंब्याने कोट्टायममधील कांजिरप्पल्ली येथून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.

२०११ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सहा वर्षांनंतर ते राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.