या दहा जणांनी नागरिकांच्या हक्कांसाठी स्वत:च्या करिअरवर पाणी सोडल

बोललं पाहीजे मग ते कोणत्याही बाजूने असो. कोणाची बाजू खरी आणि कोणाची खोटी हा नंतरचा मुद्दा पण बोललं पाहीजे हे नक्की.

आत्ता परवाच शरद पवार म्हणाले, आपल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलताना नीट माहिती घेऊन व्यक्त व्हावं असा माझा सचिनला सल्ला राहील. थोडक्यात सचिनचं मत पवारांनी खोडून काढलं. म्हणून त्याचं बोलणं चुकीचं ठरणार नाही. मत हे व्यक्त करायलाच हवं. मग ती रिहाना असो की मिया किंवा कंगना. आपल्या देश, आपलं राज्य आमचं आमचं बघतो म्हणून कधीच चालणार नाही.

विशेष म्हणजे सेलिब्रिटींच बोलणं अधिक महत्वाचं आहे हे देखील खरं. पण बऱ्याचदा काय होतं कशाला नसत्या लडतरीत पडावं म्हणून सेलिब्रेटी बोलणं टाळतात. मराठीत या बाजूने किंवा त्या बाजूने बोलणारी माणसं किती आहे, सेलिब्रिटी किती आहेत? असाच हा मुद्दा..

असो, तर दहा जणांची नावे आहेत. या दहा जणांचा उल्लेख सेलिब्रिटी म्हणून केला जातो. या दहा जणांच धाडस म्हणजे ते बोलले. विशेष म्हणजे ते सत्तेची नाही तर विरोधाची भाषा बोलले. आपलं करियर पणाला लावून बोलले.

१) निना सिमोन

आफ्रिकन वंशाच्या अमेरिकन संगीतकार म्हणजे निना सिमोन. त्यांच्या आवाजामुळे त्या प्रसिध्द होत्या. अमेरिकेतील वर्णभेदाच्या यातना भोगाव्या लागणाऱ्या नागरिकांच्या समर्थनात त्यांनी आवाज उचलला. त्या सातत्याने कृष्णवर्णीय लोकांच्या हक्कांची भाषा करत होत्या.

याचा परिणाम असा झाला की, त्यांच्याविरोधात राजकारण करण्यास सुरवात झाली. अनेक कार्यक्रमात त्यांना बोलावणं बंद करण्यात येवू लागलं. आर्थिक उत्पन्नाची साधने शक्य तितकी बंद करण्यात आली. याचा रिझल्ट म्हणजे त्या तरिही बोलत राहिल्या.

 

२) हॅरी बेलाफोंटे

हॅरी बेलाफोंटे हा एक प्रसिध्द संगीतकार. नागरी हक्कांच्या साठी लढणारा माणूस म्हणून प्रसिद्ध. मार्टिन ल्यूथर किंगचा हा कार्यकर्ता होताच पण त्यांचा जवळचा मित्र देखील होता. नागरी हक्क, वर्णद्वेष याच्या विरोधात तो सातत्याने बोलत राहिला.

याचा परिणाम म्हणजे अमेरिकन माध्यमांनी त्याला कम्युनिस्ट लेबल लावलं.

 

३) कॉलिन केपर्निक

कॉलिन केपर्निक हा एक अमेरिकन फुटबॉलपट्टू होता. हा देखील वर्णद्वेषाविरोधात बोलायचा. फक्त बोलून तो थांबला नाही तर कृती देखील करू लागला. NF गेम्सच्या वेळी त्याने राष्ट्रगीत सुरू असताना उभा राहण्याऐवजी गुडघे टेकून आपला निषेध नोंदवला.

याचा परिणाम म्हणजे त्याला संघातले स्थान गमवावे लागले. करियरचा प्रश्न उभा राहिला. तरिही तो बोलत राहिला.

 

४) सर डॉन ब्रॅडमन

सर डॉन ब्रॅडमन यांच नाव कोणास माहिती नाही. कसोटी क्रिकेटमधला हा बेताज बादशहा. खरा गॉड. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टिमचे प्रशिक्षक असताना त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्ष जॉन व्होस्टर यांची भेट घेतली होती. तिथे मुद्दा निघाला तो कृष्णवर्णीय खेळाडूंना क्रिकेट खेळवण्याचा. दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी यास विरोध केला. ब्रॅडमन यांनी त्यास विरोध केला. ब्रॅडमन हे नाव मोठ्ठं होतं. त्यांच्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डावरच २० वर्षांची बंदी आली.

पण महत्वाची गोष्ट अशी की ब्रॅडमन हे गोरे होते. तथाकथित उच्च. तरिही त्यांनी कृष्णवर्णीयांसाठी लढा दिला. कृती केली. ही संपूर्ण गोष्ट तूम्ही ब्रॅडमनची आणि आफ्रिकन पंतप्रधानांची भेट त्यांच्या टीमला २० वर्षांसाठी बॅन करून गेली या लिंकवर क्लिक करुन वाचू शकता.

 

५) महम्मद अली

जगप्रसिद्ध बॉक्सर महम्मद अली. अमेरिकेने लादलेल्या व्हिएतनाम युद्धाला जाण्यासाठी त्याचं नाव ड्राफ्ट करण्यात आलं. त्याने यास विरोध केला. त्यासाठी फक्त आपल्या हेवीवेट बेल्टवर पाणी सोडलं नाही तर त्यासाठी तो जेलमध्ये देखील राहिला.

तो म्हणालेला, 

” माझ्या आंतरआत्माने मला सांगितलं की मी निरपराध लोकांवर का बंदुक धरू. त्यांनी कधी मला लुटलं नाही. त्यांनी मला शिवी दिलेली नाही. त्यांनी माझे राष्ट्रीयत्व हिरावून नाही घेतलं. जगातील सर्वाधिक श्रीमंत देशासाठी मी जगातील सर्वांधिक भूकेला निरपराध्यांवर गोळी का चालवू..”

 

६) टॉमी स्मिथ, जॉन कार्लोस आणि पीटर नॉर्मन

मेक्सिकोत १९६८ च्या ऑलम्पिक दरम्यान टॉमी स्मित आणि जॉन कार्लास या खेळाडूंनी ऑलम्पिक मेडल जिंकले. प्रथमेप्रमाणे राष्ट्रगीत सुरू झाले. तेव्हा अमेरिकेच्या या दोन खेळाडूंनी हात अभिमानाने वर उंचावून मान खाली घातली. ऑलम्पिक प्रोजेक्ट फॉर राईट्स चे हे सदस्य होते. ही संपुर्ण स्टोरी तुम्ही,

या लिंकवर क्लिक करुन वाचू शकता.

 

७) शबाना आझमी

कम्युनिस्ट विचारांचे सफदर हाश्मी यांचे नाव आजही भारतीय नाट्यसृष्टीत आदराचं नाव आहे. सफदर हाश्मी यांची हत्या करण्यात आल्यानंतर चित्रपट अभिनेत्री शबाना आझमी यांनी उघड भूमिका घेतली.

तत्कालीन कॉंग्रेस सरकारवर टिका करताना त्या तुटून पडल्या. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी १९८९ च्या १२ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या व्यासपीठाचा आधार घेतला. या व्यासपीठावरून त्या म्हणाल्या होत्या,

 

८) जॉन बॉएगा

जॉर्ज फ्लाईंडच्या हत्येनंतर पोलिसांविरोधात अनेक सेलिब्रिटींनी आवाज उठवला होता. यापैकी एक होते जॉन बॉएगा. एकेकाळी स्टार वॉर्स सिरीजमधील मुख्य स्टार. त्यांच्या नावाने पिक्चर खपतो अशी त्यांची ओळख होती पण जस जस स्टार वॉर्सचे पुढचे सिनेमे येत गेले तस तस त्यांचा पिक्चरमधला रोल कमी कमी होत गेला. अनेकांचा असा आरोप आहे की जॉन बोएगा कृष्णवर्णीय असल्यामुळे हे घडलं.

जॉर्ज फ्लॉइडच्या निमित्तानं जेव्हा आंदोलने सुरु झाली तेव्हा जॉनसुद्धा रस्त्यावर उतरला. हातात करणं घेऊन त्याने धुवाधार भाषणे केली.

“सगळ्या संकटावर मात करत आपण आज इथवर पोहचलो आहे आणि यावेळीदेखील आपण जिंकणारच. मला माहित नाही यानंतर मला काम मिळेल की नाही. जर या नंतर माझे करियर खड्ड्यात गेले तरी चालेल मी मागे हटणार नाही.” 

९)अरेथा फ्रँकलिन

अरेथा फ्रँकलिन हि एक सिंगर होती. अमेरिकेत तिला क्वीन ऑफ सोल म्हणून ओळखलं जायचं. ती मेली तेव्हा अमेरिकेची आजवरची सर्वोत्कृष्ट गायिका असं तिच्या बद्दल म्हटलं गेलं. पण ती जेव्हा जिवंत होती तेव्हा मात्र तिला श्रोत्यांच म्हणावं तेवढं प्रेम लाभलं नाही. यामागचं कारण म्हणजे अरेथा ही अँजेला डेव्हिसची एक समर्थक मानली जायची. डेव्हीस हे रंगभेदी विरोधात तसच मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या जगातील प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. अरेथा वर्णभेदी चळवळीशी जोडली गेल्याचा परिणाम तिच्या लोकप्रियतेवर झाला. पण तिने त्याची पर्वा केली नाही.

१०)पॉल न्यूमन

न्यूमन हा हॅलिवुडचा एक प्रसिध्द अभिनेता आणि दिग्दर्शक. ऑस्कर आणि बाफता सारखे जगातील सर्वोच्च मानले जाणारे पुरस्कार त्यांच्या नावाशी जोडले गेलेले. अगदी सुरवातीच्या काळापासून अमेरिकेत नागरी हक्कांच्या चळवळीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होता. १९६३ साली जेव्हा मार्टिन ल्युथर किंग यांनी कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी मोर्चा काढला तेव्हा पॉल न्यूमन त्यात सहभागी तर झालाच पण सोबत मार्लन ब्रँडो आणि बॉब डिलन या सेलिब्रिटींना या चळवळीशी जोडले.

अभिनयातून निवृत्त झाल्यावर न्यूमनने न्यूमन्स ओन ही खाद्यपदार्थ बनविणारी कंपनी सुरू केली व त्यात होणारा सगळा फायदा दरवर्षी दान केला. त्याचा मृत्यूनंतरही ही प्रथा कायम आहे.

हेही वाच भिडू

सचिनच्या या चुका पाहून वाटतं तो देव नाही, तुमच्या आमच्या सारखा चुकणारा माणुसच.

ब्रॅडमनची आणि आफ्रिकन पंतप्रधानांची भेट त्यांच्या टीमला २० वर्षांसाठी बॅन करून गेली

या दोन खेळाडूंनी देशातील प्रश्नाला जगाच्या व्यासपीठावर वाचा फोडली

Leave A Reply

Your email address will not be published.