आशिया चषकातील भारत-पाक मॅचमधील या १० आश्चर्यकारक गोष्टींवर तुमचा विश्वास बसणार नाही !

आशिया चषकातील भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यानची  बहुप्रतिक्षित मॅच आज दुबईत खेळवली जाणार आहे. आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या या सामन्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतोय १९८६ आणि २०१४ सालच्या आशिया चषकात खेळविण्यात आलेल्या भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यानच्या मॅचमधील अशा काही समानता ज्यावर विश्वास ठेवणं तुम्हाला कदाचित अवघड जाईल.

त्या वाचून तुमचं डोकं देखील चक्रावून जाऊ शकतं ! अशा गोष्टी ज्या केवळ योगायोगानेच घडू शकतात !!

१) टॉस.

१९८६ सालच्या आशिया चषकातील सामना शारजा येथे खेळवला गेला, तर २०१४ साली ही मॅच ढाक्यात खेळविण्यात आली. म्हणजेच दोन्ही वेळा हा सामना त्रयस्थ ठिकाणी खेळविण्यात आला.

दोन्ही मॅचमध्ये पाकिस्तानने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.

२) भारताचा स्कोअर.  

दोन्हीही मॅचमध्ये प्रथम बटिंग करताना भारतीय संघाने २४५ रन्स काढले. १९८६ सालच्या सामन्यात भारताचा स्कोअर होता ७ विकेट्स गमावून २४५ रन्स, तर २०१४ साली स्कोअर होता ८ विकेट्स गमावून २४५ रन्स.

म्हणजेच दोन्हीही मॅचमध्ये पाकिस्तानसमोर मॅच जिंकण्यासाठी २४६ रन्सचे लक्ष्य ठेवण्यात आले.

हे ही वाचा –

३) ओपनरने फटकावलेले अर्धशतक आणि सिक्सर्स.

१९८६ सालच्या सामन्यात भारताकडून ओपनर के.श्रीकांत यांनी ८० बॉल्समध्ये ७५ रन्सची इनिंग साकारत अर्धशतक झळकावलं, तर २०१४ साली  हाच कारनामा भारताचा ओपनर रोहित शर्माने केला. त्याने ५८ बॉल्समध्ये ५६ रन्स काढले.

विशेष म्हणजे या दोन्हीही ओपनर्सनी आपल्या इनिंग दरम्यान प्रत्येकी  २ सिक्सर्स सिक्सर्स लगावले.

४) भारताकडून ३ फिफ्टीज.

दोन्हीही सामन्यात भारताकडून ३ फिफ्टीज झळकावण्यात आल्या.

१९८६ साली के.श्रीकांत (७५), सुनील गावसकर (९२) आणि दिलीप वेंगसरकर (५०) या तिघांनी फिफ्टीज झळकावल्या, तर २०१४ साली रोहित शर्मा (५८), अंबाती रायडू (५८) आणि रवींद्र जडेजा (५२) या तिघांनी फिफ्टीज ठोकल्या.

५) पाकिस्तानच्या इनिंगमध्ये दोघे धावबाद. 

दोन्हीही सामन्यात पाकिस्तानच्या इनिंगमध्ये २ खेळाडू रन-आउट झाले. १९८६ साली सलीम मलिक आणि वसिम आक्रम रन-आउट झाले होते, तर २०१४ सालच्या सामन्यात पाकिस्तानचा कॅप्टन मिसबाह-उल-हक आणि शोएब मकसूद हे दोघे रन-आउट झाले.

६) शेवटची ओव्हर.

१९८६ सालच्या सामन्यात भारताकडून ३ विकेट्स घेणाऱ्या चेतन शर्मा याने मॅचची शेवटची ओव्हर टाकली, तर २०१४ साली सामन्यात भारताकडून ३ विकेट्स घेणाऱ्या आर.अश्विन याने मॅचची शेवटची ओव्हर टाकली.

७) दहाव्या क्रमांकावरील खेळाडू पहिल्याच बॉलवर बाद.

दोन्हीही सामन्यात पाकिस्तानचे दहाव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलेले खेळाडू पहिल्याच बॉलचा सामना करताना शून्यावर बाद झाले.

१९८६ साली दहाव्या क्रमांकावरील झुल्करनैन याला चेतन शर्माने पहिल्याच बॉलवर शून्यावर बाद केले होते, तर २०१४ साली दहाव्या क्रमांकावरील सईद अजमल याला आर.अश्विन याने  पहिल्याच बॉलवर शून्यावर बाद केले.

८) अकराव्या क्रमांकावरील खेळाडूकडून सिंगल घेत स्ट्राईक रोटेट

१९८६ साली अकराव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या तौसीफ अहमद याने अतिशय महत्वपूर्ण सिंगल घेत घेत स्ट्राईक जावेद मियादादकडे दिला, तर २०१४ साली अकराव्या क्रमांकावरील जुनैद खान याने महत्वाच्या वेळी सिंगल घेत शाहीद आफ्रिदीला स्ट्राईक दिला.

९) सिक्सर ठोकून पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताचा विजयाचा घास हिरावला. 

स्ट्राईकवर आलेल्या जावेद मियाँदादने चेतन शर्माच्या मॅचमधील  शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सिक्सर ठोकला आणि पाकिस्तानला आशिया चषकाचे विजेतेपद मिळवून दिले.

मियाँदादच्या याच कारनाम्याची पुनरावृत्ती २०१४ सालच्या सामन्यात स्ट्राईकवर आलेल्या शाहीद आफ्रिदीने केली. आफ्रिदीने शेवटची ओव्हर टाकणाऱ्या आर.अश्विनला सिक्सर लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

१०) विशेष म्हणजे दोन्हीही सामन्यात पाकिस्तानने १ विकेट राखून विजय मिळवला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.