लव्ह जिहाद हा शब्द अलीकडे आलाय, पण पहिली केस १०० वर्षांपूर्वी घडली होती

दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे समाजमन हेलावून गेलंय. आफताब अमीन पुनावालाने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. त्यानंतर १८ दिवस त्या तुकड्यांची जंगलामध्ये विल्हेवाट लावली.

ही घटना उजेडात आल्यानंतर पुन्हा एकदा लव्ह जिहादची चर्चा केली जात आहे.

आफताब अमीनने कथितपणे लव्ह जिहादमधून श्रद्धाची हत्या केली असा आरोप केला जातोय. या हत्याकांडापूर्वी सुद्धा लव्ह जिहादचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला आहे. सुरुवातीला २०१०-२०१२ च्या काळात केरळमध्ये हिंदू मुलींचे बळजबरी मुस्लिम धर्मात धर्मांतर करून लव्ह जिहाद पसरवला जातोय असा आरोप करण्यात आला होता.

लव्ह जिहादची चर्चा साधारणपणे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून केली जाते. सुरुवातीला रोमिओ जिहाद नावाचा शब्द प्रचलित होता परंतु त्यानंतर लव्ह जिहाद असा शब्दप्रचार रूढ झाला असं सांगितलं जातं.

जर एखादा मुस्लिम व्यक्ती बळजबरी हिंदू मुलीचं धर्मांतर घडवून तिच्याशी लग्न करत असेल तर त्याला लव्ह जिहाद असं म्हटलं जात.

पण अलीकडे चर्चा होणाऱ्या या लव्ह जिहादच्या घटनांचा इतिहास १०० वर्ष जुना आहे.

१९२० च्या दशकात हिंदू महिलांचं बळजबरी धर्मांतर करून त्यांच्याशी मुस्लिम धर्मीय पुरुष लग्न करतात असा आरोप त्याकाळी झाला होता.  या घटनांमध्ये हिंदू महिलांचं बळजबरी धर्मांतर करण्यात येत असं काही गटाचे म्हणणे होते.  

१९२४ मध्ये बनारस शहरातील एका हिंदू महिला तिच्या पतीला सोडून मुस्लिम व्यक्तीबरोबर राहायला गेली होती. तर एप्रिल १९२७ मध्ये झांशी शहरातील एका मुस्लिम व्यक्तीने एका वैश्येला स्वतःच्या घरी ठेवलं होतं. ती वैश्या मुळात हिंदू होती मात्र मुस्लिम व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. या घटनांमध्ये जास्त तणाव निर्माण झाल्याच्या नोंदी आढळत नाहीत असं सांगितलं जातं. 

प्रकरणामध्ये काय झालं याच्या स्पष्ट नोंदी नसल्या तरी पहिला सगळ्यात मोठा दंगा १९२७ च्या मुजफ्फरनगरच्या घटनेमुळे झाला होता तो.

१९२७ मध्ये मुजफ्फरनगर शहरात एका हिंदू मुलीचं बळजबरी मुस्लिम धर्मांतर करून तीच एका मुस्लिम पुरुषाशी लग्न लावून देण्यात आलंय अशी अफवा पसरली होती. या अफवेनंतर शहरामध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येने हिंदू धर्मीय एक झाले आणि ते मुस्लिम व्यक्तीच्या घरी गेले. 

जेव्हा ही सगळी गर्दी मुस्लिम व्यक्तीच्या घरी पोहोचली आणि दोघांची तपासणी करण्यात आली. तेव्हा असं लक्षात आलं की, मुस्लिम व्यक्तीशी लग्न करणारी मुलगी ही मुळात मुस्लिम धर्मीयच आहे. तिचं कोणत्याही प्रकारे धर्मांतरं करण्यात आलेले नाही. जेव्हा सगळ्या गर्दीला हे कळलं तेव्हा ती सगळी गर्दी पांगली. 

१९२०-३० च्या दशकात घडलेल्या या घटनेची अनेकांनी नोंद केली होती. आंतरधर्मीय अफवेच्या आधारावर मोठ्या संख्येने हिंदू धर्मीय लोकं गोळा होण्याची ही पहिलीच घटना मानली जाते. त्यानंतर आंतरधर्मीय विवाहांवरून उसळणाऱ्या अफवांवरून होणारा वाद कमी झाला असं सांगितलं जातं. 

मात्र परत १९९० च्या दशकाच्या शेवटी अशाप्रकारच्या लव्ह जिहादच्या चर्चा सुरु झाल्या. 

डॉ. आस्था त्यागी यांच्या संशोधनानुसार, 

१९९० च्या दशकाच्या शेवटी आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला गुजरात राज्यात लव्ह जिहादची चर्चा करण्यात येत होती. त्या वेळी लव्ह जिहादचा अर्थ मुस्लिम मुलाने हिंदू मुलीला फसवणे असा होता. सामान्यपणे दांडिया आणि गरब्यासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मुस्लिम मुलं हिंदू मुलींना फसवतात आणि त्यानंतर त्यांच धर्मांतर घडवतात असं मानलं जात होतं.

लव्ह जिहादचा सध्याचा नॅरेटिव्ह सुद्धा अशाच प्रकारचा आहे, ज्यात मुस्लिम पुरुष आणि हिंदू महिला यांच्या विवाहाला लव्ह जिहाद ठरवलं जातं.

२०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार हिंदू आणि मुस्लिम धर्मातील लोकांनी आंतरधर्मीय विवाहाला विरोध दर्शवला होता.

सर्व्हेत सहभागी झालेल्या ९९ टक्के हिंदूंनी सांगितलं होतं की, त्यांचे जोडीदार हिंदू धर्मीय आहेत. तर ९८ टक्के मुस्लिम लोकांनी म्हटलं होतं की त्यांचे जोडीदार मुस्लिम धर्मातीलच आहेत. या सर्व्हेत ६७ टक्के हिंदूंनी म्हटलं होतं की हिंदू महिलांना दुसऱ्या धर्मातील पुरुषाबरोबर लग्न करणे योग्य नाही. तर ८० टक्के मुस्लिमांनी म्हटलं होतं की, मुस्लिम महिलांनी दुसऱ्या धर्मातील पुसृष्टीबरोबर लग्न करणे योग्य नाही.

तर पुरुषांच्या बाबतीत ही आकडेवारी थोडी वेगळी आहे. ६५ टक्के हिंदूंनी म्हटलं होतं की, हिंदू पुरुषांनी दुसऱ्या धर्मातील महिलेसोबत लग्न करू नये. तर ७६ टक्के पुरुषांनी म्हटलं होतं की, मुस्लिम महिलांनी दुसऱ्या धर्मातील पुरुषाबरोबर लग्न करणे योग्य नाही. या आकडेवारीनुसार बहुसंख्य हिंदू आणि मुस्लिम धर्मातील लोकांचा आंतरधर्मीय विवाहाला विरोध असल्याचं दिसून येतं. 

पण लोकांचा विरोध असला तरी याबाबत भारतीय कायदा काय सांगतो.

संविधानात हिंदू धर्मीय लोकांसाठी हिंदू कोड बिल मधील हिंदू विवाह अधिनियम १९५५ या कायद्याची तरतूद आहे तर मुस्लिमांसाठी शरियाचे नियम लागू होतात. मात्र ज्यांना कोणत्याही धर्मानुसार लग्न करायचं नाही त्यांच्यासाठी स्पेशल मरीज ॲक्ट १९५४ ची तरतूद करण्यात आली आहे.

हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न करायचं असेल तर दोन्ही जोडीदार हिंदू असणे आवश्यक आहे. यात मुलगी मुस्लिम असो की मुलगा मुस्लिम असो त्यांना धर्मांतर करून आधी हिंदू व्हावं लागेल आणि त्यानंतर त्यांचा विवाह होईल. तर शरीयानुसार विवाह करायचा असेल तर मुलगा मुस्लिम असो की मुलगी मुस्लिम असो त्यांना मुस्लिम धर्म सिकराव लागेल आणि त्यानंतर शरियानुसार मुस्लिम लग्न होऊ शकतं.

मात्र दोन वेगवगेळ्या धर्मातील जोडीदारांना धर्म न बदलता लग्न करायचं असेल तर स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार लग्न करण्याची तरतूद आहे. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही सज्ञान व्यक्तीला मर्जीनुसार धर्मांतर करण्याचा आणि जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. तसेच काही राज्यांनी लागू केलेल्या लव्ह जिहाद कायद्यामध्ये सुद्धा कायदेशीर धर्मांतर करून विवाह करण्याची तरतूद आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.