झारखंडमध्ये चेटकीण समजून एक हजार महिलांना मारण्यात आलं होतं…

भुताखेतांचे विषय म्हणलं की लगेच आपण कान टवकारून ऐकायला लागतो. एक काहीतरी गूढ आणि कुतूहल बळावणारा विषय म्हणजे हॉरर. पण कधीकधी अती तिथं माती होतेच असाही पदर या गोष्टींना असतो.

जर तुम्ही झारखंड विचेस ( चेटकीण ) असं गुगल केलं तर बऱ्याच डेंजर घटना पाहायला मिळतात.

साध्या सुध्या महिलांना चेटकीण घोषीत करुन झारखंड मध्ये मारण्याचा सपाटा सुरू आहे. गेल्या शतकात एक हजारहून जास्त महिलांना या अफवेरुपी चेटकिनिने गिळंकृत केलं आहे. अतिशय दुर्दैव असलेली हि घटना मानली जाते. चेटकीण घोषित करुन महिलांना मारण्याच्या या गोष्टीचे कारण अतिशय विचित्र सांगितले जातात.

झारखंड हे राज्य अतिशय विकसनशील राज्य म्हणून सगळ्या भारताला परिचित आहे. मेडिकल सुविधांचे कायम बारा वाजलेले, कुपोषणाचे प्रमाण दिवेंदिवस वाढतच चाललेलं, घरोघर दारु पिणारा एक तरी माणूस आहेच. रोगराई, आजारपण, गरिबी अशा विळख्यात झारखण्ड राज्य सापडलं आणि त्यात भरीस भर म्हणून हे चेटकीण प्रकरण आलं.

या सगळ्या कॉकटेलचा परिणाम सगळ्या भारताला दिसून आला. जितक्या महिला चेटकीण समजून मारल्या त्यांचा शोधही लागला नाही इतकी भीषण परिस्थिती झारखंडची झालेली आहे.

महिला हरवल्याची तक्रार नाही त्यामुळे शोधण्याचा प्रयत्नही केला जात नाही. थेट मृतदेहच कुठेतरी अचानक भयानक सापडतो. झारखंडच्या एका सर्व्ह नुसार दिवसाला 3 महिलांना चेटकीण घोषित केलं जातं आणि असं करून करून शतक भरात 1000 महिलांना घेणं ना देणं आपला जीव गमवावा लागलेला आहे.

आता हे इतक्या मोठया प्रमाणावर पसरलं की एका एनजीओने सांगितल्या प्रमाणे अंधश्रद्धा मोठया प्रमाणात इथल्या लोकांमध्ये दिसून येते आणि त्याला जोड आहे ती म्हणजे अशिक्षितपणा. एखाद्या एकट्या दुकट्या असलेल्या गृहिणीला चेटकीण घोषित करायचं आणि तिची संपत्ती हडप करायची असा सगळा गेम यामागे असल्याचं बोलल जातं.

चेटकीण घोषित केलेल्या महिलेला मारहाण करणे, आजारपण वैगरे अशा बऱ्याच गोष्टी यात आहेत. भर रस्त्यात कधी कधी चेटकीण घोषित केलेल्या महिलेला पेटवून देणे असे भीषण प्रकार झारखंडमध्ये घडतात.

पण या सगळ्यांवर बंड केलं ते म्हणजे चटनी देवी यांनी. 2021 साली चटनी देवी यांना चेटकीण प्रकरणा विरुद्ध लढल्यामुळे भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

1995 साली जेव्हा घरातले आजारी पडले तेव्हा काही लोकांनी त्यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला, लघवी प्यायला लावली, अंगावरचे कपडे फाडले पण चटनी देवी यांनी क्रांतिकारक पाऊल उचलत या सगळ्या प्रकरणाला धीरोदात्तपणे तोंड दिलं.

चटनी देवी यांच्या या कृत्यामुळे काही अंशी हे प्रकरण थांबलं पण 4556 केसेस 2015 ते 2020 च्या दरम्यान नोंदवण्यात आल्या होत्या. शिक्षणाचा अभाव असल्याने या घटना वाढत गेल्या. अजुनही भारत सरकार हे सगळं थांबवण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत आहेत. पण गेल्या शतकात एक हजारहून अधिक जास्त महिलांना चेटकीण घोषित करुन मारण्यात येणं ही गोष्टच किती भीषण आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.