OLA च्या इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्ट्रीची कमान आता फक्त महिला सांभाळणार !

तुम्ही कधी अशी फॅक्ट्री पाहिलीय का जिथे पूर्णपणे महिला राज असेल, जिथे महिलाच सर्व जबाबदाऱ्या सांभाळतात, मग ते कर्मचारी म्हणून असो वा बॉस असो. ऑटोमोबाईल असं क्षेत्र समजलं जातं ज्यात फक्त पुरुषांचं वर्चस्व असते. पण आता काळ बदलला आहे.

ओलाचे सह-संस्थापक भविश अग्रवाल यांनी जाहीर केलेय की, कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी आता फक्त महिला चालवतील आणि हि फॅक्टरी जवळपास १०,०००  हून अधिक महिलांना रोजगार देणार आहे.

“आत्मनिर्भर भारताला आत्मनिर्भर महिलांची गरज आहे!

केवळ महिला कामगार असणारा हा जगातील सर्वात मोठा ओला चा कारखाना असणार आहे.  या कारखान्यात काम करणाऱ्या महिलांची पहिली तुकडी देखील तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

 

ओला कंपनीने या आठवड्यात पहिल्या बॅचचे स्वागत केले आहे.  महिला कामगारांची एकमेव ऑटोमोटिव्ह उत्पादन युनिट आहे ज्याची चर्चा जगभरात होत आहे.

आर्थिक संधी असलेल्या स्त्रियांना जर आपण सक्षम केलं तर त्यांचे आयुष्यच नाही तर त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण समाजाचे देखील जीवन सुधारू शकते. खरं तर, अनेक अहवालाचे आकडे दर्शवतात की  महिलांना श्रमशक्तीमध्ये समानता उपलब्ध करून दिली तर भारताचा जीडीपी २७ टक्क्यांनी वाढू शकतो. परंतु यासाठी आपल्या सर्वांच्या सक्रिय आणि जागरूक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

तसेच ओला कंपनीने आपल्या पहिल्या बॅच मधील महिलांना उत्पादन कौशल्ये आणि मुख्य क्षेत्रांमध्ये महिला कामगारांना प्रशिक्षण आणि अतिरिक्त कौशल्ये शिकवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे आणि ते ओला फ्यूचरफॅक्टरीमध्ये तयार केलेल्या प्रत्येक वाहनाच्या उत्पादनासाठी जबाबदार असणार आहे.

ओलाने गेल्या वर्षी तमिळनाडूमध्ये आपला पहिला इलेक्ट्रिक स्कूटर कारखाना उभारण्यासाठी २,४००  कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती.

या ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे आणि येत्या ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरी देखील सुरू होणार आहे.

भविष्यात भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व दुचाकी आता इलेक्ट्रिक बाईक्स असतील.

भविष्यात भारताला इलेक्ट्रिक व्हेईकल हबमध्ये नेण्यासाठी उत्पादकांनी लाभ घेणे आणि गुंतवणूक करणे खूप आवश्यक आहे. ओला भारतात आधीच इलेक्ट्रिक कारचा ताफा चालवते. ओलाने भारतातील विविध शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहने चालवायला सुरुवात पण केली आहे आणि त्याच वेळी त्यांची वाहनं चार्ज करण्यासाठी हब तयार केले आहे.

ओला फ्यूचरफॅक्टरी हे जगाच्या भविष्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे.

१५ ऑगस्ट रोजी ओला इलेक्ट्रिकने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर S१ ही ९९,९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केली. आणि आता येत्या ऑक्टोबरपासून स्कूटरची डिलिव्हरी सुरू करणार आहेत असं कंपनीने जाहीर केलं आहे.

 या स्कूटरची किंमत त्या-त्या राज्यांवर अवलंबून असणार आहे.

राज्य सहाय्यकांनुसार ऑन-रोड किंमत कमी-जास्त असू शकते.  तामिळनाडूमध्ये कृष्णागिरी प्लांट विकसित करण्याची आणि भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचे केंद्र बनवण्याची कंपनीची योजना आहे. तसेच  ओला कंपनी २०२३ पर्यंत इलेक्ट्रिक व्हीकल प्रोजेक्टमध्ये उतरु शकते अशी योजना कंपनीने बोलवून दाखवली आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.