अवघ्या ११ व्या वर्षात पुस्तक लिहून ती काश्मीरमधली सर्वात लहान लेखिका बनलीये
या स्टोरीला सुरूवात करण्याआधी भिडू एक प्रश्न विचारते, तूम्ही जेव्हा ११ वर्षाचे होता त्यावेळी तूम्ही काय करायचे. आता जवळपास सगळ्यांच उत्तर कॉमन असेल की, अकरा वर्षाचा असताना काय करणार शाळेत जायचं, अभ्यास करायचा, खेळायचं आणि उनाडक्या करायच्या. पण भिडू तूम्ही ११ अकरा वर्षाचा असताना कधी पुस्तक लिहिलंय का? आता तुम्ही म्हणाल काय पण काय एवढ्या लहान वयात पुस्तक वाचायचं मुश्किल, त्यात ते लिहायच्या भानगडीत कोन पडणार.
पण तुमच्या माहितीसाठी कश्मीरमधली अदिबा रियाज ही या गोष्टीला अपवाद आहे. अवघ्या अकराव्या वर्षात पुस्तक लिहून ती काश्मीरमधली सगळ्यात लहान वयाची लेखिका बनली आहे.
काश्मीर मधल्या अनंतनाग जिल्ह्यातील बाटेंगू या गावात राहणारी अदिबा. आता ७ वीच्या वर्गात शिकते. बाकीच्या मुलांसारखीचं शाळेत जाते, अभ्यास करते, खेळते, पण तिच्यातलं वेगळेपण म्हणजे तिला वाचनाची आणि लिखानाची जबरदस्त आवड आहे. तिच्या या गुणामुळे तिने बऱ्याच स्पर्धांमध्ये नंबरही पटकावलाय.
महत्त्वाचं म्हणजे कोरोना काळात लॉकडाउन दरम्यान जेव्हा ही शाळकरी मंडळी आपली सुट्टी एन्जॉय करत होते, तेव्हा सुद्धा अदिबाने अनेक पुस्तकं वाचून त्याचा सपाटा मारला. आजूबाजूच्या नैराश्याच्या वातावरणात तिने स्वतःला पॉझिटिव्ह गोष्टीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. यातूनच तिला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
आपली ही पुस्तक लिहिण्याची कल्पना तिने घरच्यांसमोर मांडली. जी तिच्या घरच्यांना सुद्धा आवडली. तिच्या वडिलांचं कम्प्युटरचं दुकान आहे. वडीलांनी अदीबाला पुस्तक लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
आता तसं पाहायचं झालं तर अदीबा या नावाचा अर्थ होतो साहित्य लिहिणारी. आणि अदीबानं पुस्तक लिहून हे खरं करून दाखवलंय.
अदिबाने ११ व्या वर्षात ‘झील पेन’ या नावाचं पुस्तक लिहीलयं, ज्यात तिने जीवनाविषयी अनेक महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी गोष्टी लिहिल्यात. या ९६ पानी पुस्तकात तिने काही कविता देखील लिहिल्यात. आदिबाने सहावीपासून हे पुस्तक लिहायला सुरुवात केली. या वर्षी ऑगस्टमध्ये तिने पुस्तक पूर्ण देखील केले. एवढ्या लहान वयात तिने पुस्तकात लिहिलेल्या पॉझिटिव्ह गोष्टी वाचून भले भले चॅट पडतील. या पुस्तकात तिने जीवनाच्या विविध पैलूंबद्दल सांगितले आहे.
तिच्या पुस्तकातला काही मजूर असा कि,
‘प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कौशल्य दडलेली असतं. ज्याच्याकडे स्वत: लक्ष देऊन ते जोपासायला हवेत. आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्याचा निश्चय तर केलाच पाहिजे सोबतच प्रयत्न देखील तितकाच हवा.
यासोबतच ती पुढे म्हणते, “लोक काय म्हणतील याचा विचार आपण कधीच केला नाही पाहिजे, म्हणजे मी तर कधीच करत नाही. त्यातल्यात्यात आपल्याला जे मिळवायचं त्या बाबतीत तर अजिबातच नाही. कारण लोकं तुम्हाला मागे खेचतील, पण आपण खचून जात कामा नये.”
आता तिच्या या लिखाणावरूनच आपण तिच्या बुद्धीचा आणि समजूतदारपणाचा अंदाज बांधू शकतो. या पुस्तकामुळे तिचे गावातुन आणि काश्मीरमधून कौतुकाची थाप तर मिळवली आहेच. पण देशभरात सुद्धा आदिबाचं भरभरून कौतुक होतंय. हे पुस्तक स्टोअर्स सोबतचं ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे.
हे ही वाच भिडू :
- पुरस्कार जिंकले, पुस्तकं लिहिली पण गडी लॉकडाऊनमध्ये भारतीयांचं पोट भरायला विसरला नाही
- मराठीमधलं पहिलं छापील पुस्तक कोणतं होतं आणि कुठं छापलेलं माहीत आहे ?
- स्वतःच्याचं एका पुस्तकामुळं ती आजही आपल्या देशात जाऊ शकत नाहीये