संजय राऊतांवर एकूण 13 मानहानीच्या केसेस आहेत आज “एक” ने स्कोअर वाढला इतकच… 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला असल्याची बातमी आज आली. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी हा दावा दाखल केला असून कोर्टाची सुट्टी संपल्यानंतर सोमय्या यांचे वकील ही याचिका कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहे.

मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांना धरूनच मेधा सोमय्या यांनी हा दावा ठोकला आहे…

मात्र संजय राऊत यांच्यावर दाखल झालेला हा काही पहिला दावा नाही. यापूर्वी संजय राऊत यांच्यावर कोणकोणते दावे दाखल करण्यात आलेले आहेत व कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत हे पाहण्यापूर्वी संजय राऊत कसे आहेत ते समजून घेतलं पाहीजे…

गेल्या वर्षी संजय राऊत यांनी बोलभिडूला मुलाखत दिली होती तेव्हा अनेक कोर्ट केसमध्ये आरोपी क्रमांक एक बाळासाहेब ठाकरे व आरोपी क्रमांक दोन म्हणून संजय राऊत यांच नाव असायचं.

  • त्याबाबत संजय राऊत यांनी काय उत्तर दिलं होतं ते तुम्ही खालील मुलाखतीमध्ये पाहू शकता..

काय आहे संजय राऊत यांचा इतिहास…

२१ जुलै १९८८ साली आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जावून पोलीस सब इन्स्पेक्टर राजन कटधरे यांनी रमा नाईकचा एन्काऊंटर केला. दाऊदच्या टिपवरून हा एन्काऊंटर घडून आल्याच सांगण्यात आलं.

मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात या एन्काऊंटरमुळे खळबळ उडाली होती. पण वर्तमानपत्राच्या कागदांवर मात्र थेट आणि धडधडीत माहिती येत नव्हती. नेमकं काय झालं हे चौकटीबाहेर जावून लिहण्याचं धाडस तरी नव्हतं किंवा त्या पद्धतीची गरज कोणाला वाटत नव्हती.

अशा वेळी लोकसत्ताचे संपादक माधव गडकरींनी आपल्या गुंड पत्रकाराला,

“तिकडे” जायला सांगितलं.

माधव गडकरी त्यांचा उल्लेख गुंड असा करायचे. त्याला कारण म्हणजे त्यांचा हा पत्रकार शिवसैनिक होता. बाळासाहेबांच्या शिफारसीमुळेच त्याला ही नोकरी मिळाली होती. सुरवातीला जागा नसल्याने या माणसाने इंडियन एक्सप्रेसच्या मार्केटिंग, जाहिरात, वितरण अशा वेगवेगळ्या खात्यात काम केलं होतं. अखेर लोकप्रभामध्ये हा प्रवास थांबला होता.

गडकरींचा गुंड पत्रकार रमा नाईकच्या चकमकीच्या ठिकाणी गेला आणि येत्या लोकप्रभा मध्ये रमा नाईकवर कवर स्टोरी छापण्यात आली.

या गुंड पत्रकाराच नाव संजय राऊत.

संजय राऊतांच बालपण माहिममध्ये गेलं. त्यांचे वडिल राजाराम राऊत हे JKW कंपनीत कामगार होते. आणि तिथले कामगार नेते देखील होते. कट्टर शिवसैनिक असणारे राजाराम राऊत हे बाळासाहेबांच्या देखील तितकेच जवळचे होते. त्यातूनच संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे घरोब्याचे संबध निर्माण झाले.

आंबेडकर कॉलेजमधून B.com झालेल्या या मुलाला पोटापाण्याला लावायचं म्हणून बाळासाहेबांनीच संजय राऊतांना माधव गडकरींकडे पाठवलं होतं. शिवसेनेच्या शिफारसीवर आला म्हणून गडकरी त्यांचा उल्लेख गुंड असा करायचे.

जागा नाही म्हणून संजय राऊतांना मार्केटिंग, जाहिरात, वितरण अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करावं लागलं. अशातच त्यांच्यावर जबाबदारी आली ती लोकप्रभेत लिहण्याची. संधी ओळखून संजय राऊतांनी क्राईम रिपोर्ट चालू केलं. त्या काळात म्हणजे १९८५ च्या सुमारास संजय राऊत क्राईम रिपोर्ट करु लागले. मराठीत एकतर क्राईम स्टोरी छापून येत नसतं किंवा त्यांच स्वरुप बातम्यांच्या स्वरुपात असे.

पण संजय राऊतांनी आपली वेगळी शैली विकसीत केली. वेगवेगळ्या कवर स्टोरीमुळे लोकप्रभाचा अंक हातोहात खपू लागला आणि संजय राऊत लोकांच्या नजरेत येवू लागले.

पण या सगळ्यात राऊतांवर खास नजर होती ती बाळासाहेबांची. बाळासाहेबांना हा पोरगा काहीतरी करेल अस वाटायचं. क्राईम रिपोर्ट करता करता संजय राऊतांचा मोर्चा राजकिय रिपोर्टिंगकडे वळला. या संधीच सोनं करत आपल्या शब्दांनी लोकप्रभा गाजवू लागले.

माधव गडकरींची स्टाईल आणि बाळासाहेबांची स्टाईल याच अचूक मिश्रण म्हणजे संजय राऊतांच्या लिखाणाची स्टाईल असल्याचं सांगण्यात येतं. शिवसेनेत एकसे एक नेते खळ खट्याक करण्यासाठी प्रसिद्ध होते. बोलण्याच्या स्पर्धेत देखील अशा नेत्यांचा नंबर लागायचा.

छगन भुजबळ, नारायण राणे हे बाळासाहेबांप्रमाणेच तोडीस तोड बोलायचे. पण प्रश्न होता तो बाळासाहेबांप्रमाणे लिहणाऱ्याचा. आपल्या शेलक्या शब्दात अचूक घाव घालणारा माणूस बाळासाहेबांकडे नव्हता.

अशातच छगन भुजबळांनी शिवसेनेला रामराम केला. छगन भुजबळांनी सेनेला राम राम ठोकताच लोकप्रभात कवर स्टोरी छापण्यात आली. ही कवर स्टोरी केली होती संजय राऊतांनी. संजय राऊतांची ती स्टोरी बाळासाहेबांच्या नजरेत आली बाळासाहेबांच्या लक्षात आलं,

हीच ती वेळ..!

बाळासाहेबांनी राऊतांना बोलावून त्यांना सामनाचं कार्यकारी संपादक केलं. तेव्हा संजय राऊतांच वय होतं २९ वर्ष. पत्रकारक्षेत्रातल्या लोकांना वयाच्या २९ व्या वर्षी सामना सारख्या वर्तमानपत्राचं संपादक होण म्हणजे काय ते समजू शकतं. एकवेळ २९ व्या वर्षी आमदार होता येईल पण इतक्या कमी वयात संपादक होता येत नाही. राऊत संपादक झाले व तिथूनच त्यांची गाडी सुसाट सुटली.

अशा या संजय राऊतांवर केसेस नसतील तर आश्चर्य वाटेल. माय नेता या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार संजय राऊतांवर आजपर्यन्त IPC सेक्शन 500 नुसार 13 मानहानीचे दावे करण्यात आलेले आहेत. अमरावती च्या चांदूर बजार मध्ये केस क्रमांक,

Case No- 100/2000, Court- JMFC Amaravati(Chandur Bazar, अकोला येथे Case No- 4038/2002, Court- CJM Akola, सोलापूरमध्ये SSC No- 6150/2005, Court-VII. Jt. CJJD Solapur, खेड मध्ये Case No- 57/2006, Court- Civil Judge(S.D) Khed, सोलापूर येथे SCC No 2852/2007, Court- JMFC Solapur, उस्मानाबाद येथेSCC No- 433/2007, Court- JMFC Usmanabad, सोलापूर सेशन कोर्टात SCC No- 103/2007, Court- Solapur Session Court, परभणी येथे SCC No 61/2012, Court JMFC Parbhani, मुरबाड येथे SCC No- 92/2012, Court- JMFC Murbad, औरंगाबाद येथे SCC No- 2719/2012, Court- JMFC Aurangabad, कल्याण SCC No- 485/2013, Court- JMFC Kalyan, हैद्राबाद मध्येChief Metropolitan Magistrate Court At Hyderabad Pending,औरंगाबाद येथे S.S.C. No- 221/2014, Court- Civil Judge(S.D.) Aurangabad

अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 13 केस पेंडिग असल्याचं माय नेता या संकेतस्थळावर सांगण्यात आलं आहे.

यासहित असणाऱ्या केसेसची माहिती देण्यात आलेला आहे ती अशाप्रकारे

Screenshot 2022 05 23 at 6.21.34 PM
https://myneta.info/rajsab09aff/candidate.php?candidate_id=626

या संकेतस्थळावर जावून तुम्ही या केसेस पाहू शकता

थोडक्यात काय तर यापूर्वीच संजय राऊत यांच्यावर 13 मानहानीचे दावे दाखल झालेले दिसून येतात. आज त्यामध्ये 1 ने भर पडली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.