पंधरा वर्षाच्या रेखा सोबत झालं होतं #metoo

रेखा म्हणजे भारतीय फिल्म इंडस्ट्रीची बच्चन. होय बच्चनचं. अमिताभ जसा गेली तीस वर्ष आपल स्टारडम टिकवून आहे तशीच हिरोइन्स मध्ये फक्त रेखाचं अशी आहे जिच्या भोवतीच स्टारडम अजूनही कमी झालं नाही. आजही कांजीवरम साडी, अंगभर दागिने, माथ्यावर सिंदूर अशा वेशात रेखा  एखाद्या पार्टीमध्ये येते तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच वळतात. सौंदर्याचं आत्मविश्वासाच मापदंड म्हणून तिला ओळखलं जात.

पण रेखा जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा तिच्याकडे यापैकी काहीचं नव्हतं. तेव्हा ती दक्षिणेतून हिरोईन बनायला आलेली सोळा वर्षाची भानुरेखा होती.

खरं म्हणजे रेखाचे वडील जेमिनी गणेशन हे तमिळ फिल्मइंडस्ट्रीचे सुपरस्टार होते. रेखाची आई पुष्पवल्ली त्यांची गर्लफ्रेंड. ती सुद्धा अॅक्ट्रेस होती. हे दोघे जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा जेमिनी फिल्मइंडस्ट्रीमध्ये नवखा होता तर पुष्पव्ल्ली बालकलाकार असल्यापासून काम करत असल्यामुळे ती बऱ्यापैकी प्रस्थापित होती. दोघांचही लग्न झालेल होतं. तरीही लपून छपून त्यांच रिलेशन चालूच राहिलं. पुष्पव्ल्लीने आपल्या नवऱ्याला डिव्होर्स दिला पण जेमिनीने तिच्याशी लग्न केलं नाही.

या दोघांना या अनैतिक प्रेमातून दोन मुली झाल्या. मोठी भानूरेखा आणि छोटी राधा. तो पर्यंत जेमिनी मोठा स्टार झाला होता आणि पुष्पवल्लीला हिरोईन म्हणून काम मिळण बंद झालं होतं. जेमिनीने या मुलींचं पालकत्व स्वीकारण्यास नकार दिला. पुष्पव्ल्लीवर तर आभाळ कोसळलं. कसबस मिळेल ते काम करत तिने या मुलीना वाढवलं.

घर सांभाळण्याची जबाबदारी रेखावर अगदी लहानपणीचं आली. बालकलाकार म्हणून सिनेमात काम करू लागली पण तीच बालपण मात्र तीथचं संपलं.  अवघी चौदा वर्षाची असतानाच रेखाला हिरोईन म्हणून काम ऑफर होऊ लागली. वयाने तिप्पट असलेल्याकन्नड सुपरस्टार राजकुमार समोर “ऑपरेशन नल्ली सीआयडी ९९९ “या सिनेमामधून तिने हिरोईन म्हणून एंट्री केली. पिक्चर हिट झालाचं पण तोपर्यंत तिला हिंदी पिक्चर देखील मिळाला. तिच्या आईने ही ऑपरच्युनिटी सोडली नाही.

अवघ्या पंधरा सोळा वर्षाच्या रेखाला एकटीला मुंबईत सोडलं. सिनेमाच नाव होतं अंजना सफर. सिनेमाचे डायरेक्टर होते राजा नवाथे. 

रेखा मुंबईत आली तेव्हा अगदी टिपिकल साउथ इंडियन मुलगी होती. सावळा वर्ण, अंगाने गुबगुबीत हिंदीचा गंधही नाही आणि शिवाय वयाने अल्लड. यामुळे सुरवातीपासूनचं बॉलीवूडच्या वखवखलेल्या शिकारी कुत्र्यांची नजर तिच्यावरचं गेली होती. अंजना सफरच्या सेटवर तिला बराच त्रास दिला जाई. तिच्यावर अश्लील टोमणे मारले जायचे. पण रेखाला पंजाबी हिंदी भाषा कळत नव्हती पण आपल्याबरोबर वाईट घडतंय एवढी तरी समज तिला होती. नंतर एका मुलाखतीमध्ये ती म्हणते,

“मला अगदी जंगलात आणून सोडल्याप्रमाणे वाटत होतं. माझ्या बरोबरच्या मुली शाळेत शिकत होत्या , खेळत होत्या आईसक्रीम खात होत्या आणि मी हे काय करतेय, का करतेय हे सुद्धा मला ठाऊक नव्हत.”

ती रोज एकटीच रडायची. पण ऐकायलाही कोण नव्हत. सेटवर तिला मुद्दाम त्रास देणे थांबत नव्हत. एकदिवस मात्र तिच्या सहनशक्तीचा अंत व्हावा असं घडलं.

मेहबूब स्टुडियोमध्ये शुटींग सुरु होतं. हिरो आणि हिरोईनचा एक रोमांटिक सीन होता. राजा नवाथे सिनेमाचे सिनेमेटोग्राफर सुद्धा होते. त्यांनी असिस्टंट डायरेक्टर कुलजितपाल , सिनेमाचा हिरो विश्वजित यांच्यात मिळून एक प्लॅन केला. रेखाला याची कल्पना ही लागू दिली नाही.

जेव्हा राजा नवाथेनी अॅक्शन म्हणून आज्ञा दिली, अचानक अनपेक्षितपणे विश्वजितने रेखाला कंबरेला धरून जवळ ओढून घेतले आणि तिला कीस करायला सुरवात केली. रेखासाठी हा धक्काच होता. ती सुटून जाण्याचा प्रयत्न करत राहिली पण विश्वजितची मगरमिठी सैल होण्याचा नाव घेत नव्हती. डायरेक्टर सुद्धा कट म्हणायला तयार नव्हता. एक नाही दोन नाही तब्बल पाच मिनिट हा खेळ सुरु राहिला. 

सेटवरून कोणीही पंधरा वर्षाच्या रेखाला वाचवण्यासाठी पुढे गेले नाही. उलट काहीजण शिट्ट्या वगैरे वाजवून एन्जॉय करत होते. बऱ्याच वेळानंतर विश्वजितने खो खो हसत तिला जाऊ दिल. आपण काही गैर करतोय त्याला कल्पनाचं नव्हती. रेखा मात्र धावत त्या सेटवरून बाहेर गेली.

पुढे या सेक्सुअल असोल्टचा केस होऊन सगळे प्रकरण कोर्टात गेले. सेन्सॉरने सर्टिफिकेट देण्यास नकार दिला. सिनेमाचं शुटींग थांबल, पिक्चर डब्ब्यात गेला. रेखाचा विनयभंग करणारा अभिनेता विश्वजित म्हणत राहिला ही राजा नवाथेची आयडिया होती. राजा नवाथेच्या मते हा सीन खरं वाटावा, रेखाचे आश्चर्यचकित झालेले एक्प्रेशन टिपता यावेत म्हणून तीला आधी याची कल्पना दिली नव्हती.

काहीही असो, भारतीय सिनेमा इंडस्ट्रीमधील ही सर्वात लाजिरवाण्या घटने पैकी एक घटना होती.लाईफ मासिकाच्या आशियन एडिशनने या घटनेवर आपली कव्हर स्टोरी बनवली. पुढे अनेक वर्षांनी हा सिनेमा दो शिकारी या नावाने रिलीज करण्यात आला. मध्यंतरी सावन भादो मधून सिनेमात एंट्री केलेली रेखा काही वर्षात सुरवंटाचं फुलपाखरू बनाव अशी बदलून गेली. तिची अदा तिचा नाच बघण्यासाठी पब्लिक थिएटर मध्ये गर्दी करू लागलं.

अमिताभ बरोबरच मुकद्दर का सिकंदर, खुबसुरत,सिलसिला, उमराव जान असे तीचे अनेक सिनेमे  बॉक्सऑफिस वर गाजले. हेमामालिनी नंतरची हिंदी सिनेमाची सुपरस्टार हिरोईन ती बनली. बच्चन बरोबरच्या तिच्या अफेअरच्या गॉसिपमुळेही तीच्या भोवतीचं प्रसिद्धीच वलय वाढतच गेला.

आणि विश्वजित? त्याच काय झालं?

तसाही तो चांगला अभिनेता नव्हता. फक्त आपल्या देखण्या दिसण्यावरून त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं होतं. हळूहळू तो हिंदी सिनेमामधून बाहेर फेकला गेला. आपल्या मूळ बंगाली सिनेमाकडे त्याने आपला मोहरा वळवला पण तिथेही त्याला काही यश मिळाले नाही. अखेर त्याने धर्मेंद्र हेमामालिनीला घेऊन हिंदी मध्ये दिग्दर्शनाचा प्रयोग केला “केहते है मुझको राजा”. आश्चर्य म्हणजे एवढं होऊनही रेखाने या सिनेमात काम केलंय. हा सिनेमा फ्लॉप झाला. विश्वजित हा विषय भारतीय फिल्म इंडस्ट्रीसाठी फायनली संपला.

पुढे त्याने राजकारणातही हातपाय मारून बघितले. तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर दिल्लीमधून पडला. आज बाकीच्या नेत्यांप्रमाणे तो भाजपामध्ये आहे.

हे ही वाचा भिडू.

2 Comments
  1. Rushi sakhare says

    I selutesion to REKHA

  2. pravin ghagi says

    Comment:ithe pn bjp ch..kay Rao tumhi…

Leave A Reply

Your email address will not be published.