आरोग्य विभागातील १६ हजार जागा भरण्याची प्रक्रिया कशी असणार आहे?
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट येऊन स्थिरावली आहे. त्यात रुग्णसंख्या पण वाढत आहे, अशातच आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोग्य विभागावर येत असलेला ताण आणि नजीक काळात वाढणारा ताण हे लक्षात घेऊन शासनाकडून दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.
यात राज्याच्या आरोग्य विभागात तब्बल १६ हजार जागांची तात्काळ भरती करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातील माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. यात अ आणि ब वर्गातील प्रत्येकी २ हजार, तर क आणि ड वर्गातील १२ हजार कर्मचार्यांची भरती करण्यात येणार आहे.
काय म्हणाले राजेश टोपे?
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले,
या आधी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता फक्त ५० टक्के रुग्णसेवेशी संबंधित पद भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. पण ती सध्या अपुरी पडत आहे. तसचं येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे.
ती शक्यता लक्षात घेऊन राज्यातील भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, त्यामुळे क आणि ड वर्गातील कर्मचारी वाढतील अशी आरोग्य विभागाने मागणी केली होती. त्यानुसार कॅबिनेटने १०० टक्के पद भरती करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.
तसचं यासाठी आता कॅबिनेट स्तरावर जाण्याची गरज नाही. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री स्तरावर या संबंधीतील प्रस्तावाला मान्यता देऊन ही पदभरती करण्यात येणार आहे.
कशी असणार आहे हि भरती?
यात आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार,
अ वर्गात एकूण २ हजार पद भरली जाणार आहेत. यात विविध शाखांमधील तज्ञांचा, आणि तज्ञ डॉक्टरांचा समावेश असणार आहे. या संवर्गातील ही संपूर्ण प्रक्रिया MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पार पाडण्यात येणार आहे.
यानंतर ब वर्गात देखील एकूण २ हजार पद भरली जाणार आहेत. यात प्रामुख्याने डॉक्टर्स आणि मेडिकल ऑफिसर्स यांचा समावेश असणार आहे. या संवर्गातील संपूर्ण प्रक्रिया ही आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्या स्तरावर पार पडणार आहे. त्यात मुलाखत घेऊन डॉक्टरांची निवड प्रक्रिया केली जाणार आहे.
यानंतर क आणि ड या वर्गात तब्बल १२००० हजार पद भरली जाणार आहेत. यात तांत्रिक विभाग, नर्स, शिपाई, वॉर्डबॉय, ड्रायव्हर्स अशी सगळी पद असणार आहेत. तसेच या संवर्गातील संपूर्ण प्रक्रिया ही एका एजन्सी कडून पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर परीक्षा घेऊन, निकाल लावला जाणार आहे.
या सगळ्या भरती प्रक्रियांमुळे आरोग्य विभागात स्थैर्य येईल असं देखील आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
सातत्यानं मागणी होत होती.
ही भरती प्रक्रिया करण्यासंबंधी या आधी सातत्यानं मागणी सुरु होती. भाजप आणि पक्षाचे कार्यकर्ते यासंबंधी मागणी करत होते. राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनी देखील काही दिवसांपूर्वी या भरती विषयी संकेत दिले होते.
@mrhasanmushrif साहेब zp आरोग्य भरती करा 3 ऱ्या लाटेच्या अगोदर.. https://t.co/xjsAS9CKzU pic.twitter.com/ckXtJccbpa
— SLNandewad (@NandewadSainath) May 1, 2021
माजी आमदार डॉ. आशिष देशमुख आणि काँग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांनी देखील यासाठीची नुकतीच मागणी केली होती.
कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य व पोलिस विभागात सरकारने तात्काळ भरती करावी.#Covid19India #COVID19outbreak #महाराष्ट्र #maharashtra #महाराष्ट्र_पोलीस #महाराष्ट्र_सरकार #MaharashtraGovernment pic.twitter.com/P6etSOcrSl
— Dr. Ashish Deshmukh (@AshishRDeshmukh) May 5, 2021
तसेच MPSC करणाऱ्या उमेदवारांकडून देखील आरोग्य विभागात भरती करण्यात यावी यासाठी मागणी केली जात होती.
सर, आरोग्य विभागाच्या सर्व पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण क्षमतेने म्हणजे 100% पदे भरण्यात आली पाहिजेत. आम्ही 4-5 वर्ष mpsc चा अभ्यास केला आहे. आता कुठे select होईल असे वाटत असतानाच पदे मात्र 50%भरली जात आहेत. हा अन्याय आहे mpsc करणार्या विद्यार्थ्यांवर. Please 🙏🏻
— swapnil shid (@SwapnilShid) May 5, 2021
सध्या आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर रुग्ण सेवा आणि आरोग्य विभागातील प्रशासनासंबंधी तात्काळ भरती प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे नक्कीच आरोग्य विभागाला स्थैर्य प्राप्त होण्याला मदत होणार आहे.
हे हि वाच भिडू.
- एमबीबीएस डॉक्टर, पण आदिवासींसाठी मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी तुडवतोय रानवाटा !
- एकदा बघुन घ्या भाजपने २०१४ आणि २०१९ च्या इलेक्शनला आरोग्यविषयक कोणती आश्वासने दिलेली..
- कोरोनाची दुसरी लाट वाढलीय आणि आरोग्य सेतूचं रेटिंग दिवसेंदिवस ढासळत चाललंय..