१०० वर्षांपूर्वी गायब झालेली मूर्ती या पोरीला कॅनडामध्ये सापडली.

२०१९ मधली घटना… विनिपेगमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या दिव्या मेहराला कॅनडातील रेजिना विद्यापीठातील मॅकेन्झी आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन बघायला गेलेली. सगळ्या मुर्त्या निरखून पाहता पाहता तिची नजर एका मूर्तीवर खिळली… तिला भगवान विष्णूची मूर्ती दिसली जी स्त्रीच्या रूपात होती. तिने लागलीच त्या मूर्तीचा अभ्यास चालू केला.

आणि त्यातून एक सत्य सामोर आलं ते म्हणजे, रेकॉर्डमध्ये पाहिल्यावर हि आई अन्नपूर्णाची मूर्ती भारतातली असून ती १९१३ मध्ये एका मंदिरातून चोरीला गेल्याचे आढळले. मग मेहरा ने हि माहिती भारतीय दूतावासाला कळवली. दुतावासाने माहिती काढायला सुरुवात केली.  

अमेरिकेतील पीबॉडी एसेक्स म्युझियममधील भारतीय आणि दक्षिण आशियाई कलेचे क्युरेटर सिद्धार्थ व्ही. शाह यांनी पुष्टी केली की एका हातात खीर आणि दुसऱ्या हातात चमचा असलेल्या या आई अन्नपूर्णा देवी आहेत.

मेहरा यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की मूर्तीचे मालक, वकील नॉर्मन मॅकेन्झी यांनी १९१३  मध्ये भारताच्या प्रवासादरम्यान ही मूर्ती पाहिली होती. त्यांना कोणीतरी वाराणसीतील नदीकाठावरील मंदिरातून चोरलेली मूर्ती मॅकेन्झी यांना विकली होती. मॅकेन्झी यांनी १९३६ मध्ये कॅनडामध्ये रेजिना विद्यापीठात हे मॅकेन्झी आर्ट गॅलरी बांधली होती. 

तर हि आई अन्नपूर्णा देवीची मूर्ती १९१३ मध्ये वाराणसीमध्ये गंगेच्या काठावरून चोरीला गेली होती. १९१३ मध्ये चोरीला गेलेली हि मूर्ती वाराणसीतून थेट  कॅनडाला पोहचली. आणि योगायोग म्हणजे १०० वर्षानंतर तिचं मूर्ती भारतीय वंशाच्या दिव्या मेहरा हिच्या नजरेस पडली आणि तिच्या प्रयत्नांनंतर ही मूर्ती भारत सरकारच्या पुढाकाराने भारत सरकारकडे सुपूर्द करण्यात आली. 

दिव्य मेहरा यांनी हि मूर्ती परत मिळवण्यासाठी मॅकेन्झी आर्ट गॅलरीचे सीईओ जॉन हॅम्प्टन यांच्याशी बोलणी केली. त्यांना त्या मूर्तीचा इतिहास सांगितला. आणि हि मूर्ती परत पाठवण्यासाठी विनंती केली. गॅलरीने दिव्या यांच्या विनंती मान्य केली. चोरीला गेलेल्या पुतळ्याच्या शोधाबद्दल वाचल्यानंतर, ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालय आणि कॅनेडियन हेरिटेज विभागाने संपर्क साधला आणि परत हि मूर्ती परत आणण्यासाठी मदत करण्याची ऑफर दिली. डिसेंबर २०२० मध्ये ही मूर्ती दिल्लीत उतरण्याची अपेक्षा होती, परंतु कोविड-19 साथीच्या रोगाने परत येण्यास उशीर झाला पण आत्ता हि मूर्ती परत भारतात, वाराणसी मध्ये मिळाली.

दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये UP सरकारला अन्नपूर्णा देवीची मूर्ती सुपूर्द करण्याचा विधी कार्यक्रम सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केला होता. नुकतीच कॅनडातून परत आणलेल्या या मूर्तीची १५ नोव्हेंबरला वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाणार आहे. मात्र काशी विश्वनाथ मंदिरात ठेवण्यापूर्वी दिल्लीहून अलीगढ, कन्नौज आणि अयोध्या येथे नेली जाणार आहे. 

हि मूर्ती वाळूच्या दगडापासून बनवलेली आहे.

संशोधनानुसार, चुनार वाळूच्या दगडाने बनवलेली ही मूर्ती १८ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. ज्याच्या एका हातात वाटी आणि दुसऱ्या हातात चमचा आहे.  पौराणिक मान्यतेनुसार, काशीमध्ये एकदा भीषण दुष्काळ पडला, तेव्हा भगवान शिवाने माता अन्नपूर्णेचे ध्यान करून तिच्याकडे भिक्षा मागितली होती. तेव्हा आई अन्नपूर्णा म्हणाल्या होत्या की, आतापासून काशीत कोणीही उपाशी झोपणार नाही.”

जेंव्हा हि मूर्ती पहिल्यांदा कासगंजमध्ये पोहोचली…तेंव्हा लोकं अन्नपूर्णा देवीची वाट पाहत बसले होते. 

तिचे जंगी स्वागत करण्यासाठी रात्रभर लोकांनी जागरण केले, पहाटे मूर्ती पोहचली. तब्बल १०८ वर्षांनी कॅनडातून मायदेशी परतलेल्या माता अन्नपूर्णा यांच्याबाबत एक श्रद्धा आहे की, आता कोणीही उपाशी झोपणार नाही, आई अन्नपूर्णाने दिलेले हे वरदान पुन्हा एकदा फलदायी ठरेल. कासगंजच्या सीमेवरील दुकरिया नागला गावात सदरचे आमदार देवेंद्र राजपूत यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. सोरॉनमधील कार्यक्रमानंतर राज्य सरकार या पुतळ्याला भव्य मिरवणुकीच्या रूपात काशीला घेऊन जाईल, जिथे पुतळ्याची स्थापना केली जाईल.

हे ही वाच भिडू :

 

 

.

Leave A Reply

Your email address will not be published.