वैष्णोदेवीपेक्षाही भयंकर चेंगराचेंगरी कुंभमेळ्यात घडलेली, खुद्द पंतप्रधान हजर होते

शानिवारी सकाळी लाखो लोकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिरात मोठी दुर्घटना घडली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये अचानक चेंगराचेंगरीत झाली आणि या घटनेत जवळपास  १२ जणांचा मृत्यू झाला. तर जखमींचा आकडा २० च्यावर असल्याचं समजतंय. ज्यानंतर पुढच्या आदेशापर्यंत  वैष्णोदेवी यात्रा स्थगित करण्यात आलीये.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाचं घडलेल्या या घटनेबद्दल सगळ्या देशभरात हळहळ व्यक्त केली जातेय. पण तुम्हाला माहितेय, यापेक्षाही भयंकर घटना घडलेली ती कुंभमेळ्यात. ज्यामुळे सगळ्या देशाला हादरा बसलेला.

ते सालं होत १९५४ चं नवीन वर्ष सुरु होऊन महिनाच उलटलेला. नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि अलाहाबाद म्हणजे सध्याच्या प्रयागराज या चारही ठिकाणी १२ वर्षांच्या गॅपनं कुंभमेळा भरतो, ज्यात लाखोंनी लोक स्नानासाठी व साधूंच्या भेटीसाठी येतात. त्यावेळी कुंभमेळा हा अलाहाबाद इथं होता जिथं  गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम होतो.

३ फेब्रुवारी १९५४ चा तो दिवस, स्वातंत्र्यानंतर आयोजित केलेला पहिला कुंभमेळा त्यामुळे त्याला एक महत्त्व मिळालेलं. प्रत्येक वेळी प्रमाणं यंदाही भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी झालेली. नागपंथीय साधूंची मिरवणूक संगमाच्या बंधाऱ्यावरून जाऊ लागली. गंगा नदीच्या काठावर मिरवणूक पाहण्यासाठी हजारो लोकं बसले होते.

नागा साधूंच्या या मिरवणूकीसाटी पोलीस मार्ग मोकळा करू लागले. पण अफाट गर्दी असल्यामुळं रेटारेटी होऊन माणसांमध्ये गोंधळ उडाला आणि भिती पसरली. त्यामूळं जो तो मिळेल त्या मार्गाने गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला लागला. त्यामुळे प्रचंड चेंगराचेंगरी झाली, बरीच जण तुडवली गेली, अनेकांचे जीव गुदमरले. या चेंगराचेंगरीत जवळपास 800 लोकांचा मृत्यू झाला. तर हजारो लोकं जखमी झाले.

या घटनेने अख्ख्या देशात एकचं खळबळ उडालेली. आता स्वातंत्र्यानंतरचा पहिला कुंभमेळा होता त्यामूळं तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेक राजकारण्यांनी या कुंभमेळ्याला भेट दिली होती.

असं म्हंटलं जात की, नद्यांच्या संगमात पवित्र स्नान करणाऱ्या ५० लाख यात्रेकरूंपैकी राजेंद्र प्रसाद एक होते, तर पंतप्रधान नेहरू तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी कुंभमध्ये होते. आणि घटना घडली त्यावेळी पंतप्रधान त्याच ठिकाणी होते.

पंडित नेहरूंनी माध्यमांमध्ये बोलताना म्हंटले की, ते पवित्र स्नान करायला आले नव्हते, पण दुर्घटना घडली तेव्हा ते कुंभमेळ्यातचं होते. सकाळी 9:45 ते 10:15 च्या सुमारास एकी बाल्कनीतून ते गर्दीचं निरीक्षण करत होते. पण घटना घडली तेव्हा त्यांना सुद्धा काहीच समजले नाही ती, नेमकं काय झालं.

त्यावेळी नेहरूंच्या नेतृत्वाखालील सरकारवर मेळ्यात अपुर्‍या सुरक्षा उपायांसाठी टीका करण्यात आलेली. त्यांच्यावर आरोप होता की, सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने पोलीसांची तैनाती करण्याऐवजी त्यांना व्हीआयपी आणि प्रमुख व्यक्तींकडे लक्ष ठेवायला सांगितलं.

त्यानंतर राज्यसभेत बोलताना पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले की,

“नदीच्या दोन्ही बाजूला बहुधा 40 लाख लोकं होते. एवढी प्रचंड गर्दी देशात किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात मी कधीच पाहीली नव्हती. आणि तो घडलेला प्रकार मी कधीच विसरू शकत नाही.”

नंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती कमलाकांत वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील एक समितीची स्थापना करण्यात आली. आणि भविष्यातील मेळ्यांमध्ये चांगले व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हीआयपी आणि राजकारण्यांना मेळ्याला भेट देण्यावर बंदी आणली.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.