मदत मागायला आलेल्या पाकिस्तानला चीनने सांगितलं, “लाहोर भारतात गेलं तर जाऊ द्या.”

१९६५ चं भारत पाकिस्तान युद्ध कुठलाच भारतीय विसरणार नाही. किंबहुना येणाऱ्या पिढ्या सुद्धा ते युद्ध लक्षात ठेवतील असच आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या युद्धाने दोन्ही राष्ट्रांच्या दशेमध्ये आणि दिशेमध्ये मोठा बदल केला. सर्वसाधारणपणे सगळेच असे म्हणतात की हे युद्ध होण्यामागं कारण काश्मीर विवाद होता. पण फार थोड्या लोकांना हे माहित आहे की या युद्धाची सुरुवात कच्छ च्या कोणाला फारशा माहीत नसलेल्या भागात झालेल्या छोट्या चकमकीतून झाली.

आता या चकमकीचा इतिहास तुम्हाला सगळीकडेच वाचायला मिळेल. पाकिस्तानी म्हणतात हे युद्ध आम्ही जिंकलंय, तर भारतीय म्हणतात हे युद्ध भारताने जिंकलंय. हा वादाचा मुद्दा सोडला तर, भारताने अक्षरशः पाकिस्तानची पळता भुई थोडी केली होती. पाकिस्तान शेवटी मदत मागायला चीनकडे गेलं तर चीन म्हंटल की,

भारत लाहोर घेत असेल तर घेऊ द्या

पाकिस्तानचं मुख्य शहर लाहोर पर्यंत आलेल्या भारतीय सैन्याचा हा युद्ध किस्सा.

भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर कच्छच्या भागामुळे पाकिस्तानचा खूप फायदा झाला होता. कारण पाकिस्तानच्या आठव्या बटालियनचे मुख्यालय ह्याच भागात होते. ह्याच भागापासून २६ किलोमीटर लांब बादीन नामक एक रेल्वे स्टेशन होत जिथून कराची फक्त ११३ मैल लांब होती. जेव्हा भारतीय सुरक्षा दलाला कळले की ह्या भागात पाकिस्तान ने १८ मैल लांब एक कच्चा रस्ता तयार केला आहे तेव्हाच युद्धाची ठिणगी पडली.

भारताने पाकिस्तानच्या रस्ता तयार करण्याला विरोध केल्यानं, पाकिस्तानने काहीच कारण नसताना आक्रमक पवित्र घेतला. त्यांच्या सेनेच्या ५१व्या ब्रिगेडला म्हणजेच ब्रिगेडप्रमुख कमांडर ब्रिगेडियर अजहरला ह्या भागात जास्त प्रमाणात व आक्रमकपणे गस्त घालण्याचे आदेश होते.

दुसरीकडे भारताने मार्चच्या अखेरीस कंजरकोटपासून अर्ध्या किलोमीटर वर दक्षिण दिशेला सरदार चौकी तयार केली. हे कळल्यावर पाकिस्तानला हे सहन झाले नाही. पाकिस्तानच्या कमांडर जनरल टिक्का खानने ब्रिगेडियर अजहरला भारताची सरदार चौकी पूर्णपणे नष्ट करण्याचे आदेश दिले आणि इथूनच युद्ध सुरु झाले.

तीन दिवस घमासान युद्ध चाललं. युद्धाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच १० सप्टेंबर रोजी अयुब खानने चीनला एक पत्र पाठवले. त्याने चीनकडून मदत मागितली. त्या वेळी चीनचे अध्यक्ष होते झाऊ एनलाई. चीनने पाकिस्तानला लढाऊ विमाने द्यावीत अशी अयुबची इच्छा होती. पण अयुबला भीती वाटत होती की जर ही लढाऊ विमाने थेट चीनहून पाकिस्तानात आली तर अमेरिका चिडेल. म्हणूनच अयुबने चीनला विनंती केली. इंडोनेशियातून मदत पाठवा असे सांगितले.

चीन म्हंटल की, जर पाकिस्तानला लढाऊ विमाने हवी असतील तर चीन त्यांना चोवीस तासांच्या आत थेट चीनमार्गे पाकिस्तानात पोहोचवू शकतो. पण पाकिस्तानला ते मान्य नव्हतं. शेवटी चीनने ही विमाने पाकिस्तानला इंडोनेशियामार्गे दिली. दुसरीकडे, इंडोनेशियाने एक वेगळीच गोष्ट केली. पाकिस्तानसोबत मिळून त्यांनी भारताची अंदमान आणि निकोबार बेट काबीज करण्याची योजना सुरू केली.

हे सर्व चालू असतानाच अयूब खानने भुट्टोला सोबत घेऊन गुपचूप चीन गाठलं. चीनची इच्छा होती की, जरी पाकिस्तान हरलं तरी त्याने युद्ध लढतच राहावं.

चीनच्या राष्ट्र्पतीने अयुब खानला सांगितलं की, कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानने आपली लढाई थांबवू नये. भले ही थोडंफार नुकसान होईल पण युद्धातून माघार काय घेऊ नका. यावर चीनने भूमिका घेतली होती की, आम्ही तुम्हाला सशर्त पाठिंबा देऊ आणि त्यात भले हि भारत लाहोर सारख्या महत्वाच्या शहरांपर्यंत आले तरी बेहत्तर पण पाकिस्तानने हे युद्ध खूप काळासाठी सुरु ठेवायचं आहे.

खरं तर पाकिस्तानने पहिल्यांदाच विचार केला होता की, पहिल्यांदा आपण युद्ध सुरु करायचं आणि मग सुरक्षा परिषद आपल्या मदतीला धावून येईलच.

पण चीनच्या डोक्यात पाकिस्तानचा उद्देश काही जाईना. जर पाकिस्तानचा उद्देश युद्धबंदीच आहे तर ते युद्ध का लढतायत हेच चीनला समजत नव्हतं. चीनने पाकिस्तानवर युद्ध लढण्यासाठी दबाव वाढवला. पण अयुब खानला माहित होते की तो हे करू शकत नाही. पाकिस्तानी लष्कर त्याच्यावर युद्धबंदी आणण्यासाठी दबाव आणत होते. पाकिस्तानी सैन्यकडचा दारु गोळा हि संपत चालला होता.

पुढं भारताच्या लष्करप्रमुखांनी ही लाल बहादूर शास्त्रींना सल्ला दिला कि, आर्मीजवळील दारूगोळा जवळपास संपत आलाय, त्यामुळे यापुढे युद्धे लढणे भारतासाठी चांगले नाही. त्यामुळे रशिया आणि अमेरिकेच्या पुढाकाराने सीएसफायरचा प्रस्ताव भारताने स्वीकारला पाहिजे. आणि शास्त्रीजींनी त्यांचे ऐकले आणि प्रस्ताव स्वीकारला .

पण नंतरच्या पाहणीत असे दिसून आले की,  भारतीय सैन्याच्या दारूगोळा संपलाच नाही. फक्त २०% दारुगोळा खर्च झाला होता. जर भारताने ठरवले असते तर तेवढ्या दारूगोळ्यात पाकिस्तान संपेपर्यंत युद्ध केलं असतं. परंतु सेना प्रमुखांनी चुकीची माहिती दिल्यामुळे हे होऊ शकले नाहीबरं सैन्यप्रमुखांच्या चुका इथेच संपत नाहीत.

ताश्कंद करारापूर्वी भारतीय सैन्य लाहोरच्या बाहेर पोहचले देखील होते, भारतीय सैन्य सहजपणे सियालकोट आणि लाहोर ताब्यात घेऊ शकले असते परंतु सेना प्रमुखांनी शास्त्री यांना असे करण्यास रोखले.

२३ सप्टेंबर रोजी युद्धबंदी जाहीर करण्यात आली तरीही सीमेवर तणाव कायम होता. मध्यस्थी करण्यासाठी रशिया पुढे आला आणि ताश्कंदमध्ये करारासाठी शास्त्री आणि जनरल अयूब खान यांना बोलविण्यात आले. करारामध्ये पाकिस्तानने  काश्मीरवर भर देण्याची इच्छा होती. परंतु शास्त्रीजींनी त्यांचे काहीच चालू दिले नाही आणि १० जानेवारी १९६६ रोजी करारावर सह्या झाल्या.

या करारानंतर त्याच रात्री एक पार्टी ताश्कंद मध्ये ठेवण्यात आली होती आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळी शास्त्रीजी वापस परतणार होते परंतु रात्रीतूनच त्यांची तब्येत अचानकच बिघडली आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.