फक्त एका रस्त्याचं निमित्त झालं आणि भारत – पाकिस्तानमध्ये घनघोर युद्धाला सुरवात झाली..

भारत आणि पाकिस्तानची दुश्मनी कोणापासून लपून नाही. काश्मीरवरून, सीमेवरून , नद्यांवरून एवढंच काय तर रस्त्यावरून सुद्धा त्यांच्यात झालेल्या लढाईच किस्से प्रत्येकाला माहीतेयत, पण  फारच थोड्या लोकांना माहितेय की,  १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा पाया कच्छच्या अज्ञात आणि वाळवंटी भागात झालेल्या चकमकीत घातला गेला होता.

हा सगळं भाग एक प्रकार वाळवंट होता जिथं काही मेंढपाळ कधीकधी त्यांच्या गाढवांना चरण्यासाठी घेऊन जात किंवा कधीकधी चुकून पोलिसांचं पथक गस्त घालायला  यायचं.

तसं पाहायचं झालं तर इथं पाकिस्तान फायद्यात होतं, कारण या भागापासून २६ मैलाच्या अंतरावर त्यांचं बादीन रेल्वे स्टेशन होत, जिथून रेल्वेनं कराचीच अंतर मात्र ११३ मैल होत. तसेच पाकच्या ८ व्या डिव्हिजनचं मुख्यालय सुद्धा इथंच होत. 

दुसरीकडं भारतातनं कच्छच्या रणात जाण्यासाठीचे सगळे रस्ते पार दुर्गम होते. सगळ्यात जवळचा ३१ वं  ब्रिगेड अहमदाबादात होतं, जे तिथल्या सगळ्यात जवळच्या रेल्वे स्टेशन भुजपासून १८० किलोमीटर दूर होत. तसं पाहिलं तर भुज रणचा एक छोटा भाग होता. पण वादग्रस्त भारत-पाकिस्तान सीमेपासून ११० मैलांच्या अंतरावर होतं.

रस्त्याच्या लढाईच मेन कारण

या भांडणाला सुरुवात तेव्हा झाली जेव्हा भारतीय सुरक्षा दलाला समजलं कि,  पाकिस्ताननं डींग आणि सुराईला जोडण्यासाठी १८ मे १९६५ रोजी एक कच्चा रस्ता बनवला. हा रस्ता अनेक ठिकाणी भारतीय सीमेच्या दीड मीटर अंतरावर जात होता. भारताने स्थानिक आणि मुत्सद्दी पातळीवर याचा निषेधही  व्यक्त केला होता.

पाकिस्ताननं याच्या उत्तरात ५१ व्या ब्रिगेडचे  कमांडर ब्रिगेडिअर अज़हरला त्या भागात अधिक आक्रमक गस्त घालण्याचे आदेश दिले. दुसरीकडे मार्च येता येता भारताने कांजारकोटच्या जवळ  अर्ध्या किलोमीटर दक्षिणेस सरदार चौकी बनविली. मात्र पाकच्या डोळ्यात ते खुपलं. पाकिस्तानचा कमांडर मेजर जनरल टिक्का खानने  ब्रिगेडियर अजहरला हल्ला करून भारताच्या नव्याने बनवलेल्या  सरदार चौकीला उध्वस्त करण्याचे आदेश दिले.

९ एप्रिलला पहाटे २ वाजता पाकिस्तानी हल्ला सुरु झाला. त्याला सरदार चौकी, जंगल आणि शालीमार अशी आणखी दोन भारतीय पोस्ट ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले. शालिमार चौकीवर तैनात असलेल्या स्पेशल रिझर्व्ह पोलिस जवान मशीन गन आणि मोर्टर फायरच्या कव्हरमध्ये पुढे जात पाकिस्तानी सैनिकांचा सामना करू शकले नाही. दरम्यान, सरदार चौकीवर असलेल्या पोलिसांनी तीव्र प्रतिकार केला. १४ तासाच्या आक्रमणानंतर  ब्रिगेडियर अजहरनं  गोळीबार थांबविण्याचे आदेश दिले.

या दरम्यान, सरदार चौकीच्या पहाऱ्यासाठी असलेले पोलिस दोन मैल मागे विजियोकोट चौकीवर आले. पाकड्यांना हे माहित नव्हतं आणि त्यांनीही आपल्या सैनिकांना परत या ठिकाणी जाण्याचे आदेश दिले, जिथून त्यांनी सकाळी हल्ला सुरू केला होता. संध्याकाळी परत आलेल्या एसआरपी सैनिकांना समजलं की, सरदार चौकीवर पाकिस्तानी सैनिक नाहीत. त्यांनी संध्याकाळपर्यंत न लढता परत त्या चौकीवर नियंत्रण मिळवलं.

परिस्थितीचे गांभीर्य पाहून भारताने मेजर जनरल डुनला मुंबईहून कच्छला पाठवलं. या दरम्यान, पाकिस्ताननं सुद्धा सगळ्या ८ व्या इन्फ्रंट्री डिव्हिजनला  कराचीहून  पाकच्या हैदराबादला बोलवलं. त्यावेळी परिसरात ब्रिगेड कमांडरची भूमिका बजावणारे लेफ्टनंट कर्नल सुंदरजी यांनी पोलिसांचा ड्रेस घालून भागाची पाहणी केली आणि भारताने कांजारकोटवर हल्ला करावा असा सल्ला दिला.

परंतु सरकारनं त्यांचं म्हणणं काय ऐकले नाही. पुढे हे सुंदरजी भारतीय लष्करप्रमुख बनले आणि याच भागात त्यांनी १९८७ मध्ये प्रसिद्ध ब्रास्टॅक अभ्यास केला, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे सैन्य जवळजवळ युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचल.

या दरम्यान, एक मनोरंजक गोष्ट अशी घडली की, पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल असगर खान यांनी भारतीय वायुसेना प्रमुख एअर मार्शल अर्जन सिंग यांना फोन करून दोन्ही देशांच्या हवाई दलाने या लढापासून स्वत: ला दूर ठेवण्याविषयी बोललं.

अर्जन सिंग यांनी त्यांचा सल्ला स्वीकारला पण असगर खानने  या ऑफरवर फील्ड मार्शल अय्यूब खानची संमती घेतली नव्हती. असगर खान यांनी आपल्या ‘द फर्स्ट राऊंड’ या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केलेला नसला तरी नंतर असा अंदाज वर्तविला जात होता की,  कदाचित यामुळंच   युद्ध सुरू होण्याच्या दहा दिवस अगोदरच अय्यूब खानने त्यांना एअर मार्शल म्हणून पदावरून काढून टाकले आणि  नूर खानला पाकिस्तानी हवाई दलाचा नवा प्रमुख बनवण्यात आलं.

यांनतर २४ एप्रिलला ब्रिगेडियर इफ्तीकर जूनजुआ (जे नंतर पाकिस्तानच्या लष्करप्रमुख बनले) च्या नेतृत्वात पाकिस्तानी सैन्याने सेरा बेट ताब्यात घेतला. त्यानं यासाठी दोन फुल टँक रेजिमेंट्स आणि तोफखान्यांचा वापर केला आणि भारतीय सैनिकांना माघार घ्यावी लागली. पुढील दोन दिवसांत भारतीय सैनिकांनाही बीयर बेटची चौकी सुद्धा खाली करावी लागली.

पाकिस्तानने देशी-विदेशी पत्रकारांना बोलावून भारतीय सैनिकांनी सोडलेली  शस्त्रे आणि दारुगोळा दाखवल्यावर भारत आणखी लाजिरवाणं व्हायला लागलं.

पाकिस्तानचा गैरसमज

नंतर, ब्रिटनच्या हस्तक्षेपाने दोन्ही सैन्य आपल्या जुन्या मोर्च्यावर परत गेले. फारूक बाजवा यांनी आपल्या ‘फ्रॉम कच्छ टू ताशकंद’ या पुस्तकात लिहिले की, यामुळे पाकिस्तानी सैन्याला कमीतकमी मर्यादित पातळीवरच का असेना  भारतीय सैन्याची क्षमता अजमवण्याची  संधी मिळाली.

भारताचे तत्कालीन लष्कराचे सरचिटणीस जनरल कुमार मंगलम यांनी एका मुलाखतीत  सांगितलं  की,

“भारतासाठी कच्छची लढाई योग्य शत्रूशी चुकीच्या वेळी चुकीची लढाई होती. या लढाईत पाकिस्तान भारतावर भारी पडलं, पण यामुळं पाकिस्तानला गैरसमज सुद्धा झाला आणि मोठं नुकसान सहन करावं लागलं. काश्मीरची लढाई त्यांच्यासाठी एक केकवॉक ठरली.

भारताचे माजी उच्चायुक्त शंकर बाजपेयी यांनी एका मुलाखतीत सांगितले कि, ‘ही चकमक भारतासाठी वरदान ठरली, कारण पाकच्या कटाबाबत सतर्क झालं. तीन महिन्यांनंतर जेव्हा पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर अंतर्गत काश्मीरमध्ये आपल्या घुसखोरांना प्रवेश मिळवून  दिला, तेव्हा भारतीय सैन्य त्यांच्याशी सामना करण्यास आधीच तयार होतं.

याच चकमकीच्या जोरावर सुरु झालेल्या सुप्रसिद्ध १९६५च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.