७१ च्या युद्धात या खेडूत महिलांनी केलेली मदत भारतीय हवाई दल कधीही विसरू शकणार नाही..

8 डिसेंबर 1971, भारत पाकिस्तान घनघोर युद्ध होतं. सारख्या सुरु असलेल्या घुसखोरीला वैतागून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तान तोडून वेगळा बांगलादेश निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली होती. भारतीय आर्मीचे शूर जवान निकराचा लढा देत होते.

भारताच्या पूर्व सीमेबरोबरच पश्चिम सीमेवर देखील युद्धाची आघाडी उघडण्यात आली होती. तिन्ही दळ उतरले होते. पाकिस्तानने अमेरिकेकडे या युद्धात मदत मागितली होती. अमेरिका यात उतरण्याआधी लवक्रातल्या लवकर पाकिस्तानचा निकाल लावण्याचा भारताचा प्रयत्न सुरु होता. 

८ तारखेला रात्री भारत-पाक युद्धादरम्यान सेबर जेट विमानाच्या पथकाने भुजमधील भारतीय वायुसेनेच्या एअरस्ट्रिप वर 14 पेक्षा अधिक नॅपलॅम बॉम्ब टाकले. ज्यामुळं ही एअरस्ट्रिप तूटली आणि भारतीय लढाऊ विमानांचे उड्डाण भरणे अशक्य झाले.

हा भारताचा सर्वात महत्वाचा हवाई तळ होता. इथूनच संपूर्ण गुजरातचं संरक्षण केलं जात होतं. या भूजमधल्या एअरस्ट्रीप मुळे पाकिस्तानी लढाऊ विमाने खोलवर जाण्याचं धाडस करू शकत नव्हते. मात्र तोच एअरस्ट्रीप तुटल्यामुळे भारताची पश्चिम सीमा पाकिस्तानसाठी अगदी खुली झाली.

दुसरा दिवस उजाडला. भारतीय हवाई दलाने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना एअरस्ट्रिप दुरुस्त करण्यासाठी पाचारण केले, पण वेळ वेगाने जात होती आणि कामगार कमी होते.

अशा परिस्थितीत, भुज माधापूर गावातले 300 गावकरी भारतीय वायुसेनेच्या मदतीला आले.

ज्यात बहूतेक महिला होत्या. मनात देशभक्ती घेऊन त्या सगळ्या आपल्या घरातून बाहेर पडल्या. ही कदाचित त्यांची विलक्षण देशभक्तीचं होती, की त्यांनी डोक्यावर पाकिस्तानी बॉम्बची टांगती तलवार लटकत असतानाही एअरस्ट्रीपच्या दूरूस्तीसारखं अशक्य काम केवळ 72 तासात पूर्ण केले.

In 1971 300 Bhuj Women Risked Their Lives to Revive a Bombed Airstrip in 3 Days Vinaya

या धाडसी महिलांपैकी एक वल्बाई सेघनीने एका मुलाखतीत सांगितले की,

त्यावेळी त्यांना स्वत: सैनिकांसारखे वाटत होते.

तत्कालीन जिल्हाधिका्यांनी या 300 धाडसी महिलांना या उदात्त कार्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले. परंतु जेव्हा गावचे सरपंच जाधवजीभाई हिरानी यांनी पहिले पाऊल उचलले आणि हवाई दलाला मदत करण्यासाठी या महिलांकडून पाठिंबा मागितला, तेव्हा सर्वांनी आनंदाने त्यांचे समर्थन केले.

9 डिसेंबर 1971 रोजी जेव्हा त्यांना बॉम्ब पडण्याच्या घटनेची माहिती मिळाली तेव्हा आर्मी ट्रकमध्ये चढताना या महिलांनी एकदाही आपल्या किंवा आपल्या कुटूंबाच्या सुरक्षेचा विचार केला नाही. त्या थेट निघाल्या एअरस्ट्रीपच्या दुरूस्तीसाठी.

सेघनी यांनी सांगितल्याप्रमाणे त्या जवळपास 300 बायका होत्या, ज्या वायुसेनेच्या मदतीसाठी निर्धाराने आपल्या घरातून बाहेर पडल्या. जेणेकरून पायलट पून्हा तेथून उड्डाण करू शकतील.

त्या म्हणतात की, त्या दिवशी आमचा जीव गेला असता तरी तो सन्मानजनक मृत्यू असता.

युद्धाच्या वेळी स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक हे भुज विमानतळाचे प्रभारी होते आणि या महिलांच्या प्रोत्साहनासाठी स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांचेही महत्त्वपूर्ण योगदान होते. 50 आयएएफ आणि 60 डिफेन्स सिक्युरिटी कोरचे जवान आणि दोन अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मिळून त्यांनीच हे सुनिश्चित केले की, स्फोटात नुकसान झाल्यानंतरही एअरस्ट्रीप चालू राहिल.

स्क्वॉड्रॉन लीडर कार्निक यांनी एका मुलाखतीत या घटनेबाबत सांगितले की,

सर्वजण एकप्रकारे युद्ध लढत होते आणि यापैकी कोणतीही महिला जखमी झाली असती तर या प्रयत्नाचे मोठे नुकसान झाले असते. अखेर काम झालेच. हल्ला झाल्यावर कोठे आसरा घ्यायचा, याबाबत त्यांना सांगितले गेले होते आहेत आणि त्यांनी धैर्याने याचा पाठपुरावा केला. “

दरम्यान, तुटलेली एयरस्ट्रीप ठीक करणे, एक अवघड काम होते. कारण, नागरिकांच्या जीवाला सतत धोका होता. त्यांनी आपल्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सुरवात केली. जेव्हा जेव्हा भारतीय वायुसेनेला पाकिस्तानी बॉम्बर त्यांच्या दिशेने जाण्याची भीती वाटली, तेव्हा सायरन वाजवून या नागरिकांना सावध करण्यात येई.

सर्वजण ताबडतोब पळत जाऊन झुडुपात लपत. महिलांना हलक्या हिरव्या रंगाची साडी घालायला सांगण्यात आले जेणेकरून झाडीत लपणं सोपे होई. त्यानंतर एक छोटा सायरन पुन्हा कामावर जाण्याचा संकेत होता. सर्वांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट घेतले, जेणेकरून दिवसा उजेडाचा पुरेपूर फायदा मिळेल.

शत्रूच्या विमानाला चकमा देण्यासाठी शेणाने एयरस्ट्रीप झाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. सायरनचा आवाज येताच बंकरच्या दिशेने धाव घेतली जायची.

पहिल्या दिवशी तर जेवणाची देखील पंचाईत असल्यामूळं उपाशी झोपण्याची वेळ या नागरीकांवर आली होती.

या युद्धाच्या तीन वर्षांनंतर जेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांना या महिलांना काही भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी नम्रपणे नकार दिला. त्यानंतर 50,000 रूपयांचे बक्षीसही माधापूर येथील एका सामुदायिक सभागृहाला देण्यात आले. तसेच 2018 मध्ये, केंद्र सरकारने भुजच्या माधापूर गावात या वीर महिलांना ‘वीरांगना स्मारक’ नावाचे युद्ध स्मारक समर्पित केले आहे!

02 01 2020 vijay karnik 19898559

दरम्यान,या घटनेवर आधारित भुजः द प्राइड ऑफ इंडिया हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यात अजय देवगनने स्क्वॉड्रॉन लीडर कर्णिक यांची भूमिका साकारली आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.