1972 साली ज्ञानेश्वरांची समाधी उघडण्याविषयीचे प्रकरण नेमके काय आहे ?
तुला माहिताय का? या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना बाहेरून पैसा येतो. बाहेरून म्हणजे थेट दुबई, अमेरिका. तिकडचे पैसे घेतात आणि इतकं हिंदू धर्मात ढवळाढवळ करतात. तूला माहिताय का? या अंनिसवाल्यांनी एकदा आळंदीत जावून ज्ञानेश्वर महाराजांची समाधी तोडण्याचा प्रयत्न केला होता.
आमचा सनातनी मित्र आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल माहिती सांगत होता. तो सांगत असणाऱ्या सर्वच गोष्टी भाकडकथा होत्या त्यामुळे त्याच एकही वाक्य मनावर घेण्याचा प्रश्नच नव्हता. पण,
जेव्हा तो अंनिसवाल्यांनी आळंदीत जावून ज्ञानेश्वरांची समाधी तोडण्याचा प्रयत्न केला होता अस म्हणाला तेव्हा मात्र आमच्या फ्यूजा टाईट झाल्या. अरे काहीही काय बोलतो, तूला कोणी सांगितलं? तर तो म्हणाला, मी वाचलय.
आत्ता त्याने वाचलेले नेमकं आम्हाला दाखवण्याची वेळ आली तेव्हा सापडलं नाही. पण मुद्दामहून आम्ही पियर्सच्या साबणाच्या जाहिरातीत ज्याप्रमाणे ५ महिलांना घेवून प्रयोग करतात त्याप्रमाणे ५ सनातनी लोकांना घेवून प्रयोग करायचं ठरवलं.
आम्ही पाच सनातनी व्यक्तींना याबद्दल माहिती विचारली तर त्यापैकी प्रत्येकाला ही गोष्ट माहिती होती. त्यांच ठामपणे म्हणणं होतं, होय अंनिसवाल्यांनी अस केलेल. ज्यांनी ही गोष्ट ऐकली नव्हती ते पण म्हणतं होते अस केलेलच असणार आहे.
आत्ता मात्र प्रकरण सिरीयस घेण्यासारखं वाटलं. नेमकं काय प्रकरण होतं याची शोधाशोध चालू केली. इंटरनेटवरून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर हाती शून्य आला. त्यानंतर मग या क्षेत्रातील अभ्यासकांना फोन करून विचारणा सुरू केली.
त्यांनी माहिती देण्यास सुरवात केली.
तर १९७२ साली आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडण्याचा विषय समोर आला होता ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मात्र दूरान्वये संबध नव्हता.
कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली १९८९ साली. त्यापुर्वी श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ते नरेंद्र दाभोळकर कार्यरत होते. या समितीची स्थापना झाली होती ती १९८२ साली. आणि हा विषय समोर आला होता तो १९७२ साली. १९७२ साली नरेंद्र दाभोळकर नुकतेच मिरज येथील वैद्यकिय कॉलेजमधून शिक्षण घेवून बाहेर पडले होते. त्या काळात ते म्हणावे तितके सक्रिय नव्हतेच आणि इतका जहाल विषय मांडावा इतके सक्रिय तर नव्हतेच नव्हते.
आत्ता विषय समाधीचा,
तर ज्ञानेश्वरांनी लिहलेल्या ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपीका बद्दल मतभेद होते. काही जणांच्या मते यातील अनेक ओवी या नंतरहू घुसडण्यात आल्या. मात्र संत एकनाथांनी कित्येक वर्षांपूर्वीच ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली होती. त्यांनी असेही लिहले होते की,
श्री ज्ञानदेवाचे पाठी, जो ओवी करील मराठी, त्याने अमृताचे ताटी, जाण नरोटी ठेविली.
मात्र त्यानंतर देखील ज्ञानेश्वरीमध्ये बाहेरून अनेकांनी ओव्या घुसडल्याचे सांगण्यात येते. ज्याप्रमाणे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली होती त्याचप्रमाणे आपण ही शुद्ध प्रत तयार करावी असा विचार वारकऱ्यांच्याच एका चर्चेतून समोर आला.
आत्ता विषय येतो तो समाधी उघडण्याचा…
तर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तेव्हा त्यांच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली होती. आपण समाधी उघडल्यास तिथे आपणास ज्ञानेश्वरीची अस्सल प्रत मिळेल असा एक मतप्रवाह समोर आला. पाहता पाहता या मुद्याने जोर पकडला. पण हा मुद्दा देखील वारकऱ्यांच्या एका गटाकडून आला होता न की कोणत्याही समाजसुधारक, धर्मसुधारक व्यक्तींकडून.
ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत मिळवण्याच्या हेतूने समाधी उघडण्याची गोष्ट पुढे आली आणि तिला तितकाच प्रखर विरोध झाला. हा विरोध वारकरी संप्रदायाने केला आणि विरोध मान्य करत समाधी उघडण्याची गोष्ट मागे पडली. त्यानंतर आजतागायत हा विषय कधी चर्चेत आला नाही की समाधी उघडण्यात आली नाही.
चर्चेतला विषय चर्चेतच संपून गेला अशी ती गोष्ट मात्र ही चर्चेतली गोष्ट काहीतरी गुढ म्हणून आजही wtsapp विद्यापीठातून तोंडावर मारली जाते.
या प्रकरणात काडीचाही संबंध नसणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आणि डॉ. दाभोळकरांना नाहक बदनाम केले जाते. समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या प्रेमापोटी डॉ. दाभोळकरांनी आपल्या मुलाचं नाव हमीद ठेवलं मात्र अफवा पसरवणारे त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचं सांगून मुलाच्या हमीद नावाकडे बोट दाखवतात. असाच हा काहीसा प्रकार.
हे ही वाच भिडू.
ह्या विषयावर दाभोळकरांचा सहभाग होता. तदसंबंधीचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. माझे संग्रही आहे. रघुनाथ नारायण शुक्ल ह्या NCL मधील शास्त्रज्ञांच्या कामामुळे समाधी उघडणे टळले.
समाजात खोटी माहिती पसरवणारे खूप आहेत. त्यात आता आपली भर नोंदली गेली.
We are not scientifically minded society. Similar things with regards TajMahal base opening.
पुस्तकाचे नाव दिले तर खूप बरं होईल…माझ्या काही नास्तिक मित्रांची तोंडे बंद करता येतील..मी अध्यात्माचा विद्यार्थी असल्याने ह्यावर अधिक चिंतन केलंय…सकारात्मक लहरी, तरंगे अनुभवली आहेत…आळंदीचा अनुभवही तसाच होता…पण काहींना पुरावाच लागतो….म्हणून