भारतीय विमानाचं अपहरण झाल्यानंतर चक्क पाकिस्तानने मदत केली. 

भारत आणि पाकिस्तानात मोठ्ठं टशन आहे. लहानपणापासून आपल्याला तेच माहिती. इतकच काय आत्ता हि हेडलाईन वाचून देखील, ते कोण मदत करणार, दाखवतो त्यांना वगैरे वगैरे टाईप धमक्या देणारे अनेकजण येतील. आत्ता पाकिस्तान शत्रूरात्र आहे याबद्दल आमचं काही दुमतं नाही. पण एखादे किस्से असे देखील असतात कि शत्रूकडून देखील अस्स कस झालं बुवा. 

अचानक एवढं चांगल का वागाईलास टाईप रिएॅक्शन येवू शकतात. तर असाच एक अनुभव भारताला आला होता.

जेव्हा भारतीय विमानाच अपहरण करून ते पाकिस्तानात घेवून जाण्यात आलं होतं आणि पाकिस्ताने विमानातील प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यासाठी चक्क आपल्याला मदत केली होती. 

साल होतं १९८१. सप्टेंबर महिन्याचे दिवस चालू होते. भारतात खलिस्तानवादी चळवळीने जोरात डोकं वर काढलेलं. कित्येक ठिकाणी कारवाई करुन खलिस्तानवादी आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती. याचाच परिणाम म्हणून पाच खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईनच्या IC 423 चं अपहरण केलं होतं. 

दिनांक २९ सप्टेंबर १९८१.

इंडियन एअरलाईन्सच्या बोईंग ७३७ विमानाने श्रीनगरहून दिल्लीच्या दिशेने उड्डाण केलं. काही वेळातच विमानात बसलेल्या पाच जणांनी हे विमान ताब्यात घेतलं होतं. आपल्याकडे असणाऱ्या किरपान च्या जोरावर त्यांनी विमानातील प्रवाशांना धमकवण्यास सुरवात केली. 

गजेंद्र सिंह याने विमानाच्या कॉकपीटचा ताबा घेतला. सतनाम, ताजिंदर सिंह, जसवीर सिंह, आणि करणसिंह या सहकाऱ्यांसोबत त्याने विमानाचं अपहरण केलं. कॅप्टनला हे विमान लाहोरच्या दिशेने घेवून जाण्यास सांगण्यात आलं. विमानामध्ये एकूण १११ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर होते. पायलटने विमान लाहोर विमानतळावर उतरवलं. विमान उतरल्यानंतर १११ प्रवाशांपैकी ६० प्रवाशांना अपहरणकर्त्यांनी सोडून दिलं. मात्र इतर प्रवाशांना ओलिस धरून आपल्या मागण्या नटवरसिंग यांच्याकडे सुपूर्त केल्या.

त्यांची पहिली मागणी होती ती म्हणजे खलिस्तान देशाला तात्काळ भारताने मंजूरी द्यावी. त्यांनी दावा केलेल्या भागातून आपलं सैन्य, प्रशासन मागे घ्यावं. जनरलसिंग याची सुटका करावी व त्याचसोबत ५,००,००० लाख डॉलर देण्यात यावेत. 

या मागणी दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये योग्य संपर्क होतं होता. रात्री दहा च्या सुमारास पाकिस्तानी कंमाडोचे पथक SSG (स्पेशल सर्विस ग्रुप) यांच्या मार्फत जनरल लोधी यांच्या सुचनेनुसार ऑपरेशन हाती घेण्यात आलं. भारताकडून सुचना आल्यास आपण विमानात घुसून योग्य ती कारवाई करु असा निरोप भारताकडे पाठवण्यात आला. भारताकडून रात्रीच्या सुमारास तात्काळ मिटींग बोलावून पाकिस्तानला कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्याच रात्री पाकिस्तानच्या कमांडो पथकाने योग्य संधी साधून कारवाई केली. विमानातील प्रवाशांची सुखरुप सुटका करुन अपहरणकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. पुढे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्या पाचही जणांच्या विरोधात पाकिस्तान कोर्टामध्ये केस चालवण्यात आली. त्यांना पाकिस्तानच्या कोर्टामध्ये जन्मठेपेची शिक्षा देखील देण्यात आली.

२००० साली ते पाचही जण जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्त झाले. या पाच जणांपैकी ताजिंदर आणि सतनाम पुन्हा भारतात परतले तर उर्वरीत तिघे गजेंद्रसिंह, जसविर आणि करणसिंह यांनी पाकिस्तानातच राहणं पसंद केलं. 

२०११ साली दिल्ली कोर्टामध्ये ताजिंदर आणि सतनाम यांच्यावर पुन्हा चार्जशीट दाखल करण्यात आलं. मात्र त्या दोघांनी यापुर्वी त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा भोगली असल्याने त्यांना पुन्हा शिक्षा करु नये असा युक्तिवाद करण्यात आला. कोर्टाने देखील तो मान्य करत या दोघांची मुक्तता केली.

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.