कित्येक पिढ्यांची एकच टॅगलाईन,” नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो”

नवनीत हाती आले हो अवघड सोपे झाले हो

हि टॅगलाईन एकेकाळी शाळकरी पोरांच्या परिचयाची होती. नवनीतच्या २१ अपेक्षितांमधून बोर्डाच्या परीक्षांचा पोरांनी दिवसरात्र केलेला अभ्यास असो किंवा गृहपाठाच्या उत्तर नवनितच्या गाईडमधून लिहिणं असो पदोपदी नवनीत शाळकरी पोरांच्या सोबत होतं. अनेक पिढ्या या नवनितच्या अपेक्षीत आणि गाइडांवर वाढल्या आहेत. आज आपण याच नवनीतची स्थापना आणि विस्तार कसा झाला त्याबद्दल जाणून घेऊया.

नवनीतची स्थापना झाली ती १९५९ साली. सुरवातीला नवनीतला मोठं स्वरूप आलेलं नव्हतं, स्थापना केली ती गाला फॅमिलीने. हरिचंद गाला आणि गाला ब्रदर्स/फॅमिली हे आद्य स्थापक होते. आधीच्या काळात महाराष्ट्र आणि गुजरात एकच प्रांत होता पण पुढे हे दोन राज्य तयार झाल्याने गाला फॅमिलीने नवनीतच हेडक्वार्टर म्हणून मुंबईची निवड केली. पुढे १९६६ साली अहमदाबादमध्ये कंपनीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक कार्यालय उभारण्यात आलं. 

१९६९ मध्ये अहमदाबादेत एक छोटा प्रिंटिंग प्लांट सुरु करण्यात आला. जस जसा काळ पुढे सरकत होता तसा उत्तरोत्तर नवनीतचा उत्कर्ष होत चालला होता. १९८० साल हे नवनितच्या दृष्टीने क्रांती आणणारं साल होतं. या काळात नवनितने मोठी प्रगती केली. १९८२-८३ च्या काळात नवनीतने इलेकट्रोनिक फिल्डमध्ये आगमन केलं. याच काळात प्रिंटिंगसाठी आणि बाइंडिंगसाठी लागणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची मशिनं वापरण्यात येऊ लागली.

गुजरातच्या दंताली भागात मोठ्या नवनीतने अजून एक प्लांट उभा केला. या प्लांटमध्ये प्रिंटिंग, बाइंडिंग, पॅकेजिंग, स्टोरिंग अशा सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. या प्लांटमध्ये दिवसाला १२० टन प्रोडक्शन केलं जातं म्हणजे २ लाख पुस्तक दिवसाला छापली जातात. यात सगळीच मिळतीजुळती पब्लिकेशन सामील आहेत. अनुभवी स्टाफ आणि लवकरात लवकर काम पूर्ण करणे हे नवनीतच वैशिष्ट्य आहे. 

नवनीतचे अनेक पब्लिकेशनसुद्धा आहेत त्यात नवनीत, गाला, विकास, फन, बॉस आणि नवनीत नेक्स्ट सामील आहेत. हे सगळे ब्रँड टॉप सेलिंग ब्रँड प्रोडक्टस आहेत. सध्या भारतात नवनीत हि टॉप सेलिंग ब्रँड कंपनी आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवनीत हि डॉमिनंट मार्केट कंपनी म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण भारतभर सगळ्यात जास्त विक्री होणारे शैक्षणिक साहित्य, स्टेशनरी हे नवनीत कंपनीचे आहेत.

भारतात अगदी खेडोपाड्यातसुद्धा नवनीतला प्राधान्य दिलं जातं. शाळेतसुद्धा अपेक्षितसाठी नवनीत हेच जास्त सजेस्ट केलं जातं यावरून नवनीतची लोकप्रियता किती आहे याची प्रचिती येते. गाईडपासून ते वह्यांपर्यंत नवनीत आपला ब्रँड वाढवत आहेत. भारतच नाही तर परदेशातसुद्धा नवनीतचे प्रोडक्ट निर्यात केले जातात.

नवनीत कंपनी ३ सेगमेंटमध्ये आपला व्यापार करते त्यात पहिल्या क्रमांकावर आहे शैक्षणिक आणि मुलांसाठी पुस्तकं प्रकाशित करणे, पेपर स्टेशनरी आणि स्टेशनरी व्यतिरिक असणारे प्रोडक्ट. शेअर बाजारातसुद्धा नवनीत कंपनीचा दबदबा आहे. लोकांचा विश्वास हा नवनीत ब्रॅण्डवर किती जास्त हे आहे परीक्षेच्या काळात जास्त दिसून येतं कारण परीक्षा आल्या कि नवनितचा खप वाढला जातो.

भारतभरात नवनीतचे जवळपास ७५ हजार आउटलेट्स आहेत. दीड लाख शाळेंसोबत त्यांचे ऑल रेडी करार आहेत. १९९५ साली नवनीतचा एकही वितरक नव्हता ते २०११ पर्यंत बाराशे वितरक नवनीतचे झाले. वॉलमार्ट, टेस्को आणि टार्गेट हे प्रोडक्ट जगभरात वितरित केले जातात. आज घडीला नवनीतचे महत्वाचे माणसं आहेत कमलेश विकामसे आणि गणेश गाला. 

अडीच हजार कामगार आणि १३० मिलियनचा रिव्हेवेन्यू आज घडीला नवनीतचा आहे. सध्यातरी नवनीतला स्पर्धा करणारा क्लासमेट हा ब्रँड आहे पण नवनीत हा लोकांचा विश्वासाचा ब्रँड आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.