दारू पिल्यानंतर माणसं खरं का बोलतात ?

जगातील सर्वात जास्त खोटं हे कोर्टात बोललं जात तर जगातील सर्वात जास्त खरं बार मध्ये बोललं जातं 

 – सआदत हसन मंटो.

मंटो साहेबांनी खऱ्या खोट्याची केलेली हि व्याख्या. या वाक्यातली पहिली लाईन आपल्याला फिक्स खरी आहे ते माहितच आहे. पण दूसऱ्या लाईनच काय ? ती खरी का खोटी ?

एकवेळ मान्य केलं की दारू पिल्यानंतर लोक खरच बोलत असतात तरी या गोष्टीचा फायदा घेवून खोटं बोलणाऱ्यांची संख्या देखील जगात काही कमी नाही. बरं तुम्हाला आम्ही हे सांगतोय तो कोणत्या अवस्थेत. तर पुर्णपणे शुद्धीत. याचा अर्थ असा नाही की, आम्ही खोटं बोलतोय.

तर विषयांतर टाळून आपण चालू करुया मुख्य मुद्याला. तर आजचा समान्य नॉलेजचा मुद्दा असा आहे की, खरच दारू पिल्यानंतर माणसं खर बोलतात का ? 

तर संशोधन अस सांगत की माणसं खर खोट बोलत नाहीत तर त्यांची कोणत्याही गोष्टींवर तर्क लावण्याची जी क्षमता असते की दारू पिल्यानंतर कमी होते. अर्थात आपण खर बोललो तर त्याचे परिणाम काय होतील हा तर्क दारू पिल्यानंतर लावणं अशक्य जातं त्यामुळे खरं बोलण्याचं सांगण्याच प्रमाण वाढतं. आत्ता हे झालं एका वाक्यातलं ज्ञान. पण त्यासाठी शास्रीय आधार देखील पाहीजे. तरच आमचं महत्व अबाधित राहिल. 

सादर करत आहोत दारू पिल्यानंतर खरच बोललं जातं याच शास्त्रीय कारण –  

शास्रीय कारण सांगण्यासाठी आपणाला दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. पहिली गोष्ट आपलं डोक आणि दूसरी गोष्ट दारू. दारूमध्ये काय असत ? तर अल्कोहल. हे अल्कोहल आपल्या पोटात जातं  तेव्हा आपल्या डोक्यावर अर्थात मेंदूवर परिणाम करु लागत.

मेंदूमध्ये हिप्पोकैम्पस, मोटर कॉर्टेक्स और निओफ्रंटल कॉर्टेक्स असे तीन भाग असतात. नावे लक्षात राहत नसली तर अ,ब आणि क म्हणू शकता. तर या अ,ब आणि क वर दारूच्या मात्रेनुसार क्रमवार परिणाम पडत जातो. 

१. हिप्पोकैम्पस-

हिप्पोकैम्पस नावाचा मेंदू मधील जो भाग आहे ते आपल्या मेमरी कार्ड सारखा असतो. क्षणोक्षणी आपल्या आजूबाजूला काय होतय ते या भागात साठवलं जातं. दारूचा पहिला परिणाम या भागावर होतो. परिणामी दूसऱ्या दिवशी काल काय काय झालं अस सहकाऱ्यांना विचारायची वेळ आपणावर येते. 

२.कॉर्टेक्स-

मेंदूचा दूसरा भाग म्हणजे मोटर कॉर्टेक्स. नावातच मोटार असणारा हा भाग शरिरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. तोल जाण्याचे पराक्रम या भागावर दारूचे परिणाम झाल्यामुळेच होतात. 

३.निओफ्रंटल कॉर्टेक्स-

आत्ता तिसरा भाग. जो की दारू पिल्यानंतर तुमच्या तोंडातून खरं बोलण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्या भागाच नाव आहे निओफ्रंटल कॉर्टेक्स. हा भाग तुमच्या डोक्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण याच भागामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टींबद्दल तर्क करू शकता. लिहू शकता. वाचू शकता. सिनेमा पाहू शकता. पुढे काय होईल मागे. काय झालेलं. आत्ता ती तुमच्याशी बोलणार आहे की नाही  ? तो प्रेमात तुम्हाला खरच फसवतोय का असले तर्क मांडण्याच काम मेंदूचा हाच भाग करत असतो.

साहजिक या भागावर जेव्हा अल्कोहलचा परिणाम होतो तेव्हा तो असे पुढचे मागचे तर्क मांडण्याच सोडून देतो. असे तर्कच निर्माण होत नसल्यानं तुम्ही आपल्या खोट बोलण्याचा किंवा येडेचाळे करण्याचा कोणता परिणाम होवू शकतो याचा विचार करु शकत नाही. त्यातूनच तुम्ही खरं बोलता. पण या काही लोकं इतके हूशार असतात की लक्षात कंट्रोल करुन करुन या भागाला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करतात. आणि खरच बोलतोय की म्हणून खोट बोलू लागतात. 

तर असो कधी मैफिल रंगेल तेव्हा मित्र मैत्रीणींना हे वाचायला द्या. त्यांना तर्क लावूदे हे खरच आहे की लेखकाच्या सुद्धा निओफ्रंटल कॉर्टेक्स वरती परिणाम झालाय. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.