२०२१ पण संपत आलं.. खरं भारताचे अंतराळवीर अजूनही आभाळाकडेच डोळे लावून बसलेत
भारतीय अंतराळवीर स्वबळावर अवकाशात पाठविण्याची योजना भारताच्या वतीने इस्रोने २००९ मध्ये आखण्यात आली होती. यावेळी २०१५ मध्ये दोन अथवा तीन अंतरिक्षयात्री (गगननॉट्स) पाठविण्याचा संकल्प केला होता. तसेच त्यावेळी भारताच्या नियोजन समितीने पाठबळ पुरविण्याचे मान्यही केले होते. त्यामुळे हि योजना लवकरात लवकर मार्गी लागणार अशीच चिन्हे होती.
इस्रोने इंडियन ह्युमन स्पेसलिफ्ट प्रोग्रॅम हा कार्यक्रम आखला होता. त्यानुसार अंतराळवीरांच्या प्रशिक्षणाची सोय करण्यापासून ते इतर सर्व नियोजन ठरले होते. २००९ मध्येच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं होत. तसेच यावेळी रशियाकडून सहकार्य घेण्याची शक्यता बोलून दाखविण्यात आली होती.
१५ ऑगस्ट २०२१ ला भारतीय अंतराळवीर झेप घेतील असे सांगण्यात आले होते.
यानंतर चीनने सुद्धा २०१२ मध्ये आपण अंतराळवीर पाठविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भारताच्या वतीने या इस्रोच्या मोहीलेम वेग वेग देण्यात येईल असं सांगितलं गेले होते. मात्र २०२१ संपत आले असून अजूनही गगननॉट्स योजना पूर्णत्वास येऊ शकली नाही.
आता याबाबत केंद्रीय अंतरिक्ष राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मोहिमे बाबत भाष्य केले आहे.
त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, गगनयान मिशन अंतर्गत पुढच्या वर्षी जानेवारीत दोन मानवविरहित उड्डाणे होतील असे सांगितले. तसेच भारतीय अंतराळवीर २०२३ अंतराळात जातील अशी माहिती दिली.
२०२१ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष होतील. त्याचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी भारताचा पहिला अंतराळवीर घेऊन इस्रोचे यान उड्डाण करेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये केली होती. मात्र मध्येच कोरोनाने गोधंळ घातल्याने यांना संदर्भातील काही बाबी पूर्ण पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तसेच त्याची ट्रायल सुद्धा वेळेत पूर्ण झाले नाही.
मुख्य म्हणजे कोरोनामुळे अंतराळवीरांना देण्यात येणारे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे २०२१ मध्ये होणारे गगनयान मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. केंद्रीय अंतरिक्ष राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह गगनयान मोहीम पूर्ण होण्यासाठी २०२३ उजाडावे लागणार आहे.
तसेच यावेळी केंद्रीय अंतरिक्ष राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारतीय अंतराळवीर ज्यावेळी अंतराळात जाईल त्याच वेळी खोल समुद्रयान मिशन अंतर्गत ५ हजार मीटर समुद्र खोलीत मानव पाठविण्याची मोहीम यशस्वी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
एकीकडे एक भारतीय अंतराळवीर उड्डाण घेईल त्याच वेळी दुसऱ्या भारतीयाने सागराचा तळ गाठावा. तसेच त्यांनी हे सुद्धा मान्य केलं की, समुद्र तळ शोध मोहीम मागे पडत आहे. मात्र आता याकडे सरकार विशेष लक्ष घालून या मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार असल्याचे सांगितले.
जर गगनयान मोहीम यशस्वी तर भारताने खूप मोठा पल्ला गाठल्याचे सिद्ध होईल.
अंतराळ मोहिमेत भारत सध्या मागे
भारत सध्या अंतराळ मोहिमेत मागे पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या २ वर्षात केवळ ४ यानाचे प्रक्षेपण झाले आहे. जर याबाबतची तुलना चीन सोबत केल्यास एक वर्षांत जवळपास ४० मोहीम फत्ते केल्या आहेत. हे करून चीनने जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे.
तसेच एका वर्गाकडून कायम अशा खर्चिक मोहिमेला विरोध करण्यात येतो. या मोहिमेवर होणारा खर्च भारतातील गरिबी निर्मूलनाकडे हा निधी वळवून त्यावर लक्ष केंद्रित करावं अशी टीकाही करण्यात येते.
हे ही वाचं भिडू :
- अंतराळात सापडलेल्या एका जिवाणूला सय्यद अजमल खान यांच नाव देण्यात आलेलं आहे
- आज राकेश शर्मा ७१ वर्षांचे झाले, या वयातही त्यांची अंतराळात जायची तयारी आहे.
- देशद्रोहाचा खोटा आरोप झाला नसता, तर मंगळयान २० वर्षांपुर्वीच यशस्वी झालं असतं !