हे खतरनाक मीम्स आले आणि लॉकडाऊन असूनही २०२१ भारी गेलं ….

चांगला आणि वाईट काळ येतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे येते ते जाते. म्हणजेच, जग खूप बदलणारं आहे, एखादी गोष्ट तिथे कधीही राहू शकत नाही. आता 2021 वर्ष सरत आहे, 2022 पुढे उभं आहे, ज्यावर मानव नवीन आशेने साजरे करण्यास सज्ज होत आहे. पुढच्या वर्षी काय करायचे म्हणून लोक नवस करू लागले आहेत. पण मागच्या वर्षीच्या आठवणी पण घ्या. या गोड आठवणींनीच २०२१ हे वर्ष वेगळे केले. आपल्याकडे असे काही मीम्स आहेत जे 2021 मध्ये व्हायरल झाले होते. जरी यापैकी बरेच काही आहेत जे उपयुक्त आहेत आणि लक्षात ठेवण्यासारखे देखील आहेत… हे टॉप 5 इतके मजेदार मीम्स आहेत की आपण त्यांना विसरू शकत नाही. आता बाकीचे जे तुमचे पर्सनल फेवरेट असतील ते कमेंटीत टाका.

आपल्या देशात काहीही होऊ शकतं मिम्सच्या माध्यमातून क्रांती घडवण्याची धमक आपल्या देशातल्या तरुणांच्या मोबाईलमध्ये आहे याचा प्रत्यय पुढल्या काही मिम्स मधून कळेलच.

1) जल लिजीए

Amrita Rao's dialogue 'Jal lijiye, aap thak gaye honge' from 'Vivah' goes  viral on the internet as netizens share hilarious memes
अमृता रावचा जल लिजीए हा मीम चांगलाच व्हायरल झालेला. विवाह सिनेमात घरी पाहुणे पाहायला आल्यावर पाण्याचा ग्लास हातात घेऊन अमृता राव जाते आणि डायलॉग म्हणते की जल लिजीए आणि या डायलॉग वर नेटकऱ्यांनी मिम्स बनवायला सुरवात केली. पट्टे खेळून दमला असशील तर जल लिजीए, पोरींच्या फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये गूळ पाडून दमला असशील तर जल लिजीए अश्या अनेक वेगवेगळ्या परिस्थितीत जल लिजीए या डायलॉगचा धुमाकूळ सुरू झाला होता. खुद्द अमृता रावला सुद्धा तिच्या अनेक लाईव्ह सेशनला हा डायलॉग म्हणा म्हणून कमेंटमध्ये लोकं विचारत होते.

2) पुरी बटर की टिक्की डाल दी भैय्या ने

20 BTS "Butter" Memes That Will Make Your Day 200%...Butter - Koreaboo

मधीच एक नाद घुमत होता की ओ भाई, देखो भैय्या ने पुरी की पुरी बटर की टिक्कीया डाल दी, और देखो इतना सारा बटर और प्लेट सिर्फ बीस रुपये में… या फूड vlog करणाऱ्या गाबड्यानी डोकं उठवलेलं. कुठलाही फूड vlog व्हिडिओ बघा त्यात हे वेगवेगळ्या पद्धतीने आयटम बनवणारे जसं फूड vlog वाल्या लोकांना बघतात तेसुद्धा बटर टाकायची हयगय करत नाही. हे सुरवातीला बटर टाकणं चांगलं वाटत होतं पण नंतर नंतर ते लैच ओव्हररेटेड झालं आणि मग या फूड vlog करणाऱ्या लोकांना शिव्या पडू लागल्या. पण ओह भाई, देखो पुरी की पूरी बटर की टिक्की डाल दी भय्याने हा डायलॉग जास्तच व्हायरल झाला होता.

3) बिनोद

Mystery Solved: Who is Binod? Here is How The Twitter Meme Fest Originated

बिनोद हा शब्द का गाजला, कसा गाजला, कोणी गाजवला ह्याबद्दल निम्म्या नेटकऱ्यांना ठाऊक नाहीए. म्हणजे एखादा म्हणेल की बिनोद मध्ये हसण्यासारखं काय आहे तर एका यू ट्यूब व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका बिनोद नावाच्या माणसाने स्वतःच नाव तिथं उत्तर म्हणून लिहिलेलं आणि काही क्षणातच त्याचे स्क्रीनशॉट भरभर व्हायरल झाले आणि बिनोद शब्द ट्रेंड सेटर झाला.

4) पावरी गर्ल ( पार्टी गर्ल )

pawri ho rahi hai || meme template || - YouTube

ए मै हुं, ए हमारी कार है और ए हमारी पावरी हो रही है…पावरी गर्लचा हा मीम खूप प्रसिद्ध झाला. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील रहिवासी दानीर मोबीनने पोस्ट केला होता. यामध्ये त्याच्या ‘पावरी हो रही है’ बोलण्याच्या शैलीने लोकांच्या मनाचा ठाव घेतला आणि लोकांना तो खूप आवडला आणि मीम्स बनवले. लोकांनी मजेदार व्हिडिओही बनवले. कैक बॉलिवुड सेलिब्रिटी मंडळींनी या डायलॉग वर विडंबनात्मक व्हिडिओ बनवून हवा केली.

5) जेसीबी

Blocked Suez Canal Funny Memes After a 'JCB' Excavator Was Brought In To  Help Free Giant Cargo Ship Will Make You Laugh Hysterically | 👍 LatestLY

एव्हर गिव्हन नावाचे मालवाहू जहाज अडकल्याने सुएझ कालव्यात बराच काळ जाम झाला होता. त्यावेळी त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मोठ्या जहाजाजवळ एक पिवळा बुलडोझर उभा असलेला दिसला. तेव्हापासून मीम्स बनवले जाऊ लागले. म्हणजे दाताने शेंगदाणा तुटेना आणि….समजून घ्या इथलं तुम्हीच. ताकद नाही आणि मोठ्या गोष्टी करण्याच्या नादी लागणे असा सगळा तो सीन होता.

असे अनेक मिम्स गाजले. सगळेच इथं देऊ शकत नाही त्यामुळं तुम्हाला या वर्षात कोणते मिम्स आवडले किंवा तुम्ही बनवले असतील असे मिम्स कमेंटमध्ये टाका. नवीन वर्षात नवीन ट्रेंड येतील पण 2021 अशा अनेक वेगवेगळ्या मिम्सने गाजवलं होतं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.