गोव्यात काँग्रेसने मागच्या वेळी माती खाल्ली आणि ते अजूनही सिरीयस घेत नाहीयत

गोव्यात २०१७ च्या सुमारास काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत होताच एक गेम झाला अन भाजपने गोव्यात सरकार स्थापन केलं. असो आत्ता पुन्हा गोव्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. 

विधानसभा निवडणुकीला पाच महिन्यांपेक्षाही कमी काळ बाकी असतांना, सर्व राजकीय पक्षांनी एकमेकांशी संपर्क करायला सुरुवात केली आहे. निवडणूकपूर्व युतीसाठी नेत्यांच्या बंद दाराच्या आड होणाऱ्या बैठका घेतल्या जात आहेत. पण या युतीच्या हालचालीमध्ये मात्र एक पक्ष मागे आहे, तो म्हणजे कॉंग्रेस पक्ष ! जो कि गोव्यात सद्या मुख्य विरोधी पक्ष म्हणून सक्रीय आहे.

पक्षाने स्वतः कोणत्याही प्रादेशिक पक्षाशी युतीसाठी कोणतीही औपचारिक वाटाघाटी सुरू केली नाही, किंवा असा कोणताही प्रस्ताव इतर कुणा नेत्यांना तसेच पक्षांना दिला नाही, बरं इतकंच नाही तर इतर पक्षांकडून आलेल्या अशा कोणत्याही युतीच्या संकेतावर प्रतिक्रिया दिली नाही.

गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी माध्यमांना सांगितले कि, “आमचे नेते पी. चिदंबरम आणि दिनेश ग्रुंडू राव गोव्यातील ब्लॉक स्तरावर भेट देत आहेत आणि स्थानिक कामगारांशी विविध विषयांवर चर्चा करत आहेत. युतीबाबत कोणत्याही पक्षाशी औपचारिक चर्चा सुरू झालेली नाही”, असंही ते म्हणाले.

काँग्रेसने २०१७ मध्ये जी चूक केली होती. पण आता पुन्हा त्याच चुकीची पुनरावृत्ती करत असल्याचे दिसून येत आहे. असं राजकीय तज्ञांनी त्यांची मते व्यक्त केली आहे.

अशाही चर्चा चालू आहेत कि, काँग्रेस पक्ष अजून कम्फर्टझोन मधून बाहेरचं पडलेला नाहीये. थोडक्यात कॉंग्रेसमध्ये गोव्यात जिंकून येण्यासाठी आवश्यक असलेल्या आक्रमक प्रवृत्तीचा अभाव आहे.

भाजपचा माजी मित्रपक्ष गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससोबत २०२२ साठी निवडणूकपूर्व युतीसाठी चर्चा करत आहे. २०१७ मध्ये GFP ने सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबत युती केली, परंतु नंतर इतर पक्षांतील दोषींना सामावून घेत आणि विधानसभेत आपली ताकद वाढवल्यानंतर भाजप मंत्रिमंडळातून GFP मध्ये गेल्यामुळे दोन्ही पक्ष वेगळे झाले.

यानंतर, GFP ला सरकारसोबत राहण्यात काहीच अर्थ नव्हता. GFP या वर्षी एप्रिलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून औपचारिकरित्या वेगळे झाले.

GFP पार्टीने यापूर्वी भाजपला तोंड देण्यासाठी काँग्रेससोबत संभाव्य युतीचे ध्येय समोर ठेवून काँग्रेसशी संपर्क साधला होता, परंतु पक्षाने प्रतिसाद दिलाच नाही.

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गोवा दौर्यानंतर, “प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, आम्ही गोयमकरपोन म्हणजेच गोव्याच्या संस्कृतीच्या सुरक्षेसाठी प्रादेशिक पक्षांशी युती करण्यासाठी तयार आहोत”.

मात्र, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने भाजपसोबत युती नाकारली आहे.  महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी माध्यमांना सांगितले कि, आम आदमी पार्टीसोबत युती करण्यासाठी चर्चेत असलेल्या पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाशी कोणतीही युती करणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

थोडक्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपच्या विरोधात आहे पण त्यांना आप सोबत देखील युती करायची नाही. पण दीपक ढवळीकर असंही म्हणतायेत कि,  आम्ही पूर्णपणे भाजपच्या विरोधात आहोत आणि गोव्यातील भाजप सरकारची हकालपट्टी करण्यासाठी कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करण्यास तयार आहोत. यामध्ये काँग्रेससोबत देखील आम्ही युती करायला तयार आहोत. थोडक्यात पक्षाला असं म्हणायचं कि, त्यांना कॉंग्रेससोबत अधिकृत युती करायची नाही तर, काही जागांवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि कॉंग्रेस पक्ष एकमेकांना पाठिंबा देणार आहेत.

आता हे हि आहे कि आधीच तृणमूल काँग्रेसने आपले कार्यकर्ते गोव्यात सक्रीय केले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसने आपल्या निवडणूक तयारीला वेग दिला आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा मोठ्या प्रमाणात हिंदू पुराणमतवादी व्होट बँक आकर्षित करतो. पण जर विचार करायला गेलं तर गोमंतक पक्ष हा वैचारिकदृष्ट्या गोवा काँग्रेसपेक्षा वेगळी आहे. गोव्यात कॉंग्रेसची व्होट बँक हि सर्वात जास्त कॅथलिक आणि धर्मनिरपेक्ष व्होट बँक आहे. काँग्रेस आणि एमजीपी या दोन्ही पक्षांच्या सूत्रांनी सांगितले की, दोन्ही पक्ष अजूनही अनौपचारिकपणे काही मार्ग शोधत आहेत.

थोडक्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत कॉंग्रेसला युती करण्यासाठी योग्य संधी चालून आली आहे.

गोमंतक पक्षासोबत युती करण्यासाठी गोव्यातला प्रत्येक पक्ष संपर्क करत आहे. आणि गोमंतक पक्ष देखील इतर पक्षांसोबत बोलणी करत आहे.  एक तर आधीच कॉंग्रेसचे लुईझिन्हो फालेरोसारखे ज्येष्ठ नेते हे टीएमसीमध्ये गेले. त्यात आता जर टीएमसी गोव्यात मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली आहे.

जर गोव्यात आप आणि टीएमसीची युती झाली तर ते कॉंग्रेस आणि गोमंतक पक्षाला परवडण्यासारखे ठरणार नाही. त्यामुळे कॉंग्रेसने आत्ता तरी कम्फर्टझोन मधून बाहेर पडावं नाही तर कॉंग्रेस गोव्यातली सत्ता हातातून गमावेल हे सांगता येत नाही.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.