या भिडूने डिप्रेशनवर इलाज काढलाय…सायकलवर अख्खा भारत फिरतोय.

शाळा- कॉलेज झालं कि आता भविष्यात काय असा प्रश्न डोक्यात ठेवून अनेक जन डिप्रेशनची शिकार होतात. अनेकजणांची ब्रेकअप होतात. तर काहींचा फॅमिली इशूज असतात. मग अशावेळेस आपण एकटे पडत जातो. बरं मग तुम्ही-आम्ही या डिप्रेशनवर अनेकजण वेगवेगळे उपाय शोधतात.

असाच एक भिडू आम्हाला भेटला जो या डिप्रेशनवर मात करण्यासाठी अख्खा  भारत देश फिरतोय. आपला भारत देश जवळून अनुभवायचा, आपली लोकं येथील वेगवेगळी संस्कृती जाणून घेत सायकली वर संपूर्ण भारत फिरतोय.  तेही खिश्यात एकही रुपया नसतांना !

तो म्हणतो, मला सिकंदरासारखे जगायचे नाही तर बुद्धासारखे जगायचे आहे !

डिप्रेशनमध्ये असतांना त्याने स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला चिंतन केलं. आणि  ‘रिबॉर्न विदिन’ हे पुस्तक लिहायला घेतलं.

हे पुस्तक लिहित असतांना विशालला मानवी जीवनाविषयी प्रश्न पडायचे. विशाल बोलभिडू शी बोलतांना म्हणाला कि, “मी ज्याला आयुष्य समजत होतो, खरंतर ते  आयुष्यच नव्हतं, लहानाचे मोठे व्हा, शिका, नोकरी करा बस्स आयुष्यात एवढाच उद्देश माणसाला आनंदी करतो तर मग जगातला सर्वात डिप्रेस्ड देश भारत का आहे? २०१७ च्या एका अहवालानुसार तर जगात एका वर्षांत सरावत जास्त आत्महत्या ह्या भारतात घडल्या आहेत. आजही आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के जनता म्हणजेच आज ४ पैकी एक व्यक्ती हा नैराश्याचा बळी ठरते  आहे.”

१.

१२ जून २०२० ला हे पुस्तक प्रकाशित प्रकाशित केलं आणि लागलीच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १३ जून ला भारत भ्रमंतीला निघाला. 

विशेष म्हणजे १३ जून ला विशाल चा वाढदिवस होता. २१ व्या पदार्पण केलेला विशाल, इतक्या कमी वयात आयुष्याचा मतीतार्थ शोधायला निघाला होता. तर आज हा प्रवास सुरु होऊन ४३६ दिवस पूर्ण झाली आहेत.

२

विशाल सांगतो, “मला जेंव्हा नैराश्य आलं त्यात माझे जवळपास ६-७ महिने वाया गेले. त्यात मला प्रश्न पडायचे आणि त्याची उत्तरं मी पुस्तकात, ग्रंथामध्ये शोधायचो. पण माझं समाधान झालं नाही. म्हणून मी निर्णय घेतला कि, देशात फिरायचं, भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना भेटायचं, त्यांचं आयुष्य जगुन बघायचं”.

३

“वाटेत जी लोकं भेटायची त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांच्यासोबत जेवलो, त्यांच्या समस्या, दुःख ऐकून घेतली”. 

४

“जिथे जाईल तिथल्या गावात मी राहायचो, त्यांना जेवण मागवून खात असे. भूक लागली म्हणून, खिश्यात पैसे नसताना फुकट जेवण मागायचो आणि तिथेच माझा अहंकार संपून गेला. कित्येकदा असंच झालं कि मला मागण्याची वेळच आली नाही लोकं मला प्रेमाने जेवन आणून द्यायची, त्यांच्या घरी २-३ दिवस ठेवून घ्यायची. त्यांना मदत म्हणून मी त्यांच्या शेतात काम करायची, त्यांच्या गाईचं दुध काढायचं. असं अनेक छान अनुभव आले आहेत”.

६.

विशालने देशातली सगळी राज्ये सायकलवर फिरत बुद्धाचा संदेश देण्याची मोहीम आखली आहे. तो सांगतो कदाचित या प्रवासाला ४-५ वर्षे अजून लागू शकतात. आत्तापर्यंत त्याने संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू हि राज्ये पूर्ण केली आहेत. तर सद्या तो तंजावर ला मुक्कामाला आहे.

७

तो सांगतो कि, “त्याला कोरोनाकाळात अनेक अडचणी आल्या. विशेषतः महाराष्ट्रात. अनेकदा असं झालं कि तो जेंव्हा एखाद्या गावी मुक्कामाला जायचा तेंव्हा तो मंदिरात झोपायचा. पण गावकऱ्यांनी त्याला हाकलून लावलं आणि त्याला स्मशानभूमीत झोपावं लागलं होतं. तो सांगतो कि त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात हि आठवण म्हणजे सर्वात वाईट आणि सर्वात सुंदर आठवण म्हणलं आहे. कारण या स्मशानभूमी मध्ये रात्र काढल्यानंतर त्याला अनेक समजुती, मिथक इत्यादी गोष्टींचे आकलन झाले”

आयुष्यात जोपर्यंत आपले कुत्र्यासारखे हाल होत नाहीत तोपर्यंत आयुष्य आपल्याला उमगणार नाही हे त्याने जाणलं. 

शाळेत आपल्याला कबिरांचे दोहे परीक्षेत २ मार्क जास्त मिळावे म्हणून शिकवायचे, पण त्याचा अर्थ आपल्या आयुष्यात कसा अंमलात आणायचा, आयुष्यात कधी वाईट प्रसंग आले तर त्या कबीरांच्या ओळी आठवा हे मात्र शिकवले गेलेच नाही.

अशाप्रकारे विशाल नैराश्यातून तर बाहेर आलाच पण आता इतरांना देखील त्याच्या या उपक्रमाद्वारे खूप चांगली शिकवण देत आहे. खिश्यात  रुपया नसतांना, उपाशीपोटी त्याने प्रवास चालू केला तो आजपर्यंत यशस्वी पणे चालू आहे. कदाचित आपल्या स्पर्धेच्या दुनियेत विशाल सारखे व्यक्ती खूप आहेत.

“आयुष्यात जोपर्यंत आपले कुत्र्यासारखे हाल होत नाहीत तोपर्यंत आयुष्य आपल्याला उमगणार नाही हे त्याने जाणलं आहे”. 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.