इराण मधून शेंगदाणा तेल आयात केल्याचं सांगितलं पण ते होतं १२५ कोटींचं हेरॉईन…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकामागून एक ड्रग प्रकरण समोर येतायेत. तशी याआधीही आली आहेतचं पण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ही प्रकरण मोठ्या प्रमाणात उघड होत गेली.

त्यांनतर आता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणात दोषी आढळलायं. २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूजवर सुरु असलेल्या पार्टीदरम्यान आर्यन आणि त्याच्या काही मित्रांना ड्रग्स घेतल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली.  या क्रूजवर पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले होते. 

ज्यामुळे राज्यभरात एकचं खळबळ उडाली. त्यानंतर राज्यात एनसीबी जास्तचं सक्रिय  झाले असून अधिकाऱ्यानाकडून ठिकठिकाणी छापे टाकले जातायेत.

याच साखळीत DRI टीमने नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर छापा टाकला जिथे एका कंटेनरमधून २५ किलो हेरॉईन जप्त करण्यात आलेय. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे १२५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

डीआरआयच्या मुंबई युनिटने बंदरावर छापा टाकल्यानंतर नवी मुंबईतील ६२ वर्षीय व्यापारी जयेश सांघवीला अटक केली आहे. त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. सांघवीवर इराणमधून शेंगदाणा तेलाच्या एका खेपामध्ये हेरॉईन लपवून मुंबईत आणल्याचा आरोप आहे.

डीआरआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,  कंटेनर वैभव एंटरप्रायजेसचे संदीप ठक्कर यांनी आयात केले होते, ज्याचे ऑफिस मस्जिद बंदरमध्ये आहे. डीआरआय टीमने ठक्करचीही चौकशी केली आहे. ठक्करने डीआरआयला सांगितले की,  संघवीने त्याला त्याच्या फर्मच्या आयईसीमध्ये इराणमधून वस्तू आयात करण्यासाठी १०,००० रुपये प्रति माल पाठवण्याची ऑफर दिली होती. ते दोघेही १५ वर्षांपासून संघवीसोबत व्यवसाय करत होते. त्यामुळे विश्वास ठेवून त्याने ही  ऑफर स्वीकारली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीचं अँटी ड्रग स्क्वार्डने सात किलो हेरॉईननसहीत दोन जणांना ताब्यात घेतलं होत. मुंबईमधील डोंगरी भागामध्ये ही कारवाई करण्यात आली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये १५ कोटी रुपये असल्याचे समजते.

तसेच, याआधी जुलै महिन्यात नवी मुंबईच्या न्हावाशेवा पोर्टमधूनचं ३०० किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं होत, तेव्हा सुद्दा इराणमधल्या अब्बास बंदरातूनच हे कंटेनर आले होते, जे टाल्कम पावडरच्या नावाखाली आणले गेले होते. संधू एक्सपोर्ट्स पंजाबचे मालक प्रभाजीत सिंग यांना अटक करण्यात आली होती.

तर दोन आठवड्यापूर्वीचं गुजरातच्या कच्छमधल्या मुंद्रा पोर्टमध्ये हेरॉईनची सर्वात मोठी खेप पकडली गेलो होती. अफगाणिस्तानातून आयात केलेल्या दोन कंटेनरमधून तब्बल तीन टन हेरॉईन आयात केलं गेलं होत. ज्याची किंमत २१ हजार कोटी रुपये असल्याचं समजत. या प्रकरणामुळे गौतम अदानी अडचणीत सापडले होते. कारण  मुंद्रा पोर्टवर अदानी पोर्ट कंपनीचा मालकी हक्क आहे.

महत्वाचं म्हणजे हे दोन्ही कंटेनर इराणच्या अब्बास बंदरातून आले होते आणि जुलै महिन्यात सापडलेल्या ३०० किलो हेरॉईनसुद्धा याच बंदरातून आले होते. 

आता हे सगळी प्रकरण कुठे कुठे एकमेकांशी लिंक आहेत. त्यामुळे या ड्रग तस्करीशी खूप मोठे रॅकेट जोडले असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.