उरीच्या घटनेवरुन प्रेरणा घेत त्यांनी भारतीय जवानांसाठी खतरनाक रोबो बनवला

इंजिनिअरची चार वर्ष संपत आल्यावर जवळपास ९९ टक्के पोर चांगली नोकरी मिळवावी म्हणून धडपडत असतात. यासाठी पहिला ऑप्शन असतो कॅम्पसमधून होणारं सिलेक्शन. तिथं चांगल्या पॅकेज मध्ये झालं तर नशीब, नाही तर मग स्वतः बाहेरच्या कंपन्यांमध्ये रिझ्युम घेऊन जात अप्लिकेशन करत बसायचं.

आता राहिलेल्या एक टक्का पोरांच काय? तर या एखादा टक्काच पोरांकडे काही तरी स्वतःच उभं करण्याचा प्लॅन रेडी असतोय. ते नोकरीच्या नादाला न लागता सरळ कॅम्पसला फाट्यावर मारत आपल्याला जे करायचं आहे तिकडं वळतेत.

चेन्नईमधल्या तिघांनी असचं कॅम्पसला फाट्यावर मारतं मेक्ट्रोनिक्स इंजिनियरींगची डिग्री घेतल्यावर ‘टोरस रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ हा डिफेंस हार्डवेअर स्टार्टअप उभा केला. एम. विग्नेश, विभाकर सेंथिल कुमार आणि के.अभी विग्नेश अशी या तिघांची नाव.

यात पहिल्याच टप्प्यात त्यांनी सैन्यासाठी काही तरी करायचं ठरवत डिफेंस रोबोटिक्स सॉल्यूशंसमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी ३ वर्षापूर्वीच उरी वरचा हल्ला होऊन गेला होता. या तिघांच्या मते भारतीय सैन्यांचं ते आजवरचं सर्वात मोठं नुकसान होतं. कारण ग्रेनेड सहित थेट बेस कॅम्पलाच लक्ष करण्यात आलं होतं. तो एक बदलण्यासाठीचा क्षण होता.

याच क्षणाच्या प्रेरणेनं तिघांनी स्टार्टअप सुरु करण्याआधी महत्वाचा असलेला अभ्यास सुरु केला, रिसर्च चालू केला. सैन्याची काय गरज आहे ते जाणून घेतलं. खरतरं हे एक प्रकारचं आव्हानचं होतं. कारणं त्याच वेळी भारतात जवळपास १९४ डिफेन्स स्टार्टअप होते, जे आधी पासूनच सुरक्षेसाठी वेगवेगळी तंत्र शोधत होते.

त्यामुळे वेगळेपण जपण्याचं आव्हानं होतं.

यात सर्वात महत्वाची होती कोच्ची स्थित असलेली आयरोव्ह संस्था. जी पाण्याच्या खाली निरीक्षणासाठी लांबून संचालित करता येतील अशा वाहनांवर (रिमोटली ऑपरेटेड अंडरवॉटर) संशोधन करत होते. तर मुंबईस्थित ideaForge हे डिफेंस होमलँड सिक्यूरिटी आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्ससाठी ड्रोनच्या निर्मितीवर संशोधन करत होते.

त्यामुळे टोरसने जमिनीवर सुरक्षा प्रदान करण्यासाठी काम सुरु केलं. बऱ्याच अभ्यास आणि संशोधनानंतर तिघांनी २०१९ मध्ये चेन्नईत टोरस रोबोटिक्सच्या माध्यमातुन अनमॅन्ड व्हेईकलला भारतीय सशस्त्र बलाच्या साह्यानं लॉन्च केलं.

हे एक मॉड्यूलर 6DOF (six degrees of freedom) या तंत्रज्ञानावर आधारित असलेलं पूर्णतः लाईटवर चालणार मानवरहित जमिनीवरच वाहनं (अनमॅन्ड ग्राउंड व्हेईकल) होतं.

जे सैन्याच्या वेगवेगळ्या मिशनच्यावेळी त्यांच्या गरजांना पूर्ण करणार होतं. त्या गरजा कोणत्या तर अज्ञात वस्तू शोधण्यात, त्यांची ओळख पटवण्याचा आणि त्यावर उपाय शोधून मात करण्याचं काम करणार एक रोबोटिक आर्म होतं.

आज ही याचा उपयोग सैन्याला जंगली भागातील, दाट झाडी असलेल्या प्रदेशातील छुपेबॉम्ब, भूसुरंग अशा गोष्टी शोधण्यासाठी, सीमारेषेवर गस्त घालताना मनुष्य हानीचा वापर टाळण्यासाठी केला जात आहे.

टोरसनं या पुर्वी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO साठी एक मोबाईल स्वायत्त रोबोटिक्स सिस्टम (मोबाईल ॲटोनोमस रोबोटिक्स सिस्टम – MARS) ची निर्मीती केली होती.

त्यांच्या या प्रयत्नांनमुळेच टोरस रोबोटिक्सला स्टार्टअप इंडियाने मान्यता दिली आहे. त्यासोबतचं IDEX-DIO कडून “Pioneer Defence Innovator” म्हणून गौरवण्यात आलं. त्यामुळे तिघांचा दावा आहे की त्यांनी भारतात सशस्त्र बलांसाठी अनमॅन्ड ग्राऊंड व्हेईकल बनवणारं पहिलं स्टार्टअप उभं केलं आहे. सहाजिकच यामुळे परदेशी प्रतिस्पर्ध्यांसोबत स्पर्धा करत आहे.

टोरसं बद्दलची भविष्यातील योजना सांगताना विग्नेश म्हणतो,

टोरसमध्ये आम्ही जवळपास ५० लाखांहून अधिकची गुंतवणूक केली आहे. नंदन जीएसई प्राय. लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले रघुनंदन जगदीश यांनी देखील यात गुंतवणूक केली आहे. सोबतच केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारकडून नवीन तंत्रज्ञानासाठी अनुदान प्राप्त केलं आहे.

भारत सरकार इनोवेटर्सना संरक्षण विभागासाठी नवनवीन तंत्रज्ञान देवून पर्याय उभे करण्याचं आवाहन करत आहे. याच्या आधी फेब्रुवारीमध्ये एका इंडस्ट्री इव्हेंटमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खुलासा केला होता की सरकार २०२२ पर्यंत संरक्षण आयातला कमीत कमी २ बिलीयन डॉलर पर्यंत खाली घेवून इच्छिते.

त्यामुळे या तिघांच पुढचं लक्ष आहे आता एआय-आधारित अनमॅन्ड ग्राऊंड व्हेईकल विकसीत करणं. त्यासाठी टोरसनं नुकतचं भारत अर्थ मूवर्स लिमिटेड सोबत एक करार केला आहे. थोडक्यात काय तर अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.

तसचं पुढच्या तीन महिन्यात टोरसची इलेक्ट्रॉनिक्स मोटार्सचा व्यवसाय करण्याची योजना आहे. त्यासाठी स्वतःचे स्वदेशी मोटर्ससाठीचे पायलट पण ऑर्डर केले आहे.

त्यासोबतचं एक स्वदेशी पॉवरट्रेनची कमतरता पुर्ण करण्यासाठी स्टार्टअपने भारतीय इलेक्ट्रिक ऑटोमोटिव सेक्टरला लागणारे वजनानं हलक्या असलेली आणि कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक मोटर्स बनवले आहेत.

सद्य स्थितीत चीन मधून जवळपास ९५ टक्के पॉवरट्रेन आयात केले जातात. त्यामुळे बाजारातील या इलेक्ट्रिक मोटर्सच्या तुलनेत टोरसची स्वदेशी इलेक्ट्रिक मोटर्स वजनाला ५० टक्के हलकी, १५ टक्के अधिक कुशल, १० टक्के अधिक प्रभावी असल्याचा दावा आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.