पहिल्या भेटीत या पाच गोष्टी केल्यास, मुली सोडून जातात. वाचा आणि शहाणे व्हा.

तुम्ही सिंगल आहात का, तुम्ही रिलेशनशीपमध्ये आहात का, सध्य स्थितीत तुमचा स्टेटस काहीही असेल तरी हा लेख तुम्हाला उपयोगी ठरणार आहे, हा बोलभिडू कार्यकर्त्यांचा शब्द आहे. आजचा प्रमुख विषय आहे, पहिल्या भेटीत कोणत्या गोष्टी करणं टाळावं, कारण काय तर पहिल्याच भेटीत बावळट म्हणून मुली सो़डून जाण्याचा चान्स जास्त असतो.

तर अगोदर कस असायचं, अगोदर मुली मुलांकडे बघायच्या अर्थात लाईन द्यायच्या. त्यानंतर हळुहळु एकमेकांबद्दल बोलणं व्हायचं. कॉलेजचा ग्रुप असेल तर जरा सोप्प जायचं. एकाच गावात असतील तर जरा अवघड असायचं पण जमायचं. मात्र आत्ता तसा प्रकार नाही. आत्ता फेसबुक पासून टिंडरपर्यन्तचा मॅटर तुमच्या समोर उभा राहिला आहे. अशा वेळी फक्त फोटो बघून आपण प्रेमात पडतो. आपण सोशल मिडीयावर जपलेली वाघासारखी इमेज पहिल्या भेटीत गळून पडण्याचा धोका असतो. तर अशा पहिल्या भेटीत कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे भिडू लोक सांगत आहेत. 

१) गडबडीत भेटायच टाळायचं असत. 

हे बघा आपण असतो सिंगल लोक. अशा वेळी आपले कपडे पण धुतलेले नसतात. गरज असली तर इस्त्री नसते. डोक्याला जेल वगैरे सारखे प्रकार नसतात. परफ्युम नसतो. म्हणजे सिंगलपणा आपले सगळे लागलेले असतात. अशा वेळी भरली की चालली सारखा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसारखा अॅटिट्यूड ठेवू नये. वेळ काढावा, दोन चार दिवसांचा वेळ मागावा. या काळात एक चांगला ड्रेस (चांगला याचा अर्थ इतरांना चांगला वाटणारा) धुवून इस्त्री करावा. चांगले शुज घालावेत. फुल्ल टू अर्जून द रेड्डी पासून साथिया मधल्या विवेक सारखा तुम्हाला जो सुट होतो तो लूक करावा आणि मगच भेटायला जावं. उगी भरली की चालली केलात तर ती पण पहिल्याच भेटीत जाईल. 

२) गंदी बात, गंदी गंदी गंदी बात. 

सर्व सिंगल लोक एका ग्रुपमध्ये हमखास असतात. त्या ग्रुपच नाव असतं उपाशी मित्रमंडळ. तर उपाशी मित्रमंडळातले तुम्ही सिनियर असाल तर पहिल्याच भेटीत तुम्ही डायरेक्ट कलरवर येता. असा फालतुपणा कधीच करु नका. मस्तपैकी बोलावं, मोदी-राहूल-पवार-ठाकरे असले विषय टाळून आर्यास्टार्क सारखे विषय काढावेत. तिला ज्या विषयात गती आहे तो विषय चर्चेला घ्यावा. उगीच कलर कोणता, फोटो पाठवणार का असले उद्योग लगेच करु नयेत. म्हणजे असे उद्योग करु नयेत असं नाही जरूर करावेत पण प्रेमात विश्वास निर्माण झाल्यानंतर.पहिल्याच भेटीत नाही. 

३) बोल की बोल, कर की कर सारखा अधाशी अॅटिट्यूड. 

कस असत पहिल्याच भेटीत स्वत:ला टॉमक्रुझ समजण्याची वाईट सवय पोरांना असते. आपण काय करतो, “त्याला काय होतय” म्हणून रुबाब झाडायला सुरवात करतो. बॉसिंग करायची सवय जात नाही. लक्षात ठेवा  समोरची मुलगी आहे, जी तुम्हाला भेटायला आली आहे. त्यामुळे जरा सबुरीने घ्यावं.  पोरगी नाही म्हणत असली तरी तिच्या नकार होय असतय वगैरे धंदे करु नयेत. लक्षात घ्या या हल्लीच्या पोरी आहेत. याच्याकडे नो मीन्स नोच असतय. थोडक्यात काय तर लायकीत रहायला शिका. जास्त उड्या मारू नका. 

४) आपला शब्दाय ना… 

हि एक पोरांच्या बाबतीतली सगळ्यात वाईट गोष्ट. जास्तकरून उपाशी मित्रमंडळामध्ये सन्माननीय असाल तर या गोष्टी जोरात होतात. म्हणजे कस तर आपला शब्दय ना. आपण बोल्लो ना. करतो. केलच म्हणून समज. काय होतं बऱ्याचदा या गोष्टी मुलींना आवडत नाही. मुलींना अस वाटतं कि हा अतीच होयहोय करतोय म्हणजे काहीतरी कंपनी फॉल्ट असणार. याच गोष्टीमुळे पोरी सोडून जावू शकतात. सो इज्जतीत रहा. 

५) सारखा ताप देणं… 

जगात एकाच प्रकारच्या मुली असतात. त्यांच्यात स्वभाव मात्र वेगवेगळे असतात. जस की, काही पोरींना सारखा फोन करु वाटतो, मॅसेज करु वाटतो. तर काही पोरी इतर ठिकाणी इतक्या बिझी असतात की त्यांना फोनचा कंटाळा येतो. अशा वेळी समोरच्याच्या स्वभावाचा अंदाज घ्यावा लागतो. तिच्या मोकळ्या वेळात तिला फोन करायचा असतो. उगी भेटून आल्या आल्या. मग कस, आत्ता काय पुढं जायचं का असले धंदे करायचे नसतात. निवांत वेळ द्या मोकळा वेळ द्या. जमायचं असलं तर जमेल. 

बर या सगळ्या गोष्टी करुनही मुलगी सोडून गेली तर लक्षात ठेवा, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. तुमची गाठ बांधायला देव विसरून गेला. तुम्ही सिंगलच मरणार आहात. 

जास्त हवा केलीत तर अस चित्र दिसतं, दूसराच कोणीतरी तुमच्या छत्रछायेखालून हिसकावून घेवून जातो. फोटो आयुष्याच्या संदर्भासाठी जपून ठेवा.  

Screenshot 2019 02 12 at 9.40.34 AM

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.