निवडणूकांमुळे या पाच राज्यांनी कोरोनाला कोले केलय…! 

कोले का कोले 

बातमी वाचण्यासाठी आलेले लोकं पहिला कोले या शब्दावर कॉन्स्ट्रेट करणार आहेत याची पुरेपुर जाणीव आम्हाला आहे. म्हणून कोरोना, राज्यात लागलेल्या इलेक्शना यापेक्षा पहिला कोले या शब्दाचा अर्थ विस्कटून सांगतो. 

लहानपणी विटू दांडू खेळताना. दांडू ने विटी कोले केली जायची. तेव्हा पुढच्यांना कोले का कोले अस विचारून कोले केलं जात. म्हणजे उडवून लावलं जायचं. उडवून लावणं याला समानार्थी जवळचा वाटणारा शब्द म्हणजे कोले. 

असो तर आपल्या मुळ मुद्यावर येवू सध्या भारतात निवडणूका चालल्यात. पाच राज्यांच्या निवडणूका या अतिमहत्वाच्या समजल्या जातेत. या निवडणूका यासाठी देखील महत्वाच्या आहेत की निवडक अशा महत्वाच्या निवडणूकांमध्ये भाजपला खातं खोलणं देखील अवघड होवून बसतं. 

अशा वेळी भाजपला संपुर्ण भारतात पाय रोवलेत हे दाखवून द्यायचं असेल तर या निवडणूका अतिमहत्वाच्या ठरणाऱ्या आहेत. 

तर ही पाच राज्य आहे पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरल, आसाम आणि पॉडिचेरी.. 

या पाच राज्यामध्ये एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघ तर १८ कोटी मतदार येतात. प्रत्यक्ष लोकसंख्या याहून अधिक आहे. 

आत्ता क्रमवार आपण प्रत्येक राज्यात कोरोनाची काय सिच्युएशन आहे त्याची माहिती घेवूया.

पश्चिम बंगाल 

पश्चिम बंगालमध्ये एकूण कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या सहा लाखांच्या दरम्यान आहे तर मृतांची आकडेवारी दहा हजारांच्या पुढे आहे. 

१० मार्च च्या दरम्यान रोजचे २२२ रुग्ण असायचे तर  १० एप्रिल रोजी रोजच्या रुग्णांची संख्या आहे हजारांच्या वरती गेली. कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर १० मार्चपर्यन्त पश्चिम बंगालमध्ये  .७७ लाख केसेस आलेल्या. मात्र गेल्या दहा महिन्यात या केसेस .१० लाख झालेल्या आहेत. थोडक्यात एका महिन्यात ३३ हजार केसेस वाढल्या. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या एकूण ५४५२ होत्या ज्या इलेक्शन सुरु झाल्यानंतर महिन्याला ३३ हजार झालेल्या आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख असणारे अनिर्वाण दलुई हे माध्यमांना सांगतात, 

मागच्या वर्षी २४ मे मध्ये २०८ केसेस समोर आल्या होत्या. दहापट संख्या वाढायला तेव्हा दोन महिने लागले होते. मात्र या वेळेत मार्च पासून ते एप्रिल पर्यन्तच्या काळात एकूण कोरोना केस दहा पट वाढलेल्या आहेत. मागच्या लाटेत या दहा पट संख्या वाढायला दोन महिने लागले होते जे आत्ता एका महिन्यात वाढत आहेत. असच चालू राहिलं तर ही संख्या सहा ते सात हजार प्रतीदिन रुग्णसंख्या या घरात लवकरच पोहचू शकेल. 

आत्ता तुम्ही म्हणाल याला जबाबदार फक्त ममता. तर भिडूंनो इथे ममता आहेत, इथे अमित शहा आहेत आणि इथे राहूल गांधी देखील आहेत. अमित शहा राणाघाट, बसिरघाट, २४ परगणा अशा ठिकाणी राडा करू लागलेत. राहूल गांधी १४ एप्रिलला प्रचारसभेत सामिल होणार आहेत तर ममता व्हिलचेअर वरून मॅड मॅक्स फ्युरी करायला लागलेल्या आहेत.

थोडक्यात जबाबदार सगळे आहेत. 

तामिळनाडू 

तामिळनाडू मध्ये सध्यापर्यन्त लाख २६ हजार केसेस ८१६ केसेस समोर आल्यात. पैकी १२ हजार ८८९ लोकांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. १० मार्च रोजी दिवसाला ५६४ केसेस मिळायच्या ज्या १० एप्रिलपर्यन्त रोजच्या हजार झालेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार भारतात सर्वाधिक कोरानाने मृत्यू झालेल्या राज्यामंध्ये तामिळनाडूचा नंबर लागतोय. 

आसाम 

आसाम मध्ये एकूण लाख १९ हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. पैकी १११७ लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील मार्च महिन्यात प्रतिदिन १९ केसेस समोर येत होत्या त्या आता १९४ इतक्या झाल्या आहेत. मागील दोन महिन्यांपूर्वी लाख १७ हजार ७२६ असणाऱ्या केसेस आत्ता लाख १९ हजार ९५८ इतक्या झाल्यात. १० एप्रिल रोजी एका दिवसात २४० केसेस समोर आलेल्या आहेत. 

म्हणजे बघा एक महिन्यापूर्वी दिवसाला १९ केसेस यायच्या ज्या आत्ता २०० च्या वरती गेल्यात. 

केरल मध्ये आत्तापर्यन्त ११ लाख ६० हजार २०४ केसेस समोर आल्या आहेत. पैकी हजार ७६७ लोकांचा कोरोनाने आत्तापर्यन्त मृत्यू झाला आहे. मागच्या १० मार्च मध्ये एका आठवड्यात कोरोनाच्या हजार ३५५ केसेस समोर आलेल्या. ज्या १० एप्रिल मध्ये हजार ९६८ प्रती आठवडा झाल्या आहेत. एका महिन्यात केरलमध्ये ७६ हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे. 

पॉन्डिचेरी 

पॉन्डिचेरीत आत्तापर्यन्त ४३ हजार ७३७ रुग्णांची नोंद झालेली आहे. पैकी ६८९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. जिथे प्रतिदिन २० ते २५ कोरोना रुग्ण मिळत होते ती संख्या आत्ता २७२ च्या घरात गेलेली आहे. १० मार्च रोजी एकूण रुग्णसंख्या ३९ हजार होती ती एका महिन्यात ४३ हजारांच्या घरात गेली आहे. म्हणजे एका महिन्यात ३८०० ने रुग्ण संख्या वाढलेली आहे. पूर्वी ही संख्या प्रतीमहिन्याला ३०० ते ४०० च्या घरात होती जी इलेक्शनच्या काळात ४००० पर्यन्त पोहचत आहे. 

आत्ता या सर्व गोष्टींवर केंद्रिय निवडणूक आयोगाने सांगितलय की जर कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर आम्ही कारवाई करणार. हे जर खरं धरायचं झालं तर ममता बनर्जी यांच्यासह मोदी आणि अमित शहांवर पण कारवाई करायला लागणार. कशाला गंडवताय राव. 

बाकी ते आपलं पंढरपूर राहिलय, ते पण यात घेवून टाका 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.