भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानच्या हद्दीत जाण्यापासून वाचवणारा ‘मुखोटा’ आहे…
गुजरातमधील ओखा बंदरातील मासेमारी करणाऱ्या दोन बोटींसह १६ खलाशांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं. यामधले सात खलाशी हे पालघर जिल्ह्यातील आहेत. रोजगारासाठी ओखा येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या या कामगारांना समुद्रातूनच पाकिस्तानच्या मेरिटाईम विभागाने ताब्यात घेतलं. त्यामुळे या खलशांची कुटुंब सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहेत.
पालघर मधील अनेक तरुण रोजगारासाठी जात गुजरात ओखा बंदरात जातात. खोल समुद्रातील पाण्यात मासेमारीसाठी गेल्यावर आंतरराष्ट्रीय सीमा लवकर लक्षात येत नाही आणि अशा प्रकारे मच्छिमार पाकिस्तानच्या सीमेत पोहचतात. त्यानंतर अनेक वर्ष जेल मध्ये राहावं लागत.
मात्र अशा प्रकारच्या घटना टाळता याव्यात म्हणून एका एनजीओकडून ‘मुखोटा’ तयार करण्यात आला आहे. हा मुखोटा मच्छिमारांना आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यापासून रोखतो.
त्या अगोदर मागच्या ५ वर्षात किती भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या जेल मध्ये आहे ते पाहुयात
परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत दिलेल्या माहिती नुसार, ५७७ भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या जेल मध्ये आहेत. तर मागच्या ५ वर्षांत ९ भारतीय मच्छिमारांचा पाकिस्तानच्या कस्टडीत मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत आणि पाकिस्तान मध्ये २००८ साली एक द्विपक्षीय करार करण्यात आला. त्यानुसार १ जानेवारी आणि १ जुलै या दिवशी या दोन्ही देशातील सरकार त्यांच्या कारागृहात त्यांच्या देशातील किती कैदी आहेत याची माहिती देत असतात.
तसेच मुरलीधरन यांनी सांगितले की, २०१४ पासून पाकिस्तानच्या जेल मध्ये असणाऱ्या २ हजार १४० मच्छिमारांना परत आणले आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेने सुद्धा २०२१ नंतर २३९ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहेत. त्यातील १५९ जणांना सोडवण्यात यश आले आले.
तर भारतातच्या जेल मध्ये असणाऱ्या ८० मच्छिमारणांपैकी ४४ जणांना सोडवण्यात आले आहे. उर्वरित ३६ जणांना चर्चेनंतर सोडण्यात येईल असेहि त्यांनी यावेळी सांगितले होते.
भारताच्या सीमा ओलांडून पाकिस्तान जाऊ नये म्हणून मच्छीमारांसाठी सुरु केलेला जुगाड
प्रथा, परंपरा या विषयी प्रश्न उपस्थित करण्याचे नसतात. आमचा एक मित्र आहे. गेली अनेक वर्ष तो त्यांच्या घरातील देवीला बोकड कापत असतो. त्याला त्या संदर्भात विचारलं तर सांगतोय की, पिढान पिढा ही प्रथा सुरु आहे. त्यामुळे आता बंद करता येणार नाही. त्यामुळे अजूनही सुरु आहे.
अशीच एक प्रथा गुजरातचे मच्छिमार पाळतात. प्रत्येक बोटीवर एक मुखवटा लावता येतो, हा मुखवटा बोटीवर का लावण्यात येतो असा प्रश्न विचारल्यावर ठरलेलं उत्तर असतं. ते म्हणजे मुखवटा लावण्याची प्रथा आहे. हा मुखवटा लावल्याने वाईट शक्तींना रोखतो. त्यामुळे तो बोटीवर लावण्यात येतो.
तर दुसरीकडे अनेक मच्छिमारांना बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडल्याबद्दल अटक जाते. त्याच कारण म्हणजे मच्छिमारांकडून कुठल्याही तंत्रज्ञानाचा, उपकरणाचा वापर करत नसल्याने चुकून आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडली जाते त्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागत. वर्षानुवर्षे त्यांच्या कुटुंबापासून दूर राहतात, यात अनेकांना जीव सुद्धा गमवावा लागतो.
मच्छिमारांसाठी WPP एनजीओ काम करते. मच्छिमार सतत आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलंडतात आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. यावर उपाय करता येईल, कशा मुळे अशा घटना रोखता येईल असा विचार ही संस्था करत होती.
यावेळी एनजीओच्या लक्षात आलं की, हे मच्छिमार कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर करत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या समस्यांना समोरे जावे लागते. एनजीओने कायनेटिक इंडिया कंपनीशी याबद्दल विचारणा केली. त्यावर कंपनीने बोटीवर जीपीएस बसवता येईल का असे सांगितले.
मात्र बोटीवर वेगळे जीपीएस बसविले तर ते मच्छिमार वापरतील का अशी चिंता एनजीओला होती. त्यामुळे संस्थेच्या वतीने मच्छिमारांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, हे मच्छिमार बोटीवरून कधीच मुखवटा काढत नाही. त्यामुळे त्यावर काही करता आले तर जमू शकेल असं संस्थेला वाटलं.
ही आयडिया संस्थेने कायनेटिक कंपनीला सांगितली. बोटीवरील मुखवट्यात जीपीएस बसविण्यात आले. जेव्हा कधी बोट आंतरराष्ट्रीय सागरी सीमे जवळ जाईल सावध करण्यासाठी अलार्म वाजवला जाईल. तसेच मुखवट्याच्या डोळ्यात लाल लाईट बसवण्यात आले होते.
अशा अशा जीपीएस असणारा मुखोटा तयार करण्यात आला. यामुळे अनेक मच्छिमार आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडण्यापासून वाचले. गुजरातच्या किनारपट्टीवरील २ हजार गावातील बोटींवर जीपीएस मुखवटा लावण्यात आले आहेत. यामुळे १५ हजार वेळा हे बोटींवरचे मच्छिमार आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडण्यापासून रोखले गेले.
हे ही वाच भिडू
- कधीकाळी वेटर म्हणून काम करणाऱ्या निलेशच्या चित्रांचं प्रदर्शन ताज आर्ट गॅलरीत भरणार आहे
- मुंबईचं टायटॅनिक “रामदास बोट” जी आजच्या दिवशी ६९० लोकांना घेवून बुडाली होती.
- भारतात लाँच झालेल्या फाईव्ह जी बद्दलच्या ५ गोष्टी जाणून घ्या…