नाकातून देण्यात येणाऱ्या iNCOVACC लसी बद्दलच्या ७ महत्वाच्या गोष्टी

कोरोनाने चीन मध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दिवसाला लाखो लोक कोरोना बाधित होत आहेत. यामुळे हॉस्पिटल मध्ये रुग्णांना जागा मिळणे अवघड झाले आहे. याच कारण कोरोनाचा नवीन व्हेरियंट. भारताने सुद्धा काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. आज देशभरात मॉक ड्रिल राबवण्यात येत आहे. जर अचानकपणे कोरोनाचे रुग्ण वाढले तर काय होईल याची चाचपणी केली जात आहे.

कोरोना संदर्भात केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे नाकातून देण्यात येणाऱ्या भारत बायोटेकच्या लसीला मंजुरी दिली आहे. त्या लसीचे नाव iNCOVACC आहे. नाकातून दिले जाणारे लसीला बूस्टर डोज म्हणून दिल आहे.

भारत बायोटेकच्या iNCOVACC लसी संदर्भातील १० गोष्टी

१) अमेरिकेची मदत  

-भारत बायोटेक आणि अमेरिकेच्या वाशिंग्टन युनिव्हर्सिटी ने तयार केली आहे. सुरुवातील या लसीला BBV154 हे नाव दिल होत. मात्र आता नाव बदलून iNCOVACC करण्यात आलं आहे.

-नाकाद्वारे देण्यात येणारी ही जगातील पहिली लस असल्याचा दावा करण्यात येत आहे. भारताच्या ड्रग्ज रेग्युलेटरी ६ सप्टेंबर रोजी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती.

२)  कोणाला ही लस घेता येणार आहे 

-ही लस १८ वर्षांवरील सगळ्यांना देता येणार आहे. १२ ते १७ वर्षांच्या मुलांचे लसीकर सुरु आहे. नाकातून देण्यात येणारी लस त्यांना देण्यात येता येणार नाही.

-ज्यांनी अगोदर लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना ही लस बूस्टर डोस म्हणून देण्यात येणार आहे.

 ३) रजिस्ट्रेशन करावं लागणार 

बूस्टर डोजच रजिस्ट्रेशन COWIN.gov.in  पोर्टल वर करावे लागणार आहे. बूस्टर डोससाठी iNCOVACC निवडावी लागणार आहे.

४) लस फ्री कुठं मिळणार

– ही लस खासगी आणि सरकारी रुग्णालयातच मिळणार आहे. सरकारी रुग्णालयात सुद्धा ही लस विकतच मिळणार आहे.  खासगी रुग्णालयात ८५० रुपयांना तर सरकारी रुग्णालयात ३२५ रुपयांना ही लस मिळणार आहे.

५) ४ ड्रॉप नाकात टाकले जाणार

-यापूर्वी देण्यात आलेल्या लसी या इंजेक्शन द्वारे देण्यात आल्या होत्या. या लसी नाकात ड्रॉपमधून टाकण्यात येते.

-कंपनीने सांगितले आहे की, दोन डोस घ्यावे लागणार आहे प्रत्येक डोस मध्ये ४-४ ड्रॉप नाकात टाकले जाणार आहे. दोन्ही डोसमध्ये १ महिन्याचे यानंतर ठेवावे लागणार आहे.

६) लस सेफ आहे का ? 

कोरोना नंतर लस हाच उपाय असल्याचे सांगितलं जात होत. त्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. भारत बायोटेक iNCOVACC लसीच्या तीन फेज मध्ये ट्रायल घेण्यात आली. पहिल्या फेज मध्ये १७५ आणि दुसऱ्या फेजच्या ट्रायलमध्ये २०० लोकांना लास देण्यात आली होती.

-यानंतर कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की ट्रायल दरम्यान चांगला रिजल्ट मिळाल्याचे सांगितलं आहे. कोरोना विरोधात इम्युनिटी तयार होत असल्याने संक्रमण रोखण्यात ही लस मदतगार ठरत असल्याचा कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे.

७) अगोदर कोव्हशील्ड घेतली असेल तर ही लस घेता येते का ?

-अनेकांनी सिरमची कोव्हीशील्ड लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यामुळे अनेकजण विचार आहेत की, भारत बायोटेकच्या iNCOVACC चा बूस्टर डोस घेतला तर चालणार आहे. त्यामुळे कोव्हीशील्ड घेणाऱ्यांना कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.