स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दलच्या या ७ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ..?

प्रख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचं वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्याविषयी फारशा माहिती नसणाऱ्या या गोष्टींवर एक नजर आवश्य टाका.

  • विश्वास ठेवायला थोडसं विचित्र वाटत असलं तरी हे खरंय की स्टीफन हॉकिंग हे लहानपणी क्रमिक अभ्यासात कधीच फारसे हुशार नव्हते. फार कसरत करून ते कसेबसे अॅव्हरेज ग्रेड मिळवायचे. पण असं असलं तरी त्यांच्या शिक्षकांना मात्र हा प्रखर बुद्धीमत्ता असणारा विद्यार्थी आहे, याची कल्पना शालेय जीवनातच आली होती. त्यामुळेच हॉकिंग यांना ‘आईनस्टाईन’ हे टोपणनाव मिळालं होतं.
  • ‘हॉकिंग’ यांच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलाने बायोलॉजीमध्ये संशोधन करावं, परंतु हॉकिंग यांना ‘बायोलॉजी’ बिलकुल आवडत नसे. ‘बायोलॉजी’मध्ये अनेक गोष्टी गरज नसताना अधिक विस्तृतपणे सांगितल्या जातात,असं ते म्हणत. गोष्टी अचूक आणि नेमकेपणाने सांगणारा गणित हा विषय त्यांना आवडे.
  • हॉकिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून फिजीक्समध्ये पहिला क्रमांक मिळवला परंतु पिजीक्ससुद्धा त्यांचा अॅडमीशन घेताना पहिला प्रेफरन्स नव्हताच. त्यांना ‘गणित’ हा मुख्य विषय हवा होता, परंतु त्याकाळी ऑक्सफर्डमध्ये ‘गणित’ हा मुख्य विषय घेऊन अॅडमिशन मिळत नसे, त्यामुळे त्यांनी फिजिक्सची निवड केली.stephen hocking 2
  • वयाच्या २१ व्या वर्षी ज्यावेळी त्यांना ‘अॅमीट्रॉफीक लॅटरल स्क्लेरॉसीस’ नावाच्या आजाराने ग्रासल्याचं निदान झालं त्यावेळी ते पुढची काही वर्षेच जगू शकतील असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. सुरुवातीला तर त्यांना धक्काच बसला की आपल्यासोबत हे असं का झालं म्हणून पण नंतर लगेच त्यांनी एक ल्युकेमियाग्रस्त मुलगा बघितला. त्या मुलाकडे बघुन त्यांना जाणवलं की जगातील अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास आहे, आपला त्रास तुलनेने फारच कमी आहे.
  • ऑक्सफर्डमधील शिक्षण संपवून पीएचडीसाठी केम्ब्रिजमध्ये गेलेल्या हॉकिंग यांची भेट तिथे जेन विल्डे या विद्यार्थिनीशी झाली. आधी मैत्री आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. हॉकिंग यांच्या आजाराचं निदान झाल्यानंतरही जेन यांनी हॉकिंगची साथ सोडली नाही. जेन यांच्यासोबतची एंगेजमेंटमुळे आपल्याला जिवंत राहण्याची प्रेरणा मिळाली असं हॉकिन्स सांगत.
  • न्युमोनिया झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या स्टीफन हॉकिंग यांचं एक ऑपरेशन करण्यात आलं. या ऑपरेशननंतर हॉकिंग यांना त्यांचा आवाज गमवावा लागला. तशी कल्पना त्यांना ऑपरेशनपूर्वीच देण्यात आली होती, परंतु त्यांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने हे ऑपरेशन अत्यंत आवश्यक होतं.
  • ‘A Brief History of Time’ लिहिणाऱ्या हॉकिंग यांनी यांनी आपल्या मुलीसोबत मिळून “George’s Secret Key to the Universe” आणि “George’s Cosmic Treasure” ही २ लहान मुलांसाठीची पुस्तके देखील लिहलेली आहेत, याची कल्पना बऱ्याच जनांना नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.