“डिजिटल रेप” च्या केसमध्ये 81 वर्षाच्या म्हाताऱ्याला अटक, पण काय असतो डिजिटल रेप..?

काल नोएडा येथे एक गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा होता बलात्काराचा आणि बलात्कार करणारा गुन्हेगार होता ८१ वर्षांचा एक वयस्कर माणूस. ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या मुलीचं वय आहे १७ वर्ष आणि बलात्कार होत होता तो गेल्या ७ वर्षांपासून..
मात्र हा गुन्हा नोंद होत असताना एक गोष्ट नमुद करण्यात आली ती म्हणजे या बलात्काराला “डिजीटल रेप” अस संबोधण्यात आलं. त्यामुळेच डिजीटल रेप चर्चेत आला. अनेकांना प्रश्न पडू लागला हा डिजीटल रेप असतो तरी काय..?
त्यापूर्वी नेमकी केस काय आहे हे पाहणं गरजेचं आहे…
नोएडा येथे राहणारा ८१ वर्षीय व्यक्ती मॉरिस रायडर. मॉरिस रायडर यापूर्वी प्रयागराजला रहात होता. सुमारे २२ वर्षापूर्वी तो प्रयागराजवरून आपल्या पत्नीसोबत नोयडा येथे शिफ्ट झाला. त्यानंतर एका महिलेच्या संपर्कात आला व तिच्यासोबत राहू लागला.
दूसरीकडे त्यानं हिमाचल प्रदेशात आपलं ऑफिस सुरू केलं होतं. या ऑफिसमध्ये एक महिला कामासाठी येत होती. ओळख झाली आणि या महिलेनं आपल्या मुलीला चांगल शिक्षण मिळावं म्हणून या वृद्ध चित्रकारासोबत तिला नोएडा येथे पाठवलं.
२०१५ साली ९ वर्षीय ही मुलगी चित्रकारासोबत नोएडा येथे आली. त्यावेळीपासून या मुलीवर शारिरीक अत्याचार चालू होते. पण अल्पवयीन मुलगी, त्यात शिक्षण व कामासाठी संबधिताच्या घरी संपुर्णपणे अवलंबून असल्याने तिला ही गोष्ट दूसऱ्यांना सांगता आली नाही. मुळात या वयात आपल्यावर अत्याचार होतोय याची जाणिवच होत नसते अस मानसोपचार तज्ञ सांगत असतात.
मात्र वयाच्या १७ वर्षापर्यन्त आपल्यासोबत नेमकं काय घडतय हे मुलीला कळू लागलं. त्यानंतर गेल्या महिन्यापासून या मुलीने एकएक पुरावे गोळा करण्यास सुरवात केली. ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरूपात हे पुरावे नोएडा पोलीसांसमोर सादर करून बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला.
मात्र बलात्काराच्या केसमध्ये शारिरीक संबध स्थापित होतात. इथे असा प्रकार झाला नव्हता. दूसरीकडे नुसतं विनयभंग म्हणलं तर यातून पिडीतेवर झालेल्या अन्यायाची थट्टा केल्यासारखाच प्रकार असतो.
कारण घडलेला प्रकार पुर्णत: वेगळा होता म्हणूनच या केसला डिजीटल रेप अस म्हणलं गेल.
डिजीटल रेप म्हणजे काय
डिजीटल रेपमध्ये पिडीतेच्या खाजगी भागात अत्याचार करणाऱ्याने आपल्या हातांच्या, पायांच्या बोटांचा वापर केला असेल तर अशा बलात्काराला डिजीटल बलात्कार म्हणतात.
बलात्कार झालेला असेल, नैसर्गिक शारिरीक संबंध प्रस्थापित झाले असतील तर पिडीतेच्या वैद्यकिय चाचणीत जे पुरावे मिळतात त्या आधारावर गुन्हेगाराला शिक्षा मिळणं सोप्प जातं. कारण अशा केसेसमध्ये गुन्हेगाराचे स्पर्म किंवा इतर पुरावे सहजपणे मिळून जातात.
मात्र गुन्हेगाराने आपल्या हातांच्या किंवा पायांच्या बोटांचा वापर करत अत्याचार केलेला असेल तर अशा वेळी पुरावे मिळत नाहीत किंवा अशा गंभीर गोष्टीला फक्त विनयभंग किंवा अश्लिल कृती किंवा लैंगिक चाळे म्हणता येत नाही. कारण कायद्याच्या भाषेत लैंगिक चाळे म्हणल्यास गंभीर गुन्हा केलेला असताना सुद्धा आरोपीला पळवाट मिळते.
म्हणूनच या कृतीला डिजीटल रेप अस संबोधल जातं.
पण डिजीटल हा शब्द का. तर सर्वसाधारण डिजीट चा अर्थ अंक किंवा आकडे असा होतो. मात्र ब्रिटीश इंग्लिश शब्दकोशानुसार डिजीटचा दूसरा अर्थ हात व पायांची बोटे असाही होतो. हात व पायांच्या बोटांचा वापर करुन करण्यात आलेला बलात्काराला डि़जीटल बलात्कार अस म्हणण्यात येतं.
निर्भया केसच्या प्रकरणानंतर भारतात बलात्कारांच्या गुन्ह्यांवर फिरविचार करत सुधारणा करण्यात आल्या. बलात्कार करूनही फक्त लैंगिक अत्याचार अथवा विनयभंग म्हणून आरोपी कायद्याच्या कचाट्यातून पळून जावू नयेत म्हणून अशा अशा गुन्ह्यांना डिजीटल बलात्काराच्या कक्षेत आणण्यात आलं.
हे ही वाच भिडू
- कर्नाटकचा सिरीअल किलर महिलांवर बलात्कार करुन खून करायचा, तेही त्यांच्या अंतर्वस्त्रांसाठी
- बांग्ला स्त्रियांच्या बलात्कारावर पाक राष्ट्रपती म्हंटले जन्माला येणारी पोर सूंदर निपजतील
- बूब हंटर हे काय बलात्काऱ्यांपेक्षा कमी नसतात…