रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होत्या हे ज्याला पटलेलं त्यांनीच पुढे वाचावं. 

प्रचंड व्हायरल होणारा शब्द म्हणजे 90’s किड्स. म्हणजे आपल्या भूतकाळात रमणारी जगात काही निवडक गट आहेत त्यात सगळ्यात टॉपला 90’s किड्स नावाची जनता येते. दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग आपला अहवाल जाहिर करत असतो या अहवालात जे काही वाईट घडलेलं असतं ते सगळं या जनतेमुळं येत यावर आमचा ठाम विश्वास आहे.

आत्ता हि मुलं कशी ओळखायची तर ज्यांची लग्न होत नाहीत, जे विश्वास नांगरे पाटलांच भाषण ऐकून सायन्स वरुन आर्टस् ला गेले. जी लोक इंजनियरिंगला उत्तम पर्याय म्हणून BCA, BBA करु लागले. इंग्लिश पिक्चर पाहून पुण्याच्या एखाद्या नाट्यसंस्थेत काम करू लागले वगैरे वगैरे जे काही असतील त्यांच्यावर बिंनधास्तपणे 90’s किड्स चा शिक्का मारून रिकामं व्हायचं. लक्षात ठेवा हा शिक्का वाया जाणार नाही. 

बोलभिडू कार्यकर्त्यांच्या अशा दोन्ही मिळून अफवांची लिस्ट तुमच्या पुढे मांडतो. पटतेय ती घ्या नाही पटत ती सोडून द्या. कारण नव्वदीची पोरं लोड घेत नाहीत. 

१) रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होत्या. 

२००३ चा वर्ल्डकप फायनलचा थरार. थरार कशाचा कुत्र्यागत हाणलेला आपल्याला खोटं कशाला सांगा. आस्ट्रेलियानं लय येड्यागत हाणलं होतं. मध्येच लाईट गेली तेव्हा रेडिओवर येणारा ये BSNL चौका छक्काचा आवाज आसमंतात चार दिवस घुमत होता. त्यानंतर भारतानं सपशेल हार पत्करली. वीस साल बाद इतिहास होणार अस वाटत असताना त्या क्षणाला नव्वदीची पोरं हुकली. आणि दूसऱ्या दिवशी अफवा आली. रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंगा होत्या. मॅच परत घेणार आहेत. मॅच काय परत झाली नाही पण पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंगा होत्या हे फिक्स झालं. 

२) अंडरटेकर आत्तापर्यन्त सात वेळा मरून जिवंत झाला आहे. 

WWF हा सगळ्यात भारी प्रकार होता. म्हणजे खरतर ते WWE असायचं पण आपल्याला त्यातलं काय कळणार आपल्या  फक्त अंडरटेकर कधी मरतो आणि कधी जिवंत होतो यात इंटरेस्ट. तशीच दूसरी अफवा होती केन आणि अंडरटेकर भाऊ आहेत. बाकी या सगळ्यात ब्रॉक लेसनर आणि बिग शो दोघांनी मिळून स्टेज तोडलेलं आणि केन नं मास्क काढलेलं हे सीन नेहमीच अजरामर राहतील. 

३) ओम्नीतून बारकी पोरं किडनॅप केली जातात. 

लहानपणीची हि सगळ्यात भितीदायक अफवा. याच मेन कारण म्हणजे आपला इंडियन सिनेमा. या सिनेमात व्हिलन कोणपण असो तो किडनॅप करायला फक्त आणि फक्त ओम्नी वापरायचा. दोन्हीकडून दार उघडत असल्यामुळे चालता चालता पाठीमागून गाडी येणार आणि आपल्याला किडनॅप करणार अस वाटायचं. पण हा योग नशिबाने आपच्या नशिबात तरी आला नाही. 

४) अग्निशामक दलाला तीन माणसं मारायची परवानगी असते. 

कुठं आग लागली की अग्निशामक दलाची गाडी ती विझवायला जायची. ती इतकी जोरात जायची की सहज अफवा होती, यांना तीन माणसं मारायची परवानगी असते. आग विझवायला जाणारी माणसं रस्त्यावरची माणसं मारत का जाईल हा विचार तेव्हा केला नाही. असेल तर असेल म्हणून लाल गाडी दिसली की लांब पळायचं एवढच प्रत्येकाने ठरवलेलं असायचं. 

५)  डोक्यात दोन भवरे असले की दोन लग्न होतात. 

वास्तविक या अफवेला प्रत्येकाच्या घरातील कारणीभूत आहेत. घरातल्यांनीच हा नाद लावलेला असतो. मोठ्ठेपणी फक्त इतकच कळतं की डोक्यात दोन भवरे असले की भांग व्यवस्थित पडत नाही. बाकी दोन लग्नाच काय बोलताय…. असो तो विषय परत कधीतरी. 

६) शक्तिमान बघून स्टुलावरुन उड्या मारणारी गॅंग. 

शक्तिमान वाचवण्यासाठी येईल म्हणून उड्या मारणारी गॅंग होती. म्हणजे खास आपल्यासाठी शक्तिमान येणारच बरका अस म्हणत हि लोकं माकडासारख्या उड्या मारून गुडघे फोडून घ्यायचे. मोठ्ठेपणी हिच मुलं स्वामीनाथन आयोग येणार म्हणून वाट बघत आहेत. 

आत्ता या झाल्या निवडक अफवा, बाकी करवंदाच बी खाल्ल तर पोटातनं झाड उगवणार, बुमर गिळलं की मरणार, रेल्वेच्या खाली रुपाया टाकला की त्याचं लोहचुंबक होणार (बरं तो लोहचुंबक असतं ते खूप उशीरा समजलं आम्ही लवचुंबकच म्हणायचो) वगैरे वगैरे अफवा होत्याच. ज्या सुचतील त्या कमेंटमध्ये टाकत चला काही टेन्शन नाही.

हे ही वाचा.

12 Comments
  1. Ganesh says

    Kay pan mast divas hote te tya kayam athavani manat rahanar te divas parat milnar nahit kharac afhva soda pan to kaal veglac hota

    miss this day

  2. Kamlesh paithankar says

    – लहानपनी एक भयानक खतरनाक अफवा होती –
    – लाल चिंचा येणारी चिंच खायची नाही…?
    – कारण त्या चिंची खाली कुणीतरी जिव दिलेला असतो…!!
    – किंवा त्या चिंचेला पाणी म्हणुन रक्त टाकलेलं असतं…!!
    – त्या चिंची च्या झाडांचं अस्तित्व हे भुतांसाठी असतं…!!

    – ह्या भयान अफवा लहानपणी चालायच्या…!!

  3. Suhas says

    2002 साली मी 10 vi मध्ये शिकत असताना एक अफवा फेमस होती ती म्हणजे 10 जून 2002 la जगबुडी होणार.
    सलमान खान la एड्स झाला
    Allu अर्जुन अपघातात वारला

  4. mandar says

    de diwas atchya android arkhe nahit

  5. Atrangi Crowd says

    डोके ठोकल्यावर शिंग येतात म्हणे

  6. Prashant Medge says

    कुत्र्या वर्ती बसले कि माणुस बुट्ट राहुन जात.
    कुत्र्या वर पाणी फेकले की आपल्या अंगावर खाजु येती, पुळ्या येतात.
    टक्कर घेतली कि शिंग येतं.

  7. Manu says

    अजून एक अफवा होती की हाकामारी येते आणि ओळखीच्या लोकांचा आवाज काढते आणि हाक मारते आणि आपण ओ दिली की आपण मरतो आणि तस होऊ नये म्हणून त्या वेळी आम्ही प्रत्येक दारावर फुली मारून ठेवली होती

  8. महेश says

    कुत्रा शी करत असताना अंगुटी बांधायची म्हणजे त्याची संडास हटकून राहील
    आणि चीचबिलाई च्या बिया उशी खाली सोलून ठेवल्या की सकाळी पैसे बनते

  9. Harsh Bhosale says

    ज्याला तीळ जास्त त्याला पैसे जास्त

  10. DATTA DHERE says

    संडासला जवळ जवळ बसलं की संडासच्या जागी दात येतात.

  11. DATTA DHERE says

    गोसविला लात मारली की पायाला फोड येतो.

  12. DATTA DHERE says

    कापूस वेचताना मिष्या ठेवल्या तर मिषा येत नाही

Leave A Reply

Your email address will not be published.