म्हणून चीनची ९४% लोकसंख्या चीनच्या फक्त पूर्व भागात रहाते…

जगात लोकसंख्येच्या बाबतीत चीनला ओव्हरटेक करत भारतानं पहिला नंबर मिळवलाय, चीन भले दोन नंबरवर गेलं असेल, पण मेन विषय हा आहे की चीनची लोकसंख्या चीनच्या फक्त ३६% भागातच रहाते.

चीनच्या टोटल क्षेत्रफळातला फक्त पूर्वेकडचा भाग लोकांनी व्यापला गेलाय आणि बाकीच्या उरलेल्या पश्चिम भागात काही घडत नाही, वाढत नाही, उगवत नाही, पिकत नाही, आणि तिथे फार कोणी राहतही नाही. चीनची ९४% लोकसंख्या ही चीनच्या पूर्व भागात रहाते आणि उरलेली फक्त ६% लोकसंख्या पश्चिम भागात. 

बरं या विषयी चीन फार काही करताना, अॅक्शन घेतानाही दिसत नाही. ईस्ट आणि वेस्ट अशा दोन भागांमध्ये चीन विभागलं गेलंय आणि १९३५ साली चायनीज डेमोग्राफर हू यूआन यॉंग नावाच्या माणसामुळे पहिल्यांदा हे पार्टिशन पडलेलं लोकांना नोटिस झालं होतं आणि म्हणूनच या पार्टिशनला द हू लाइन असंही म्हणतात.

हू लाइन जेव्हा चीन फिरत होते तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की चीनच्या ६४% पश्चिम भागात चीनची फक्त ६% लोकसंख्या राहते. आणि पूर्वेच्या ३६% भागात उरलेली सगळी म्हणजे ९६% लोकसंख्या राहते. पण इतके वर्षांपूर्वी पडलेली पार्टिशन आणि या दोन भागांमधला इमबॅलेंस आजही असाच असण्यामागे काही कारणं आहेत

पहिलं कारण भौगोलिक आणि वातावरणातला फरक हे आहे. पूर्व आणि पश्चिम भागातल्या चीनची भौगोलिक स्थिती एकदम काँट्रास्ट आहे. आता माणसाला सेटल व्हायला काय लागतं तर जिथे योग्य प्रमाणात अन्न धान्य असेल म्हणजेच सुपीक जमीन असेल पाऊस पाणी व्यवस्थित असेल, नद्या असतील, तर अशी जागा माणसांना राहण्यासाठी महत्वाची असते आणि या गरजा चीनच्या पूर्व भागात पहिल्यापासूनच उत्तमरित्या पूर्ण होतात, उदाहरण द्यायचं म्हटलं तर जगातल्या दोन सगळ्यात मोठ्या नद्या म्हणजेच द यल्लो रिव्हर आणि द यांगसे रिव्हर या दोन्ही चीनच्या पूर्व भागात आहेत. त्यामुळे चीनच्या पूर्व भागात विकासही मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसतो

पण हेच चित्र चीनच्या पश्चिम भागात मात्र एकदम उलटं आहे. 

याचं कारण म्हणजे इथलं तापमान. इथलं तापमान इतकं extreme लेव्हलला आहे की थंडीत -४० पेक्षाही कमी होतं आणि उन्हाळ्यात ५० डिग्रीचा टप्पा गाठतं त्यामुळे इथे कोणी साधं सोपं आणि सरळ आयुष्य जगूच शकत नाही. पण हे असं का होतं? वाढलं की एकदम जास्त, कमी झालं की एकदम कमी? तर याला म्हणतात रेन शॅडो इफेक्ट.

रेन शॅडो इफेक्ट म्हणजे काय तर आपल्या पश्चिम भारतातून जे पावसाळी ढग वाहत वाहत चीनच्या पश्चिम  भागात जायला हवे ते मधल्या हिमालय पर्वतरांगेमुळे अलीकडेच अडकून राहतात आणि पुढेच सरकत नाहीत त्यामुळे हिमालय पर्वतरांगेच्या पालिकडल्या भागात पाऊसच पडत नाही, परिणामी हा सगळा प्रदेश वाळवांटांचा बनलाय. चीनच्या पश्चिम भागात तिबेट, तकलामकान आणि गोबी नावाची वाळवंट आहेत जी याच रेन शॅडो इफेक्टमुळे तयार झालीयेत.

दुसरं कारण आहे ते म्हणजे कल्चर आणि संस्कृतीत झालेले बदल.

तकलामकानच्या वाळवंटात इसवीसनापूर्वी इजिप्शियन लोकांच्या छोट्याशा समूहाने राहायला सुरवात केली. पण त्यांना तिथे राहून आपली कम्यूनिटी काही वाढवता आली नाही. कारण हा प्रदेश संपूर्ण वाळवंटाचा असल्यामुळे इथे प्रगती किंवा विकास होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे आज हा ग्रुप एक मायनॉरिटी म्हणूनच उरलाय. 

पण हेच दुसऱ्या बाजूला म्हणजेच पूर्वेला, विकास होत होता, संस्कृती वाढत होती, चायनीज civilization घडत होतं आणि काळ बदलत होता तशी ईस्ट चायनाची आर्थिक, सामाजिक घडी बसायला सुरवात झाली होती. चीनच्या पूर्व भागात होणारी प्रगती पाहून चीनच्या गव्हरमेंटनी देशाच्या दोन भागात पडलेली फुट दूर करण्याचा प्रयत्न केला नाही.

आता प्रगतीसाठी काय लागतं तर शिक्षण लागतं, आरोग्य लागतं, डेवलपमेंट व्हायला लागते आणि GDP वाढावा लागतो आणि या सगळ्या गोष्टी चीनच्या पूर्व भागातच पूर्ण होत होत्या…  तिथल्या लोकांना पहिल्यापासूनच मार्केटचं गणित सुद्धा अचूक कळलेलं…. खरंतर चीनच्या डेवलपमेंटमध्ये तिकडच्या नागरिकांचाही खूप मोठा वाटा आहे.

तिकडच्या नागरिकांनी काळाप्रमाणे होणाऱ्या, घडणाऱ्या बदलांचं कायमच स्वागत केलं, समोर येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवली आणि म्हणूनच चीन आजच्या घडीला इतका पावरफुल देश बनलाय. पण हे सगळं फक्त चीनच्या पूर्व भागातच घडताना दिसतं

तिसरं कारण आहे संसाधनं.

चीनच्या पश्चिम भागात नॅच्युरल रेसओरसेस कमी आहेत त्यामुळे इथे माणसं कमी, माणसं कमी आहेत त्यामुळे डेवलपमेंट कमी झालीये.. आणि डेवलपमेंट झाली नसल्याने मॅन मेड रेसओरसेस सुद्धा अगदी नगण्य आहेत. तेच चीनच्या पूर्व भागात मात्र रोज नवीन संसाधन, रोज नवीन टेक्नॉलजी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते.

आता जर ईस्ट चायनामध्येच सगळं आहे आणि वेस्ट चायनाची जमीन नुसतीच पडीक आहे तर मग चीनला या जागेचा काहीच उपयोग होत नाही का तर असं नाहीये. चीनच्या पश्चिम भागात पाऊसपाणी आणि सुपीक जमीन जरी नसली तरी जमिनीखाली तेलाचे साठे उपलब्ध आहेत आणि पूर्वेपेक्षा सुद्धा पश्चिम भागात हे साठे जास्त आहेत, याच कारणामुळे २००९ साली ऑइल Consumption आणि प्रॉडक्शनच्या लिस्ट मध्ये यूनायटेड स्टेट्स नंतर चीनचा नंबर दुसऱ्या क्रमांकावर आला होता.

पण असं जरी असलं तरी चीनच्या पूर्व आणि पश्चिम भागात मात्र कायम तणावपूर्ण संबंधच असलेले आढळतात. आता हे तणाव पूर्ण संबंध का आहेत तर पूर्वेकडून होणारं सांस्कृतिक आक्रमण, आर्थिक मागासलेपण यामुळे चीनच्या पूर्वेकडच्या जिनजियांग प्रांतातले उइगर मुस्लिम्स आणि तिबेटियन्स वेगळ्या प्रांताची मागणी करतातयत. मात्र चीनच्या कम्यूनिस्ट सरकारने अत्याचार करत हा विरोध संपूर्णपणे चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला.

पण पश्चिम भागात डेवलपमेंट करण्याच्या दृष्टीने चीनच्या गव्हरमेंटने कधीच हालचाल केली नाही का? तर असंही नाहीये, २००६ साली पश्चिम भागात डेवलपमेंट घडवण्यासाठी चीनने १ ट्रीलियन युआन म्हणजेच ११ लाख करोड रुपये खर्च केले जेणेकरून ते पश्चिम भागातलं ट्रान्सपोर्ट, हायड्रो पॉवर प्लांटस, एनर्जि आणि टेली कम्युनिकेशन सुधारू शकतील. शिवाय त्यांनी तिबेटला डायरेक्ट्ली चीनशी जोडायचं म्हणून तिबेट रेल्वे प्रोजेक्टवर सुद्धा काम केलं होतं पण नंतर त्याचा फार काही उपयोग झाला नाही. त्यामुळे चीनचे पूर्व आणि पश्चिम भाग कल्चरली आणि इकॉनॉमिकली आजही विभागलेलेच आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.