पंजाब जिंकण्यासाठी नव्वदी पार केलेले बादल पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत

कुठल्याही पक्षात जेष्ठ नेत्यांना, त्यांच्या शब्दांना मान हा असतोच. पक्षाच्या कुठल्याही निर्णयात किंवा प्लॅनमध्ये त्यांचं मतं बऱ्याचदा ग्राह्य धरलं जातं. कारण जुन्या हाडाला लयं अनुभव असतो असं  म्हणतात. पण निवडणुकी उतरवताना कौल हा तरुण चेहऱ्यावरचं लागतो. आता यामागची स्ट्रॅटेजी अशी कि,भारतात तरुण वर्ग जास्त आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला इम्प्रेस करण्यासाठी पक्ष तरुण चेहऱ्यानं जास्तीस्त जास्त संधी देतात. 

आता सुद्धा येणाऱ्या वर्षात ५ महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणूका आहे. त्यामुळे तिथल्या निवडणुकांमध्येही असचं काहीस चित्र पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. पण पंजाबमध्ये वेगळंच गणित पाहायला मिळतंय. 

देशातील सर्वात जेष्ठ नेत्यांपैकी एक असलेले प्रकाश सिंह बादल पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जातंय.  येत्या ८ डिसेंबरला बादल आपल्या वयाची ९४ वर्षे पूर्ण करणार आहेत. पण त्यांच्या शिरोमणी अकाली दलाने त्यांना लांबी विधानसभा मतदारसंघातून उभं कारण्याची तयारी सुरु केलीये. आता यामागे पक्षाची काहीतरी खास रणनीती  तर असणार हे तर फिक्स आहे.

 येत्या फेब्रुवारी महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यात या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाने बहुजन समाज पक्षासोबत हातमिळवणी केलीये. राज्यातल्या ११७ विधानसभा जागांपैकी शिरोमणी अकाली दलाच्या वाट्याला ९७ जागा आल्या असल्याचं समजतंय. तर बाकीच्या २० ठिकाणी बहुजन पक्ष आपला उमेदवार उतरवणार आहेत. १९९६ नंतर हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोमणी अकाली दलाने ९७ पैकी ८९ जागांवर आपली उमेदवारी जाहीर केली आहे. पण सर्वात महत्वाच्या असणाऱ्या लांबी मतदार संघासाठी उमेदवार घोषित करणं पक्षानं रिझर्व्हवर ठेवलं आहे.  आणि लांबी मतदार म्हणजे प्रकाश सिंह बादल यांचा बालेकिल्ला. आतापर्यंत दहा वेळा आमदार झालेले प्रकाश सिंह बादल यांनी आपल्या बहुतेक निवडणूक लांबाच्या जागेवरूनच लढल्या आहेत. 

त्यात राज्यात सध्याची राजकीय परिस्थती पाहता काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचं तगडं आव्हान आहे, अश्यात आपल्या जास्तीत जागा निवडून याव्यात, यासाठी पक्ष खटाटोप करतयं. त्यात गेले जवळपास २३ वर्ष अकाली भाजपच्या एनडीएतल्या पक्षांपैकी एक होता. मग गेल्या वर्षी त्यांचं भाजपशी बिनसलं आणि अकाली या एनडीएमधून बाहेर पडलं. 

त्यामुळे आता पक्षाला बहुजन समजा पक्षासोबत मिळून चांगली रणनीती आखायची आहे. तसे प्रयत्न देखील पक्षाने सुरु केलंत, याचं रणनीती मधला एक भाग म्हणजे  प्रकाशसिंग बादल यांना मैदानात उतरवणं. 

पक्षाच्या एका नेत्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीची सांगितलं की, पक्ष लांबीच्या जागेवर प्रकाशसिंग बादल यांना उमेदवारी देणार आहे. त्यावर गांभीर्याने विचारही सुरू आहे. आम्हाला या जागेवर विजय मिळवता येणार नाही असा कोणताही उमेदवार उभा करायचा नाही, त्यामुळे आम्ही प्रकाशसिंग बादल यांना या जागेवरून पुन्हा उभे करण्याचा विचार करत आहोत.

दरम्यान, बादल यंदाची निवडणुकीत लढवणारी नाही असे म्हंटले जात होते. आणि त्यांच्या लांबा मतदारसंघासाठी सुखबीर बादल आपली जलालाबादची जागा सोडू शकतात, असा अंदाज बांधला जात होता. कारण प्रकाशसिंग बादल यांचं वय झालंय आणि त्यांची प्रकृतीही खालावत चालली आहे. 

त्यामुळेच आता सुखबीर बादल आपल्या बादल कुटुंबाच्या वडिलोपार्जित जागेवर उभं राहणार असं बोललं जात होत.  पण पक्षाने काही दिवसापूर्वी सुखबीर बादल यांना जलालाबादमधून पुन्हा उमेदवारी दिल्याने लांबीच्या जागेवर कोण निवडणूक लढणार असा प्रश्न निर्माण झाला होता. एवढंच नाही तर पक्ष आणि कुटुंबात प्रकाश सिंह बादल यांची तब्येत पाहता हरसिमरत कौर बादल आणि त्यांच्या मुलीच्या नावाचीही चर्चा होती.  

आता सद्यःपरिस्थितीवर बोलायचं झालं तर प्रकाशसिंग बादल हे देशातील सर्वात वयस्कर आमदार आहेत आणि आता पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर ते सर्वात वयस्कर उमेदवार असतील. 

हे ही  वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.