पनवेलच्या डॉ. स्वातीने तीन वर्ष परिसरात धुमाकूळ घातला होता.

नौपाडा परिसरातील एका ज्वेलर्सवाल्याकडे फोन आला. आठ हजार रुपये किंमतीचा एक सोन्याचा दागिना हवा आहे, तुमचे कामगारांना तो घेवून ठरलेल्या पत्यावर पाठवू शकता का. समोरचा तो मंजूळ आवाज, त्यातही डॉ. स्वाती अस नाव सांगून हॉस्पीटलचा सांगितलेला पत्ता यावरुन चटकन विश्वास ठेवून ज्वेलर्सवाला आपल्या कामगारांना ठरलेल्या हॉस्पीटलमध्ये पाठवून देतो. डॉ. स्वाती शेवटची सुचना म्हणून वरचे पैसै सुट्टे आणावेत अस सांगते.

ज्वेलर्सवाला आपल्या कामगारांना सोन्याचा दागिणा आणि वरचे हजार दिड हजार रुपयांच्या सुट्या नोटा देवून ठरलेल्या ठिकाणी पाठवतो. 

कामगार डॉ. स्वातींच्या हॉस्पीटलखाली येतात. इतक्यात समोर एक शासकिय कर्मचारी वाटावा असा इसम येतो. अमुक तमूक ज्वेलर्सवाल्यांकडून आला आहात का? स्वाती मॅडम तुमची वरती वाट पहात आहेत म्हणून सांगतो. कर्मचारी वर जावू लागताच तो सांगतो मी स्वाती मॅडमचा PA आहे. ते सोबत आणलेले सुट्टे पैसे तेवढे माझ्याकडे जा आणि वरती मॅडमकडे जा.

एका हातात सोन्याचा दागिणा आणि दूसऱ्या हातात सुट्टे हजार दिड हजार रुपये. अशा वेळी चोर सोन्याचा दागिनाच पळवू शकतो. कामगारांनी त्याला सहज आपल्या खिश्यातील हजार दिड हजार रुपये दिले आणि डॉ. स्वातीना डिलिव्हरी देण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. 

संपुर्ण बिल्डींग पालथी घातल्यानंतर त्यांना समजलं इथे कोणीच डॉ. स्वाती नावाची व्यक्ती रहात नाही. खाली भेटलेला इसम आपणास हजार रुपयांना फसवून गेला, इतकच काय ते. 

पुढे काय होतं तर तर ज्वेलर्सवाला तक्रार दाखल करतो. पोलीस देखील हजार दोन हजार रुपयांची फसवणूक म्हणून दुर्लक्ष करतात. हळुहळु अशा प्रकारच्या फसवणुकीच्या वारंवार केस दाखल होवू लागतात आणि पोलीस अधिकारी सतर्क होतात. अखेर सापळा रचून तीन चाणाक्ष अधिकाऱ्याकडून त्याला पकडलं जातं.

डॉ. स्वाती अस तिचं नाव. म्हणजे त्याच मुळ नाव मनिष आंबेकर. 

मनिष आंबेकर हा पनवेलचा. आजवर त्याने हजार दोन हजार करत हजारो जणांना लाखो रुपयांना गंडवलं असल्याच सांगण्यात येत. किरकोळ रक्कम असल्याने बऱ्याचदा अनेकांकडून केस दाखल करण्यात आल्या नसल्याचं सांगण्यात येतं.

मनिष आंबेकर सुरवातीच्या काळात क्रॉफर्ड मार्केट इथे कामास होता. त्याठिकाणी बऱ्याचदा सामान घेत असताना लोकांकडून सुटे पैसै घेवून घरी येण्यासाठी सांगितलं जात असल्याच त्याच्या लक्षात आलं. दूकानदार देखील होम डिलिव्हरीत पैशाची झिकझिक नसते म्हणून सुट्टे पैसे कामगारांकडे देत असत. याच गोष्टीवरुन फसवण्याची एक अनोखी शक्कल त्याला सापडली होती. 

तो एखाद्या व्यापाऱ्याला फोन करत असे. होम डिलिव्हरीच्या नावाखाली छोटमोठ्या गोष्टी मागवत असे. हे सर्व करत असताना तो महिलेचा आवाज काढायचा. होम डिलिव्हरीसाठी कामगार येताच तो त्याला खालीच गाठून आपण डॉ. स्वाती यांचे PA असून आणलेले सुट्टै पैसे आपल्याकडे द्यायला सांगायचा. वरती मॅडम वाट पहात आहेत असही आवर्जून सांगायचा. कामगार देखील पैसै देवून मॅडमच्या शोधात बिल्डींगमध्ये जायचे. डॉ. स्वाती नावाची कोणतिच महिला राहत नाही म्हणल्यानंतर पोलीस केस व्हायची. चौकशीचा रोख डॉ. स्वाती नावाच्या अनोळखील महिलेकडे वळत असे.

प्रत्येक केस डॉ. स्वाती या एकाच नावाने असल्याने चाणाक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी शोध घेण्याच ठरवलं आणि मनिष आंबेकर नावाचा पनवेलचा इसम पोलीसांच्या जाळ्यात सापडला.

मनिषची मैत्रीण एका डान्सबार मध्ये बारगर्ल म्हणून काम करायची. तिच्यावर पैसै खर्च करण्यासाठी तो मोठ्या प्रमाणात भुरट्या चोरीकडे वळला होता. पेसे कमी असतील पण ते चाणाक्षपणे उकळण्याच्या शैलीमुळे तो डॉ. स्वातीच्या नावाने बराच प्रसिद्ध झाला होता. २०१५ ते २०१८ या काळात डॉ. स्वातीने पनवेलसह मुंबई परिसरात बऱ्यापैकी धुमाकूळ घातला.

तो विवाहित होता तरी तिच्यासाठी तो पैसे गोळा करत राहिला. या काळात स्नॅक सेंटर, किरकोळ व्यापारी, सोनाचांदीवाले अशा सर्वांना त्याने आपआपल्या परीने लुटण्याचा एकहाती कार्यक्रम केला. १४ डिसेंबर २०१८ ला १०० लोकांचे मोबाईल नंबर ट्रेस करून तर ८० च्या वरती CCTV कॅमेऱ्यांचा तपास करुन पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. आणि या डॉ. स्वातीच्या चेहऱ्यावरचा पडदा उठला. आज डॉ. स्वाती अर्थात मनिष आंबेकर जेल की सलाखों के पिछे असतात.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.