डॉ. बाबासाहेब यांच्यासोबत मोदीजींची तुलना करताना इलाय राजांनी ही कारणे दिलेत..

इलाय राजा. भारतीय संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज नाव. संगीत क्षेत्रातलं त्यांचा योगदान तर पार आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडलं आहे. त्यांनी ७०००० हून अधिक गाणी रचली आहेत. १४०० हून अधिक चित्रपटांसाठी संगीत दिलं आहे. आणि २०,००० हून अधिक मैफिली गाजवल्या आहेत. 

त्यामुळं  “इसाग्नानी” (संगीत प्रतिभा)  हे नाव त्यांना चपखल बसतं.

इतक्या दिवस आपल्या संगीतामुळेच चर्चेत असलेले इलाय राजा आता मात्र वेगळ्याच गोष्टीमुळे वादात सापडलेत. इलाय राजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्याने वाद निर्माण झाला आहे.

दिल्लीस्थित ब्लूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशनने ‘आंबेडकर अ‍ॅन्ड मोदी- रिफॉर्मर्स आयडियाज, परफॉर्मर्स इम्लिमेनटेशन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध केले असून त्याच्या प्रस्तावनेत इलाय राजा यांनी ही तुलना केली आहे.

त्यामुळंच वादंग पेटला आहे. आता वाद पेटलाय एवढाच सांगून आम्ही थांबणार नाही हे तुम्हला पण माहित आहे. तर वाद ज्या प्रस्तावनेमुळे पेटला आहे. तीच तुम्हाला जशीच्या तशी सांगतो. म्हणजे तुम्हाला मुद्दा नक्की क्लीअर होईल.

तर प्रस्तावनेत इलाय राजा लिहतात…

सामाजिक न्यायाचा विचार करायचं झाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कायदे आणि संविधानिक संरक्षण देत समाजातील उपेक्षित समुदायांभोवतालचं कायद्याचं कवच अजूनच मजबूत केलं आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित OBC आयोगाची स्थापना हे त्याचेच एक उदाहरण म्हणता येइल.

त्यांनी शौचालये बांधून, घरे बांधून आणि बँक काउंट्स उघडून गरिबांचे जीवन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत.

ही अशी पावले आहेत ज्यामुळं गरिबातील गरीबांना मदत मदत होत आहे. सामाजिकदृष्ट्या वंचित समुदायातील लोक यामुळं मुख्य धारेत येत आहेत. गृहनिर्माण, स्वच्छता आणि विजेच्या सुविधा, उत्तम राहणीमानाची हमी ही पंतप्रधानांची धोरणं समाजातल्या वंचित घटकाच्या सबलीकरणाचं काम करत आहेत.

दोघांनीही दारिद्र्य आणि सामाजिक संरचनेची अडचण जवळून पाहिली आणि त्याचबरोबर ती मोडून काढण्याचे कामही केले. 

दोघांनीही भारतासाठी मोठी स्वप्ने पाहिली. त्याचवेळी दोघेही व्यावहारिक पुरुष आहेत जे केवळ विचार करत बसण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात.

मला आशा आहे की हे पुस्तक लोकांना भारत त्याच्या स्वप्नांच्या पूर्ततेच्या दिशेने कसा वाटचाल करत आहे याची माहिती देईल. हे महत्वाचं आहे की भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात हे पुस्तक प्रकाशित होत आहे.  

मोदी उभारत असलेला आत्मनिर्भर भारत ही आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नांना योग्य श्रद्धांजली आहे.

मी विशेषतः आपल्या देशातील तरुणांना या पुस्तकाची शिफारस करतो कारण ते त्यांना आपल्या मातीतल्या महान सुपुत्राच्या वारशाची माहिती देईल आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आकांक्षांशी अखंडपणे एक नवीन भारत कसा बांधला जात आहे हे त्यांना कळेल. मी पुस्तकाला पुढील सर्व यशासाठी शुभेच्छा देतो.

अशी ही सर्व प्रस्तावना आहे.

आणि यामुळंच इलाय राजा यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अगदी इलाय राजा यांना भाजपतर्फे राज्यसभेवर नियुक्त केले जाण्याची शक्यता असून त्यासाठी त्यांनी एवढा खटाटोप केला आहे इथपर्यंत टीका झाली. 

इलाय राजायांच्या निकटवर्तीयांनी मात्र त्यांची कोणतीच राजकीय महत्वाकांक्षा नसल्याचं म्हटलं आहे. मात्र आता मोदींशी केलेल्या आंबेडकरांच्या या तुलनेनं पुस्तकाची मात्र चांगलीच हवा झाली आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.