हातगाडीवर भाजी विकणाऱ्या शेतकऱ्याने कंपनी उभारून अडीच कोटींची उलाढाल केलीय….

भारतात शेतीला सगळ्यात जास्त महत्व दिलं जात, कृषिप्रधान देश म्हणून जगभर भारताचा नावलौकिक आहे आणि धान्याचं कोठार म्हणून भारताला ओळखलं जातं. शेतकरी, हमीभाव, पाऊस, पेरणी, दुबार पेरणी या गोष्टी सतत आपण ऐकत असतो पण त्याकडे कधी गांभीर्याने बघत नसतो. पण काही शेतकरी हे डोकं लावून काम करतात आणि वेगळी वाट धरून शेतीतून हुशारीने नफा मिळवतात. मुळशी पॅटर्न मधला डायलॉग आहे बघा आता वझाला पाठ नाही तर डोकं लावायचं… सेम टू सेम अशीच आयडिया वापरून एका मराठी शेतकऱ्याने कोटींची उलाढाल केलीय. त्याचीच ही यशोगाथा.

मराठी माणूस धंदा करू शकत नाही या समजुतीला मुरड घालत अशाच एका मराठी शेतकऱ्याने अविरत मेहनत घेऊन आपलं ध्येय साध्य केलं. महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवासी उमेश देवकाते यांची कथाही अशीच आहे. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या उमेश देवकाते याना शिक्षणानंतर नोकरी मिळवण्यात यश आले. पण, थोड्या वेळाने त्यांनी स्वतःचे काम सुरू केले. हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. शिक्षण घेतलं खरं पण या देशात नोकऱ्या मिळण्याच्या शक्यता या फक्त शक्यताचं बनून राहिल्या आहेत म्हणून देवकाते यांनी वेगळा मार्ग निवडण्यात धन्यता मानली.

शिक्षण बाजूला सारून आणि नोकरीचा विचार डोक्यातून काढून टाकत देवकाते यांनी हातगाडीवर भाजीपाला विकून सुरुवात केली, 2017 मध्ये उमेशने पहिल्यांदा भांडुपमधील एका सोसायटीबाहेर हातगाडी लावून भाजीपाला विकला. भाजीपाला विकताना त्यांना बऱ्याच गोष्टी उलगडत गेल्या आणि बिझनेस नॉलेज काय असतं, व्यवसाय कसा वाढवता येईल, अजून आर्थिक उत्पन्न कसं वाढेल याचाच ते सतत विचार करत असायचे. नंतर नंतर चांगल्या गुणवत्ता असलेला माल कोणता अशा बारीकसारीक गोष्टींवर त्यांनी निरीक्षण नोंदवलं. पुढे डोक्यात मोठे विचार घोळू लागले.

हातगाडीवर भाजीपाला विकणाऱ्या उमेश देवकाते यांनी बिझनेस नॉलेज आत्मसात केलेलं होतं, याच हातगाडीचे नंतर त्यांनी परिश्रमपूर्वक होम डिलिव्हरी कंपनीत रूपांतर केले. शेतकरी पुत्र असल्याने शेतीच जन्मजात नॉलेज त्यांना आलेलं होतं. नंतर या होम डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीची लोकांना माहिती झाली आणि हळूहळू संपर्क आणि माऊथ पब्लिसिटी द्वारे त्यांच्या कंपनीची माहिती सगळीकडे पसरू लागली. उमेश देवकाते हे गेल्या ४ वर्षांपासून ‘फार्म टू होम’ नावाचा स्वतःचा स्टार्टअप चालवत आहे. ज्याद्वारे ते फळे, भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतात आणि वर्षाला सुमारे 2.5 कोटींची उलाढाल करत आहेत. उमेश देवकरची कथाही खास आहे कारण तो शेतकरी कुटुंबातून आला आहे.

हातगाडी टायकून भाजीविक्री सुरु केली यानंतर उमेश देवकाते यांनी शेतीलाच करिअर बनवले आणि आता ते मोठ्या प्रमाणात कमाई करून मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देण्याचे काम करत आहेत. त्याच्या टीममध्ये सुमारे ३० लोक काम करतात, जे त्यांना शेतीपासून ते मार्केटिंगपर्यंत मदत करतात. केवळ नोकरीच्या भरवश्यावर न बसता देवकाते यांनी शेतीलाच करिअर मानलं आणि आज घडीला कोटींची उलाढाल ते करताय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.