सुपरस्टार बच्चनला पैसे उधार द्यायचे म्हणून पत्रकार महोदय खुश झाले होते…

अमिताभ बच्चन तेव्हा नवीनच खासदार झाले होते. सेंट्रल हॉलमध्ये सगळे निवडून आलेले खासदार जमलेले होते तेव्हाचा हा किस्सा. जेष्ठ पत्रकार अशोक जैन याना त्यावेळी आपण सावकार असल्याचा फील आला होता. बच्चनला कॉफीचं बिल द्यायचं होतं पण अशोक जैन यांच्याकडुन त्यांना पैसे उधार घेण्याची वेळ आली खरी पण बच्चनने त्यानंदात एक गडबड केली होती त्याबद्दलचा हा किस्सा. महाराष्ट्र टाइम्समध्ये दीर्घकाळ त्यांनी दिल्लीतून पत्रकारिता केली, त्यांच्याच राजधानीतून या सदरात त्यांनी हि घटना लिहून ठेवलेली आहे.

एके दिवशी जेव्हा अशोक जैन हे सेंट्रल हॉलमध्ये हजर झाले होते नेमकं त्याच वेळी त्यांची अमिताभ बच्चन यांच्याशी गाठ पडली. अमिताभ बच्चन जैन यांना ओळखत होते तेव्हा त्यांनी जैन यांना विचारलं आप कॉफी लेंगे ? जैन यांनी होकार दर्शवला. बच्चन यांनी लगेच दोन कॉफीची ऑर्डर दिली. वाफाळत्या कॉफीसोबत बच्चन आणि जैन अशाच रँडम गप्पा मारत बसले होते. 

इतक्यात लोकसभेच्या बैठकीची पूर्वसूचना देणारी घंटा घणघणू लागली. अकरा वाजायला दोन मिनिटं बाकी होती आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणेच ती घंटा वाजत होती. लोकसभेचा पहिला तास हा प्रश्नोत्तराचा असतो  आणि ज्या ज्या सदस्यांनी तिथं प्रश्न विचारलेले असतात त्यांनी तिथं हजर राहणं गरजेचं असतं. तो घंटेचा आवाज ऐकताच अमिताभ बच्चन हे कॉफीचा कप अर्धाच टाकून सभागृहाकडे जायला निघाले. यावर जैन यांनी अमिताभला विचारलं कि तिथं तुम्ही प्रश्न विचारलाय का ? मग कशाला इतकी घाई करताय, सावकाश कॉफी संपवूनच जा.

त्या यादीत अमिताभ यांचा प्रश्न नव्हता पण आपण वेळेवर पोहचलो नाही तर आपली खासदारकी जाईल याची भीती अमिताभला होती म्हणून ते जायला निघाले, त्या झपाट्यात अशोक जैन यांनी एका झटक्यात कॉफीचा मग रिकामा केला आणि तेही उठले. दोघांना जाताना पाहताच वेटर धावत दोघांच्या मागे बिल घ्यायला आला. त्यावेळी कॉफी स्वस्त होती ती म्हणजे १ रुपये १० पैसे. 

बिल देण्याकरिता बच्चन यांनी खिशात हात घातला आणि त्यांच्या हातात थेट शंभरची नोट आली, नंतर सगळ्याच शंभरच्या नोटा त्यांच्याकडे होत्या. बच्चनची हि अवस्था बघून जैन यांनी पटकन आपल्या खिशातून १० रुपयांची न काढली आणि मी बिल देतो म्हणून सांगितलं. पण बच्चन हट्टाला पेटले आणि त्यांनी बिल मीच देणार सांगितलं.

जैन यांनी बच्चनला सांगितलं कि हे दहा रुपय मी कर्ज म्हणून तुम्हाला दिले असं समजा. अमिताभ बच्चन सारख्या सुपरस्टारला मी पैसे कर्ज म्हणून दिले असं मला बाहेर सांगता येईल.

पण बच्चन यांनी नकार दिला आणि शंभर रुपयांची नोट त्या वेटरच्या हातावर टेकवली. वेटरने सुटते नसल्याची खून केली आणि सांगितलं कि नो चेंज. यावर कीप द चेंज म्हणत ९८ रुपये आणि ९० पैसे इतकी टीप बच्चनने वेटरला देऊन टाकली. हे त्याकाळचे ९८ रुपये होते म्हणजे आजच्या हिशोबात त्याची कल्पना न केलेली बरी.  

अशोक जैन या घटनविषयी लिहितात कि जर याच प्रमाणात त्या वेटरला अशी टीप मिळत राहिली असती तर तो वेटर आजपर्यंत करोडपती झाला असता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.