वर्तमानपत्रात क्रिकेटवर लिहणाऱ्या पत्रकाराला क्रिकेटच खरं मार्केट कळलं

क्रिकेट म्हटल्यावर डोळ्या समोर उभं राहत ते मोठं मैदान, त्यातील लाखो प्रेक्षक आणि खेळाडू. लहानापासून क्रिकेट बघत असल्याने खेळाडू आणि त्यांच्याबद्दल विशेष प्रेम असायचे. मात्र, हर्षा भोगले आणि रवी शास्त्री हे दोन कमेंटेटर असे होते त्यांच्यामुळे कॉमेंट्रीची आवड लागली.

एकेकाळी रिची बेनॉ, जेफरी बॉयकॉट, टोनी ग्रेग यांची मक्तेदारी असणारे हे क्षेत्र सुनील गावसकर, संजय मांजरेकर, रवी शास्त्री यांच्याबरोबरीने हर्षा भोगले या मराठी माणसाने बरीच मजल गाठली. यापैकी हर्षा भोगले वगळता इतर सगळे क्रिकेटर होते. बाकीचे क्रिकेटर असले तरीही त्यातील बारकावे आणि तंत्र यांचे अचूक वर्णन आपल्या लाघवी आणि रसाळ वाणीने  करणारे भोगले या सर्वांहून सरस ठरतात.   

हर्षा भोगले यांचं जन्म हैद्राबाद येथे मराठी कुटुंबात १९ जुलै १९६१ रोजी झाला. 

त्यांचे वडील ए. डी भोगले आणि आई शालिनी हे मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. हैद्राराबाद येथील पब्लिक स्कुल मध्ये यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर उस्मानिया युनिव्हर्सिटीतून केमिकल इंजिनियरिंगची शिक्षण पूर्ण केले. आणि त्यानंतर त्यांनी आयआयएम मधून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. 

यानंतर हर्षा भोगले यांनी एक जाहिरात एजंसी मध्ये कामाला सुरुवात केली होती. तिथे त्यांनी २ वर्ष काम केले. त्यानंतर त्यांनी एका स्पोर्ट मॅनेजमेंट कंपनी जॉईन केली.      

तसं पाहायला गेलं तर हर्षा भोगले यांचं कॉमेंटेटर म्हणून करियर १९ व्या वर्षीच सुरु झाली. हैद्राराबाद असतांना त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर कॉमेंटेटर म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी भारताच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यांदरम्यान ABC रेडिओ ग्रँडस्टँडसाठी काम केले आणि १९९६ आणि १९९९ क्रिकेट विश्वचषकांमध्ये त्यांच्या बीबीसीसाठी आठ वर्षे काम केले. 

९० च्या दक्षकात नरसिंह राव आणि मनमोहनसिंग ह्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा मुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. त्यामुळे घरोबर घरोघरी टीव्ही पोहचले.बीसीसीआयचे जगमोहन दालमिया ह्यांना टीव्ही प्रसारणाच्या हक्काचं गणित समजलं. आणि क्रिकेट मध्ये पैसा ओळखला तो हर्षा भोगले यांनी. 

रेडिओवर कॉमेंट्री करणारे, वर्तमानपत्रात लिहिणारे हर्षा भोगले यांनी कॅमेराची ताकत जाणली. कॅमेरा माणसाला उघडाही पाडू शकतो हे त्याने समजून घेतलं. त्यांनी आपल्यात तसे बदल करून घेतले.

स्वतःच्या शारीरिक व्यक्तिमत्वावर हर्षा यांनी मेहनत घेतली. बोलण्याचं कौशल्य त्याच्याकडे तर होतेच. दुसरी गोष्ट म्हणजे टीव्हीसाठी कॉमेंट्री करतांना अनेक मोठ्या खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून बसावं लागणार होत. अशावेळी त्यांना मान देऊन आपला आब राखणं सोप नसतं. हर्षा भोगले यांनी हे बरोबर साधलं.

१९९५ पासून हर्षा भोगले ESPN STAR स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री टिमचा भाग होते. यावेळी त्यांनी जगभरात झालेल्या सिरीज, वर्ल्ड कवर केलं आहे. तसेच हर्षा ऑनलाइन, हर्षा अनप्लग्ड आणि स्कूल क्विझ ऑलिम्पियाड सारखे कार्यक्रम होस्ट केले आहेत. 

९२ च्या वर्ल्ड कप आधी वेळी हर्षा भोगले ऑस्ट्रेलियन रेडीओवर काॅमेंट्री करत होते.  तिथले भारतीय आणि विशेषतः मराठी माणसं त्याची काॅमेंट्री ऐकून थक्क व्हायचे. भारतीयांन बरोबर औस्ट्रेलियन नागरिकांना  भोगले यांनी आपल्या आवाजाने प्रभावित केले होत. लोकांनी त्यांना “sexiest voice on the earth’ अशी पदवी सुद्धा दिली होती. तर काही लोक त्याला गमतीने, ‘ऑस्ट्रेलियाचा भविष्यातील पंतप्रधान’ म्हणायचे.

२०१६ मध्ये कॉमेंट्री करतांना भारतीय खेळाडूंपेक्षा विरोधी संघातील खेळाडूंचे कौतुक करतात असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले होते. हे ट्विट अनेकांनी रिट्विट करत हा विषय उचलुन धरला होता.

त्यावेळी भारताचा कॅप्टन असणाऱ्या  महेंद्रसिंग धोनी याने रिट्विट करतं,  मी अजून काय बोलणार, असं लिहलं होत. बच्चन यांनी ट्विट करतांना कोणाचेही नाव घेतले नव्हते. मात्र त्यांचा निशाणा हर्षा भोगले यांच्यावर होता. त्यानंतर भोगले यांनी फेसबुकवरून सविस्तर उत्तर दिले. त्यांच्या मते, कॉमेंटेटर ‘न्यूट्रल’ राहायला हवेत असं उत्तर दिल होत. 

यानंतर आयपीएलच्या सुरुवातीपासून समालोचनाची धुरा सांभाळणाऱ्या या हर्षा भोगले यांना २०१६ मध्ये  करार यंदा रद्द करण्यात आली. सध्या हर्षा भोगले क्रिक बझ वर विश्लेषण करतात. 

 हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.