संसदेच्या आवारात एका महिलेने थेट नेहरूंची कॉलर पकडून जाब विचारला होता, अन् आत्ता

काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टोकाची टीका करणारे ट्विट Go-air विमानकंपनीच्या एका पायलटने केले. दिवसभर मीडियामध्ये या संबंधीच्या बातम्या येत होत्या.

“PM is an idiot. You can call me the same in return. It’s ok. I don’t matter. Bcoz I am not PM. But PM is an idiot. Period,”

अशा आशयच ते ट्विट होत. यानंतर काही क्षणातच Go-air ने त्याच्यावर कारवाई करत संबंधित पायलटला सेवेतून निलंबित केलं. त्यानंतर त्याने हे ट्विट डिलीट करत कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी देखील मागितली.

पण भारताच्या राजकीय इतिहासात काहीस माग वळून बघितलं तर याहून मोठी घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत. या घटनेत केवळ टीका करण्याचं नाही तर थेट पंतप्रधानांची भर संसदेबाहेर कॉलर पकडून जाब विचारण्याचं धाडस एका महिलेनं दाखवलं होत. आणि नेहरू त्या महिलेला शांतपणे उत्तर देत होते.

पण त्याआधी जेष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यातील टीका-टिपन्नीचा एक किस्सा सांगतो, त्याचा संदर्भ पुढे वाचताना येईल.

साधारण १९६३ सालची गोष्ट.

उत्तरप्रदेशच्या फरुखाबाद मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होती. हि निवडणूक जिंकून जेष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया पहिल्यांदा लोकसभेत पोहचले होते. ते पूर्वाश्रमीचे काँग्रेसी त्यामुळे लोहिया आणि नेहरू यांची विचारधारा जरी वेगळी असली तरी दोघांच्यात घट्ट मैत्री होती.

पण संसदेत काम करताना लोहिया यांनी कधीही मैत्री आड येऊ दिली नाही. सभागृहात ते नेहरूंना त्यांचा समाजवाद दिखाऊ आणि ढोंगी असल्याच म्हणत त्यांच्यावर ‘स्युडो -सेक्युलर’ आणि इतर बरीच काही टोकाचे टीका करायचे.

पण त्यांनी ती कधीही वैयक्तिकरित्या लावून घेतली नाही. सभागृहातील टीका ते सभागृहातच सोडून बाहेर यायचे. टोकाच्या आरोपानंतर देखील नेहरूंना ती टीका आक्षेपार्ह वाटली नाही. त्यांनी समर्थन करताना लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचं स्वातंत्र्य असल्याचं म्हणाले होते.

एकदा असच घडलं. एक वयोवृद्ध महिला आपल्याला काही समस्या घेऊन थेट लोहियांच्या पर्यंत आल्या होत्या.

लोहियांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर थेट पंतप्रधान नेहरू यांना प्रत्यक्ष भेटूनच जाब विचारण्याचा सल्ला दिला. नेहरू त्यांना संसदेच्या बाहेर कोठे आणि कधी भेटणार हे देखील सांगून ठेवलं. 

लोहियांच्या सांगण्यावरून ती वयोवृद्ध महिला संसदेच्या बाहेर पोहचली. त्यावेळी पंतप्रधानांची सुरक्षाव्यवस्था आजच्या सारखी कडक नसायची. त्यामुळे कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला अगदी सहज पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांना भेटता येत असे.

त्यावेळी जसे नेहरू गाडीतून खाली उतरले, तसे ती महिला रागारागात पुढे सरसावली आणि थेट नेहरूंच्या कॉलरलाच पकडले. आणि म्हणाली, .

भारत स्वातंत्र्य झाला, तुम्ही देशाचे पंतप्रधान झालात, या सगळ्यात मला म्हातारीला काय मिळालं?

यावर नेहरूंचे उत्तर लोकशाहीला अत्यंत समर्पक असं होत. ते शांतपणे म्हणाले,

तुम्हाला एवढं स्वातंत्र्य मिळालं आहे की, तुम्ही थेट देशाच्या पंतप्रधानांच्या कॉलरला पकडून त्यांना जाब विचारु शकता. 

असं म्हणतात की, त्या महिलेनं फाळणीमध्ये आपलं घर गमावलं होत. तेव्हापासून ती आश्रितसारखी राहत होती. त्यानंतर नेहरूंनी महिलेच्या समस्या स्वतः ऐकल्या होत्या आणि त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देखील दिलं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.