“शिंदे-ठाकरे” बंडाचा कंटाळा आला असेल तर या वेबसिरीज पाहू शकता..

ऑप्शन काय आहे. टिव्ही लावला की एकनाथ शिंदे काय करणार, सेनेचे आमदार गुवाहाटीत, शिवसेना आमचीच, उद्धव ठाकरेंचा निर्णय, संजय राऊतांचा निशाणा हेच पहायला लागतय. कंटाळा येवून मोबाईलवर फेसबुक उघडलं तरी तेच. यू ट्यूबवर जावं म्हणलं तरी तेच. बर यातून कंटाळा आला म्हणून झी 5 वर गेलो तिथं धर्मवीर..

अशा वेळी सगळ्याचाच कंटाळा येतो.

त्यात शिंदे पण कडक भूमिका घेवून कंडका पाडणात. ऐरवी धक्का देणारे फडणवीस आत्ता मात्र शांततेत कार्यक्रम करायला लागलेत. मग करायचं काय? तर करायला पर्याय आहेत. वेबसिरीज. त्यामुळं चागला टाईम पण जातो आणि टेन्शन पण येत नाही. अशाच वेबसिरीजची माहिती आम्ही घेवून आलोय.

१. पंचायत सीझन 2 

ही सिरिज २०२० मध्ये आलेल्या ‘पंचायत’ या सिरिज चा दूसरा सीझन आहे. ही मुख्यत: कॉमेडी ड्रामा सिरिज आहे, उत्तरप्रदेश मधल्या एका छोट्याश्या खेड्याची गोष्ट आहे. यात एका शहरात राहणार्‍या तरुणाची एका छोट्या गावात पंचायत सचिव म्हणून नियुक्ती होते आणि तो गावात आल्या नंतर गाव वाल्यांसोबत त्यांच्या सुख-दुखात मिसळून जाऊन तिथे कसं राहतो ,गावकडचं एकदम सुंदर चित्रण यात करण्यात आलय.

जितेंद्र कुमार हा कलाकार यात मुख्य भूमिकेत आहे. ही सिरिज एकूण ८ एपिसोड्स मध्ये आपल्याला अ‍ॅमेझॉन प्राइम वर पाहायला मिळेल. या सिरिज ला १० पैकी ८.१ आयएमडीबी रेटिंग आहे. 

२. रानबाजार

तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांची मुख्य भूमिका असलेली रानबाजार ही वेब सिरिज मागच्याच महिन्यात रिलीज झालीये. मराठी मधली सर्वात बोल्ड वेब सिरिज म्हणून या सिरिजची बरीच चर्चा झाली होती. रानबाजार ही एक पोलिटिकल थ्रिलर ड्रामा सिरिज आहे जी रेगे सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलीये.

यात मोहन आगाशे, सचिन खेडेकर,मोहन जोशी, मकरंद अनासपुरे आणि उर्मिला कानेटकर यांच्या भूमिका आहेत. या सिरिजचे एकूण १० एपिसोड्स आहेत.

ही सिरिज आपल्याला प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्म वर बघायला मिळेल. या सिरिज ला १० पैकी ७.८ आयएमडीबी रेटिंग आहे. राजकारण सोडायचं पण नाही आणि टाईमपास पण पाहीजे अस काही विचार करत असला तर हा चांगला ऑप्शन आहे. 

३. पांडू

मुंबई पोलिसांच्या आयुष्यावर आधारलेली ही अतिशय सुंदर मराठी वेब सिरिज आहे. या सिरिजचं कथानक हे  गायकवाड आणि कांबळे नावाच्या २ पोलिसांच्या आयुष्यात येणार्‍या रोजच्या घटनांवर बेतलेलं आहे. ही एक हलकी फुलकी कॉमेडी सिरिज आहे पण यातले काही सिन्स आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पाडतात.

सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के हे दिग्गज कलाकार यात मुख्य भूमिकेत आहेत. ही सिरिज अनुशा दांडेकर आणि सारंग साठये यांनी दिग्दर्शित केलीये. यात एकूण ६ एपिसोड्स आहेत. ही सिरिज आपल्याला एमएक्स प्लेयर वर बघायला मिळेल. १११ या सिरिज ला १० पैकी ८.७ आयएमडीबी रेटिंग आहे. 

४. निर्मल पाठक की घरवापसी

ही एक कॉमेडी ड्रामा आणि थ्रीलर हिन्दी वेब सिरिज आहे. या सिरिज मध्ये निर्मल पाठक नावाचा एक तरुण दाखवलाय, जो गावातल्या जातीपाती वरुन करण्यात येणार्‍या भेदभावाला वैतागून गाव सोडून जातो.

हा जातिभेद मिटवण्यासाठी तो परत एकदा गावात येतो आणि कशा प्रकारे जातिभेद मिटवण्यासाठी काम करतो याची रंजक कथा यात रंगवण्यात आलीये. वैभव तत्ववादी हा मराठी कलाकार यात मुख्य भूमिकेत आहे. ही सिरिज तुम्ही सोनी लीव्ह वर बघू शकता. या सिरिज ला १० पैकी ८.६ आयएमडीबी रेटिंग आहे. 

५. होम शांती

ही एक मध्यम वर्गीय कुटुंबावर आधारित कॉमेडी ड्रामा हिन्दी वेब सिरिज आहे. यात दाखवलेल्या एका कुटुंबाचं आपलं स्वत:च एक घर असावं असं स्वप्नं असतं आणि ते बनवण्यासाठीची त्यांची धडपड यात दाखवलीये. आपल्या स्वप्नातलं घर मिळवण्यासाठी या कुटुंबाला काय काय प्रयत्न करावे लागतात? हे घर त्यांना मिळतं का? याची उत्तरे आपल्याला सिरिज बघितल्या नंतरच मिळतील.

ज्येष्ठ अभिनेते मनोज पावा आणि सुप्रिया पाठक यात मुख्य भूमिकेत आहेत. ही सिरिज एकूण ६ एपिसोड्स ची असून तुम्ही ती डिज्नीप्लस हॉट स्टार या प्लॅटफॉर्म वर पाहू शकता. या सिरिज ला १० पैकी ८.२ आयएमडीबी रेटिंग आहे. 

६. एस्केप लाईव्ह

ही सिरिज एक हिंदी क्राइम थ्रीलर ड्रामा सिरिज आहे. या सिरिजची स्टोरि सुरू होते एका ॲप  पासून, या ॲप वरून कंटेंट क्रिएटर्स साठी एक कॉन्टेस्ट आयोजित करण्यात आलेली असते. या कॉन्टेस्ट मध्ये जे जिंकणार त्यांना ३ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं असतं.

आता ही कॉन्टेस्ट कोण जिंकतं आणि त्यासाठी काय काय ऊचापत्या करतात, हे पाहण्याठी आपल्याला ही सिरिजच बघावी लागेल. प्लाबिता बोरठाकूर, सिद्धार्थ आणि सुमेध मुदगलकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. यात एकूण ९ एपिसोड्स आहेत, ही सिरिज तुम्ही डिज्नीप्लस हॉट स्टार वर बघू शकता. सिरिज ला १० पैकी ८.१ आयएमडीबी रेटिंग आहे. 

७. माई

ही एक फॅमिली थ्रीलर हिंदी सिरिज असून एका बदल्याची गोष्ट म्हणजेच एक रिवेंज स्टोरी आहे. एका मध्यमवर्गीय आई समोर तिच्या तरुण मुलीचा अपघातात मृत्यू होतो, काही काळाने तिला समजतं की हा अपघात नसून ठरवून केलेला खून होता.

मग तिथून पुढे ती आपल्या मुलीच्या खुनाचा कसा बदला घेते हे या सिरिज मध्ये दाखवण्यात आलं आहे. यात मुख्य भूमिकेत साक्षी तन्वर ही अभिनेत्री आहे. ही सिरिज एकूण ६ एपिसोड्स सह नेटफ्लिक्स वर आपल्याला पाहायला मिळेल. या सिरिज ला १० पैकी ७.२ आयएमडीबी रेटिंग आहे.

८. गुल्लक

गुल्लक ही एक हलकी फुलकी फॅमीली ड्रामा सिरिज आहे. याचे पहिले २ सीझन्स अत्यंत लोकप्रिय झाले आणि आता याचा तिसरा सीझन आलाय. या सिरिज मध्ये ती प्रत्येक गोष्ट आहे जी एका मध्यमवर्गीय कुटुंबात असते. सुख-दुख, मजा मस्ती या सगळ्या भाव भावना मिळून ही कहाणी तयार झालीये.

ही सिरिज आपल्या फॅमीली सोबत बसून बघण्यासारखी आहे. यात मुख्य भूमिकेत वैभव राज गुप्ता, जमील खान आणि गीतांजली कुलकर्णी हे कलाकार आहेत. यात पहिल्या सीझन मध्ये ५, दुसर्‍यात ५ आणि तिसर्‍यात ५ असे मिळून एकूण १५ एपिसोड्स आहेत. हि सिरीज सोनी लीव्ह वर आपल्याला पाहायला मिळेल.

या सिरिज ला १० पैकी ९.१ इतकं तगडं आयएमडीबी रेटिंग आहे.

९. आश्रम

२०२० मध्ये आलेल्या या सिरिजच्या पहिल्या आणि दुसर्‍या सीझन ला प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादा नंतर आता या सिरिज चा तिसरा सीझन आलाय. यात एका पावरफुल बाबाची कहाणी दाखवण्यात आलीये, ज्यात हा बाबा आपल्या आश्रमाचा आणि लोकांच्या भक्तीचा चुकीचा वापर करून राजकारण करत असतो.

सगळे काळे धंदे या बाबांच्या आश्रमात चालत असतात. यात एक पम्मी नावाचं पात्र आहे, ती या बाबाच्या आश्रमातून पळून गेलेली असते आणि या बाबाचे सगळे काळे धंदे तिला माहिती असतात. तर ही पम्मी या बाबाचे काळे धंदे लोकांसमोर उघडे पाडतीये का बाबा त्याधीच तिला पकडतोय, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही सिरिजचं बघावी लागेल. एकूण १० एपिसोड्सची ही सिरिज आहे आणि यात मुख्य पात्रात बॉबी देओल, आदिती पोहणकर आणि ईशा गुप्ता आपल्याला बघायला मिळेल. ही सिरिज तुम्ही एमएक्स प्लेयर वर पाहू शकता. या सिरिज ला १० पैकी ७.५ आयएमडीबी रेटिंग आहे.

१०. असुर

ही एक क्राईम सस्पेन्स हिंदी ड्रामा सिरिज आहे. यात एकामागून एक मर्डर होत असतात, आणि हे मर्डर करणारा सिरियल किलर एक विशिष्ट मुखवटा लाऊन हे मर्डर करत असतो. या किलर ला पकडण्यासाठी एक टिम तयार केलेली असते. आता त्या टीमला हा किलर सापडतो की त्या टिमच्या मेंबर्सलाच हा मारतो हे सिरिज पाहूनच कळेल.

यात मुख्य भूमिकेत अर्शद वारसी, रिद्धि डोगरा, अमेय वाघ, बरून सोबती आणि शरीब हाशमी हे कलाकार आहेत.  यात एकूण ८ एपिसोड्स आहेत. ही सिरिज वूट या प्लॅटफॉर्म वर आपण पाहू शकता. या सिरिज ला १० पैकी ७.५ आयएमडीबी रेटिंग आहे.

११. लंडन फाइल्स

ही सिरिज एक इन्वेस्टिगेशन सस्पेन्स हिंदी ड्रामा सिरिज आहे. यात लंडन मधल्या एका व्यक्तीची मुलगी हरवलेली असते आणि तिला शोधण्याचं काम एका ऑफिसर कडे येतं. त्याचा आधीच एक वाईट भूतकाळ असतो, हा भूतकाळ काय असतो आणि त्याचा या मुलीशी काय संबंध असतो, तो त्या मुलीला शोधू शकतो का, अशा बर्‍याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ही सिरिज पाहूनच मिळेल.

यात मुख्य पात्रात आहे अर्जुन रामपाल, पुरब कोहली, सपना पब्बी हे कलाकार. ही एकूण ६ एपिसोड्स ची सिरिज आहे. ही सिरिज वूट या प्लॅटफॉर्म वर आपल्याला पाहायला मिळेल आहे. या सिरिज ला १० पैकी ८.२ आयएमडीबी रेटिंग आहे.

तर अशा या खतरनाक ११ वेब सिरिज आहेत. ज्या तुम्हाला सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी अशा सगळ्या प्रकारचा अनुभव देतील. तर लगेच बघून टाका मित्रांनो..!

 

हेही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.